Submitted by चिमु on 21 June, 2017 - 02:22
जुलै मध्ये आम्ही (मी आणि माझा नवरा) US ला long term साठी शिफ्ट होतोय ..माझा हा पहिला च प्रवास आहे ..इथून जाताना काय पॅकिंग करायचं ..काय काय वस्तू एथून घेऊन जायच्या या बाबत थोडी माहिती मिळाली तर उत्तम च ..! धन्यवाद in advance
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संसारी लोकांसाठीची लिस्ट नाही
संसारी लोकांसाठीची लिस्ट नाही माझ्याकडे पण इन जनरल टिप्स लिहिते जरा वेळाने..
युएस मधे कुठे चाललाय ? आणि अभिनंदन आणि ऑल द बेस्ट पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठल्या भागात चाललाय त्यावर
कुठल्या भागात चाललाय त्यावर पण आहे ...NJ ला सगळं मिळेल...हल्ली सगळं मिळत सगळीकडे...पण इन जेनेरल सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स अजिबात न्ह्यायच नाही ,voltage डिफ्फेरेन्स आहे.. कनवर्टर लावला तरी खराब होऊ शकतं... भांडी थोडी घेव्युन जा..कुकर, तवा, पोळपाट, लाटणं... इडली पात्र... चकली चा सोर्या हवा असेल तर..बाकी सगळं ताट वाटी कढई चमचे गाळण खिसणी चाकू वगैरे मिळत...जे मिळत नाही तेवढंच न्या... खायचं तर इंडियन स्टोर मध्ये मिळतच... फोडणीचा डब्बा (रिकामा )न्या सोबत... खाकरा मॅगी ची पाकिटे चिवडा कामी येईल सुरुवातीच्या दिवसात... मसाले तिथेच घ्या ... इकडून हवं तर पाकिटे नेऊ शकता एवरेस्ट वगैरे पण ते पण मिळत सगळं...छत्री जॅकेट स्वेटर शूज सगळं तिकडेच घ्या.. इथे नको.. इंनेरवेअर चे 10/15 सेट न्या.. वीकली लौंद्री केली तर... overall कपडे आणि थोडी भांडी अँड थोडी रेडी to ईट पदार्थ वरती example म्हणून सांगितलेले...बास... आणि सगळ्या डोक्युमेंट्स ची 1 file... इंडिया मध्ये 1 कॉपी देऊन ठेवा घरी...
केस बारीक कापून जा. तिथे महाग
केस बारीक कापून जा. तिथे महाग आहे.
>>केस बारीक कापून जा. तिथे
>>केस बारीक कापून जा. तिथे महाग आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारता बाहेर ही जागतिक समस्या आहे....!
ईथे आता युके मध्ये तर १० पाऊंड्शिवाय हात नाही लावत.. एव्हडे करून भारता सारखे स्टाईलिस्ट कापून मिळत नाहीतच. पूर्वी हळहळ व्हायची , अलिकडे केसांनी ती समस्या स्वतःच सोडवली आहे.
असो. चिमु यांना शुभेच्छा!
ट्रंप महाशयांचे डोके फिरण्या आधी लवकर पोहचा..
हा हा... हो... केस नक्की
हा हा... हो... केस नक्की कापून जा...तसही पार्लरपण महागच आहे...तरी इंडियन्स च्या दुकानात परवडेल थोडं... वॅक्स तर सरळ विकत आणून ओव्हन मध्ये थोडा मेल्ट करून वापरायचा... बाकी थ्रेडिंग माझी 1 मैत्रीण शिकून आली होती सो ती तीच करायची पण आम्हाला बाहेर 15 डॉलर तरी मोजायला लागायचे.. एकीकडे 8 होते थ्रेडिंगचे... वॉक्सिनग facial बहुदा 100 पर्यंत जाते... असो...
काही घेऊन जायची गरज नाही..
काही घेऊन जायची गरज नाही.. सगळे मिळतंय... तरी कुकर, तवे, तूप, thermals, कपडे घेऊन जा...
सगळ्या गावात इंडियन ग्रोसरी असतेच... वॉलमार्ट आणि टार्गेट पण..
इंडियन मेंटलिटी फक्त घेऊन जाऊ नका.. १५$ केस कापायला काही जास्त नाही... डॉलर ते रुपया कॉन्व्हर्जन करणे काही दिवसात बँड होईल.. तोपर्यंत महाग वाटतील गोष्टी...
अभिनंदन... कोणती सिटी?
कुठल्या भागात चाललाय त्यावर
कुठल्या भागात चाललाय त्यावर पण आहे >>> +१
तुम्ही सुरुवातीला जेथे रहणार आहात त्या परिसराची माहिती करुन घ्या. Google map मधे पत्ता टाकून आजुबाजूला कोणती दुकाने, हॉटेल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, farmers market, प्रवासासाठी बस थांबा आहेत ते बघून घ्या.
कुकर, तवा, पोळपाट, लाटणं... उलथने, डाव, २-४ चमचे, चहाचे भांडे- गाळणी, एक पॅन, छोटी परात घेतले तर बरे होईल. म्हणजे इथे आल्यावर फक्त एक डिनर सेट घेतले की झाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरी, नेलकटर, छोटी कात्री, सुई-काळा-पांढरा दोरा, plucker, swiss knife या गोष्टी शुल्लक वाटल्या तरी एका पाऊच मधे घेऊन जा. (कधी गरज पडली तर लगेच दुकानात जाऊन आणाता येतील असे नाही होत.)
>>इंडियन मेंटलिटी फक्त घेऊन
>>इंडियन मेंटलिटी फक्त घेऊन जाऊ नका.. १५$ केस कापायला काही जास्त नाही...
थोडक्यात काय तर तुमच्या स्थलांतराच्या निर्णयात केस कापण्याच्या (खर्चाचा) अडसर येऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाकी $१५ चं असं आहे: हा परवड्ण्याचा मामला नाही... तिथे दुसरा पर्याय नाही.
डेंटिस्ट, कॉस्मेटीक वगैरे चा तर ऊल्लेखही नको... काय?
[अनेक वर्षे ऊसगावात राहिल्यावर मग दुबई ला रहात असताना पहिल्यंदा केस कापायला गेलो तेव्हा तिथे $२ म्हणजे जवळ जवळ १० दिर्हाम टीप दिली होती... तेव्हा तिथल्या त्या न्हाव्याचा चेहेरा अजूनही लक्षात आहे...! आणि आता ईथे युके मध्ये मुद्दाम £13 असा भाव लावतात म्हणजे टीप सकट £15 आपण देतोच... थोडक्यात काय तर न्हावी आणि दातांचा डॉक्टर इथे बजेट आणि घासाघीस करू नये... गुमान करून घ्यावे.]
झिरो मशिन घेऊन जावे.
झिरो मशिन घेऊन जावे.
(No subject)
तुमच्या गरजा बघून ठरवा.
तुमच्या गरजा बघून ठरवा.
वाण-सामान सगळीकडे मिळते. भाज्या वगैरे मिळतात. कुकर, ग्लास, थाळ्या वगैरे सगळे मिळते.
काही लोक औषधे घेऊन येतात. (डोकेदुखी, पोटदुखी, Antibiotics, दातदुखी).. खरं तर ती ही सगळी मिळतात. पण डॉक्टरची व्यवस्था लगेच होणार नसेल, आणि Prescribe औषधे लागणार असतील तर घेऊन या.
कपडे आणि तुमची रोजची औषधे
कपडे आणि तुमची रोजची औषधे इतकेच घेऊन या. बाकी काहीही लागत नाही. घरी असेलच तर थोडा लहान आकाराचा कूकर घेउन या म्हणजे इथे प्रेशर कूकर घेताना 'खूप पैसे गेले' असे वाटणार नाही.
भारतीय वाणसामान, अगदी रोज न लागणारं जसं ज्वारीचं पीठ, डिंक, चुरमुरे, झालच तर कारली, दुधी वगैरे भाज्या पण सगळीकडे मिळतात. मी तुलनेने आड-भागात राहिलो आहे (आयोवा, रुरल मिनेसोटा). तिथेही कधी अडचण आलेली नाही.
हे स्वानुभवाचे बोल आहेत. इथे आलो तेव्हा युरोपातून आलो त्यामुळे फक्त एक २० किलोची बॅग घेऊन येता आले प्रत्येकी. त्यात फक्त कपडे, शूज, दोन-चार पुस्तके इतकेच मावते. काहीही कसलीही अडचण आली नाही.
हे आणू शकता.
हे आणू शकता.
लहान कुकर, चहाचे भांडे, गाळणी, कप (इकडे जंबो साईज वाटू शकतो सुरवातीला कपचा), कढई, झारा, थोडी रोजची भांडी, पोळपाट लाटणे, सालकाढणी, आप्पे पात्र, इडली पात्र,
ज्वारी, बाजरी पिठ, साबुदाणा, (हे इकडे माझ्यामते चांगले मिळत नाही), थोड्या दिवसासाठी पुरतील एवढे डाळ तांदूळ, घरचा मसाला, भाजणी ई. ई.
औषधे नेहमीची घेता ती
नका आणू:
लोणची (कितीही काहीही केलं तरी याच्या बाटल्या पॅकींग दगा देतात)
जिरे (एका मैत्रीणीला स्पेसिफिकली विचारलेलं जिरं आहे का बॅगेत म्हणून म्हटले)
खसखस
आंबे
कोणतीही रोपं, सीड्स, फळं इ.
डाळ तांदूळ>> हे सुद्धा नको,
डाळ तांदूळ>> हे सुद्धा नको, कारण हल्ली त्यामुळे दंड भरावा लागल्याचे ऐकण्यात आहे.
हो का? बरं झालं सांगितलं
हो का? बरं झालं सांगितलं
घरी बनवलेले काही खास मसाले
घरी बनवलेले काही खास मसाले असतील तर ते आणू शकता. गोडा मसाला वगैरे मिळतो इथे पण त्याला अजिबात चव नसते.
आम्ही इथे अनेक वर्षे रहातो.
आम्ही इथे अनेक वर्षे रहातो. आमच्याकडे खूप खूप भांडी साठली होती. मग जेंव्हा माझ्या बायकोची भाची इथे आली तेंव्हा बरीच भांडी खोक्यात भरून तिला पाठवली. पुढे भारतात परत जाताना तिने त्यातली काही भांडी परत भारतात नेली पण उरलेली परत आमच्याकडे पाठवली. तो खोका न उघडता तसाच घरात पडला होता. दुसर्या वर्षे मा़झी पुतणी न्यू जर्सीत आली. तिला घरी बोलावून तो खोका दिला नि शिवाय घरात फिरून काय हवे ते घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे घरातल्या बर्याचश्या नको असलेल्या गोष्टी आयत्याच कमी झाल्या. तिने परत जाताना तोच खोका नि इतर भांडी, तिची मैत्रिण नुकतीच आली होती, तिला दिली!
तर आमच्यासारखे कुणि नातेवाईक, मित्र असतील तर शोधा!
आजकाल तर काय, निघण्या आधी, व्हॉट्स अॅप वर बोलून, चित्रे दाखवून तुम्हाला सांगता येईल काय हवे आहे काय नको नि काय मिळू शकेल. ते लोक तुमचे आभार मानतील!
जरी इथे भारतीय दुकानात बर्
जरी इथे भारतीय दुकानात बर्याच गोष्टी मिळत असल्या तरी भरल्या मिरच्या, बटाट्याचे पापड हे पदार्थ आम्ही नेहेमी भारतातून येणार्यांना आणायला सांगतो. मसाल्यांबद्दल बरेच लोक पर्टिक्युलर असतात, त्यांनी तिथूनच आणलेले बरे.
सर्वात महत्वाचे : गाडी
सर्वात महत्वाचे : गाडी चालवायचे लायसन्स घेउन जाणे, international license असेल तर उत्तम . बाकी सगळे तिकडे मिळेलच.
तुम्ही जेव्हा तिथे पोहोचता,
तुम्ही जेव्हा इथे पोहोचता, तेव्हा प्रचंड थकलेले असता. तेव्हा बाहेरून जेवण मागवणे/ बाहेर जेवायला जाणे .अशक्य, तेवढी माहितीही नसते. तसेच तुमच्याकडे सिम कार्ड नसल्यामुळे, तुम्ही उबेर वगैरे कॅब्स करू शकत नाही. मेट्रिक्स कार्ड वर उबेर सेवा देत नाही. त्यामुळे पहिल्या 1-2 दिवसाची सोय करून जा. आम्ही येताना थोडे 1-2 वेळच्या जेवणाचे डाल तांदूळ नेलेले, छोटा कुकर न्या. खिचडी करता येते. कारण गेल्या गेल्या ग्रोसरी शॉपिंग करणे शक्य नसते, चहा लागत असेल तर असेच 1-2 वेळच्या चहाची तयारीकरता चहापत्ती ,साखर ,गाळनी,छोट पातेले न्या. वरती सुचवल्याप्रमाणे ड्राइविंग लाइसेन्स महत्वाचे. इथे आल्या आल्या सिम कार्ड आणि कार अत्यंत गरजेची आहे. (बे एरिया मधे येणार असाल तर इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आजिबात नाही, कार मस्ट आहे).बाकी मसाले , ग्रोसरी, भाज्या इथे सर्व मिळते.
तसेच तुम्ही लोकल फेसबूक कम्यूनिटी जॉइन करू शकता, तिथून मूव आउट सेल मधे काही चांगल्या वस्तू मिळू शकतील. स्वानुभव.
रिप्लाय बद्दल सर्वाना Thanks
रिप्लाय बद्दल सर्वाना Thanks![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिया >> युएस मधे कुठे चाललाय ? आणि अभिनंदन आणि ऑल द बेस्ट पण हैप्पी>>>>>>
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
US मध्ये Los Angeles ... Thanks !!
अरे वा.. एलए ला येताय होय!!
अरे वा.. एलए ला येताय होय!! या या! सगळं मिळ्तं इथे. भांडी मसाले व २-४ दिवसासाठी खायची सोय म्घेऊन या. बाकी जमतंय सगळं हळूहळू..
एल ए तर मस्तच मग.. .बहुदा
एल ए तर मस्तच मग.. .बहुदा तुम्हाला काहीच न्यायची गरज नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी आता फार काही लिहित नाही कारण सगळे पॉईंट्स कव्हर झालेत वरती. पण एक सांगते जर इन केस बॅगांचं वजन वाढलं आणि काही कमी करावं लागलं तर जिन्स सोडून द्या.. उगाच प्रचंड वजन होतं आणि जिन्स ही अशी वस्तू आहे की युएस मधे घेताना वाईट पण वाटत नाही.
वरती सगळ्यांनी लिहिलंय की $ चे रु कन्व्हर्ट करत बसू नका... पण गंमत सांगू माझ्या बाबतीत उलटं झालेलं.. मी 'अरे फक्त १५$ च तर आहे, अरे फक्त ३२$ च तर आहे' करत भरमसाट खरेदी केलेली आल्या आल्या
अर्थातच ते सगळं लिटरली युजलेस होतं
तेंव्हा नो युर झोन ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणखी एक सल्ला , गेल्या गेल्या अजिबात वेळ न दवडता इन्श्युरन्सचं काम करून घ्या.. मी मुर्खपणा केलेला आणि माझ्याकडे इन्श्युरन्स नव्हता आणि मग मला डेंटिस्ट कडे एक्दा जावं लागल आणि पुढचं सांगत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पोहचलात की वेळ मिळेल तसं आधी डॉलर शॉप / डॉलर ट्री वगैरे मधे चक्कर मारुन या, तिथे १ $ मधे वस्तू मिळते, आपल्याकडे नाही का ४९/९९ चालू झालेलं मधे तसंच.. खुपदा कंटेनर, हँगर वगैरे गोष्टी वर्थ असतात तिथुन घेणं..
बाकी तुमचं कोणी आहे का तिथे ऑलरेडी? म्हणजे कंपनीतले लोकं वगैरे.. त्यांना सांगुन रहायची वगैरे सोय आधी होतेय का बघुन घ्या
एक आणखी गोष्ट - कंपनी काय काय क्लेम करू देते ते ही बघुन घ्या.. माझी कंपनी पहिल्या आठवड्यातल्या जेवणाचेह पैसे, उपयोगी वस्तू जसं की कंफर्टर वगैरे क्लेम करू देणार होती, पण मला माहीत नव्हतं म्हणून मी सगळी बिलं टाकून दिलेली.... या वरून आठवलं तिथे बिलाला रिसिट म्हणतात आणि जेवण पार्सल करणे ला टू गो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या गोष्टी फार साध्या आहेत त्यामुळे चुकल्या तरी हरकत नाही... रॅदर काहीच चुकलं तरी हरकत नाही, तिथे लोकं मदत करतात, मला तरी गैर्फायदा घेणारं कोणी भेटलं नाही , फक्त डॉक्युमेंट्स वगैरे नीट ठेवा आणि तुमच्याशी रिलेटेड प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल एवढं बघा
कुकर, उलथणं, पोलपाट, लाटणं
कुकर, उलथणं, पोलपाट, लाटणं चिमटा/ सांडशी, इडली पात्र , बीडाचा किंवा लोखंडी तवा
माझ्या मते या वस्तू नेणं गरजेचं आहे... बस्कू सांग गं.. डेन्व्हरला फार महाग मिळायचं हे वरचं सगळं.. काही काही तर मिळालंच नाही मला तिथे.
डोक्याला लावायचे लहान क्लचर्स, क्लिपा, सेफ्टी पिना , टिकल्या हे अजिबात विसरू नका.... भरपूर घेऊन ठेवा..
मला तिथे एक तर एकदम लहान क्लचर्स मिलाले किंवा एकदम मोठे.. मला हवेत तसे क्लच्र्स मिळालेच नाहीत मला कधीच.
महत्वाचं - गेल्या गेल्या खरेदी करायला मागे पुढे पाहू नका कारण आप हळू हळू तिथे पैसे कमावतोच, उगाच वस्तु कमी पडतात मग चिड्चिड होते (स्वानुभव)
एथिनिक वेअर जस साड्या,
एथिनिक वेअर जस साड्या, ड्रेसेस, ज्वेलरी जरुन घेवुन जा! भारतात मिळते तितकी व्हरायटी मिळत नाही, ब्लाउज शिवुन घेण किचकट आहे,
कुर्तिज, ड्रेसेस इन्डियातुन घेवुन जा, वेस्टन वेअर सगळ इकडेच घ्या.
आणण्यासारख
सेक्शन असलेली ताट
पावभा़जी प्लेट
उलथण्,पळी, पोलपाट, लाटण, परात( कणीक मळण याशिवाय जमत नसेल तर च) , कुकर, तवा , चहाच भान्ड, एक किवा २ पॅन ,मिसळणीचा डबा, सु रवात म्हणून जिरे,हळद्,तिखट्,मोहरी आणू शकता पण हे सहज म्हणजे अगदी सहज उपलब्ध आहे.
हे वर लिहलेल सगळच्या सगळ इथे भरपुर व्हरायटी मधे मिळत पण आल्या आल्या इन्डियन ग्रोसरी गाठावी लागेल
घरचा गोडा मसाला, थालिपिठ भाजणी, कुरडया, पोहा पापड, सोर्या, पुरणयन्त्र -हे अजुनही मला दिसलेले नाहीत ( याची गरज आहे की नाही ते तुम्ही ठरवा)
कैलास जिवन , कालनिर्णय ( हे मिळत पण तितक सरास नाही)
अरे वा.. एलए ला येताय होय!!
अरे वा.. एलए ला येताय होय!! या या! सगळं मिळ्तं इथे. >> वा वा ! बरय!
कॅलिफ ला येताय थोडी चायनिज
कॅलिफ ला येताय थोडी चायनिज शिकून घ्या
वरती लिस्ट दिलेलीच आहे पण
वरती लिस्ट दिलेलीच आहे पण माझा अनुभव, सगळ मिळत पण १.५/२/३ पट किमतीत. त्यामुळे ३/४ दिवस सेट्ल होईपर्यंत बाहेर जाउन काही आणाव लागणार नाही हे बघा.
ईतक्या वर्षांनंतर, सुरवातीला येतांना आणलेल्या किचनचे सगळेच सामन आता रिप्लेस झाले आहे. फक्त कुकर (२/३ वर्षात भारत वारीत परत आणला जातो), ईड्ली भांड्, कधीतरी सांडशी हेच अजुन वापरले जाते.
आता येतांना आणल्या जाणार्या वस्तु - ईन्डियन साड्या/ड्रेसेस, दागिने ई, मसाले, (पावडर्/आख्खे), ज्वारी/बाजरी पीठ, कोकम, पापड्/कुर्डया ई.
सगळं मिळते पण ते घराजवळ
सगळं मिळते पण ते घराजवळ मिळेलच असे नाही. तुमच्याकडे गाडी असेल तर काही त्रास नाही होणार पण नसेल तर कोणीतरी मदत करणारे असले तर बरे होईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही आलो तेव्हा आमच्या ओळखीचे कोणीच नव्हते. तसेच चालत जाणे सोडाच बसची सुद्धा सोय नव्हती. सुरुवातीला बरेच वेळी जेव्हढ्या पैश्यात सामान खरेदी होई तेव्हडेच पैसे टॅक्सीला लागत
ऑनलाईन ग्रोसरीची सोय फार
ऑनलाईन ग्रोसरीची सोय फार उपयोगाची आहे सुरुवातीला. मला इथे instacart मुळे कुठेच जायला लागलं नाही आल्याबरोबर.
Pages