कुठल्याही चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच 'संवाद' हेही महत्वाचं अंग असतं.
काही चित्रपटांमधले निवडक quotes, किंवा आपल्या देशी भाषेत 'डायलॉग्स' हे त्या चित्रपटांइतकेच फेमस आहेत.
उदा.
'I made him an offer he couldn't refuse!'
'Play it again, Sam!'
किंवा अगदी आपल्या गवर्नरसाहेबांचा 'I'll be back!'
आपले हिंदी चित्रपटही याबाबतीत मागे नाहीत.
राजकुमार, अजित यांच्यासारखे नरपुंगव तर इतर कुठल्याही बाबीपेक्षा त्यांच्या डायलॉगबाजीनेच अजरामर झाले.
पण एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही. बॉलिवुडचे सर्व 'डायलॉग्स' सहसा मेल कॅरॅक्टर्सच्याच तोंडी असतात! स्त्री अभिनेत्यांचे लक्षात राहाण्यासारखे डायलॉग्स जवळजवळ नाहीत! असं का बुवा?
हिंदी चित्रपटांमधले टॉप डायलॉग्स आठवून पहा.
'जाओ, पैले उस आदमी का साइन लेके आओ'
'मेरे पास मां है'
'जो डर गया, समझो मर गया'
'साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है'
'पुष्पा, आय हेट टिअर्स'
'ये बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है'
'जली को राख कहते है...' वगैरे वगैरे.
पण सर्वच्या सर्व पुरुष पात्रांचे.
स्त्री नट्यांच्या वाट्याला मात्र 'मैं तुम्हारे बच्चों की मां बनने वाली हूं' किंवा 'बेटा, मैंने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है' अशा जेनेरिक डायलॉगांपलिकडे नसतंच.
कधीकधी हिरोला एखाद्या स्त्रीपात्राला तिची जागा दाखवून देता येण्यासाठी, किंवा तिचा बावळटपणा अधोरेखित करता यावा म्हणून तिला एखादा 'लिडिंग' डायलॉग दिला जातो.
उदा. बराच वेळ बसंतीची बालिश बडबड, आणि अमिताभने 'तुम्हारा नाम क्या है बसंती' विचारणे.
किंवा 'लोग इस तरह अपने दरवाजे खिडकियां खुल्ली रखे तो चोर-उचक्के घरमे घुसेंगे ही' सारखा चीप डायलॉग.
बराच वेळ विचार केल्यावर एक स्त्रीपात्री डायलॉग सापडला... 'थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है'
आणखी खूऽऽप वेळाने आठवला 'परमिसन लेना चाहिये ना!??...'
पण असे एका हाताच्या बोटावर मोजता येतील.
असं का बुवा? स्त्री अभिनेत्यांवर नाच, गाणी अशांसारखी महत्वाची कामे सोडून चांगले डायलॉग 'वाया' घालवणे अडचणीचे पडत असावे का? की हिरॉइनच्या पर्सनॅलिटीला जितका फोकस मिळेल तितकी तिची इतर 'अंगे' झाकोळली जात असावीत?
बहुत नाइन्साफी है ये (छ्याः... पुन्हा पुरुषाचाच डायलॉग)
संघटन में शक्ती है, और
संघटन में शक्ती है, और अकेलेमें आपकी फटती है>>> गुलाब गँग.
शाहरुख चा ओम शांति ओम मधिल
शाहरुख चा ओम शांति ओम मधिल स्पीच हे फक्त शाहरुख लाच जमतं. कलाकार म्हनुन शाहरुख खुप आवडतो >>>
कितनी शिद्दत से तुम्हे पाने की कोशिश की है . की हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है .. कहते हैं अगर किसी चीज़ को अगर दिल से चाहो तो साड़ी कयनाथ तुम्हे उससे मिलाने की कोशिश में लग जाती है.. आज आप सबने मिलके मुझे मेरी चाहत से मिलाया . Thank you very much.. and I feel like I am the king of the world… आज मुझे यकीन होगया दोस्तों, की हमारी ज़िन्दगी भी हमारे हिंदी फिल्मों के जैसा ही है.. जहा पे एन्ड में सब कुछ ठीक हो जाता है.. “Happies Endings”.. लेकिन अगर एन्ड में सब कुछ ठीक ना हो तो वह the end नहीं हैं दोस्तों.. पिक्चर अभी बाकी है..
लोग हिरोंचे डायलॉग का लिहुन
लोग हिरोंचे डायलॉग का लिहुन राहिलेत?
ईथे लिहीलेले बरेचसे संवाद
ईथे लिहीलेले बरेचसे संवाद हीरोच्या किंवा बनवाबनवी च्या बाबतीत, साड्या नेसलेल्या पुरूष पात्राच्या तोंडचे आहेत.
धागाकर्त्याने लिहील्याप्रमाणे स्त्री पात्राचे लक्षात रहातील असे, किंवा iconic असे संवाद खूप कमी आहेत (तुलनात्मक). असं का हा चर्चेचा मुद्दा आहे ना?
खूप पुर्वी "महाश्वेता" म्हणून
खूप पुर्वी "महाश्वेता" म्हणून मराठी सिरीयल लागायची दूर्दर्शन वर. त्यातल्या अनुपमा च्या सा.बा. सारखे म्हणायच्या
"जगदम्ब...जगदम्ब..." राग खूप अनावर झाला की....भारी वाटायचे ते...
"डोला रे डोला" गाण्यानन्तर
"डोला रे डोला" गाण्यानन्तर च्या सम्वादान्मध्ये चन्द्रमूखी म्हणते, "....तमाशा अब खत्म हुआ.."
फेरफटका, दक्षिणा, हेच
फेरफटका, दक्षिणा, हेच म्हणायचं होतं. वर लिहिलेल्या डायलॉग्सपैकी 'आयकॉनिक' किती आहेत? 'आयकॉनिक' ची माझी व्याख्या म्हणजे- ते पोराटोरांनासुद्धा पाठ आहेत. ते कुठल्या चित्रपटातले किंवा कोणाच्या तोंडी हे बहुतेकांना सांगावं लागत नाही. आणि ते आपण बरेच वेळा आपल्या संवादात थोडे बदलून किंवा विडंबन करून म्हणीसारखे वापरत असतो. अशी उदाहरणं वरच्या प्रतिसादांमध्ये थोडी आहेत आणि त्यातली बरीचशी अलिकडच्या चित्रपटांमधली आहेत(काही अपवाद). यावरून सशक्त स्त्रीभुमिका असलेले चित्रपट आत्ताआत्ता बनायला सुरुवात झाली आहे असं दिसतं.
पूर्वीच्या ठोकळेबाज चित्रपटांत कुठलं काम कोणी करायचं याची वाटणी झालेली असायची. म्हणजे हिरोने सद्गुणांचा पुतळा असायचं, हिरोच्या आईने ममतेने ओसंडणारी गरीब गाय असायचं, हिरॉईनने नाचगाणी आणि सुंदर दिसण्याकडे लक्ष पुरवून शिवाय हिरोइतकाच, पण 'स्त्रीसुलभ' सद्गुणांचा पुतळा असायचं. निगेटिव्ह भुमिकेतल्या स्त्रीपात्राने माफक शरीरप्रदर्शनाचं डिपार्टमेंट सांभाळायचं, अशा सगळ्या ठोकळेबाजपणामध्ये डायलॉगबाजी हे 'फायटिंग' सारखंच एक 'पुरुषी' काम असं पर्सेप्शन असल्यामुळे ते जनरली हिरो आणि व्हिलन यांचं राखीव कुरण असायचं, असं वाटतं!
आपण धाग्याकर्त्याचे काय
आपण धाग्याकर्त्याचे काय म्हणणे आहे ते फाट्यावर बसवून त्यांचा धागा हॅक केला आहे.
बहुतेक प्रत्येक प्रतिसाद आला की हीच ती विषयबाह्य पोस्ट असे दे जावू फिलिंग त्यांना येत असावे.
सॉरी देजा वू जी. मी पण त्यातच भर घातली होती आधी.
द़क्षिणा आणि फेरफटका यांनी गाडी रुळावर आणली.
हरकत नाही! त्यानिमित्ताने
हरकत नाही! त्यानिमित्ताने अनेक मस्त डायलॉग कळले.
आणखी काही...
जब वी मेट मध्ये 'कुत्ते...उल्लु के पठ्ठे' पासून दबकत सुरुवात होऊन करीनाचा बांध फुटून 'तेरे मां कीऽऽऽऽ' पर्यंत पोचणे
दम लगा के हैशा मधली आत्या 'पीछे से आवाज निकले बिना तट्टी भी ना निकले आपकी, भाईसाब'
त्यातलीच मुलीला नवर्याला ब्लु फिल्म दाखवायला सांगणारी आई. जणू काही गीता वाचायला सांगत आहे अशा आवेशात 'माहोल बन जायेगा. क्रांती आ जायेगी विचारों में'
मलाही तोच प्रश्न पडला होता की
मलाही तोच प्रश्न पडला होता की. लोकं हिरोचे डायलॉग का टाकत आहेत.. पण मी मात्र सर्व स्त्री पात्रांचेच डायलॉग टाकले आहेत.
मागच्या पानावरील पुन्हा एकदा..
I have changed my mind. Titanic
समीर.. हवा का झोंका.. हम दिल दे चुके सनम
बस छोरी समझ के ना खेलना. दंगल
हे परत लिहिले.. कारण.. हा धागा आवडला. मस्त.!
डायलॉग पुढं सिनेमाच नाव
डायलॉग पुढं सिनेमाच नाव अभिनेत्यांच नाव काहीतरी लिहा लोकहो.. काही आठवत नाहियेत कशातले आहेत
>>>>>
हेच तर डायलॉग बाजीतले सेक्सिझम आहे. स्त्री पात्रांच्या तोंडी अजरामर संवाद तुलनेत फार कमीच..
धाग्याचा हेतू निव्वळ स्त्री पात्रांच्या तोंडचे डायलॉग लिहिणे नसून त्यांना दमदार डायलॉग तुलनेत कमी का असतात ही चर्चा देखील आहे.
दक्षिणा +१
दक्षिणा +१
द़क्षिणा आणि फेरफटका यांनी
द़क्षिणा आणि फेरफटका यांनी गाडी रुळावर आणली.>>> +७८६, आपले अभिनंदन!!!
मला देजा वू, यांच्या सहनशीलतेचे कौतुक करावेसे वाटते, तब्बल १०० प्रतिसाद होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली.
मला देजा वू, यांच्या
मला देजा वू, यांच्या सहनशीलतेचे कौतुक करावेसे वाटते, तब्बल १०० प्रतिसाद होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली>>>
खरंय! 'येथे फक्त, आणि फक्त, गाजलेले डायलॉग स्विकारले जातील' अशी पाटी सुरवातीलाच लावायला हवी होती
लोग हिरोंचे डायलॉग का लिहुन
लोग हिरोंचे डायलॉग का लिहुन राहिलेत>>> सध्या स्त्रि प्रदान भुमिका गाजवणारि आभिनेत्रि आहे विद्या बालन बाकि सर्व खानांबरोब्रर काम करण्यात धन्यता मानतात मग ति भुमिका दुय्यम असलि तरि चालते. त्यानंतर दुसरा नंबर लागतो दिपिकाचा...
इतर असतिल तर माहिति नाहि
Chehera ola kelyane dolyatle
Chehera ola kelyane dolyatle pani lapate as vatat ka tula,,
_Mitva
Ekhadyala apali savay
Ekhadyala apali savay lavaichi avdhich haus asel na tar aayushyabar sath dyaychi dhamak pan thevaychi..
_Mitwa
अनिता - नहीं पुजा, तुम विरेन
अनिता - नहीं पुजा, तुम विरेन कि जिम्मेदारी हो, परेशानी हो। और यही रहोगी।
पुजा - चलिए, मैं उनकी कुछ तो हूं, मगर आप उनकी क्या है?
@ kally, मितवा!!! वा:, मस्त!
@ kally, मितवा!!! वा:, मस्त!!! मी सेव्ह करून ठेवतो.
हे सगळे फेमस डायलॉग आहेत का?
हे सगळे फेमस डायलॉग आहेत का? मला तर माहित नाहीत. अगदी तो सिनेमा पाहिला असला तरी डायलॉग लक्षात राहिलेलेला नाही
सस्मित... फेमस कसलं ओ... लोक
सस्मित... फेमस कसलं ओ... लोक आपापले आवडीचं dialogue टाकून राहिले..
https://drive.google.com/file
मग आता लागलीच आहे वाट तर
मग आता लागलीच आहे वाट तर धाग्याचे शिर्षक तरी बदला
अनिता - नहीं पुजा, तुम विरेन
अनिता - नहीं पुजा, तुम विरेन कि जिम्मेदारी हो, परेशानी हो। और यही रहोगी।
पुजा - चलिए, मैं उनकी कुछ तो हूं, मगर आप उनकी क्या है?>>> हे कुठल्या चित्रपटातले?
लम्हें
लम्हें
Iconic संवाद असा हवा की तो
Iconic संवाद असा हवा की तो सिनेमा न बघता सुद्धा प्रसंगानुरूप तोंडात यायला हवा. कित्येकदा हा संवाद कुठल्या सिनेमात होता हे सुद्धा आठवायला लागतं, पण संवाद माहीत असतो. उदा. 'गाजर का हलवा' प्रसिद्ध आहे, पण मला तरी पटकन सिनेमाचं नाव आठवत नाही ज्यात , बेटे, मैने तुम्हारे लिये तुम्हारा मनपसंद गाजर का हलवा बनाया है' असं वाक्य पिनपॉईंट करता येईल. किंवा धर्मेंद्र चं 'कुत्ते, कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा' हे आठवलं, तरी सिनेमाचं नाव आठवत नाही. अजित चं 'उसे कहना, की उसकी माँ हमारे कब्जे मे है' माहीत आहे, पण नेमका सिनेमा नाही पटकन आठवत.
काही काही संवाद मात्र त्या त्या सिनेमासकट आणी सिनेमापुरते प्रसिद्ध होतात आणी तसेच लक्षात रहातात. उदा. शोले मधले असंख्य (लोहा लोहे को काटता है, बसंती ईन कुत्तो के सामने मत नाचना, बहुत याराना लगता है, संग्रेजोंके जमाने के जेलर वगैरे), किंवा जंजीर मधला, 'यह पुलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं ई.
सस्मित... फेमस कसलं ओ... लोक
सस्मित... फेमस कसलं ओ... लोक आपापले आवडीचं dialogue टाकून राहिले.. << मला तरसंशय येतोय की लोक स्वतःच लिहुन राहिलेत
लोक स्वतःच लिहुन राहिलेत
लोक स्वतःच लिहुन राहिलेत
सई ताम्हणकर स्पेशल !
सई ताम्हणकर स्पेशल !
अन्या चड्डीत राहायचं हा चड्डीत | Classmates Dialogue Scene | Marathi Movie
https://www.youtube.com/watch?v=_IP9wJdIdqg
आता फक्त राडा | Classmates Dialogue Scene | Ankush, Sai | Marathi Movie
https://www.youtube.com/watch?v=BsixWOg0gIY
ए स्मॉल आहे तो | A SMALL AAHE TOH | CLASSMATES DIALOGUE | ANKUSH | SAI |
https://www.youtube.com/watch?v=fjj9jDk6qH0
पुर्ण ऐका हे विडिओ..
हे असले डायलॉग महिलांमध्ये दमदारपणे सईलाच शोभावेत
सोबत / समोर अंकुश होता म्हणून टिकला, अन्यथा सईने एकहाती खाऊन टाकला असता
है यहा कोई मर्द हिंदुस्तानी
है यहा कोई मर्द हिंदुस्तानी जो मुझे छू सके..
Pages