Submitted by योकु on 20 June, 2017 - 12:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक वाटी थंड्गार आणि जरासं आंबट, साधं दही
७/८ हिरव्या मिरच्या (तिखट वाली व्हेरायटी घ्यावी)
मीठ
साखर
चमचाभर तेल
अगदी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
एका लहान कढल्यात चमचाभर तेल आणि बारीक चिरलेली मिरची असं घालून अगदी मंद आचेवर तापत ठेवावं. मिरच्या मस्त कुरकुरीत व्हायला हव्या.
तोवर दही चमच्यानीच थोडं फेटून घ्यावं
यात चवीनुसार मीठ, साखर घालून तयार ठेवावं
आता कुरकुरीत केलेल्या मिरच्या यात घालाव्या आणि थोडी कोथिंबीर घालावी
फार घट्ट असेल तर अगदी थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करावी. पळीवाढी टाईप्स.
जरा आंबट, गोड्सर, खारट आणि तिखट अशी दही मिरची तयार आहे. पोळी-भाजी सोबत तोंडीलावणं म्हणून मस्त लागतं.
वाढणी/प्रमाण:
आवडेल तसं.
अधिक टिपा:
दही गार असेल तर मस्त लागतं
मिरच्या जरी जास्त वाटल्या तरी तिखट होत नाहीत. सॉर्ट ऑफ तिखटपणा जातो कुरकुरीत तळल्यामुळे.
माहितीचा स्रोत:
बायडी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सशलच्या बोटीत मीही. तिखमिठलं
सशलच्या बोटीत मीही. आम्हीही तिखमिठलं म्हणतो, मिळमिळीत खातो आणि भो मि चं भरीत करतो.
आमच्याकडे क्वचित कधी व्हायचं तिखमिठलं. पण हिरवी मिरची कुणी खाऊ नाही शकत त्यामुळे पोपटी मिरची भाजून, भरपूर कोथिंबीर असं त्याचंही मिळमिळीत व्हर्जनच व्हायचं.
काल लगेच केलं मी हे. मस्त
काल लगेच केलं मी हे. मस्त लागलं.
इथे झणझणीत मिरच्यांचा विषय
इथे झणझणीत मिरच्यांचा विषय चाललाय म्हणून मला खालील फोटो डकवण्याचा मोह होतोय. फोटो पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटतंय की नाही पहा!
मस्त.
मस्त.
ह्यातली भूत जलोकिया कुठली?
ह्यातली भूत जलोकिया कुठली?
मी नेहेमी मिरची आचेवर भाजून
मी नेहेमी मिरची आचेवर भाजून घेऊन दह्यात कुस्करते आणि भरपूर दाण्याचं कूट घालते...आम्हीही तिखमिठलं म्हणतो.आता तुमच्या सारखी करून बघेन
मस्त रेसिपी आमच्याकडे याला
मस्त रेसिपी. आमच्याकडे याला मिरची भरीत म्हणतात.
पण साखर टाकत नाहीत..... असेच तिखट-तिखट गट्टम करतात.
वाह वाह, लगेच करण्यात येइल
वाह वाह, लगेच करण्यात येइल
Wah रेसिपी आणि सचिन यांचा
Wah रेसिपी आणि सचिन यांचा मिरच्यांचा फोटो दोन्ही भारीच....करून बघेन.
वा मिरच्यांचे फोटो भारी आहेत.
वा मिरच्यांचे फोटो भारी आहेत. कालपासून धागा सारखा वर येतोय, करावी का दही मिरची?
Pages