गेले कितीतरी दिवस मराठी चित्रपट पाहायला गेल्यावर, "उगीच आलो" असं वाटायचं. म्हणून आधीच मुरंबा पाहायचा नाही असं ठरवून टाकलं होतं. पण चिनूक्सनी फेबुवर आवर्जून पाहावा असा चित्रपट आहे असं वर्णन केल्यावर तिकीट काढलं.
मुरंबा गोष्ट आहे फक्त एका दिवसाची. आलोक (अमेय वाघ) आणि इंदू (मिथिला पालकर) यांचं ब्रेकअप होतं. इंदूचं तीन चार वर्षं आलोकच्या घरी येणंजाणं असल्यामुळे आलोकला ही बातमी त्याच्या आई बाबांना (चिन्मयी सुमीत - सचिन खेडेकर) सांगावी लागते. त्याची कारणी मीमांसा करताना आलोक जी कारणे देतो ती वरवर पटण्यासारखी वाटतात, निदान आत्ताच्या पिढीला तरी, पण त्याच्या आई बाबांना मात्र इंदूशी बोलायचं असतं. इंदूशी बोलल्यावर आणि एकूण परिस्थिती उलगडल्यावर त्यांच्यातले खरे मतभेद समोर येतात आणि मिटतात, अशी ही गोष्ट आहे.
कुठलही नातं बळकट बनवायचं असेल तर आपल्यातल्या आणि समोरच्या व्यक्तीमधल्या सगळ्या भिंती पाडाव्या लागतात. आणि नवरा बायकोच्या नात्यात (किंवा, हल्लीच्या गफ्रे/बॉफ्रे नात्यात) आपल्याला कशाची भीती वाटते, कशाची काळजी वाटते, हे सगळं जितकं मोकळेपणाने बोललं जाईल तितकं ते नातं घट्ट होत असतं. पण लहान वयात आपल्या जोडीदारासमोर आपली एक प्रतिमा जपून ठेवण्याचा अट्टाहास केला जातो. कधी कधी ती प्रतिमा फक्त आपल्यापुरतीच खरी असते. समोरच्या माणसांनी कधीच त्या प्रतिमेपलीकडे जाऊन आपल्याला ओळखलेले असते. जेव्हा कुणीतरी आपले वर्म ओळखले आहे हे लक्षात येते, तेव्हा त्या व्यक्तीचाच रागराग केला जातो. त्या व्यक्तीला आयुष्यातून काढून टाकले की आपण पुन्हा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपली प्रतिमा कवटाळून जगायला मोकळे आहोत असं वाटायला लागतं. अशीच काहीशी गुंतागुंत ह्या ब्रेकअप मागे आहे, जी चित्रपट पाहून जाणून घेण्यातच मजा आहे.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच मुरंबा अगदी मुरवून मुरवून तयार केलेला आहे. गोष्ट पटापट सांगायची घाई केली नाहीये, किंवा तिच्यात गरजेपेक्षा जास्त वेलची/साखर वगैरे घालायचा सुद्धा प्रयत्न नाहीये. त्यामुळे वरुण नार्वेकरबद्दल आदर वाटतो. आलोकच्या घरचे वातावरण, घरात चालणारे रूटीन इतके बारकाईने टिपले आहे की आपण चित्रपट बघत नसून त्यांच्या घरातच चहा घेत बसलोय असे वाटते. एका फ्रेममध्ये आलोकची आई डोसे घालताना दाखवली आहे. आणि त्या डोश्यांचा मस्त क्लोजप आहे. तसेच एका फ्रेममध्ये बाबा चहा करताना दाखवलेत. तिथे चक्क भांड्यात असलेला वेलची, चहापूडवाला चहा दाखवला आहे. आणि हे दोन्ही शॉट्स नंतर चर्चा व्हावी इतके लक्षात राहतात. हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.
अमेय वाघने शुद्ध पुणेरी मुलाचा अगदी नैसर्गिक वाटावा असा अभिनय केला आहे (तो त्याच्यासाठी नैसर्गिकच असावा). सगळा चित्रपट त्यानी त्याच्या अभिनयाच्या जोरावर उचलून धरला आहे. सचिन खेडेकर नेहमीप्रमाणे प्रामाणिक बाबांच्या भूमिकेला न्याय देतात. मिथिलाची भूमिका छोटी असली तरी तिच्यावर चित्रित झालेला प्रत्येक प्रसंग तिनी समर्थपणे पेलला आहे. पण या चित्रपटाची खरी नायिका चिन्मयी सुमीत आहे. ज्या ताकदीनं कमी शिकलेल्या, "बाहेरून" पुण्यात आलेल्या आईचा रोल तिनी केला आहे त्याला तोड नाही. तिची देहबोली, आवाज, चेहऱ्यावरचे भाव सगळं एकदम जमून आल्यासारखं आहे. आणि कुठेही मालिकांमध्ये जसे कधी कधी आईपण "ओव्हर" होते तसे झालेले नाही. चिन्मयीसाठी हा चित्रपट नक्कीच एक नवीन दार उघडून देणारा असेल यात वाद नाही.
तरुण मुलं/मुली असतील तर त्यांच्याबरोबर आईबाबांनी आवर्जून पाहावा असा आहे . आणि तरुणांनीदेखील "फॉर अ चेंज" आई बाबांबरोबर बघावा असा हा चित्रपट आहे.
परीक्षण अवडले.
परीक्षण अवडले.
थोडक्यात आटोपले ?
थोडक्यात आटोपले ?
अजुन लिहिण्याची गरज होती.
१० पैकी ५-६ घरात सहजपणे घडणारी गोष्ट आहे. उत्तमरित्या हाताळली आहे
छान परीक्षण, अमेय सोडून बाकी
छान परीक्षण, अमेय सोडून बाकी सगळ्यांसाठी पहावा असं वाटू लागलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मिथिलाचा रोल छोटा? बहुत नाइन्साफी है
समहाउ मला अमेय वाघ आवडत नाही
समहाउ मला अमेय वाघ आवडत नाही पण ट्रेलर आणी आइबाबा लाइव्ह जातात ते इतक आवड्ल होत की मुव्ही बघावासाच वाटत होता.. थिएटर ला मुव्हि बघण शक्य नाही, आपली मराठी वर आला की बघु.
थोडक्यात आटोपले ?>> एका दिवसाची कथा असेल तर यापेक्षा जास्त लिहता कस येइल
छान लिहिलयसं , स्पॉयलर अलर्ट
छान लिहिलयसं , स्पॉयलर अलर्ट द्यायची गरज आहे का बघ.
मिथिलाला पुर्ण लांबीची भुमिका मिळायला हवी , अगदी नॅचरल आहे ती.
छान लिहिलय.
छान लिहिलय.
सुरेख.
सुरेख.
कुठलंही नातं ..... पासून सुरू
कुठलंही नातं ..... पासून सुरू झालेला तिसरा पॅराग्राफ सही आहे. बहुधा हेच चित्रपटाचे सार असावे. याचसाठी चित्रपट बघावासा वाटतोय.
मस्त परिक्षण!
मस्त परिक्षण!
परिक्षण छान लिहिलं आहे. परवा
परिक्षण छान लिहिलं आहे. परवा 'चि आणि चि सौ का' पाहिला. त्यापेक्षा हा पाहिला हवा होता का? गेला आठवडा माबोवर फारसं न आल्यामुळे इथे मुरांबाची चर्चा आहे हे माहित नव्हतं. शुक्रवार पर्यंत टिकला तर पहाता येइल.
मस्त परिक्षण. बघायची इच्छा
मस्त परिक्षण. बघायची इच्छा नव्हती खरतर पण आता पहावा अस वाटतय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>परिक्षण छान लिहिलं आहे.
>>>परिक्षण छान लिहिलं आहे. परवा 'चि आणि चि सौ का' पाहिला. त्यापेक्षा हा पाहिला हवा होता का? गेला आठवडा माबोवर फारसं न आल्यामुळे इथे मुरांबाची चर्चा आहे हे माहित नव्हतं. शुक्रवार पर्यंत टिकला तर पहाता येइल.
'चि आणि चि सौ का' चा आईकडून रिव्ह्यू ऐकून मी मुरंबा कॅन्सल केला होता. पण खरंच बघण्यासारखा आहे. अवश्य बघा.
>>छान परीक्षण, अमेय सोडून बाकी सगळ्यांसाठी पहावा असं वाटू लागलंय
अमेयपण चांगला वाटलाय यात. कदाचित अवार्ड बिवार्ड पण मिळेल त्याला. माझा पण त्याच्या विषयी पूर्वग्रह आहे. पण तो बाजूला ठेऊन कौतुक केलं पाहिजे.
सई, मस्त लिहिलयस... आता तू
सई, मस्त लिहिलयस... आता तू इथे लिहिलेलं वाचल्यामुळे मला मुरांबा बघायचा मोह होतो आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेय वाघने शुद्ध पुणेरी
अमेय वाघने शुद्ध पुणेरी मुलाचा अगदी नैसर्गिक वाटावा असा अभिनय केला आहे (तो त्याच्यासाठी नैसर्गिकच असावा). सगळा चित्रपट त्यानी त्याच्या अभिनयाच्या जोरावर उचलून धरला आहे. सचिन खेडेकर नेहमीप्रमाणे प्रामाणिक बाबांच्या भूमिकेला न्याय देतात. मिथिलाची भूमिका छोटी असली तरी तिच्यावर चित्रित झालेला प्रत्येक प्रसंग तिनी समर्थपणे पेलला आहे. पण या चित्रपटाची खरी नायिका चिन्मयी सुमीत आहे. ज्या ताकदीनं कमी शिकलेल्या, "बाहेरून" पुण्यात आलेल्या आईचा रोल तिनी केला आहे त्याला तोड नाही.
पहिल्या वाक्यात बरोबर एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे. पण पुढे सगळीकडे अनेकवचनी का लावलंय ?
"चिनूक्सनी " लिहिलंय पहिल्या परिच्छेदात ते पण आदरार्थी लिहायच असेल तर मास्तरांनी , चिनूक्स यांनी असं लिहायला हवं. नाहीतर चिनूक्सने असं हवंय.
छान परिक्षण सई.
छान परिक्षण सई.
मी पण विकेंडला चि व चिसौकां पाहिला. ओवरऑल सिनेमा क्यूट वाटला पण तरिही अतिरंजित लाउड पण होता. सगळ्या लोकांनी थोडं हळू बोलायची गरज होती. किचाळून भांडायची गरज नव्हती. पण असो.
आता मुरंबा पण बघणार.
चि सौ का बघायचा होता पण नेमका
चि सौ का बघायचा होता पण नेमका सचिन आडवा आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता या शनिवारी पुन्हा चि सौ का ला जावे की हे परीक्षण वाचून मोरण्बा चाखावा या संभ्रमात पडलोय
यफ यु कोणी पहिला का... आकाश
यफ यु कोणी पहिला का... आकाश चा सिनेमा
मला आवडला मुरम्बा.
मला आवडला मुरम्बा.
चि.सौ.का. ओवरऑल सिनेमा क्यूट
चि.सौ.का. ओवरऑल सिनेमा क्यूट वाटला पण तरिही अतिरंजित लाउड पण होता. सगळ्या लोकांनी थोडं हळू बोलायची गरज होती. किचाळून भांडायची गरज नव्हती. +१
रविवारी मुरांबा पाहिला. खूप
रविवारी मुरांबा पाहिला. खूप आवडला. सगळ्यांचीच कामं छान झाली आहेत. सचिन खेडेकर सगळ्यात बेस्ट. अमेय वाघचा पुणेरी टोन खटकत नाही. चिन्मयी सुमितने पण मस्त काम केलं आहे. ती ह्या गेट अपमध्ये छान दिसते.. अगदी टिपीकल आई दिसते. मिथीला पालकरला कमी सिन्स आहेत पण तरीही छाप पाडते.
बर्याच दृष्यांमध्ये न बोलता, केवळ चेहेर्यावरून, डोळ्यांमधून बरच काही सांगितलं आहे. (टिव्ही सिरीयल्समध्ये लोकं स्वतःशीच मोठ्याने वाक्यच्या वाक्य बोलत असतात, ते पाहून हे अधिकच जाणवलं). आलोक आईला "तू अजूनच धारवाडच्या दहावी पास झालेल्या मुलीसारखी वागतेस.." म्हणतो तो सिन जबरी घेतलाय! त्यात तिघांचेही अभिनय उच्च!
मला ह्या सिनेमाची गाणीही खूप आवडली पण ती सिनेमात नाहीयेत !! एक सुरुवातीला आणि आणि एक शेवटी. बाकीची दोन नाहीच !!
सिनेमातल्या सगळ्या फ्रेम्स एकदम चकाचक, नीटनेटक्या, सुंदर वगैरे आहे. त्यामुळे पूर्ण सिनेमा एकदम प्रेक्षणीय वाटला.
परत एकदा पूर्णपणे शहरी वातावरणातला सिनेमा बघायला मजा आली.
सई, इथलं वाचून मी त्या डोश्यांच्या सिनवर अगदी लक्ष्य ठेऊन होतो पण ते दृष्य दिड सेकंदही नव्हतं. त्यामुळे तू आता त्या दृष्याचं रसग्रहण लिही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमेय वाघ चे शुभमंगल ::)http:/
अमेय वाघ चे शुभमंगल ::)
http://marathistars.com/news/amey-wagh-marriage-photos/
काल अखेर सकुसप मुरांबा पाहिला
काल अखेर सकुसप मुरांबा पाहिला. (सकुसप पाहायला जमलं नाही तर बघायचाच नाही असं ठरवलं होतं.
)
अमेय वाघने जबरदस्त काम केलंय. मला तो टीव्हीवर खूप काही आवडला नव्हता. इतर ४ जणं तसाच हा एक असं वाटायचं. पण मोठ्या स्क्रीनवर पहिल्या पाच मिनिटांत माझे हे समज गळून पडले.
त्याने टीव्ही मालिका वगैरे सोडून फक्त चांगले सिनेमे करावेत असं वाटून गेलं.
>>>सई, इथलं वाचून मी त्या
>>>सई, इथलं वाचून मी त्या डोश्यांच्या सिनवर अगदी लक्ष्य ठेऊन होतो पण ते दृष्य दिड सेकंदही नव्हतं. त्यामुळे तू आता त्या दृष्याचं रसग्रहण लिही
अरे देवा! त्यापेक्षा माझ्या घरी डोसे खायला या सगळे. ते जास्त सोपं आहे.
सुंदर सिनेमा ! परीक्षणात
सुंदर सिनेमा ! परीक्षणात लिहिलं आहे तसे अगदी मुरवलेले कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन ! मला वाटलं होतं गंभीर असेल पण गालातल्या गालात हसू येईल असा छान, हलकाफुलका आहे.
चि व चि सौ का आणि मुरांबा ह्या दोन्ही चित्रपटांची जातकुळी फारच वेगळी आहे त्यामुळे तुलना करुच नये असे वाटले. चि सौ का त विनोदनिर्मीतीसाठी पात्रांचे स्वभावविशेष आणि प्रसंग टोकदार करुन दाखवले आहेत व्यंगचित्रासारखे. तर मुरांबा subtle, polished आहे. दोन्ही आपापल्या जागी मस्त आहेत !
सई, इथलं वाचून मी त्या
सई, इथलं वाचून मी त्या डोश्यांच्या सिनवर अगदी लक्ष्य ठेऊन होतो पण ते दृष्य दिड सेकंदही नव्हतं. त्यामुळे तू आता त्या दृष्याचं रसग्रहण लिही >>> डोसे उलटण्याची आणि चहा करण्याची दृष्यं मस्त आहेत. इंग्लिशविंग्लिशची आठवण झाली. त्यात अशी लाडू वळण्याची, जेवण वाढण्याची दृष्यं आहेत. जाहिरातींमध्ये असे पदार्थांचे वाफाळते क्लोज अप्स बघायला मिळतात बरेचदा.
जरा पांढर्या रंगावर उलटले. अजून कुणाला असे वाटले नाही का ?
ते नीर डोसे असतील तर ठीक आहे ( पण साधेच वाटले ). साधा डोसा असेल तर अजून जरा खमंग सोनेरी रंगावर उलटायला पाहिजे होते असे वाटले
अगो
अगो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि लोणी अंमळ जास्त नाही का वाटले ? हार्ट ट्रबल असतो ना त्याला? पँटीस आणि खारी पण मजेत खातो तो......
आणि लोणी अंमळ जास्त नाही का
आणि लोणी अंमळ जास्त नाही का वाटले ? हार्ट ट्रबल असतो ना त्याला? पँटीस आणि खारी पण मजेत खातो तो...... >>> मालपाणीचे क्रीम रोल्स पण![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सई आणि अगो,
सई आणि अगो,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
म्हणजे 'नेत्रसुखद' ह्या अर्थाने असेल तर हो, तसा तर पूर्ण सिनेमाच एकदम मस्त प्रेक्षणीय आहे. आलोकचं घर पण मस्त आहे एकदम. तो बाहेरचा 'सन रूम' सारखा एरीया पण मस दाखवला आहे एकदम.
एका दृष्यात आलोक समोर पंख्यासारखा डोसा आहे, उभा ठेवलेला, तो पण मस्त आहे एकदम.
मला वाटलं सईला त्या डोश्यांमधून काही प्रतिकात्मकता, गहन अर्थ वगैरे दिसला की काय ? म्हणून विचारलं.
मला वाटलं सईला त्या
मला वाटलं सईला त्या डोश्यांमधून काही प्रतिकात्मकता, गहन अर्थ वगैरे दिसला की काय ? म्हणून विचारलं. >>> सिनेमाच्या सुरुवातीला डोसे म्हणजे फर्मेंट होऊन फस(फस्)लेलं नातं, मध्यात वाईन म्हणजे नातं मुरायला लागल्याची नांदी आणि शीर्षकात मराठमोळा आंबटगोड मुरांबा म्हणजे चित्रपटाचं सार कुठलंही नातं मुरायला वेळ द्यावा लागतो असा प्रतिकात्मक अर्थ काढता येऊ शकतो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणी नाते सुद्धा कुरकुरीत
आणी नाते सुद्धा कुरकुरीत होण्याच्या आतच लोणी घालून पलटी मारले की मऊसूत राहते वगैरे .....:)
Pages