पिवळ्या पंखांचा पक्षी
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
44
असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!
महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,
पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..
आता शिशिर ऋतूही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. थोड्याच दिवसांत 'इदं न मम' म्हणून समस्त वृक्षवल्ली, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात, संन्यस्त भावाने पर्णसंभाराचा त्याग करेल. नंतर येईल अखिल समष्टीला नवचैतन्य देणारा वसंत! त्या गर्दकेशरी वसंताची उत्सुकतेने वाट पाहात ही पीतवस्त्रा कर्दळ, सचैल न्हालेल्या षोडशेसारखी आत्ता पासूनच थटून बसलीय!
सर्व मायबोलीकरांना ह्या विजयादशमीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद!
विषय:
प्रकार:
शेअर करा
कर्दळीसारख्या बटबटीत फुलाचा
कर्दळीसारख्या बटबटीत फुलाचा इतका नाजुक फोटो? अप्रतीम! आणि तो पिवळा रंगही कसला मस्त उतरलाय!
मस्तच
मस्तच
सहीच एकदम.
सहीच एकदम.
superb !!!!
superb !!!!
सुरेख!!!
सुरेख!!!
आयटे, फोटो तर क्लास आहेच पण
आयटे, फोटो तर क्लास आहेच पण वरच्या ओळी विशेष भावल्या.
आयटी, एकदम सुरेख!! अगदी
आयटी, एकदम सुरेख!!
अगदी ओळींसह!
केलेल्या कौतुकाबद्दल आणि
केलेल्या कौतुकाबद्दल आणि दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार!
आयटे, कमबॅक केल्यासारख्या
आयटे, कमबॅक केल्यासारख्या वाटला... कर्दळीचं वर्णन भारी केलस. छान ओळींसहित फोटो
वॉव!
वॉव!
छान आलाय फोटो आयटी.
छान आलाय फोटो आयटी.
अ .... श .... क्य
अ .... श .... क्य !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुंदर!!
सुंदर!!
भावना, अल्पना, मिलिंदा, नीलू
भावना, अल्पना, मिलिंदा, नीलू आणि परागकण - आभार!
Pages