why is there something rather than nothing??????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 28 June, 2017 - 05:38

देव,धर्म,मृत्युनंतरचे जीवन,अमानवी शक्ती व अनेक गोष्टी मानवाला आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही लहानपणी या गोष्टींवर विश्वास ठेवायचो,त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.बहुतांश लोक या नशेतून बाहेर येत नाहीत. आयुष्यभर या नशेत राहण्यामागे उत्क्रांतीवादानुसार काही कारणही असेल .मला याचे विश्लेषण करत बसायचे नाही.
काही वर्षांपुर्वी मी आमच्या साताराजवळ असलेल्य महीमानगडावर गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती,सुर्य मावळूण चंद्र उगवत होता.निरव शांतता होती.अश्या वेळी काही फिलॉसॉफीकल प्रश्न मला पडतात.आणी त्या कातरवेळी तो अचाट प्रश्न माझ्या मनाच्या पटलावर अचानक अवतरला.हे विश्व ,मुर्त अमुर्त जे काही आहे /असेल ते मुळात अस्तित्वात का आहे? आस्तिकांसाठी काही काळ देवाचे अस्तित्व मान्य केले तरी या मुर्त अमुर्तात तोही येतो,हे सगळं काय आहे? .अनेक दिर्घीका आहेत,आकाशगंगा आहेत,त्यात अब्जावधी तारे आहेत.अनेकविश्वे(multiverse) अस्तित्वात असतील तरी मला त्याच्या खोलात जायचे नाही.मला या अस्तित्वाचे मुळ कारण काय या प्रश्नाने विचलीत व्हायला झाले.
why is there something rather than nothing????
हा प्रश्न त्यादीवशी ज्या तिव्रतेने माझ्यावर आदळला तसा कुठलाच प्रश्न आजवर माझ्या मनावर आघात करु शकलेला नाही.मग सुरु झाले या प्रश्नाचा मागोवा घेणे.थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आले की हा प्रश्न सद्य तत्वज्ञातला(contemporary philosophy) सर्वात जटील प्रश्न आहे.भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान जिथे एकमेकांना छेदतात तो हा बिंदू आहे.थोड्या वाचनातून हे लक्षात आले की पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे.absolute voidsकिंवा absolute nothingness म्हणजे काय? तर काहीच नाही,मुर्त अमुर्त संकल्पना ,गणितीय तथ्ये,काहीच अस्तित्वात नसलेलं काहीतरी(?) Not even the concept of nothingness!!!
पण काही फिलॉसॉफर्स असे मानतात की पुर्ण शुन्यावस्था ही मुळातच अस्थिर असते,(absolute nothingness is inherently unstable).त्यामुळे त्यांच्यामते हे विश्व शुन्यातून अचानक उगम पावले आहे.महाविस्फोटाचा सिद्धांत(big bang theory)याचे द्योतक आहे.
पण कार्यकारण भावाचा आपल्यावर खूप पगडा असल्याने something from nothing हे मान्य होत नाही.देव धर्म ,मृत्युनंतरचे जीवन अश्या थोड्या उथळ प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मला बरेच वैचारीक मैथुन करायला लावले आहे.कदाचीत why is there something rather than nothing या प्रश्नाचे उत्तर कधीच सापडणार नाही,की सापडेल? आपल्याला काय वाटते?चर्चा अपेक्षीत आहे.

१.why is there something rather than nothing याचे आपल्याकडे काही उत्तर आहे का?

२.पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे असे आपल्याला वाटते का?

३.हा प्रश्न आपल्याला कधी पडला होता का? असल्यास तुमच्या धार्मिक ,निधर्मी,अध्यात्मीक धारणेवर याचा काय प्रभाव पडला???
धन्यवाद..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व वासना उपभोगल्यावर विरक्ती आल्याशिवाय अध्यात्माच्या वाटेला जाऊ नये असे माझे वैयक्तिक स्पष्ट मत आहे.
>>>>>>>>

हे काही पटले नाही.
महर्षी वाल्मिकी बनायला आधी दरोडेखोर वाल्या बनले पाहिजे असे वाटते.
दारू वाईट आहे हे समजायला दारूची चव चाखणे गरजेचे नसते.

Pages