पिवळ्या पंखांचा पक्षी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!

महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,

पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..

आता शिशिर ऋतूही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. थोड्याच दिवसांत 'इदं न मम' म्हणून समस्त वृक्षवल्ली, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात, संन्यस्त भावाने पर्णसंभाराचा त्याग करेल. नंतर येईल अखिल समष्टीला नवचैतन्य देणारा वसंत! त्या गर्दकेशरी वसंताची उत्सुकतेने वाट पाहात ही पीतवस्त्रा कर्दळ, सचैल न्हालेल्या षोडशेसारखी आत्ता पासूनच थटून बसलीय! Happy

सर्व मायबोलीकरांना ह्या विजयादशमीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! Happy

धन्यवाद!

विषय: 

परफेक्ट फ्रेम आणि फोकस......गूड जॉब ! Happy

सर्वांना विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा !

शैलजा अगं काय चाल्लंय काय्?
कस्स्ले भारी फुट्टू टाकतीयंस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
रंगांचा उत्सव!!!!!!!!!!!!!!!!!!!

Beauty!! Happy

Wow!!!

!!!!!!!! Happy

ओहो!!!!!!!! ते जुन्या गुलमोहोरात जुगलबंदी रंगायची चारोळ्या-कवितांची तसं वाटतय सध्या प्रची आणि त्यावरची लिखाणं वाचून. Happy

सहीये एकदमच..पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना.. Happy कसली गोड ओळ आहे.

Pages