१) 0101….( शशक)
फक्त पैशांसाठी मी या प्रयोगात सहभागी झालो होतो.
माझ्या बधिर कवटीला छिद्र पाडतांना डॉक्टरांनी मला जागंच ठेवलं. त्यांनी डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना केबल्स जोडले. मेंदूच्या शुभ्र करड्या रंगात केसांएवढ्या बारीक केबल्सचा लाल रंग मिसळून गेला. त्या असंख्य केबल्सचं दुसरं टोक जोडलं गेलं सुपरकॉम्प्युटर्सना.
“ऑपरेशन सक्सेसफुल” त्यांनी जाहीर केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा महापूर उसळला होता. आता फक्त फायनल टेस्टिंग बाकी होतं.
इशारा झाला अन सगळे संगणक जिवंत झाले. माझ्या विचारांनी वायर्सचा पाठपुरावा केला. सळसळत गेलो मी इलेक्ट्रॉन्ससारखा.
आपली चूक त्यांच्या उशीरा लक्षात आली. त्यांनी मला शटडाउन करून टाकलं. पण… तोपर्यंत बराच उशीर झाला होता. माझ्या डिजिटल मेंदूने जगभरातल्या इंटरनेटचा ताबा घेतला होता.
२. पहिली भेट
२२ एप्रिल २१३८ ची संध्याकाळ :
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात अतिसंवेदनशील गुप्त बैठक सुरू होती.
“सगळे प्रयत्न हरलो आपण. तिसरं महायुद्ध आता अटळ आहे.”
“महायुद्ध आणि जगाचा विनाशही निश्चित आहे. म्हणून आपल्याला हे पाऊल उचलावंच लागणार.”
“बरोबर. टाईम मशीनचं टेस्टिंग पुर्ण झालं का?”
“झाल्यातच जमा आहे सर.”
“म्हणजे मिशन X साठी आपण तयार आहोत?”
“हो नक्की… पण भूतकाळात ढवळाढवळ करणं निसर्गनियमाच्या विरुद्ध होणार नाही का?”
“इथे मानवी अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय त्यामुळे हा विचार करण्यात आता अर्थ नाही. अहो जिवंतच नसू तर कसले नियम अन कसलं काय? इ.स. २०५६ मध्ये जाऊन ती घटना रोखली तरच हे महायुद्ध थांबू शकतं.”
“ठिकेय सर, आम्ही तयार आहोत.”
------------
पॅसिफिक महासागरात दडलेली ती गुप्त प्रयोगशाळा केव्हापासून तयार होती. हुबेहूब मनुष्यासारखे दिसणारे, वागणारे दोन ह्युमनाइड्स भूतकाळात जायला सज्ज होते. त्यांचा मेंदू सामान्य माणसापेक्षा जास्त सक्षम होता. एकाच्या डोक्यात राजकीय पेच सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी भरलेल्या होत्या तर दुसऱ्याचा डोक्यात काय होतं शब्दांत सांगणं अवघड होतं. दोघांनाही २०५६ सालात काय करायचं, कुणाला भेटायचं सगळं ठावूक होतं. पोशाखही त्या काळाला सुसंगत होता.
सगळ्या प्रक्रिया पुर्ण करून ते टाईम मशीनमध्ये बसले. प्रोग्राम्सचे सॉफ्टवेअर धावू लागले. २०५६ हे वर्ष टाईप करताच ती टाईम मशीन पहिला प्रवास करायला सज्ज झाली.
------------
आपले जडावलेले डोळे दोघांनी कसेबसे उघडले. डोकं जाम झालं होतं, मधे काय झालं काहीच आठवत नव्हतं. स्वतःचा तोल सावरत ते कसेबसे उभे राहिले. वेळ रात्रीची होती अन आसपास कुठेच टाईम मशीन दिसत नव्हती.
“हे फेला S “ कुणीतरी जोरात ओरडलं. पाठोपाठ घोडा खिंकाळण्याचा आवाज आला. अन पहिल्यांदाच त्यांनी आजुबाजुला पाहिलं. ते वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध उभे होते. घोडागाड्या दौडत होत्या, जुन्या काळातले पोशाख घातलेले लोक फिरत होते, चहुबाजूंनी राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती होत्या; अन सर्वात महत्वाचं म्हणजे, या दोघांकडे लोक विचित्र नजरेने पाहत होते.
“हाय फ्रेन्ड्स, आय थिंक यू आर लॉस्ट.” एक भारदस्त आवाज कानांवर पडला. झुपकेदार मिशा अन डोक्यावर उंच टोपी असलेला रूबाबदार तरुण होता तो.
“हरवलोय असंच म्हणावं लागेल.”
“गुड. मला हरवलेले लोक आवडतात. हाउ कॅन आय हेल्प यू?”
“विचित्र वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू?”
“नक्कीच.”
“सध्या कोणतं वर्ष सुरू आहे?”
“१८८४”
दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. टाईम मशीनने त्यांना चुकीच्या काळात आणलं होतं. परत जायचं तर बहुतेक तीपण नष्ट झाली होती. ह्युमनाईड्स असल्यामुळे सामान्य माणसांएवढं दुःख जाणवणं शक्य नव्हतं पण संपुर्ण मानवजात संकटात असेल तर थोडंफार दुःख तर होणारच.
“डोन्ट वरी, मी तुम्हाला मदत करेन.”
“थँक्स सर.”
“मित्रांनो तुमचे नावं नाही सांगितले तुम्ही अजून.”
ते सांगावं की सांगू नये या संभ्रमात पडले. कारण त्यांच्या काळात ह्युमनाईड्स लोकांना माणसांसारखे नावं नव्हते.
“इच्छा नसेल तर राहू द्या.”
“मी AL206D आणि हा AL205D. थोडे कठीण आहेत. पण तुम्ही आम्हाला हव्या त्या नावांनी हाक मारू शकता.”
“नो प्रॉब्लम.”
“युवर गुडनेम सर?”
“मी आर्थर कॉनन डायल. वेलकम टू लंडन फ्रेन्ड्स.”
३. साहित्यकोडे २
हॉस्पिटलच्या बेडवर छोटीशी, निरागस मुलगी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कॅन्सरच्या वेषात क्षणाक्षणाला तिच्या दिशेने पुढे सरकत होता. चेहरा पांढराफटक पडत चाललेला , नाकातोंडातून नळ्या घुसलेल्या, श्वासाची लय तुटक होत चाललेली.
अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता .........
--------------------------------------------
एक ते पाच कितीही शब्द टाका अन अर्थपुर्ण उतारा बनवा.
आहे की नाही सोपं
(पहिल्या दोन कथुकल्या कशा वाटल्या तेपण सांगा )
तिन्ही आवडल्या पहिल्या
तिन्ही आवडल्या पहिल्या कथेबद्दल सविस्तर लिहायला हवी आहे. तुम्ही म्हणालात की ८०० शब्दांची कथा आहे कृपया लिहा ना..! वाचायला मन उत्सुक झालयं.
चालेल. हस्तलिखित आहे. घरी
चालेल. हस्तलिखित आहे. घरी गेलो की type करून पोस्टतो.
हो कृपया नक्की लवकर टायपा
हो कृपया नक्की लवकर टायपा उत्सुकता अगदी ताणली आहे माझी...!:-):-)
हो कृपया नक्की लवकर टायपा
हो कृपया नक्की लवकर टायपा उत्सुकता अगदी ताणली आहे माझी...!:-):-)
“हे फेला S “ कुणीतरी जोरात
“हे फेला S “ कुणीतरी जोरात ओरडलं. पाठोपाठ घोडा खिंकाळण्याचा आवाज आला. अन पहिल्यांदाच त्यांनी आजुबाजुला पाहिलं. ते वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध उभे होते.
मी आर्थर कॉनन डायल. वेलकम टू लंडन फ्रेन्ड्स.
रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या माणसांना कोणी वेलकम का म्हणेल?
Pages