क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनुष्का गुणतिलका .
अपेक्षेपेक्षा कमी, पण चांगला झाला स्कोर. नॉट बॅड. टू अर्ली टु प्रेडिक्ट पण आपले चान्सेस चांगले वाटताहेत!! Happy

आता हपिसात अलेय त्यामुळे नुस्ते लाइव्ह अपडेट बघतेय. पण ७०/१ , १४ ओवेर्स मधे इज प्रेटी गुड! विकेट नाही काढल्या तर हाणतील आता.

मस्त! गेला! कसली टाईट बॉलिंग आहे? तो डिकवेला खरं किती हलतो, भारी स्टान्स आहे त्याचा पण तरी लाईन जबरी अ‍ॅक्युरेट ठेवतोय भुवनेश्वर.

क्वॉर्टर फायनल्स.. सेमी फायनल्स ग्रुप स्टेज संपल्यावर आहेत..

कालची मॅच लंकेनी एकदम क्लिनिकली जिंकली.. आपण ज्या पद्धतीत ३२१ मारले त्याच पद्धतीत त्यांनी शांतपण कुठेही आततायीपणा न करता ३२२ मारले. कुठलाच बॅट्समन उगाच मारत नव्हता. आणि आपले बॉलर्स अगदीच साधे वाटले. कदाचित नक्की काय करावे ह्याची स्ट्रॅटेजीच नव्हती. सुरुवातीपासूनच सहज एक एक धावा दिल्या, त्या रोखायचा काही प्लॅन दिसला नाही.. ३२१ करायला अवघड जातील असे वाटल्यामुळे एक लिथार्जिकपणा आला आणि त्यातूनच मॅच गेली..

१९७९ च्या वर्ल्ड कप मधे लंके कडून आपण हरलो होतो - तेव्हा आपल्याला वन डे मधे काहीच झेपत नव्हते. पण त्यानंतर पहिल्यांदा इंग्लंड मधे लंकेकडून हरलो आज. मधल्या इतक्या वर्षांत ४-५ मॅचेस मधे कधीच हरलो नव्हतो.

आता पॉईंट टेबल बघता सहज जाणवले की ईण्डिया-आफ्रिका आणि लंका-पाकिस्तान दोन्ही सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि एकेक पॉईण्ट मिळाले तर ईंडिया आफ्रिका रनरेटच्या जीवावर सेमीला जातील.

जर फक्त आपल्याच सामन्याला पाऊस पडला तर त्यांच्या सामन्याला पडो न पडो आपण आफ्रिकेपेक्षा सरस रनरेट असल्याने सेमीला जाणार..

तर कोणी मला सांगेल का रैवारी पावसाची किती शक्यता आहे ?

आमार बांगला जिण्कतेय की काय..
उद्या ऑस्ट्रेलिया ईण्ग्लण्डशी हरून बाहेर गेली तर बांग्ला सेमीला..
आणि आपण आफ्रिकेला मारून पोचलो तर आपण त्यांच्यासोबत सेमीला Happy

बांगला काल जबरी जिंकले. पहिल्या चार विकेट स्वस्तात गेल्यावर शकीब आणि महमदुल्ला ने अप्रतिम बॅटिंग केली. आणि सुरुवातीचे भेदक वाटणारे न्यूझीलंड चे बॉलर एकदमच निष्प्रभ ठरले. साउदी, बोल्ट आणि मिल्ने चे ओपनिंग स्पेल भन्नाटच होते. बॉल झेपतच नव्हता. पण नंतर बाकीच्या बॉलर्स ला ते तितकेसे जमले नाही, आणि एक दोन एक दोन धाव घेत एकदम शांतपणे चेस केला. अर्थात बॉलिंग मध्ये पण बांगला वाल्यांनी चमक दाखवली. विल्यम्सन आणि टेलर खेळत होते तेव्हा ३०० आरामात करतील असे वाटत होते, पण नंतर अचानक ब्रेक बसला, आणि फक्त २६५ झाला स्कोर. बांगला साठी एक कलेक्टिव्ह विजय ठरला.

Pages