या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<< प्रश्न ह्या दांभिक मनोवृत्ती असलेल्या लोकांची मजल कुठ पर्यंत जाऊ शकते हा आहे. >> +१

<< फीडिंग करताना काही अपवादात्मक नजरा सोडल्या (दुर्दैवाने त्या नजरा मोस्टली साउथ एशियन मेल आणि अनेकदा फिमेलच्या होत्या) तर वाईट अनुभव फार नाही.
भारतात नर्सिंग मदर यातील कुठल्या ठिकाणी जाऊन नर्स करू शकते? किंवा नर्स करताना कोणी बघितली आहे ?>>

मुद्दा पटला. पण हे जनरलायजेशन होत नाहीये का? भारतातही अगदी जुन्या काळापासून आई ला जिथे हवे तिथे पाजण्या करता मुभा दिली गेली आहे आणि शक्यतो त्यांची प्रायवसी जपायचा प्रयत्न ही केला गेला आहे.

<<<<त्या "उज्ज्वल" भूतकाळात, आमच्यातल्या खर्‍या उत्तम गोष्टी येतच नाहीत. त्यात येतात फक्त गोमाता, गोमूत्र, योगाच्या नावाखाली खवपलेली तथाकथित आयुर्वेदिक(!) औषधे व कोट्यवधि रुपयांचे साम्राज्य, इतर धर्मांचा द्वेष, इतर जातींचा द्वेष, इतर माणसांचा द्वेष. अन या द्वेषाच्या आगीवर भाजलेली आपल्या स्वार्थाची पोळी.>>>>

+१००

<<<खजुराहोतली देऊळं/शिल्पं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामिल केलेली आहेत म्हणजे त्यांच्या संरक्षणाची जबाब्दारी भारत सरकारवर येत असल्याने संस्कृतीरक्षकांचा विरोध पेल्यातलं वादळ ठरण्याची शक्यता जास्त आहे.>>>

आजकाल राजकारणाला अति जास्त मह्त्व आले आहे - सर्वच जगात. कुठल्याहि विषयाचे राजकारंण -
क्रिकेटचे सुद्धा. पाकीस्तानचा संघ मुंबईत आला तर आम्ही जाळपोळ करू, म्हणजे भारतीयांचेच नुकसान बरं का? पण हा अक्कलेचा प्रश्न नसून, राजकारणाचा प्रश्न होतो.
म्हणून विचारावेसे वाटते की हे संस्कृतीरक्षक कुणा विशिष्ठ पक्षाचे आहेत का?
म्हणजे विरोधी पक्षाचे असतील तर सध्याचे भारतसरकार तिथे एकदम कडक पोलीस पहारा ठेवतील - रात्रंदिवस.
मग पुढली दहा वर्षे निवडणुका याच मुद्द्यावर लढवल्या जातील - बाबरी मशीद्/राम मंदिर सारखे.
पण जर सरकारी पक्षाचेच असतील तर पहार्‍यात जरा ढिलेपणा होईल - मग फोडलेल्या मूर्ति पळवून नेऊन त्या पुनः लपून छपून खूप जास्त किंमतीला विकून लोक श्रीमंत होतील.

"आपली" संस्कृति नक्की काय आहे यावर एकमत होणे अशक्य - कारण कुणालाच नक्की माहित नाही. त्या संस्कृतीत काय चालते नि काय नाही हे नेहेमी बदलत रहाते. काही गोष्टी ज्या पूर्वी संस्कृतीच्या नावाखाली सिनेमात दाखवू शकत नव्हते त्या आता सर्रास दाखवतात - बायकांची गेल्या पन्नास वर्षातली वेषभूषा बदलली, मुलामुलींची मैत्री (डेटिंग). हे पूर्वी लपून छपूनच होत असे तर आता नाही.

<<म्हणून विचारावेसे वाटते की हे संस्कृतीरक्षक कुणा विशिष्ठ पक्षाचे आहेत का?>>

राजकारण करण्याकरीता याहून उत्तम मुद्दा आहे का? Happy

>>कामसूत्र विकलं जातं>>

कामसूत्र नावाचं१) पुस्तक, २)गंडा अथवा, ३) मेणाच्या शिल्पप्रतिकृती?

आपल्याकडे जी मूळ अथवा जुनी हस्तलिखितं होती ती बरीच मॅक्समुल्लरने नेली म्हणतात. ब्रिटिशांनीही नेली.

इजिप्तच्या कबरीतली चित्रं (३५०० वर्षांपुर्वीची) अजूनही पाहता येतात.
शृंगारिक मोठे लिंग दाखवले आहे,
राजाराणी अतिसुंदर रेषमी वस्त्रांत आहेत तर दासी फळे ,मदिरा घेऊन संपूर्ण नग्न उभ्या आहेत. हे कशाला?

सहाव्या शतकाअगोदरच्या शिल्पांत पुरुषांची लिंगे दाखवली आहेत व्यवस्थित. उदा० कलिंजर किल्ल्यातला भैरव. नंतरच्या काळातील शिल्पे पाहिल्यास शिल्पकारांनी तो भाग उरकल्यासारखा केला आहे.

एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल प्रथम वरदा यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. याबद्दल लिहिताना मला काही पूर्वकालीन संदर्भ देऊन त्याचे धागे या प्रश्नाशी जोडल्यास आणखी एक दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहता येईल असे वाटते. मी माझे म्हणणे एक एक मुद्दा घेऊन मांडण्याचा प्रयत्न करीन. पोस्ट मोठी होण्याची शक्यता आहे.

१. आपल्याकडे वेद हे जर सर्वात प्राचीन वाङमय मानलं तर त्यात भरपूर धनसंपत्ती मिळावी, मुले बाळे व्हावीत, भरपूर आयुष्य मिळावे अशा प्रवृत्तीपरच प्रार्थना आहेत. अथर्व वेदात तर अगदी आजार बरा करण्यापासून ते वशीकरणापर्यंत सर्वकाही आहे. यम यमी सारख्या वेदांतील कथांमध्ये बहिणीला भावाबद्दल आसक्ती वाटण्याची भावना आहे ज्याला यमाने स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या परंपरेत ऋषीमुनिंच्या, देवादिकांच्या स्खलनाच्या कथाही अनेक आहेत. पुढे ब्राह्मणग्रंथांमध्ये यज्ञपरंपरा बलवान असताना पुन्हा स्वर्ग मिळावा हीच इच्छा आहे. मोक्ष वगैरे कल्पना या नंतर आरण्यके आणि उपनिषद काळातल्या आहेत. याचा अर्थ भोगप्रवणता ही प्राचीन भारतात काही नवीन गोष्ट नाही.

२. महाभारतात तर युधिष्ठीर द्रौपदीला एकांतात पाहिल्यावर ठरलेल्या नियमाप्रमाणे अर्जुन तीर्थाटनाला जातो आणि लग्न करत सुटतो. सुभद्राहरणही त्याच काळात घडते. तीर्थाटनाला गेल्यावर हे उद्योग कुणी करायला सांगितले अशी कुणी हरकत घेतलेली नाही. महाभरत युद्धात शेवटी लग्न न केलेल्या अश्वत्थाम्याला आपले ब्रह्मास्त्र परत घेता येत नाही आणि अनेक लग्ने केलेला अर्जुन मात्र आपले अस्त्र परत घेऊ शकतो. त्यामुळे प्राचीन भारतात ब्रह्मचर्य नक्की कशाला म्हणत होते हा देखील मला विचार करण्याजोगा प्रश्न वाटतो.

३. पुढे संस्कृत वाङमयात जी पंच महाकाव्ये म्हणून प्रसिद्ध आहेत त्यातील एकूण ९६ सर्गातील ३२ सर्ग म्हणजे जवळपास एक तृतीयांश भाग हा शृंगाराने भरलेला आहे असे मी कुठेतरी वाचल्याचे आठवते. हे वाङ्मय माणसे आजदेखील आवडीने वाचतात आणि डोक्यावर घेऊन नाचतात. त्यातच आमच्या काव्यशास्त्रात तर भरताच्या नाट्यशास्त्रापासून ते अगदी शहाजहानच्या दरबारी असलेल्या पंडीत जगन्नाथापर्यंत सर्व काव्यशास्त्रज्ञानी शृंगाररसाची चर्चा केली आहे. अमरुशतकासारखे शृंगारिक वाङमय उपलब्ध आहे. अगदी आयुर्वेदातही वजीकरण हा भाग आहेच.

४. त्याकाळात, आजच्या ओशोंनी ज्याचा प्रसार केला त्या संभोगातून समाधीकडे जाण्याच्या मार्गाचे तत्त्वज्ञान काश्मिरीशैव पंथाच्या रुपाने प्रसिद्ध होते. त्याच विषयावरील अभिनवगुप्त या अकराव्या शतकातील विद्वानाचे तंत्रमार्गावरील ग्रंथही प्रसिद्ध आहेत. पंचमकार, वाम मार्ग हेही प्राचीनांना ज्ञात होतेच.

हे सर्व विवेचन करण्याचे कारण हे की त्याकाळी जनसामान्यात मान्य असलेल्या, प्रचलित असलेल्या आणि पूज्य असलेल्या भावनांचे आणि चालीरितींचेच प्रतिबिंब शिल्पकलेच्या रुपाने खजुराहोच्या मंदिरात आपल्याला दिसते असे माझे मत आहे. त्यात कुणाला धक्का बसण्याचे कारण नाही. आपली परंपरा मूलतः निवृत्तमार्गी नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.

याचा दुसरा भाग हा की शृंगाराबरोबरच प्राचीन काळी यमनियम आणि ब्रह्मचर्याचा आग्रह धरणारा योगमार्ग आहे. तृष्णा क्षयाचा अग्रह धरणारा बौद्धधर्म आहे. आत्यंतिक अहिंसेचा आग्रह धरणारा जैन धर्म आहे. वेद मानणारे पण ईश्वर मान्य नसलेले सांख्य तत्त्वज्ञान आहे. फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानणारे चार्वाक तत्त्वज्ञान आहे. हे तत्वमार्ग नुसतेच अस्तित्वात नाहीत तर त्यांना दर्शनांमध्ये स्थानदेखील आहे. पुढे सर्वकाळी मिळाल्यावर भोगवासना पूर्ण झाल्यावर ब्रह्मजिज्ञासेला सुरुवात करणारी ब्रह्मसूत्रे आणि शांकरभाष्य आहे.

त्यामुळे मला असे वाटते की प्राचीन मंडळी याबाबतीत खुल्या मनाची होती. ज्यांना जे आवडते, ज्यांचा ज्याकडे कल आहे ते त्यांनी घ्यावे अशी त्यांची भूमिका असावी. आग्रह कसलाच नव्हता. जे आग्रही होते त्यांच्या वाद आणि चर्चा होत. मते खंडण मंडनाने पटविली किंवा खोडली जात. तोडून टाका, जाळून टाका असा पिसाटपणा प्राचीन लोकांमध्ये नव्हता. प्राचीन भारताबद्दलचे माझे हे आकलन जर बरोबर असेल तर खजुराहो मंदिराबद्दल वाद घालण्याचे काही कारणच उरत नाही. आणि प्राचीनांची ही भूमिका मला स्वतःला अतिशय आधुनिक, लोकशाहीला पूरक आणि आजदेखील आपल्या काळाच्या पुढची वाटते.

नंतरच्या काळात सम्राट अशोकासारख्या चक्रवर्ती सम्राटाने बौद्ध धर्म स्विकारला, त्याचा प्रसार केला. अनेक राजांनी बौद्ध धर्माला आश्रय दिला म्हणून इतरांची मंदिरे, वाङ्मय जाळून टाका अशा आज्ञा दिल्याचे ऐकिवात नाही. शंकराचार्यांनी अद्वैत मत प्रस्थापित केले म्हणून हिंदूनी आता बौद्ध मठ आणि विद्यापिठे जाळून टाकण्याचा फतवा काढल्याचेही ऐकीवात नाही. हा वेडेपणा नंतरच्या काळाची देणगी आहे. पूर्वीची मंडळी आजच्यापेक्षा नक्कीच सहिष्णु होती.

ज्यांना खजुराहो मान्य नाही त्यांना इतर मार्ग उपलब्ध आहेत. त्यांनी संन्यास घ्यावा, आजन्म ब्रह्मचारी रहावं, उर्ध्वरेता व्हावं, योगमार्गी व्हावं, जैनपंथात जाऊन देहदंड करून घ्यावा, मोक्षमार्गी होऊन गुहेत जावं. सार्‍या वाटा मोकळ्या आहेत. कुणीच अडवलेले नाही. पण सरसकट खजुराहोच्या मंदिरांवर गदा आणणे म्हणजे आपल्याला जिलेबी आवडत नाही म्हणून जगातली यच्चयावत जिलेबीची दुकाने पाडून टाका म्हणण्यासारखेच आहे.

मी स्वत: गांधींचा अगदी आंधळा म्हणता येईल असा भक्त आहे पण म्हणून मला गांधींची सर्वच मते पटतात अशातला भाग नाही. वरदाने सांगितलेले गांधींचे मत मला कधीही पटणे शक्य नाही. किंबहूना मला ते त्यांच्याच संयमाच्या शिकवणूकीच्या विरोधी आहे असे वाटते. त्यामुळे त्या मताला माझा नेहेमी विरोधच असणार. फार पूर्वी वाचलेल्या एका पुस्तकाचा आगापिछा आठवत नाहीय पण एका प्रसंगी क्रांतिकारकांमध्ये चर्चा चाललेली असते आणि कुणीतरी चिडून ताजमहाल पाडण्याची भाषा करतो तेव्हा एकजण म्हणतो" खुबसूरत दुनिया बसाने चले है, खुबसूरत चिजोंको तोडकर? उन्हे मिटाकर? ये नही हो सकता" खजुराहोबद्दल माझे मत नेमके हेच आहे.

सगळा ढोंगीपणा आहे , भारतात काम्षास्त्र म्हटले की लगेच ते वाईट ठरतं.

प्रत्येक लेणी मग बादच पाहिजेत.

>>>बायकांची गेल्या पन्नास वर्षातली वेषभूषा बदलली, मु<<

पुरुषांची पण बदलली की हो... पण हा मुद्दा इथे लिहायचं कारण अथवा संदर्भ नाही कळला.

ज्यांना भरपूर मुलगे हवे असतात, तेच अशा कामशिल्पांवर वगैरे बंदी घालायला उत्सुक असतात.
संतानप्राप्ती साठी जे लोक देवीची खणा नारळाने ओटी भरायला जातात तेच लोक घरातल्या बायकांना पाळी चालू असताना देवीच्या मंदिरात जाऊ देत नाहीत.
मात्र मुलीला पहिल्यांदा पाळी आली की यातीलच काही लोक उत्साहाने तिची पूजा करतात (तिला पाळीचा अर्थ फक्त "मूल होण्यासाठी येते" असा अर्धाच समजावून).

हे शिल्प बनवणारे लोक कामवासना हा आयुष्याचा अंगभूत भाग आहे असे समजणारे, आणि त्याचा योग्य तासा आदर करणारे असावेत.
दांभिकपणा तेव्हा आत्ता आहे तेवढा सोशली ऍक्सेप्टेबल झाला नसेल.

>>>तच आमच्या काव्यशास्त्रात तर भरताच्या नाट्यशास्त्रापासून ते अगदी शहाजहानच्या दरबारी असलेल्या पंडीत जगन्नाथापर्यंत सर्व काव्यशास्त्रज्ञानी शृंगाररसाची चर्चा केली आहे.

हा मुद्दा फार चांगला मांडला आहे. मी साधारण १७ वर्षं भरतनाट्यम शिकले. पण माझ्या ताईने काही वर्णम आणि इतर प्रकार आम्ही १५-१६ वर्षांच्या होईपर्यंत शिकवले नाहीत. त्यात संपूर्ण शृंगार रस होता आणि तो व्यक्त करण्याइतकी समज येण्याची आमची गुरु वाट पाहत होती. यातील कितीतरी रचना संस्कृत आहेत.

भारतात नर्सिंग मदर यातील कुठल्या ठिकाणी जाऊन नर्स करू शकते? किंवा नर्स करताना कोणी बघितली आहे ? <<< अमितव, भारतात नर्सिंग मदर यातल्या सगळ्या ठिकाणी जाऊन नर्स करू शकते. Happy

<<<पण हा मुद्दा इथे लिहायचं कारण अथवा संदर्भ नाही कळला.>>>
एव्हढाच की संस्कृतीच्या नावाखाली जे जे येते, ते ते बदलत जाते. पुरुषांची वेषभूषा पण बदलली, तश्या अनेक गोष्टी बदलल्या, पण सगळ्यांची यादी मला ठाऊक नाही नि गरजहि वाटली नाही - उदाहरणादाखल लिहीले.
आमच्या काळी, पुरुषांनी वेशभूषा बदलली तर लोक म्हणाले नाहीत की "संस्कृती ला शोभत नाही हो." पण बायकांच्या बाबतीत मात्र जरा बदल झाला की लोकांना "संस्कृति" आठवे!
ढोंगी, अज्ञानी लोक. संस्कृति म्हणजे काय माहित नाही - खरे कारण देता आले नाही की धर्म, संस्कृति असली कारणे सांगायची - कुणाला नक्की माहित आहे का त्यांचा अर्थ? मला तरी नाही, पण इतर कुणि समाधानकारक उत्तर दिलेले नाही.

<<<त्यामुळे मला असे वाटते की प्राचीन मंडळी ................... प्राचीनांची ही भूमिका मला स्वतःला अतिशय आधुनिक, लोकशाहीला पूरक आणि आजदेखील आपल्या काळाच्या पुढची वाटते.>>>
पटले, अनुमोदन.

ही बातमी गुगल केली तेव्हा दिसलं की कोणा 'बजरंग सेना' नामक संघटनेने या शिल्पाच्या ठिकाणी मंदिरात कामसूत्र विकलं जाणं, छोट्या प्रतिकृती(Figurines) विकणं यावर बंदीची मागणी केली आहे. बीबीसी या संघटनेला 'little known outfit' म्हणते. यांचा विरोध मूळ शिल्पाना नसून तिथे जी विक्री चालते त्याला आहे असंही दिसतंय
http://m.hindustantimes.com/india-news/bajrang-sena-says-sale-of-kamasut...

शिल्पाना विरोध असणं आणि तिथे कामसूत्र विक्रीला विरोध असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिल्पाना विरोध कोणी केल्याचं मीडियात आलं आहे का?

अमेरिकेत कुठेही हिस्टोरीक वगैरे ठिकाणी गेलं की बाहेर पडताना तुम्ही Souvenir shop मधूनच पडता. मग काहीतरी घ्यायचा मोह होतोच, मुलं सोबत असली तर टॉय तरी घ्यावं लागतंच. न्यू यॉर्क मधये ९/११ मेमोरियल उभं राहिलं तेव्हा तिथे असं शॉप असू नये अशी मागणी होत होती त्याची या निमित्ताने आठवण झाली.

>>शिल्पाना विरोध असणं आणि तिथे कामसूत्र विक्रीला विरोध असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

सनव ताई हा मुद्दा स्पष्ट करणार का? नक्की काय वेगळेपणा आहे?
कामसूत्र विक्रीला विरोध का असावा असं तुम्हाला वाटतंय?
फक्त कामसूत्र विक्रीला विरोध आहे की सरसकट सगळ्याच souvenir ना विरोध आहे?

विरोध का आहे, तेही महत्त्वाचं आहे ना?

Such things affect the image of Indian culture and traditions in the eyes of the foreigners,” said Agarwal.

“Whatever has been depicted can’t be allowed to happen here now. What sort of moral values are we passing on to our younger generation?” Jyoti Agarwal, a Bajrang Sena member

माझा कशालाच काहीच विरोध नाही. या कोणा फ़ुटकळ संस्थेला समर्थन तर अजिबात नाही. फक्त इथे facts वर based चर्चा व्हावी इतकी अपेक्षा आहे.

१. हे जे मूठभर प्रोटेस्टर आहेत त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की शिल्पाना विरोध नसून पुस्तक व प्रतिकृती विक्रिला आहे. मग यावर चर्चा असावी.
२. बाकी तिथे जे काही depict केलं आहे ते आज पब्लिक स्पेसमध्ये करायला किंवा चित्रपटात दाखवायला बंदीच आहे व ती गेल्या ३-४ वर्षात नसून आधीपासूनच आहे. मग ते कायदे पण तालिबानी म्हणायचे का?

बाकी यानिमित्ताने मायबोलीवर आपली प्राचीन संस्कृती किती महान , प्रगल्भ होती व मंदिरांचे जतन व्हायाला हवे हे लिहिले गेले हे एक छान झाले!

हे जे मूठभर प्रोटेस्टर आहेत त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की शिल्पाना विरोध नसून पुस्तक व प्रतिकृती विक्रिला आहे. >> इतकी वर्ष होत असताना अचानक त्यांना जाग का यावी यावर ही चर्चा करण्यात यावी.

सनव,
सगळ्यात पाहिल्यांदी,
तुम्ही या बंदीला (तुमच्या मते हि बंदी फक्त पुस्तके आणि मूर्ती मंदिराच्या आवारात विकण्यापुरती मर्यादित आहे) पाठिंबा देता कि विरोध करता हे स्पष्ट शब्दात सांगा.
"माझा कशालाच विरोध नाही, फ्रिन्ज इलेमेन्ट ना पाठिंबा नाही, मात्र बंदी घातली म्हणजे फार काहि वेगळे केले नाही" हा स्टॅन्ड अतिशय अँबिग्युअस आहे,
जर पाठिंबा देत असेल तर का देत आहात ते सांगा,

मग पुढे बोलू

बंदीची मागणी हे आजाराचं लक्षण आहे. {गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे} हा तो आजार.
कामसूत्र आणि ती शिल्पे ,यांमुळे भारतीय संस्कृतीचं चुकीचं चित्र पर्यटकांकरवी जगभर जातं, असं मागणी करणाऱ्या फुटकळ संस्थे चं म्हणणं आहे. - याबद्दल काय म्हणणं आहे?

<<<<यानिमित्ताने मायबोलीवर आपली प्राचीन संस्कृती किती महान , प्रगल्भ होती व मंदिरांचे जतन व्हायाला हवे हे लिहिले गेले हे एक छान झाले!>>>
अनुमोदन.
चंगली होती हो आपली संस्कृति. वाईट वाटते आताशा कुणाला समजत नाही नक्की काय होते संस्कृतीत नि काय नाही. मग जो उठतो तो म्हणू लागतो अशीच आपली संस्कृति - मग काय विचारता? आता अर्थपण बदलला संस्कृति शब्दाचा! आज जे काही कायदेशीर समजले जाते तीच संस्कृति!
मी म्हणतो करायचे ते कायदेशीरपणे करा फुक्कट संस्कृति, धर्म वगैरे कारणे सांगू नका. जर बहुमताने ठरले की बजरंग सेना करते तसे करावे तर तसे करा. अजून तरी ते कायदेशीरपणेच चळवळ करत आहेत ना? मग करू दे. अश्या चळवळी अधून मधून होणे हेच जित्ता जागता समाज असल्याचे लक्षण आहे तसाच समाज प्रगति करू शकतो.

तुम्ही या बंदीला (तुमच्या मते हि बंदी फक्त पुस्तके आणि मूर्ती मंदिराच्या आवारात विकण्यापुरती मर्यादित आहे) पाठिंबा देता कि विरोध करता हे स्पष्ट शब्दात सांगा.

अहो माझ्या मते नाही हो, न्यूजमध्ये तसं म्हटलंय. तुम्हाला काही वेगळं सापडल्यास जरूर लिंक द्या.

माझा या बंदीच्या मागणीला विरोध आहे.

म म पर्यटक लहान मुलांना घेऊन खजुराहो ला सर्रास सोडाच पण अपवाद म्हणून तरी जातात का? जाणून घेण्याची जबरदस्त उत्सुकता आहे

माहीत नाही! मला फनी वाटली ती situation imagine करून. विषयांतराबद्दल क्षमस्व.

पुन्हा मुद्दा- विक्री बॅन करावी का? माझ्या मते नको.

या लिटिल नोन आउटफिटांना सपोर्ट होईल, असे करणार्‍या पोस्टी टाकणार्‍या सनव सारख्या आयडीजची खरेच कीव येते.
चार लोकांनी कोंडीत पकडून तुमचा विरोध आहे का? असे विचारल्या वर हो विरोध आहे म्हटल्या, पण तरीही 'लहान मुले सुवेनियर शॉप व खुलेआम विक्रीला ठेवल्यासारखे पोर्न' असे चित्र बळेच उभे करून अतिरेकाला हातभार लावलाच.

केसरी वाले काय बळंच तुम्हाला पोराबाळांसकट अशा शॉप्समधे नेणारेत की काय? अन परदेशी कॅमेर्‍यांत कैद फोटोंचं काय?

त्यांचाही नाईलाज आहे. Lol भाजपा/संघी ब्रेनवॉश्ड आहेत. काय करणार!

Pages