why is there something rather than nothing??????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 28 June, 2017 - 05:38

देव,धर्म,मृत्युनंतरचे जीवन,अमानवी शक्ती व अनेक गोष्टी मानवाला आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही लहानपणी या गोष्टींवर विश्वास ठेवायचो,त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.बहुतांश लोक या नशेतून बाहेर येत नाहीत. आयुष्यभर या नशेत राहण्यामागे उत्क्रांतीवादानुसार काही कारणही असेल .मला याचे विश्लेषण करत बसायचे नाही.
काही वर्षांपुर्वी मी आमच्या साताराजवळ असलेल्य महीमानगडावर गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती,सुर्य मावळूण चंद्र उगवत होता.निरव शांतता होती.अश्या वेळी काही फिलॉसॉफीकल प्रश्न मला पडतात.आणी त्या कातरवेळी तो अचाट प्रश्न माझ्या मनाच्या पटलावर अचानक अवतरला.हे विश्व ,मुर्त अमुर्त जे काही आहे /असेल ते मुळात अस्तित्वात का आहे? आस्तिकांसाठी काही काळ देवाचे अस्तित्व मान्य केले तरी या मुर्त अमुर्तात तोही येतो,हे सगळं काय आहे? .अनेक दिर्घीका आहेत,आकाशगंगा आहेत,त्यात अब्जावधी तारे आहेत.अनेकविश्वे(multiverse) अस्तित्वात असतील तरी मला त्याच्या खोलात जायचे नाही.मला या अस्तित्वाचे मुळ कारण काय या प्रश्नाने विचलीत व्हायला झाले.
why is there something rather than nothing????
हा प्रश्न त्यादीवशी ज्या तिव्रतेने माझ्यावर आदळला तसा कुठलाच प्रश्न आजवर माझ्या मनावर आघात करु शकलेला नाही.मग सुरु झाले या प्रश्नाचा मागोवा घेणे.थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आले की हा प्रश्न सद्य तत्वज्ञातला(contemporary philosophy) सर्वात जटील प्रश्न आहे.भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान जिथे एकमेकांना छेदतात तो हा बिंदू आहे.थोड्या वाचनातून हे लक्षात आले की पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे.absolute voidsकिंवा absolute nothingness म्हणजे काय? तर काहीच नाही,मुर्त अमुर्त संकल्पना ,गणितीय तथ्ये,काहीच अस्तित्वात नसलेलं काहीतरी(?) Not even the concept of nothingness!!!
पण काही फिलॉसॉफर्स असे मानतात की पुर्ण शुन्यावस्था ही मुळातच अस्थिर असते,(absolute nothingness is inherently unstable).त्यामुळे त्यांच्यामते हे विश्व शुन्यातून अचानक उगम पावले आहे.महाविस्फोटाचा सिद्धांत(big bang theory)याचे द्योतक आहे.
पण कार्यकारण भावाचा आपल्यावर खूप पगडा असल्याने something from nothing हे मान्य होत नाही.देव धर्म ,मृत्युनंतरचे जीवन अश्या थोड्या उथळ प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मला बरेच वैचारीक मैथुन करायला लावले आहे.कदाचीत why is there something rather than nothing या प्रश्नाचे उत्तर कधीच सापडणार नाही,की सापडेल? आपल्याला काय वाटते?चर्चा अपेक्षीत आहे.

१.why is there something rather than nothing याचे आपल्याकडे काही उत्तर आहे का?

२.पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे असे आपल्याला वाटते का?

३.हा प्रश्न आपल्याला कधी पडला होता का? असल्यास तुमच्या धार्मिक ,निधर्मी,अध्यात्मीक धारणेवर याचा काय प्रभाव पडला???
धन्यवाद..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२.पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे असे आपल्याला वाटते का? >>>
आजवर आणि आतापर्यंत तरी एवढंच वाटतं की पुर्ण शुन्यावस्था शक्य आहे... हे का वाटतं, कशामुळे वाटतं ते माहीत नाही फक्त वाटतं..अगदी लहानपणापासून Happy

हो, absolute void शक्य आहे, आणि बर्‍याच वेळा अनुभवलाय, जेव्हा तुटपुंज्या स्कॉलरशिपवर जगत होतो तेंव्हा महिन्याअखेरिला अनुभवलाय, इंटर्व्युव्ह चांगला जाउनपण सिलेक्शन झालं नाही तेंव्हाही , आणि एकदा 'नकार' भेटल्यावर Wink हा शेवटचा बरेच दिवस टिकुन होता

Student: What is the purpose of universe?

Guru: There is an answer to that question. It is the same answer to the question What is the square root of a tomato?

Student: That's a stupid question.

Guru: Exactly!

sooner or later you're going to realize just as I did that there is a difference between knowing the path and walking the path

<<<<त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.>>>>>
+१.
झिंगच म्हणायचे त्याला.
दुर्दैवाने या वयात बरेचसे लोक भेटतात,जे दुसर्‍याला आपले विचार बळेच ऐकवत बसतात!

असे प्रश्न मला पडले होते - त्याचा परिणाम असा झाला की मला असे वाटू लागले की काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाव्या लागतात, नुसते वाचून, ऐकून समाधान होत नाही - हे विचार मनाने करायचे. आपणच मनाने हळू हळू शून्यावस्थेकडे जायचा प्रयत्न केला पाहिजे - म्हणजे जोपर्यंत मनात वासना शिल्लक आहेत तोपर्यंत हे कठीण. मग जगात भौतिक देहाने राहून मन कसे स्थिर करावे हे आधी शिकावे लागेल.
जसे अंकगणित, बीजगणित, भूमिती नंतर क्वांटम मेकॅनिक्स समजायचे तर आधी स्टॅटिस्टिक्स, कॅलक्युलस वगैरे शिकावे लागते.

<<<भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान जिथे एकमेकांना छेदतात तो हा बिंदू आहे.>>>
आधी भौतिक शास्त्रात GUT (Grand Unified Theory) शोधून काढा मग एकदा भौतिक शास्त्र समजल्यावर त्यावरची पायरी म्हणजे भौतिक नि मानसिक शास्त्र यांची एकच थेअरि शोधता येईल, नाहीतर कुठेतरी एक दुवा राहून जाईल.

"हे विश्व अस्तित्वात का आहे" हा प्रश्न विचारायच्या आधी "हे विश्व अस्तित्वात आहे का?" हा प्रश्न विचारायला हवा.
मॅट्रिक्स चित्रपटासारखं हे आभासी जग फक्त मनाचे भास असू शकतात. तुम्ही फक्त तुमच्या मनाच्या अस्तित्वाची खात्री देऊ शकता.
"I think therefore I am" याबद्दल अजून वाचून बघा.

जेव्हा आपल्याला जोराची शिंक येते तेव्हाचा एक क्षण आपण संपुर्ण शुन्यावस्थेत जातो. >>>
ह्रा शिंक येण्याच्या वेळी सर्व शरीरक्रिया बंद होत असल्या तरी त्या अवस्थेला शुन्यावस्था म्हणता येणार नाही... शुन्यावस्था म्हणजे योगिक क्रियांद्वारे समाधी अवस्थेत जाणं.. त्यात सहजता तर असतेच पण आपलं स्वत: च्या शरीरावर नियंत्रण ही असतं शिंक येतेवेळी होणार्या त्रासात हि लक्षणं नाहीत.

ह्रा शिंक येण्याच्या वेळी सर्व शरीरक्रिया बंद होत असल्या तरी
>>>>
नुसते शरीरक्रिया नाही तर तुमचे विचारही थांबतात. शून्य होतात. जग जगतेय मरतेय तुम्हाला त्या क्षणाला काही घेणेदेणे नसते.

म्हणून बुवा/ बाबा लोकं तपकीर ओढायचे!!! (आजका ग्यान)
मध्यंतरी तपकीर डाऊनमार्केट झाल्याने हुक्का, जॉईन्ट आणि सिगारेट वाले कोणते शंकर, स्वामी आणि गजानन महाराज आले (हे शंकर एहेसान लॉय चालीत वाचू नये). नवे बापू आणि मैया कॅटेगरी काय करतात त्या पोकळीत जायला ते जाणून घ्यायला आवडेल.
अर्थात पूर्वीच्या बापू लोकांकडे गाड्या नसल्याने ते लोकं ड्राईव्ह नाही करायचे मेरुवानाच्या नशेत ते लक्षात ठेवा. हल्लीचे पोकळीत जाताना ड्रायव्हर ठेवत असतील बहुतेक. Proud

"श्रीज्ञानदेवतेहत्तीसी' मधून शुन्यावस्था..

अभंग १९

स्वरुप उभे तुर्येचे मेळे । अर्धपर्नीं अरुप खेळे ।
दसवे द्वारीं ढळढळ उसळे । महातेज ॥१९॥
टीकाः
तुरीयेचिया साधनमेळी । साधन साधोनि उर्ध्व ओळी । गुरुकृपें चालितां चालीं । स्वरुप दिसे ॥१॥
अंगुष्ठ चोखित श्रीहरी । वटपत्रीं क्रीडा करी । सहस्त्रदळाचिया उपारे । नवल जालें ॥२॥
निर्गुणाची नवलपुरी । देखियेली चिन्मयनेत्री । जीवन हें तयामाझारी । मिळोनि गेलें ॥३॥
दसवे द्वारातोनि जातां सहजानुभव देखतां । शुन्य देखणें शुन्या मिळतां । शुन्यचि जालें ॥४॥
तंव ते जीवन ब्रह्मारंघ्रीं । केवळ पहाणिया माझारी । तेथेंचि स्वरुप साक्षात्कारी । सहस्त्रदळीं ॥५॥
पहातां हें दशमद्वार । नवल तेजाचा प्रकार । ढळढळ महातेजसागर उंचबळला ॥६॥
महासागर दाटला । तो नयनपुटां मिळाला । नयनातोनि जीव घाला । निजसुखें ॥७॥
आत्मयाची केवल दृष्टी । त्याचें अग्र शुन्य दिठी । जेथ होय उठाउठी जीवनाची ॥८॥
तेथ आपणपे पहाणें । आपाअपणां भेटणें । अशमद्वारीं ऐक्यपणें । एकात्मते ॥९॥
दृष्टी अग्रशुन्यसार । तेचि सत्य दशमद्वार । जये ठायी मधुकर । खेळतसे ॥१०॥
दशमद्वार अति सान । जेथ रिघालें गगन । जेथ शुन्याहि विलीन । होवोनि ठेलें ॥११॥
बोजामाजीं सकळवृक्ष । तैसेंचि तेथ दृश्यादृश्य । व्यक्तव्यक्त हे लयास । जाईजे पा ॥१२॥
तरंग उदकीं निर्मिला । तो तेथिचि लया गेला । तैसा प्रत्ययो येतुला । दशमद्वरीं ॥१३॥
पिपिलिका मार्ग गहन । तयेपरी होवोनि लीन । ऐल सोडिलें गगनीं गगन । अवघेचि ॥१४॥
ग्रासिली जीताची ओवरी । रामकृष्ण शुन्यामाझारी दोन शुन्यातु साचारी । एकाचि शुन्य ॥१५॥
रामकृष्ण हें जीवन जहालें इये शुन्यातुन । गोगान शद्व वोलीन । इये पाठीं ॥१६॥
ऐसे दशमद्वारीचें छिद्र । यासीच । बोलती ब्रह्मरंघ्र । पैल सहस्त्र दळचक्र । आत्मयाचें ॥१७॥
संतजनी प्रत्यय बोलिला । जो कां सहस्त्रदळीं आला । दशमद्वार शब्द योजिला । ब्रह्मारघ्रा ॥१८॥
ऐसें येथिचें दशमद्वार । जेथ निर्गुण साक्षात्कार । स्वयंब्रह्मा ज्ञानेश्वर होविनि ठेले ॥१९॥
नवल येथिचे निगुण । जेथ निमाले सगुण । अरुप ते अति गहन । क्रीडा करी ॥२०॥
जया विशेषरुप नाहीं । तेचि अरुप बालिलें पाहीं । निगुणाची नवालाई । काय सांगो ॥२१॥

सर्व वासना उपभोगल्यावर विरक्ती आल्याशिवाय अध्यात्माच्या वाटेला जाऊ नये असे माझे वैयक्तिक स्पष्ट मत आहे. सर्व वासना भोगण्यास लायक होण्यास सत्ता व संपत्ती याची जरुर असते. वासनेत गुंतून पडलेल्या लोकांना आध्यात्मिक शांती लाभू शकत नाही, ती वासना उपभोगल्याशिवाय, त्यातले फोलपण कळल्याशिवाय त्यापासून सोडवून घेता येत नाही. सर्वसुखं पायाशी लोळण घेत असतांना जी विरक्ती येते, त्या विरक्तीतूनच परमसुखाची ओढ लागते. ती परमसुखाची ओढ समाधीकडे नेते. समाधी शुन्यावस्थेकडे आणि शुन्यावस्था परमज्ञानाकडे. (यातून अनेक प्रश्न उभे राहतील याची कल्पना आहे, हळू हळू उत्तरे मिळत राहतीलच Happy )

तेव्हा (या स्पेसिफिक विषयावर) इतर कसलेही बौद्धिक काथ्याकूट घालण्यापेक्षा मार्ग चालणे अतिशय उत्तम आहे. रस्त्याच्या कडेला बसून हा रस्ता कुठे जातो, कसा जातो, तिथे काय काय मिळतं वगैरे चर्चा व्यर्थ असतात, तद्वतच अध्यात्माच्या विषयांवरच्या अशा चर्चा व्यर्थ असतात. त्यापेक्षा आपण कुठे आहोत, स्वतःचे वैयक्तिक असे काय प्रश्न आहेत, ते अध्यात्माच्या मदतीने कसे सोडवता येतील याबद्दल विचार करणे श्रेयस्कर.

टोमॅटोचं स्क्वेअर-रुट काय हे समजल्याशिवाय विश्वाचे कारण काय हे समजायच्या वाटेला जाऊ नये असे माझे वैयक्तिक स्पष्ट मत आहे. मुळ प्रश्नातलाच फोलपणा मान्य करण्यासाठी लागणारा मुक्त दृष्टीकोन (Open Mindset) सगळ्यांकडेच असतो असं नाही. असा मुक्त दृष्टीकोन मिळवण्यासाठी प्रयत्नपुर्वक मेहनत घ्यावि लागते. ते करण्यापेक्षा बहुतेक जण बौद्धिक काथ्याकूट आणि सांगोवांगीच्या आध्यात्मिक अवडंबरात अडकुन बसतात. त्याची देखिल एक नशा असते आणि कित्येक जणं या व्यसनातुन कधीच बाहेर पडु शकत नाहीत हे देखिल तितकंच खरं.

>> रस्त्याच्या कडेला बसून हा रस्ता कुठे जातो, कसा जातो, तिथे काय काय मिळतं वगैरे चर्चा व्यर्थ असतात

का बरं? मला जर दिल्लीला जाउन पराठे खायचे असतील तर मी बसलेला रस्ता चेन्नईला तर घेउन जात नाही ना ही चिकित्सा झालीच पाहीजे ना?

मला जर दिल्लीला जाउन पराठे खायचे असतील तर मी बसलेला रस्ता चेन्नईला तर घेउन जात नाही ना ही चिकित्सा झालीच पाहीजे ना?

>> अर्थातच, पण तेव्हाच, जेव्हा तुम्हाला दिल्लीलाच जाऊन पराठेच खायचे आहेत हे पक्के माहित असते.

पण
हे दिल्लीला जाणं निरर्थक आहे, तीथं पराठे भेटतच नाही असं आपल्या आसपासचे (सो कॉल्ड हितचिंतक) सगळे ओरडून ओरडून सांगत असतील तर??????
दिल्लीला जायचा प्रयत्न करावा कि नै?? Happy

अर्थात कोणीही सकारात्मक आणि महत्वाकांक्षी व्यक्ति तो करणारच पण मग त्याला जग वेडं म्हणतं!!!

अध्यात्माचा मार्ग एकच असतो, तो एकाच ठिकाणी जातो, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता असे फाटे नसतात. हां पण, दिल्ली, चेन्नई, कलकत्त्यावरुन तुम्हाला इथेच येणं आहे. तुम्ही कुठेही असलात तरी जो कोणता रस्ता समोर आहे त्यावर चालणे आवश्यक, दुसरा कोणता रस्ता नसतोच. हातात फक्त चालायला लागणे आहे. रस्ता तुम्हाला तिथंच पोचवणार आहे. म्हणून कडेला बसून रस्त्याबद्दल फक्त गप्पा हाणण्यात वेळ घालवू नये असे माझं म्हणणं आहे.

>> अर्थातच, पण तेव्हाच, जेव्हा तुम्हाला दिल्लीलाच जाऊन पराठेच खायचे आहेत हे पक्के माहित असते.
"If you don't know where you are going, any road will get you there." --

असो.

{टोमॅटोचं स्क्वेअर-रुट काय हे समजल्याशिवाय विश्वाचे कारण काय हे समजायच्या वाटेला जाऊ नये असे माझे वैयक्तिक स्पष्ट मत आहे. मुळ प्रश्नातलाच फोलपणा मान्य करण्यासाठी लागणारा मुक्त दृष्टीकोन (Open Mindset) सगळ्यांकडेच असतो असं नाही. असा मुक्त दृष्टीकोन मिळवण्यासाठी प्रयत्नपुर्वक मेहनत घ्यावि लागते. ते करण्यापेक्षा बहुतेक जण बौद्धिक काथ्याकूट आणि सांगोवांगीच्या आध्यात्मिक अवडंबरात अडकुन बसतात. त्याची देखिल एक नशा असते आणि कित्येक जणं या व्यसनातुन कधीच बाहेर पडु शकत नाहीत हे देखिल तितकंच खरं{}

या प्रतिसादात मला जे सांगायचं आहे ते सांगुन झालंय. याला तुल्यबळ प्रतिसाद येइपर्यंत लेखनसीमा

शून्य पुर्णांक अवस्था म्हणजे आपला प्रतिसाद टाकायचा किंवा आपला धागा काढायचा आणि पुढे निघून जायचे. त्याला कोणी चांगले वा वाईट म्हटले किंवा त्यावर काय प्रतिसाद आले याचा विचार मनात आलाच नाही पाहिजे.

Pages