या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

"ही शिल्पे कोणार्कलाही आहेत"-
दोहोंचे फोटो पाहिले तर लक्षात येईल खजुराहोची रद्दड आहेत. चेहय्रावर काही भावच नाहीत. कोणार्कची थोडी भावुक आहेत.

मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.
+१

या मंदीरांना कलेच्या नजरेतून पाहण्याऐवजी उगाच अति शहाण्यासारखे संस्कृतीचा दांभीकपणा मिरवण्यात काय अर्थ आहे. मी दक्षिण भारतात पाहिलेल्या अनेक मंदीरात अशी शिल्प आहेतच , आणि त्यात वावगं ते काय आहे , तोही जीवनाचा एक भाग आहे, शिल्पे कोरुन ठेवण्यामागचा उद्देश ज्ञान पुढच्या पिढीला देणेही असू शकतो किंवा मंदीरात येणा-यांची संख्या वाढावी पर्यायाने हिंदू धर्म वाढावा असाही असू शकतो .

मूळातच जे एवढे वर्षे चूकीचे वाटले नाही ते आता वाटू लागणे ही भामटेगिरी केवळ फूकटच्या प्रसिद्धीसाठी असते. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दूस-याचे बघायचे वाकून अशा घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक असतात ते,

बंदी घालावी असे म्हणणा-यांनी आयुष्यात कधीही पॉर्न फिल्म बघितली नाही असे क्वचितच असेल...........

थोडक्यात नग्नता विकली जातेय. मग ती संस्कृती आहे की नाही हा मुद्दा गौण. बाकी जिवंत लोकं जगताहेत की मरताहेत याची पर्वा न करणारी माणसं दगडी शिल्प जतन करायला का आटापीटा करतात हे समजत नाही. दगडंच ती तुटली फुटली हरवली भूकंप येऊन जमिनीत गडप झाली तर पुढच्या पिढीचे काय असे नुकसान होणार आहे. मी तर बोलतो जर भारत सरकार माझ्या टॅक्सच्या पैश्यातून त्यांन जतन करायचा खर्च करणार असेल तर तोडून टाका, आम्हाला काही गरज नाही.
>>>
वेल! तू हे लॉजिक मंदिरांना पण लावतोस का मग?

वेल! तू हे लॉजिक मंदिरांना पण लावतोस का मग?
>>>>>
वेल, हे लॉजिक मंदिरांना लागू शकत नाही. कारण माझ्या पोस्टची खालची ओळ.
"" अर्थात हे माझे वैयक्तिक मत असले तरी ते एका फार मोठ्या गटाचे प्रतिनिधीत्व करते जे शिल्पकलेबाबत अरसिक आहेत आणि त्या शिल्पातील नग्नताही ज्यांना एंटरटेन करत नाही. ""

मंदिराबाबत बहुसंख्य लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात, तिथे उलट माझ्यासारखे नास्तिक मूठभर असतात.
आता मी नास्तिक आहे आणि मला मंदिरे असो वा नसो काही फरक पडत नाही म्हणून मी बहुसंख्य लोकांची डिमाण्ड पायदळी तुडवणारी ईच्छा व्यक्त करणे हा स्वार्थीपण झाला. त्यामुळे मंदिरे असावीत.
तसेच माझ्या पोस्टमध्ये प्रॅक्टीकल मुद्दाही उपस्थित केला आहे तो म्हणजे ही शिल्पे सरकारला महसूल कमावून देतात की माझ्य टॅक्सचे पैसे यांच्या संवर्धनासाठी वापरावे लागतात हे ईथे बघणे गरजेचे. मला नक्की कल्पना नाही. तसेच मूठभर लोकांनाच या शिल्पांबाबत पडलेय हा देखील माझाच अंदाज आहे. कुठलाही सर्व्हे नाही. जर अंदाज चुकला तर मत मागे घेतो.

बाकी जिथे पैसा मिळतो म्हणून दारूसारखे विष विकले जाते तिथे नग्न शिल्पातून पैसा कमावणारया सरकारला का ऊगाच नावे ठेवा. चालवून घेईन Happy

सिम्बा, ईतिहास जतन करून ठेवणे आणि भविष्यासाठी संशोधन करणे या गरजांना एकाच तराजूत कसे तोलत आहात?
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा सर्वांनाच माहीत आहेत. त्यापुढे प्रत्येक गरजेला क्रमाने लावत गेल्यास कुठली गरज कुठे येईल तुम्ही केलेल्या तुलनेत हे तुमचे तुम्हीच ठरवा.

तसेच मूठभर लोकांनाच या शिल्पांबाबत पडलेय हा देखील माझाच अंदाज आहे. कुठलाही सर्व्हे नाही. जर अंदाज चुकला तर मत मागे घेतो.
> युनेस्को ने जगभरात वर्ल्ड हेरिटेज साइट्स मार्क केलेल्या आहेत त्या पैकी ही एक आहे. नैमित्तिक पूजा अर्चा करायचे हे मंदिर नाही. तिथे होत असेल पण त्यापेक्षा त्यांचा दर्जा खूप मोठा आहे. त्या काळातील शिल्प कलेचा एक नमूना वाचवून ठेवलेला आहे त्यापैकी हा मंदिर समुह आहे. पण तुम्हाला माहीत नाही म्हणजे त्याचे काहीच महत्व नाही हो किनै.

इंदूरकर सर तिथे क्युरेटेड स्ट्डी टूर नेतात. त्यांच्या अंकोर वट सहलीचा तरी मला चांगला अनुभव आला. सध्या ऑक्टोबर नोव्हेंबर मधील दोन्ही टूर फुल झाल्या आहेत. शिल्पांच्या मागची भूमिका समजून घेतल्यास ती इतकी विवाद्य वाट्णार नाहीत.

सूवेनिर व पुस्तके विक्री ही अश्या साइट्स जवळ नेहमीच असते. हा त्या साइट शी संबंधित अर्थकारणाचा भाग आहे. विक्री बंद केल्यास लोकल माणसांचे व सरकारचे आर्थिक नुकसान होईल. म्हणून असा वायफळ विरोध यशस्वी होणार नाही. अंकोर समोर दुकानात अंकोर नावाची बीअर मिळते. पण त्याचा साइटच्या महत्वाशी काहीही संबंध नाही

वरदा, कळकळ पोचली. कामशिल्पे व कामवाङमय हे आपापल्या ठिकाणी उचितच आहेत व आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे अवलोकन, वाचन, अभ्यास हा व्हायलाच हवा.

संस्कृती ही सतत बदलणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. जशी लोकं, तसा काळ तशी संस्कृती. एखादी गोष्ट काल relevant होती म्हणून आज असेलच असे नाही. जी गोष्ट एखाद्याला वाटत relevant वाटत नाही ती थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर काय हरकत आहे! संस्कृती बदलत नसती तर आजही आपण जातीप्रथा, स्त्रियांसाठी असणाऱ्या जाचक रूढी वागवत नसतो का?

बाकी बहुतेक त्यांचा संरक्षित वास्तू मध्ये गोष्टी (पुस्तकं, मूर्ती) विकायला विरोध असावा असे वाटते. गेटच्या बाहेर कोणी काही विकलं तर प्रॉब्लेम नसावा.

उद्या परदेशी पर्यटकांनी जर inferance काढला की भारतात दिवसाढवळ्या स्त्री पर्यटकांवर हल्ला होतो ह्याला कारण आपली खजुराहोमध्ये कोरून ठेवलेली प्राचीन संस्कृति तर ते बरोबर ठरेल का?

उद्या परदेशी पर्यटकांनी जर inferance काढला की भारतात दिवसाढवळ्या स्त्री पर्यटकांवर हल्ला होतो ह्याला कारण आपली खजुराहोमध्ये कोरून ठेवलेली प्राचीन संस्कृति तर ते बरोबर ठरेल का?>>
अगदी अगदी. एकदम अचुक मुद्द्यावर तुम्ही महत्त्वाचे बोट ठेवले बघा. म्हणूनच बहुदा मध्यप्रदेशात सर्वात जास्त बलात्कार होतात अशी सरकारी आकडेवारी आहे. ते गुडगाव नोएडा वगैरे इथे पण अशाच प्रकारे मंदीर कलाकृती असतील तरीच तिकडे ही अश्या घृणास्पद घटना जास्त होतात.
योग्य मुद्दा उचललात राजसी.

युनेस्को ने जगभरात वर्ल्ड हेरिटेज साइट्स मार्क केलेल्या आहेत त्या पैकी ही एक आहे. नैमित्तिक पूजा अर्चा करायचे हे मंदिर नाही. तिथे होत असेल पण त्यापेक्षा त्यांचा दर्जा खूप मोठा आहे. त्या काळातील शिल्प कलेचा एक नमूना वाचवून ठेवलेला आहे त्यापैकी हा मंदिर समुह आहे. पण तुम्हाला माहीत नाही म्हणजे त्याचे काहीच महत्व नाही हो किनै.
>>>>>>

मंदिराशी तुलना मी केली नाही. ते रीयाने विचारले होते. अश्या शिल्पांची पूजा होत असती तर माझे काहीच ऑब्जेक्शन नसते. पूजनीय वस्तूंना मी कधीच विरोध करत नाही Happy

बाकी युनेस्को, वर्ल्ड हेरीटेज वगैरे मुद्यानंतरही माझा मूळ मुद्दा तोच राहणार. किती जणांना त्या शिल्पांबद्दल खरेच काही पडलेय? त्यांची उपयुक्तता काय? त्यांचे मनोरंजनात्मक मूल्य किंवा भावनिक मूल्य काय? आणि ते किती जणांसाठी? हे मुद्दाम विचारतोय कारण त्याबद्दल खरेच आतून काही वाटावे असे किती आहेत, अन्यथा आपण फार क्लासिकल आवड ठेवणारी व्यक्ती आहोत हे दाखवायलाही काही जण पुढे पुढे करणारे असतात. एक दुसरे उदाहरण म्हणजे महाराजांच्या गडकिल्ले संवर्धनाबाबत मी देखील आग्रही आहे. कारण आजही त्या वास्तूत गेले की भारावून टाकल्यासारखी फिलींग येते. तसे ईथे काही होते का? होत असल्यास त्या भावना नेमक्या कोणत्या?

मी कबूल करतो की मी सामान्य आवड ठेवून जगणारा सामान्य माणूस आहे. मला माझे सामान्य ज्ञान ईथे वाढवायला आवडेल. (जसे शंकराच्या पिंडीचे रहस्य या धाग्यामुळे समजले) तर कोणी जाणकार सांगेल का की या मुर्त्या बनवण्यामागचा नेमका हेतू काय होता? तो हेतू उदातही असू शकतो, किंवा आचरटही असू शकतो, पण अंदाज नको. नक्की माहीत असेल तरच सांगा. तसेच तो जो काही हेतू होता तो आजच्या काळात ती शिल्पे जपल्याने कसा साध्य होणार?

मी त्या मुर्त्या फोटोतच पाहिल्यात, त्या देखील फार निरखून नाहीत. त्यातील स्त्रिया (आणि पुरुषही) काल्पनिक आहेत की प्रत्यक्षातल्या व्यक्ती. काल्पनिक असतील तर पुढे वाचू नका. पण जर प्रत्यक्षातील व्यक्ती असतील, वा एखाद्या व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन असतील तर समर्थन करणे खरेच अवघड आहे. त्यातील स्त्री कदाचित एक राणी असेल, नर्तकी असेल, दासी असेल, कोणीही असू शकेल. तिची परवानगी घेऊन तसली शिल्पे बनवली आहेत याची खात्री कशी देणार. जर तिच्या मनाविरुद्ध तसे केले असेल तर ... तरीही समर्थन कराल त्या मुर्त्या जतन करायचे?

>> एक दुसरे उदाहरण म्हणजे महाराजांच्या गडकिल्ले संवर्धनाबाबत मी देखील आग्रही आहे. कारण आजही त्या वास्तूत गेले की भारावून टाकल्यासारखी फिलींग येते
तुला भारावल्यासारखं फीलींग येतं. किती जणांनां असं फीलींग येतं? महाराष्ट्रातली किती लोकं जातात गड किल्ले बघायला? टक्केवारीने. न जाणार्‍यांची, भारावून न जाणार्‍यांची संख्या जास्त असेल तर मग गड किल्ले ही नेस्तनाबूत करावेत काय?

किती फाटे फुटलेत ह्या चर्चेला? Uhoh

प्रायव्हेटायझेशन हे एक सोल्युशन असू शकते काय ती शिल्पं जतन करण्यासाठी?

तुला भारावल्यासारखं फीलींग येतं. किती जणांनां असं फीलींग येतं? महाराष्ट्रातली किती लोकं जातात गड किल्ले बघायला? टक्केवारीने. न जाणार्‍यांची, भारावून न जाणार्‍यांची संख्या जास्त असेल तर मग गड किल्ले ही नेस्तनाबूत करावेत काय?
>>>>>

हो नक्कीच, माझ्या एकट्याच्या भारावलेपणासाठी मी सर्व जनतेला वेठीस धरू शकत नाही. नक्कीच जर मी असा एकलाच वा माझ्यासारखे मोजकेच असले तर नक्कीच!

शिल्पांची जपणूक करावी का?
किंवा शिल्पांची जपणूक कशी करावी?
किंवा शिल्पांची जपणूक का करावी?
अशा विषयावर गाडी कशी काय आली?

<आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत आणि हा राष्ट्रीय वारसा जपला पाहिजे> अनुमोदन !
<प्रायव्हेटायझेशन हे एक सोल्युशन असू शकते काय ती शिल्पं जतन करण्यासाठी?> उलट प्रायव्हेटाइझेशन केले तर केवळ मुठभर लोकांच्या हातात निर्णय जाऊन अधिक धोकादायक होऊ शकते असे वाटते.

<<<विक्री बॅन करावी का? माझ्या मते नको.>>>
तेहि काळ्या बाजारात जाईल नि किंमति फुकट वाढून बसतील. Wink

बाकी फक्त खजुराहो जवळच असली विक्री बंद करण्यात काय मुद्दा आहे कळत नाही.
तसली कामसूत्र, अश्लील पुस्तके भारतात असंख्य ठिकाणी मिळतात, अगदी भर लक्ष्मी रोडवर किंवा सिताबर्डी, धरमपेठेत नाही तरी जाणकारांना माहित असते कुठे असला माल मिळतो, तोहि उघडपणे रस्त्यावर! त्यांचे काय करायचे?

माझी खात्री पटते हे सगळे काहीतरी राजकीय आहे.

तशी तर पूर्वीच्या भारतातील एक गोष्ट आहे - एक पक्ष सत्तेवर आल्यावर दारुबंदी करत असेदारुबकाळ्या बाजार्‍आट दरू विकून लोक भरपूर पैसे कमावत नि ते त्या सत्ताधारी पक्षाला देत. नंतर दुसरा पक्ष सत्तेवर आल्यावर दारुबंदी रद्द नि रेसेस वर बंदी - मग त्याचा काळा बाजार नि त्याचे पैसे त्या पक्षाला. भारतात काय - हुषार लोक!

जसे एखादा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी काही गोष्टींत बॅन झाला की वादग्रस्त म्हणून अधिक गल्ला जमवतो तशी काहीशी गत इकडे असावी असे ह्या लिंक वरुन वाटते

http://indianexpress.com/article/india/india-news-india/in-khajuraho-for...

विषयाचे वादग्रस्तत्व जपणे / वाढवणे म्हणजे जास्त मार्केटिंग = जास्त पब्लिक = जास्त पैसा.
त्या अनुषंगाने असले बंदी वाले स्टंटस वापरले जात असावेत का ?

" पैसा बोलता है "
....हेच खरे बुवा Happy

२०१३ मध्ये मध्य प्रदेशात एका स्विस महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतरच बहुतेक परदेशी पर्यटकांची संख्या घटलीय.
https://www.swissinfo.ch/eng/tourist-safety_rape-cases-still-cast-a-shad...

या बातमीत एक ग्राफ दिलाय. त्यात बलात्काराच्या सर्वाधिक केसेस नोंदलेलं राज्य मध्यप्रदेश आहे.

खजुराहो चे टुरिस्ट कमी होण्यामागे मूख्य कारण विमानाचा रूट बदलणे आणि अनधिकृत गाईड्स ची दादागिरी हे सांगितले आहे,

बहुतेक दूतावासानी आपल्या नागरिकांना "खजुराहो ला गेलात तर आमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका " असे सांगितले आहे.
>>>>>>>>
Many cited poor air connectivity and bad press over harassment of foreign tourists as factors that have hit business.>>>>
>>>>
“The embassies warn their respective tourists to travel at their own risk, and not to expect any support. Such advice deters potential tourists.”>>>>
>>>>
Government-approved guides blame the unauthorised guides who, they say, pester foreigners the moment they arrive in the town and some even misbehave with young women. “They don’t even spare Indian tourists,’’ said guide Prateek Jain.>>>

म्हणजे गुंडागर्दीमुळे पर्यटन थांबले, तर फुटफॉल वाढवायचा उपाय काय??
अजून गुंडागर्दी करून वादग्रस्तता वाढवणे?? कि कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे?

कोणत्या गोष्टी भारतीय संस्कृतीचा भाग आहेत/असाव्यात किंवा दाखवल्या जाव्यात आणि कोणत्या नाही याची नव्याने छाननी सुरू झाली आहे. त्याचाच हा एक भाग वाटतो. अलीकडेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की ताजमहाल हा काही भारतीय संस्कृतीचं प्रतीक नाही, त्यामुळे परदेशी पाहुंण्यांना ताजमहालची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात येऊ नये.

शिल्पांची जपणूक करावी का?
किंवा शिल्पांची जपणूक कशी करावी?
किंवा शिल्पांची जपणूक का करावी?
अशा विषयावर गाडी कशी काय आली?
>>>>>>

मग काय आहे विषय नक्की?
हेडरपोस्ट वाचून हाच अर्थ लागतोय.

ऋन्मेष सर, फक्त हेडर पोस्ट नका वाचू ; मजकूर देखिल वाचा . कृपया धन्यवाद

तुमच्याकरता चमच्याने भरवतो. खालील दोन वाक्ये वाचा.

तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही.
तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त्या घटनेनंतर दिल्ली- खजुराहो ट्रेन सुरू करण्यात आली. सकाळ ते संध्याकाळ पाहून पर्यटक परत दिल्लीला जाऊ शकतात.

मुख्य पाच मंदिरांयव्तिरिक्त पुर्वेला अजून बरीच मंदिरे आहेत तिथे भारतीय नसले तरी परदेशी पर्यटक जाण्यास उत्सुक असतात.
झाशी स्टेशनलाही चार वेटिंगरूम्स केल्या आहेत. एसी पेड ( २०/तास) ही आहे त्यावर परदेशी फार खुश आहेत.
झाशी - दतिया- ओरछा-खजुराहो-महोबा- अलाहाबाद- वाराणसी-सारनाथ
महत्त्वाचा पर्यटन मार्ग आहे

या इन्फ्रा सुधारणांमुळे खजुराहो मध्ये जर फुटफॉल वाढला असले तर अशी प्रसिद्धी मिळवायला स्टंट करायची गरज नसावी नाही का?

माझ्या सहचाय्राने खजुराहोतली मेणाची शिल्पं ८५ मध्ये आणलेली. त्यावेळी कॅम्रे नसल्याने याछोट्या सुवेनिरांचं महत्त्व नक्कीच होतं.
ते डाइ घरातच असल्याने पुढची पिढी तेच करत राहिली तर वावगं काय? आताच्या डिएसएलआरमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेलच.

Srd तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?
DSLR च्या युगात, स्मृतीचिन्ह म्हणून प्रतिकृती का घेतील असे म्हणायचे आहे का?
म्हणून प्रतिकृतींचा खप घसरला, आणि म्हणून हा स्टंट केला जातोय असे म्हणायचे आहे का?

थोडक्यात यांची विक्री कित्येक वर्षं बिनबोभाट होत आहे. रसिक आहेतच>>>>>
मग आत्ता अचानक या प्रतिकृती विक्रीने मंदिराचे पावित्र्य भंग होते हा साक्षात्कार झालाय हे इंटरेस्टिंग वाटते,

Pages

Back to top