'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन

Submitted by rar on 26 June, 2017 - 13:59

रात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्‍या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.
आता पडद्यावर एका पारावर बसलेली गाणारी मंडळी. जत्रेसाठी आलेली, त्यातले काही त्याच्यासारखेच गाडीवान. सगळेच पुरुष. विविध वयाचे, आकाराचे पुरुष. या फ्रेम मधे एकही स्त्री नाही. सगळेजण मस्ती मजेच्या माहोल मधे बसल्या बसल्या ठेका धरुन गाताहेत. मन्नाडेचा लोकसंगीताला साजेसा आवाज. ' चलत मुसाफिर मोह लिया रे, पिंजडेवाली मुनिया. फ्रेम मधे गाडीत टांगलेल्या कंदीलाच्या प्रकाशात हातातल्या छोट्याश्या आरशात स्वतःच रुप पाहून हरखून गेलेली ‘ती’ या गाण्यातली एकमेव स्त्री. ती देखील एक कंपनीतली बाई. नौटंकी. खांद्यावर कांबळं टाकलेला राज ह्या गाणार्‍यांच्या ग्रुपमधे येऊन बसतो. हातात छोटा डफ. राज कपूर हा केवळ ह्या ग्रुपचा एक भाग. पण गाणारा मुख्य गायक कोणी वेगळाच. अनेकदा ह्या गायकाच्या चेहर्‍यावर क्लोझअप्स येतात. गायक समरसून गातोय. नव्हे मांडी घालून बसला असला तरी चक्क नाचतोय. शैलेंद्रच्या शब्दांना, शंकर जयकिशनच्या संगीताला, मन्नाडेच्या आवाजाला, नव्हे त्या गाण्याच्या अवघ्या सिच्युएशन रात्री पारावरच्या त्या रंगलेल्या लोकसंगीताच्या ठेक्याला, त्या गाण्याला पुरेपुर न्याय देतोय. आपल्याही नकळत आपण त्याच्या त्या देहबोलीची दाद द्यायला लागतो. त्याच्यातल्या अंगभूत, नॅचरल रिदमवर आपण फिदा होतो. त्या कलाकाराचं नाव आपल्याला माहित नसतं, पुढे कधी आपण ते मुद्दाम शोधायलाही जात नाही. पण तरीही 'चलत मुसाफिर मोह लिया रे' हे गाणं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं, तेव्हा तेव्हा आपल्या नजरेसमोर हा गळ्यात गमचा,पटका सोडलेला, पांढरा कुडता घातलेला, मिशीत मिश्कील हसणारा, आणि त्या वातावरणात फिट्ट बसणारा गायक डोळ्यासमोर येतो. पडद्यावरचा तो कलाकार म्हणजे क्रिशन.
ते साल १९६६, तो सिनेमा तीसरी कसम. एका अर्थानं माझ्या वडिलांच्या जनरेशनच्या, जमान्याचा हा सिनेमा, हे वातावरण, हे पिक्चरायझेशन, हे लिरीक्स, ही चाल.

माझ्या जनरेशनच्या ट्रेंडला अनुसरुन एक दिवस हे जुनं गाणं 'रीमीक्स' स्वरुपात नव्यानं पहायला, ऐकायला मिळतं, सगळीकडे, जिकडे तिकडे.
साल २०१७. सिनेमा 'बद्रीनाथ की दुल्हनीया'. बैलगाडी ऐवजी मोटारसायकल, बाईक वगैरे. जत्रेच्या जागी माझ्या जनरेशनला साजेसा डिस्को क्लबचा माहोल. होळीची सिच्युएशन. प्लॅशींग लाईट्स, डान्स फ्लोअर, जॅझी कपडे. फ्रेममधे पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रीयांची संख्या. सध्याच्या काळाप्रमाणे टाईट, फिगर हगींग कपडे. “बेबी बडी भोली है, बेबी की रंग दी चोली है, अंग्रेजी मे खिटपिट मॅडमरी, बुरा न मानो होली है” असं हे होळी रॅप. पण गाण्याची चाल, ठेका, हार्मोनियमचा तुकडा मात्र जुनाच. ५१ वर्षापूर्वीचा. ती 'पिंजडेवाली मुनिया' आता 'बद्री की दुल्हनिया' च्या नव्या टेक्नो झगझगीत रुपात. आणि डोळ्यावर गॉगल घालून, फ्रंट ओपन स्लीव्हलेस जॅकेट मधून आपले सिक्स पॅक्स दाखवत नखशिखांत डिस्को स्टेप्स करत नाचणारा, अंगात नाचाची लय मुरलेला वरूण.
हिंदी सिनेमात आजवर अनेक गाण्यांची रीमीक्स झाली. काही गाण्यांची रीमीक्स परत परत झाली. सध्या तर परत एकदा ‘जुनी गाणी नवीन स्वरुपात विथ सम रॅप’ हीच स्टाईल आहे. काही रीमीक्स मस्तपैकी कडक जमलेली, काही सपशेल फसलेली. हा देखील एक वेगळा लेखाचा विषय.
पण 'चलत मुसाफीर मोह लिया रे' ह्या गाण्याचं ‘मुनिया रे मुनिया, बद्री की दुल्हनीया’ हे रीमीक्स मला एका फार वेगळ्या कारणासाठी क्लीक झालं. युनिक, खास, स्पेशल वाटलं. ते कारण म्हणजे १९६६ साली तीसरी कसम मधलं गाणं ज्या कलाकारावर चित्रीत झालंय तो कलाकार होता क्रिशन धवन. आणि त्यानंतर ५१ वर्षांनी तेच गाणं रीमीक्स स्वरुपात ज्या कलाकारावर चित्रीत झालं तो कलाकार म्हणजे क्रिशन धवनचा नातू - वरूण धवन. कमालीचा योगायोग !
खरं तर मुळात तीसरी कसम मधलं गाणंही राज वर चित्रीत न होता किशन धवन वर चित्रीत व्हावं. हिंदी सिनेमात पिढ्यानपिढ्या राज्य करणारे कपूर तेव्हा आणि आताही असताना, ह्या गाण्याचं रीमीक्स त्यांच्यापैकी कोणाच्या वाट्याला येऊ नये. आणि 'चलत मुसाफिर' सारख्या त्या वेळच्या आणि 'बद्री की दुल्हनिया' ह्या आत्ताच्या प्रचंड गाजलेल्या गाण्यात 'धवन कुटूंबाचं ३जी कनेक्शन' पहायला मिळावं. आता हा जमलेला योगायोग की जमवून आणलेला योगायोग? कुणास ठाऊक. पण हा योगायोग मला खास वाटला, एक्साईट करून गेला.
हे लिहीता लिहीता मला अजून एक जाणवलं की 'चलत मुसाफिर' चा विषय निघाला की माझे बाबा क्रीशन धवनला पाहून 'क्या बात है, काय रिदम आहे साल्यात' अशी हमखास दाद द्यायचे. गंमत म्हणजे 'बद्री की दुल्हनिया' पाहताना वरूण धवनचा डान्स बघून माझ्याकडूनही दिलखुलासपणे ' जबर्‍या डान्स करतो. काय रिदम आहे साल्यात' हीच दाद निघते. कमालीचा योगायोग !

ह्या योगायोगाच्या लाईटमधे आता जेव्हा मी ही दोन्ही गाणी पाहते, किंबहुना अनेकदा मुद्दाम एकामागून एक पाहते. धमाल वाटते एकदम. एकूणच गाणी पाहताना, सिनेमा पाहताना, त्याबद्दल वाचताना, ऐकताना, विचार करताना ही अशी एखादी छोटीशी पण मस्त माहिती मिळून जाते, कळत नकळत. ह्या अश्या गोष्टीतून मिळणारं थ्रील, किक,मजा काही वेगळीच!

चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडेवाली मुनिया (तीसरी कसम, १९६६)
https://youtu.be/rnUYn4TosUs

तुझको बनाकर के ले जायेंगे बद्री की दुल्हनिया ( बद्री की दुल्हनिया, २०१७)
https://youtu.be/1YBl3Zbt80A

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice article.
But I don't think Krishan and Varun Dhawan are related. Krishan's son was actor Dilip Dhawan who is no way related to David. David's father was a bank official.

चिन्मय, माहिती कनफर्म केली आहे. शिवाय नुकताच एका जावेद अख्तर च्या मुलाखतीत हा रेफरन्स मिळाला, त्याचा व्हीडीयो पण माझ्याकडे आहे.
विकीपीडीयाची माहिती ग्राह्य मानायची की जावेद अख्तरने प्रत्यक्ष कार्यक्रमात सांगीतलेली, किंवा पुस्तकात मिळालेली हा प्रश्न मलाही पडला होता.

I am pretty sure Javed Akhtar got the info wrong. Could you give a link to his video? Or which book?

मेल करते तुला व्हीडीयो. आणि जावेद अख्तर ने चुकीचं सांगीतलं असेल तर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना ही माहिती द्यायला हवी की चुकीची माहिती दिली जातीये म्हणून. इन दॅट केस देखील मला हा रीसर्च महत्त्वाचा वाटतो.

IMDb says Father of Dilip Dhavan. Dilip acted in fair amount of movies and in tv serials. Ads. Known face in the eighties. Krishan Dhavan was in guide. Varun Dhavan is now happiness ambassador for SAB tv. .Badri ki D legitimizes harrassment and stalking of young girls so i had not checked out the movie. Will see the song now.

Happy मस्त!
भिकार २G कनेक्सन म्हंजे राजेश रोशनचे म्युझिक असलेले ज्युली मधलं दिल क्या करे ह्रितिक ने काबिल मध्ये रिक्रियेट केलं .... त्याच्या काकूने ऐकले तर नक्की ध चा मा करेल...

छान लिहिलयं.
बाकी बद्री की दुल्हनियाँ मला , ' अचानक' सिनेमा वाटतो , त्यात सगळचं अचानक होत असतं.

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Go...
<>
यावरुन माझा 'रिसर्च' असा की क्रिशन धवन हे एकाचवेळी अ‍ॅक्टर आणि बँक मॅनेजर असे दुहेरी आयुष्य जगत होते. कदाचित डेव्हिड्ला 'साजन चले ससुराल' ची कल्पना त्यांच्यावरुनच सुचली असावी.

चलत मुसाफीर मस्त गाणे होते. आणि आता बद्री मधली गाणी पण आवडतात. त्या जुन्या गाण्यांना नविन काळात आणण्याचे मस्त काम केलेय बद्रीने !

त्या बद्रीची गाणी पहिल्यांदा ऐकलेली तेव्हा डोक्यात हे आलेले ... आणि धागाही काढलेला ..
चोर गाणी ! - http://www.maayboli.com/node/61950

धाग्याची जाहीरात नाही करतेय, तर पुन्हा सबंध पोस्ट लिहायला लागू नये म्हणून अश्या गाण्यांबद्दलचे माझे मत वर वाचू शकता.
मूळ लेखातल्या किस्मत कनेक्शनशी याचा अगदी संबंध नसला तरी अश्या गाण्यांविषयीचे माझे मत मांडायचा मोह आवरत नाही Happy

फक्त बद्रीने नाही, हल्ली अनेक सिनेमात जुन्या गाण्यांच्या एक-दोन ओळी वापरून चाल रिसायकल करतात. अजहर मध्ये समजू शकतो- संगिता बिजलानीसाठी गजरने किया है वापरावे लागले. पण इतर गाणी जसे लैला, राबता, हम्मा म्हणजे अगदी का? Why??!! आणि कहर म्हणजे - परिणीती चोप्रा "अभी ना जाओ छोडकर" म्हणते... kaa??!

पण इतर गाणी जसे लैला, राबता, हम्मा म्हणजे अगदी का? Why??!! आणि कहर म्हणजे - परिणीती चोप्रा "अभी ना जाओ छोडकर" म्हणते... kaa??!

मस्त आहेत कि हि गानि .. काय प्रोब्लेम आहे ?

मस्त लिहिलंय

आता हा जमलेला योगायोग की जमवून आणलेला योगायोग? >> जमवून आणलेलाच असणार.

रिव्हर्स स्वीप,
माझा एक बलराम पाठक नावाचा मित्र होता, त्याचे एका सुश्मिता पाठक नावाच्या मुलीवर प्रेम होते. त्याने जेव्हा तिला प्रपोज केले तेव्हा ती त्याला म्हणाली, वेडा आहेस का? तू पाठक मी पाठक, आपण दोघे नात्याने भाऊ बहीण झालो. एवढा अशक्य पचका आजवर कोणत्या मुलाचा झाला नसेल. तेव्हापासून आम्ही त्याला भाऊ पाठक नावाने चिडवू लागलो Happy