बाब्या मी इंजिनियर आहे !
मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.
एकदा संध्याकाळी ऑर्डर केलेले एक खेळणे घरी आले. आता पोरांना ते लगेच सुरु करायचे होते. मी आपली जरा निवांत टीव्ही बघत बसलेले असताना ते सर्व करायची माझी इच्छा नव्हती.
मी म्हटले, "मला नाही माहित त्यात काय घालायचे आहे."
स्वनिकने लगेच खेळणे चेक करून सांगितले, "त्यात बॅटरी लागणार आहेत" आणि स्वतःच स्क्रू-ड्रायव्हर घेऊन आला आणि AA बॅटरीही. आता नाईलाजाने टिव्ही बंद करून मला ते उघडावं लागलंच. त्यात पाहिलं तर AAA बॅटरी लागणार होत्या. त्या कुठे शोधणार, मग आठवले घरात वर लावलेल्या कागदाच्या दिव्यांमध्ये आहेत. म्हटले,"त्या वरच्या दिव्यापर्यंत माझा हात पोचणार नाही, बाबा आले की बघू."
आता माझे प्रयत्न आणि उत्साह पाहून त्याला कळलेच की बाबा आल्याशिवाय हे असलं काम होणार नाही.
शेवटी बाबा आल्यावरच त्यांचं काम झालं.
आपापली कामं वाटून घेतल्याने बरेच वेळा मी स्वयंपाक करताना संदीप मुलांचं आवरत असतो. किंवा त्यांना खेळायला बाहेर घेऊन जातो. अशा अनेक वेळा मी जेवण बनवत असताना तोच मुलांची खेळणी जोडणे इत्यादी कामं करतो. परवा मात्र हद्दच झाली. स्वनिकला काहीतरी टिव्हीवर लावायचे होते आणि त्यात काय सूचना लिहिल्या आहेत हे मी वाचेपर्यंत तो ओरडून रिकामा,"आई, प्रेस द स्मार्ट हब बटन, सिलेक्ट वेब ब्राऊझर, सिलेक्ट वेब ब्राऊजर". त्याचं ओरडणं ऐकून शेवटी मी म्हणाले,"बाबू जरा थांब, मी इंजिनियर आहे."
अर्थात त्याचा माझ्यावर विश्वास नव्हताच. त्यामुळे तो पुढे बोललाच,"बाबा आले की करतील, जाऊ दे".
तर या अशा घटनांतून एक गोष्ट मला जाणवते की घराप्रमाणे मोठ्या माणसांची कामं तशी वाटून घेतली जातात आपल्या सोयीप्रमाणे.पण त्यातून मुलांचे आपल्या आई-वडील, आजी आजोबा यांच्याबद्दल किती सहज ग्रह निर्माण होतात? मुलीला लहान असल्यापासून माहितेय की (कुठलीच)आजी दुचाकी गाडी चालवत नाही, फक्त आजोबा चालवतात. तिचा तो ग्रह दूर करण्यासाठी एक आजी दाखवाव्या लागल्या मला पुण्यात. एकदा असेही झाले की मुलाना वाटत होते बाबांना जेवण बनवताच येत नाही. खरंतर, आम्ही दोघे असताना अनेकवेळा त्याने बनवलेही आहे पण आता कामाच्या वाटणीत स्वयंपाक करणे(भाजी फोडणी टाकणे आणि पोळ्या) माझ्याकडे असल्याने त्यांचा तसा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तर मग त्यानंतर अनेकवेळा सॅन्डविच, सॅलड किंवा अंडाकरी असे ठराविक पदार्थ असले की संदीप करतो(मला काय तेव्हढेच बरे आहे!) आणि मुलेही त्याला मदत करतात.
माझ्यासारख्या अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण त्यातील किती जणींच्या मुलांना माहित असते की आपली आई काय करते? तिचं शिक्षण काय आहे? तिचे कलागुण काय आहेत? आमच्या मुलांना माहित आहे की मी लिहिते, चित्रं काढते, (त्यांच्यादृष्टीने) चांगला स्वयंपाकही करते. पण त्यापलीकडे बाहेरच्या जगात काय काम करते, कुणाशी बोलते, माझ्या कामामुळे लोकांना कसा फायदा होतो किंवा त्यांचे कुठले काम होते, हे सहज समजेल अशा भाषेत का होईना मुलांना सांगितले पाहिजे असं मला वाटत आहे सध्या. तसं मी सुरुही केलं होतं. अशी माहिती असल्याने मुलांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीत नक्की फरक पडेल.
बरं, नुसती आपल्या कामाची कल्पना देऊन उपयोग नाही. तर आपल्या घरातील कामांची अदलाबदलही करून पाहिली पाहिजे. म्हणजे, कधी गाडी चालवून कुठे जायचे असताना नवरा शेजारी आहे आणि मी गाडी चालवतेय किंवा तो जेवण बनवत आहे आणि मी त्यांचे ट्रेन ट्रॅक लावत आहे( हे अवघड आहे कारण ट्रेन ट्रॅक नवऱ्यालाच जास्त आवडतात पण आपलं उदाहरण) किंवा एखादी छोटी गोष्ट दुरुस्त करणे इत्यादी. यामुळे मुलांच्या मनातील आई किंवा बाबा म्हणून एक जी प्रतिमा निर्माण होत असते लहान वयात त्यात आपण त्यांचे सर्व पैलू दाखवणं गरजेचं आहे असं वाटू लागलं आहे.
मागच्या आठवड्यात मी जेवण बनवत असताना मुलं आणि नवऱ्याने एक खेळणं जोडलं. माझ्या पोळ्या चालू असल्याने मी काही गेले नाही. थोड्या वेळाने त्या खोलीत गेल्यावर स्वनिकने मला दाखवलं आणि विचारलं,"तुला माहितेय का ही ट्रेन कशी चालते?". म्हटलं,"हो, ते ट्रॅक मॅग्नेटिक आहेत." माझं उत्तर ऐकून बराच वेळ आ वासून उभा राहिला, मग मी मोठ्याने म्हणाले,"बाब्या मी इंजिनियर आहे !". प्रत्येक आईने काही इंजिनियर असायची गरज नाही पण आपले सर्व गुण मुलांसमोर नक्की आणले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
काही कामे पुरुषांनाच नीट
काही कामे पुरुषांनाच नीट जमतात असे आमचे मत.>>>+१ निदान ड्रायव्हिंग च्या बाबतित तरि आमच्या सिटित जर एखादि महिला समोर गाडि चालवत असेल तर
तर मि सुरक्षित अतंर ठेउन चालवतो कधि ब्रेक मारतिल सांगता येत नाहि अर्थात त्यालाहि अपवाद असतिल
लेख आवड्ला मस्त
लेख आवड्ला मस्त
भरभरून प्रतिसाद आलेले पाहून
भरभरून प्रतिसाद आलेले पाहून मस्त वाटलं. कुठून सुरुवात करायची विचार करतेय, नाहीतर अजून एक लेख व्हायचा.
१. मी प्रयत्न केले पाहिजेत हे मुख्य ध्येय या लेखाचं, मुलांना आपले गुण, कौशल्य आपणच समजावलं पाहिजे, तेही स्वतः दाखवून देऊन. तसेच नवऱ्यानेही कामं बदलून घेतली पाहिजेत, विशेतः जेव्हा ती येत असून केवळ सवयीमुळे किंवा कामाच्या वाटणीत मागे पडली आहेत. असो.
२. टीना म्हणाली तसं काही काही स्त्रिया मी अशा पाहिल्या आहेतच एकदम भारी कामं करतात. एक तेलुगू काकूना अमेरिकेत वेगवेगळ्या वस्तू कशा काम करतात आणि दुरुस्त करता येतील हे बघायची उत्सुकता होती, मजा आली होती त्यांच्यासोबत(माझं इंग्लिश आणि त्या तेलुगू बोलत होत्या) .
३. गाडी चालवणे हा एक तांत्रिक भाग आहे, सवयीने सर्व कामं येतात. अगदी एका मित्राकडे तो बायकोपेक्षा चांगल्या पोळ्या करतो हेही पाहिलं आहे, सरावाने सर्व येते. मी आणि नवरा आलटून पालटून गाडी चालवतो, घरातील सर्व फर्निचर स्वतः जोडले आहे सूचना वाचून(Ikea जिंदाबाद ). या सर्व गोष्टी स्त्री किंवा पुरुषच करू शकतो हे केवळ आपण लहानपणी पाहिलेल्या, पहात आलेल्या गोष्टींच्या आपल्या निरीक्षणातून बनलेले आपले भ्रम आहेत. ते निदान पुढच्या पिढीत कमी झाले पाहिजेत.
४. सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल आभार. राजसी, तुमच्या कमेंट नेहमीच वाचनीय असतात. एखाद्या लेखाची दुसरी बाजू किंवा टोकाची बाजू कळते.
विद्या.
छान लेख आहे. विषय आवडला.
छान लेख आहे. विषय आवडला.
अमुकतमुक काम बाबांचेच आणि अमुकतमुक काम आईचेच हे प्रमाण पिढी दर पिढी कमी होत चाल्ले आहे.
लहानपणी मला जेव्हा पहिल्यांदा समजले की माझ्या आईचा पगार माझ्या वडिलांपेक्षा जास्त आहे तेव्हा मला ते खरेच वाटत नव्हते. किंबहुना कित्येक महिने खरे वाटत नव्हते. बाहेर कोणाला हे सांगितले तर वेड्यात काढतील असे वाटत होते. मग जेव्हा खात्रीने पटले की ते तसेच आहे तेव्हा मी ज्याला त्याला कसल्या कौतुकाने सांगायचो, माझ्या आईचा पगार माझ्या वडिलांपेक्षा जास्त आहे हां. हे सांगताना कधी असा मनात विचारही आला नाही की मी माझ्या वडिलांना कमी लेखतोय वगैरे. उलट आईचा कमालीचा अभिमानच वाटत होता.
बाकी माझा या गोष्टीवर विश्वास न बसण्याचे कारण म्हणजे तसे असूनही आजूबाजुच्या चार मध्यमवर्गीय घरात असते तशीच पुरुषप्रधान संस्कृती वा तशीच स्त्री-पुरुष घरकामाची वाटणी आमच्याही घरी होती
आजच आलेले व्हाट्स अँप पोस्ट,
आजच आलेले व्हाट्स अँप पोस्ट,
धाग्याशी संबंधित वाटले म्हणून इंग्रजी asqle तरी इकडे टाकत आहे
.
*I just read this story on how a daughter was raised and decided to share.*
My Dad always *sounds* it in my ears "Simi, you must be *tough.* Being *girlish* and being *ladylike* is not an excuse for *weakness".* This he still says to I and my sisters till this very day.
All the children were *raised* to do the *"masculine"* as well as the *"feminine"* tasks.
My sisters and I started *winding* a 15KVA generator as soon as we got one. I *learnt* how to wash a *car* (internal and external) before the *age of 16*.
I started *learning driving* immediately after *secondary* school. My Dad told me that before he allows me drive out *independently,* that I must learn to change *car tyres.*
I remember I was forming *ajebutter* and my Dad said to me "If you are *driving* on a lonely *highway* and you need to change your *tyre*, what would you do? You will have to get down and change it.... that's the *common sense* thing to do. It's a *survival skill* for drivers.
*My brother?*
He started *washing* the dishes as soon as he could reach the sink and *handle* the dishes.
He started cooking *simple meals* before the *age of 10.* He started *washing* his socks and under wears before the *age of 7.*
He started *handling his laundry* before the *age of 11*, when he had to go to *boarding* school.
In my house, the rule was (still is) that *anyone who eats* must be able to get *involved in the kitchen*, when required.
My father tells me I can be *president,* not *first lady.* There is nothing wrong with being a first lady, but there's also nothing wrong with being the *husband* of the president.
Thus, if you tell your *son* that he can be president, you should also tell your *daughter* that she can be president.
The *hidden but significant psychology* behind this is that telling your daughter that she can be president pushes her to be *great,*
*_while telling her that she can be a_*
*first lady*
pushes her to aspire to marry a *great man,*
and probably *reduces* the needed inspiration to aspire to exercise her maximum potentials.
We need not *teach our girls* to believe that the best they can be is to *exist under the success of a man,* their husbands.
It is *disfavor* to *humanity* to raise your son with the *impression* that he is better than other females..
Raise your daughters to understand that they are not *inferior to males.*
Teach your sons to be as *domesticated* as your daughters,
_and push your daughters
to_
*attain financial independence*
as much as you push your sons.
This way, we will raise a *less entitled*:
and *more responsible* generation,
*equipped* with all vital survival skills,
and with less *handicaps.*
*Charity* begins at *home*, not in the *offices* or *work places.*
AND
*#Equality_Begins_At_Home*
Go tell it to the *world*, over the hills and everywhere
छान लिहिलय.
छान लिहिलय.
खरंच कळत नकळतपणे आपण मुलांच्या मनात बरंच काही बिंबवत असतो.
माझ्याही मुलांना असंच वाटत असणार.
प्लम्बिंग, सिलिंग फॅन झाडणे, टुटी-फुटी दुरुस्ती, थोडीफार सफाई, भाजी-फळं खरेदी वैगेरे फक्त बाबाचं काम आहे म्हणुन.
आणि मी ते अजिबात बदलणार नाहीये.
आणि जेवण बनवणं माझं काम आहे. पण बाबा पण कधी ऑम्लेट, बुर्जी, पोहे करतो. जेवताना पापड फ्राय करुन देतो. आजीला चहा करुन देतो. (ही एवढीच दौड स्वयंपाकात.) हे बघितलंय मुलांनी. त्यामुळे बाबा किचन मधेही काम करतो. आणि सफाईकाम करतो आणि ऑफिसला पण जातो.
मी ऑफिसात काय काम करते ते दोघानाही माहित नाहीये खरं.
सिम्बा खूपच मोठी पोस्ट आहे
सिम्बा खूपच मोठी पोस्ट आहे. असो.
सस्मित, मुलानाही सोबत घ्या ही कामे करताना. त्यानाही नक्की आव्डएल.
धन्यवाद.
विद्या.
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
छान लिहिलंयस विद्या.
छान लिहिलंयस विद्या.
थोडेसे अवांतर , आमच्या ऑफिस (आणि इथल्या बर्याच ऑफिसेस ) मध्ये वर्षातून एकदा "Take your kids to work day" असतो. वय वर्षे ८ - १२ मधील मुलांना एक संपूर्ण दिवस आई बाबांबरोबर ऑफिस ला जाता येतं. शाळेतून तशी सवलतही मिळते. त्या दिवसा साठी कंपनी छान कार्यक्रम आखते.
आपण काय काम करतो, कशाला करतो, जगात त्याने काय फरक पडतो. हे सगळे मुलांना समजेल असे सोप्पे करून सांगतात. मुलांना जमतील असे छोटे छोटे projects आखून त्यांच्या कडून ते करून घेतात.
आपले आई बाबा रोज काय आणि कसे काम करतात त्याची झलक मुलांना मिळते.
शिवाय दुपारी खाऊ आणि खेळ असतात
लेखप्रपंच पटला
लेखप्रपंच पटला
Thank you श्री, प्रियान,
Thank you श्री, प्रियान, मयुरी.
छान विषय आहे!
छान विषय आहे!
Thank you Aashu.
Thank you Aashu.
आवडला हा लेख ही.. एकदम सही जा
आवडला हा लेख ही.. एकदम सही जा रही हो
Lekh chan.
Lekh chan.
Aaiche swaipak karne faarach great kaam ahe, ase matr kunalach watat nahi. He dekhil chukiche ahe.
जेवण बनवणे फारच खटकतेय...
जेवण बनवणे फारच खटकतेय... चिनूक्सने वाचले तर तो माबो संन्यास घेईल बहुधा
>>>>जेवण बनवणे <<<
>>>>जेवण बनवणे <<<
मी तर मुंबईमधील बर्याच नातेवाईकांकडून असेच एकलेय. तेव्हा मुंबईची लोकं असं बोलतात हा समज होता.
छान लेख. ज्यात जो पारंगत
छान लेख. ज्यात जो पारंगत त्याने ते काम कराव अशा मताचा मी आहे. उगाच ओढून ताणून कामाची वाटणी कशाला?. जरूर पडली तर त्यासाठी मात्र सगळ्या कामांची दोघांनाही माहिती, थोडी फार सवय असावी.
आमच्याकडे आमच्या मुलांची काय पण आमच्या कुत्र्याची सुद्धा अशीच समजूत होती, की हा ग्रहस्थ कधी कधी घरी दिसतो ते आपल्याला गाडीतून फिरवायला आईने कामावर ठेवलाय.
आईने सांगितलेले काम झालेच पाहिजे हे मात्र माझ्या उदाहरणावरून मुल शिकली.
जोक्स अपार्ट,
आमच्या ह्यांना घरातील कुठल्याही कामात मी लुड्बुड केलेली आवडत नाही. "बस ना आरामात तुला काय प्रॉब्लेम आहे". (मखरातला गणपती म्हणा हव तर). पण त्याचा मुलांवर काही परिणाम झालेला दिसला नाही. दोन्ही पोर मात्र स्वयंपाकात पारंगत आहेत. ( म्हणजे १ ते १० स्केलवर ५). त्यांचे मित्र शेफ असल्याने कधी कधी आईला पण ज्ञान देतात.:). तिकडे सून बाई सगळी कामे व्यवस्थित करवून घेतात. (माझे उदाहरण कामी येते )
मुल लहान असताना मात्र त्यांची तयारी सकाळी उठवून शाळेत सोडेपर्यंत करायचो. त्यामुळे बाबा अगदीच बिनकामाचा अशी काही त्यांची समजूत नसावी.
जेवण बनवणे फारच खटकतेय...
जेवण बनवणे फारच खटकतेय... चिनूक्सने वाचले तर तो माबो संन्यास घेईल बहुधा>>>>>>>>>>> कुणी जेवण बनवलं तर खटकायचं किंवा संन्यास घ्यायचं कारण काय? त्यांना जेवायचं असेल तर बनवलं.
तुमचं माहित नाही पण चिनुक्सला असं बर्याच भागात बरेच लोक बोलतात ते माहित असावं त्यामुळे संन्यास घेणार नाहीत ते
उगाच वाटेल त्या गोष्टी
उगाच वाटेल त्या गोष्टी मुंबईच्या नावावर खपवायची टूमच निघाली आहे. विशिष्ट शहराइतकी नसली, तरी मुंबईकरांनाही थोडीफार अस्मिता आहे हो झंपी!
बॉर्न मुंबईकर.
विशिष्ट शहराइतकी नसली, तरी
विशिष्ट शहराइतकी नसली, तरी मुंबईकरांनाही थोडीफार अस्मिता आहे हो झंपी! >>>>>> +१
बॉर्न अॅन्ड ब्रेड मुंबईकर.
छान लिहिलय.
छान लिहिलय.
>>>>> मग मी मोठ्याने म्हणाले,"बाब्या मी इंजिनियर आहे !". <<<<
पुरुषांना अस काही सांगावस वाटत की नाही? (का फक्त "मी तुझा बाप आहे" इतकेच पालुपद पुरे पडते? )
>>>> आमच्या ऑफिस (आणि इथल्या
>>>> आमच्या ऑफिस (आणि इथल्या बर्याच ऑफिसेस ) मध्ये वर्षातून एकदा "Take your kids to work day" असतो. <<<<
हे नक्कीच परदेशातील असणार आहे.... इकडे देशात, पुण्यामुंबईत मी तरी पाहिले नाही बोवा... मी सुचवले होते, पण त्यास वाटाण्याच्या अक्षता लागल्या.
नंतर तर दसर्याचे दिवशी मशिन बंद असताना फॅमिली फॅक्टरीव्हिजिट असायची ते देखिल बंद झाले.
हां, हल्ली बर्याच कंपन्यातुन वर्षातुन एकदा "फॅमिली डे" होतो साजरा, पण तो कुठेतरी डेस्टिनेशन हॉटॅल वगैरे ठिकाणी पार्टी या स्वरुपात "एम्प्लॉईज वेलफेअर" हेड खाली.
Pages