Hiii...मुलींसाठी लिहिलेला पाळणा...जेंव्हा मला मुलगी झाली तेंव्हा मी खूप शोधलं पण एकही खास मुलीसाठी लिहिलेला पाळणा मिळाला नाही....म्हणून राम आणि शिवाजीराजांचा पाळणा म्हणून लेकीला पाळण्यात घातलं....मात्र परवा भावाच्या मुलीसाठी पाळणा लिहायचा प्रयत्न केला ...तिचा हक्काचा पाळणा...पहिलाच प्रयत्न आहे...समजून घ्या...
- मीनल
नीज नीज परीराणी ||
नीज नीज परीराणी ||
तुझ्याचसाठी जमले सारे
आकाशी चमचमते तारे
गाती मंजुळ गाणी ||
नीज नीज परीराणी ||
आई सोबत बनून सावली
बाबाची ती गोड छकुली
हसते कशी गोजिरवाणी ||
नीज नीज परीराणी ||
पुरे तुझे हे खेळ बाळा
नको वाजवू पैंजण वाळा
सांगते तुला कहाणी ||
नीज नीज परीराणी ||
देत झोके हलवते पाळणा
माझ्या परीला झोप येईना
जाईजुई निजल्या सा-या
तू का जागी फुलराणी ||
नीज नीज परीराणी ||
नीज नीज परीराणी ||
- मीनल
*****************************
झुलवा पाळणा पाळणा राजकुमारीचा
झुलवा पाळणा पाळणा गोड गोजिरीचा
माझ्या घरी, आली इवली परी
सडा रांगोळी घाला ग दारी
सोन्याच्या पाळण्याला चांदीची दोरी
जो बाळा जो जो रे जो....
झुलवा पाळणा पाळणा चंद्रमुखीचा
झुलवा पाळणा पाळणा राजकुमारीचा
झुलवा पाळणा पाळणा गोडगोजिरीचा
झबले टोपडे घालून सजली
लेक लाडकी पाळण्यात निजली
दृष्ट न लागो, लावा काजळ टिकली
जो बाळा जो जो रे जो....
झुलवा पाळणा पाळणा उमापार्वतीचा
झुलवा पाळणा पाळणा राजकुमारीचा
झुलवा पाळणा पाळणा गोड गोजिरीचा
रुणुझुणु रुणुझुणु वाजे खुळखुळा
पायी छकुलीच्या वाजतो वाळा
हसते लक्ष्मी पाहून बाळा
जो बाळा जो जो रे जो....
झुलवा पाळणा पाळणा वैभवलक्ष्मीचा
झुलवा पाळणा पाळणा राजकुमारीचा
झुलवा पाळणा पाळणा गोड गोजिरीचा
उद्या होईल मोठी ती राणी
शिकेल सवरेल होईल शहाणी
जिभेवर रहो मधुर वाणी
जो बाळा जो जो रे जो....
झुलवा पाळणा पाळणा देवी सरस्वतीचा
झुलवा पाळणा पाळणा राजकुमारीचा
झुलवा पाळणा पाळणा गोड गोजिरीचा
- मीनल
*****************************
फारच सुंदर. अप्रतिम}
फारच सुंदर. अप्रतिम}
chhan ahe prayant.... Mazya
chhan ahe prayant.... Mazya muliche Feb madhe barse zale... Malahi khup garaj watli ashya palnyachi...