येईल आता मृदगंध

Submitted by र।हुल on 11 June, 2017 - 04:20

येईल आता मृदगंध..

तापलेली ही धरती ।
नजर लावे वरती ।।
बरसेल तो धुंद ।
येईल आता मृदगंध ।।१

आठवणी ह्या चित्ती ।
वारा वाहे भोवती ।।
होईल कसा मंद ।
येईल आता मृदगंध ।।२

व्याकुळलेली ती पोरटी ।
वाट पाहे गोरटी ।।
जुळतील पुन्हा बंध ।
येईल आता मृदगंध ।।३

प्रित ही चोरटी ।
ओढ लागे घरटी ।।
मिळतील जाता अंग ।
येईल आता मृदगंध ।।४

―₹!हुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला।।
आवडलं। साधी मांडणी पण सरळसोट जाणारी। कुठेही आघात न करता एक मस्त नोटवर येऊन संपण्यासारखी।

Mast lihilay..!!
amchya kde saddhya paus padtoy mhanun vachaayla ankhi majja aali...

छान ...

सही...
तापलेली ही धरती ।
नजर लावे वरती ।।
बरसेल तो धुंद ।
येईल आता मृदगंध ।।