एखाद्यावर विश्वास टाकताना .... तुम्ही काय बघता, कसा विचार करता?
किंवा याऊलट,
एखाद्याचा विश्वास तुम्ही कसा संपादन करता? एखादी गोष्ट त्याला कशी पटवून देता?
मागे एक मेसेज वाचण्यात आलेला,
एखाद्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला तुम्ही कितीही पटवून द्या, त्यांचा विश्वास बसतच नाही, तर ते पटवून देणे व्यर्थ आहे.
त्याऊलट ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, त्यांना काही पटवून द्यायची गरजच भासत नाही.
थोडक्यात स्वत:ला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका.
पण प्रॅक्टीकली हे अशक्य आहे. कारण एक वौश्विक सत्य हे देखील आहे की या जगात नेहमी खरे बोलणारा आणि कधीही खोटे न बोलणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. प्रत्येक जण आयुष्यात एकदा वा अनेकदा सोयीने खोटे बोलतोच. आणि हे सर्वांनाच माहीत असते. त्यामुळे ईथे प्रत्येक जण आपली विश्वासार्हता जपायला धडपडत असतो.
हे सारे सुचायचे तात्कालिक कारण, माझा फ्रिजचा धागा -
तिथे दोन गोष्टी या विश्वास अविश्वासाच्या कोर्टात हजर झाल्या.
1) एक माझी गर्लफ्रेंड जी गेले चार वर्षे माझ्या आयुष्यात आहे.
2) दुसरा माझा नवा फ्रिज जो मी चार दिवसांपूर्वी घेतला
चर्चेत मला प्रामुख्याने 3 गट आढळले.
1) याला गर्लफ्रेंडही नाही आणि याने फ्रिजही नाही घेतला - टोटल अविश्वास
2) याची गर्लफ्रेंडही आहे आणि याने नवीन फ्रिजही घेतला - टोटल विश्वास
3) याला गर्लफ्रेंड वगैरे काही नाहीये. पण याने फ्रिज मात्र जरूर घेतला - अर्ध विश्वास
यावर माझी काही निरीक्षणे,
1) ज्यांनी वरील दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवला. त्यांनी तो विश्वास तिथे नोंदवला आणि पुढे गेले.
2) ज्यांनी अविश्वास दाखवला. त्यांनी तो अविश्वास तिथे नोंदवला. पण पुढे न जाता वादप्रतिवाद करत तिथेच रेंगाळले.
3) ज्यांनी दोन्ही गोष्टींवर विश्वास दाखवला ते माझ्या सर्वच गोष्टींवर विश्वास टाकतात किंवा ज्यांनी अविश्वास दाखवला ते माझ्या सर्वच गोष्टींवर अविश्वास दाखवतात असे म्हणने कायच्या काय होईल. त्यामुळे हे या उदाहरणाला लागू नसले तरी माणूस प्रेमात वा द्वेषात आंधळा होतो असे म्हणतात. कारण तो समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास वा अविश्वास दाखवतो.
तर अश्या केसेसना आपण या धाग्यातून वगळूया.
जो विश्वास वा अविश्वास तर्काच्या कसोटीवर पारखून दाखवला जातो त्याबद्दलच ईथे चर्चा करूया.
उदाहरणार्थ, वरच्या केसमध्ये क्रमांक 3 चा गट ज्यांनी गर्लफ्रेंडवर विश्वास दाखवला मात्र फ्रिजवर नाही त्यांनी दोन्ही बाबी नक्कीच तर्काच्या कसोटीवर परखल्या असतील. याचा अर्थ दोन्ही गोष्टींवर विश्वास वा अविश्वास दाखवणारयांनी तसे केले नसावे असे म्हणायचे नाहीये.
तर धाग्याचा विषयच हा आहे की तुम्ही एखाद्याच्या एका गोष्टीवर विश्वास टाकताना तो कसा टाकता?
त्या व्यक्तीबद्दलचे आपले आधीचे मत, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, आपले ज्ञान वापरून तर्काची कसोटी, उलट तपासणी, वगैरे वगैरे..
तर याचाच उलट प्रश्न हा आहे की एखाद्याला विश्वास पटवून देताना तुम्ही तो कसा पटवून देता?
हा प्रश्न किंवा हे दोन्ही प्रश्न सोशलसाईटवर आपली उत्तरे आणि निकष बदलू शकतात. कारण ईथे प्रत्यक्ष व्यक्तीला आपण पाहिले नसते. पण तरीही येथील दिर्घ वावरानंतर काही मते बनवली असतात.
तेव्हा तुमची विचार प्रक्रिया नेमकी कशी काम करते?
तळटीप - धागा माझ्या फ्रिजच्या उदाहरणावरून सुचला तरी त्यावर ईथे पुन्हा तीच चर्चा नकोय, त्यासाठी तो धागा खुला आहे. ईथे आपण सर्वांनाच या विश्वास अविश्वासाच्या कसोटीवर उतरावे लागले असणारच. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने. तर त्यानुसार जनरल चर्चा अपेक्षित आहे. आपले स्वताचे अनुभव वाचायला आवडतील पण याची त्याची नावे घेऊन वाद टाळावेत ही विनंती.
जि, ववि म्हणजे वर्षा विहार ना
जि, ववि म्हणजे वर्षा विहार ना?! का रून्मेषला तिकडे धाडत आहेस?? महाराष्ट्रात दुष्काळ यावा अशी इच्छा आहे काय तुझी?
तानसेन जसा गाऊन पाऊस आणायचा तस ह्याने पकवून पाऊस पळवला तर काय करेल बिचारी जनता...
याआधीच्या एखाद्या वर्षाविहार
याआधीच्या एखाद्या वर्षाविहार मध्ये ऋन्मेष वावरला नसेल कशावरून?...
सीमंतिनी, जोक्स द अपार्ट. पण
सीमंतिनी, जोक्स द अपार्ट. पण खरेच माझ्यात ईतकी शक्ती असती तर मागे उत्तराखण्डात झालेली ढगफुटी आणि पर्जन्यवृष्टी रोखून कित्येकांचे जीव वाचवले असते जे तेथील देवालाही जमले नव्हते..
पण गंमतेची गोष्ट तरीही लोकं देवावर विश्वास ठेवतात.. कुठून येतो हा हे एक कोडेच आहे
ऋ, आस्तिक-नास्तिकतेवर
ऋ, आस्तिक-नास्तिकतेवर स्वतंत्र धागा काढा.. वादळी ठरेल आणि आपली बहुमुल्य मते मायबोलीकरांना समजतील.
हो एक नवीन धागा आलाच पाहिजे
हो एक नवीन धागा आलाच पाहिजे
Pages