सरा ग बायांनो मी जाते रायाच्या भेटिला..

Submitted by किश्या on 23 May, 2017 - 01:05

सरा ग बायांनो मी जाते रायाच्या भेटिला..
भाकर ठेचा अन कांदा हाय माझ्या शिदोरीला..

पहाटच गेला राया माझा,
घेउन संगती तिफन पेरणीला,
एकटाच कसा पेरिल त्यो धान,
चावड धरायची मह्या हाताला...

उजवुनी कुस त्या धरणीमायेची,
घटकाभर थांबतो आम्ही विसाव्याला
टचकण दिसते माया म्ह्यावरची,
आंब्याच्या त्या सावलीला....

सर्ज्या अन राजा संगती आमच्या,
मायेचा घास त्यांच्या दावनीला,
पिवुद्या त्यांना घोटभर पाणी,
सैल सोडा त्यांच्या येसनीला..

दिस संपतो कामात उन लागली उतरनीला
सोबत ना सुटावी कश्याची हेच मागणं देवाला
आयुष्याचे धागे गुतले राया सोबत
काल्या मान्याच्या डोरल्याला
सरा ग बायांनो मी जाते रायाच्या भेटिला...

Group content visibility: 
Use group defaults

Happy
दिस संपतो कामात उन लागली उतरनीला
सोबत ना सुटावी कश्याची हेच मागणं देवाला
आयुष्याचे धागे गुतले राया सोबत
काल्या मान्याच्या डोरल्याला
सरा ग बायांनो मी जाते रायाच्या भेटिला...>>> मस्तच!

छानय...