Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
विकी पेज इथे पाहाता येईल
ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कचाकचा भांडायचा एक चान्स सोडत
कचाकचा भांडायचा एक चान्स सोडत नाही !!>>कधीकधी ती म्हणते सुद्धा कि मला वेळ जात नाही म्हणून मी भांडते
काय आवाज आहे नानीचा. टाण टाण
काय आवाज आहे नानीचा. टाण टाण टाण बोलते... जबरदस्तच!
मला नानीचा 'व्हॉट्स्पॉट' हा
मला नानीचा 'व्हॉट्स्पॉट' हा शब्द भारी आवडला आहे.
नानी आणि मालूचे नाते खूप सुरेख दाखवले आहे. किती माया करतात नानी मालूवर!!! आणि मालूही ते जाणून नानींच्या फटकळ बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते.:)
त्या बोक्याच्या बहिणी काय
त्या बोक्याच्या बहिणी काय आलटून पालटून सारख्याच माहेरी येत असतात काय, जुन्या काळात.
बाय द वे ते टण्या आणि ती मंदा यांचं का नाही मार्गी लागलं.
अजुन एका कारणासाठी आवडतेय ही
अजुन एका कारणासाठी आवडतेय ही मालिका, सगळीच पात्रं घडाघडा बोलतात...हे अगदीच अपवादात्मक आहे असं म्हणायचं ! नाहीतर बाकीच्या मालिकांमध्ये एखादं पात्र नुस्तं बोलत राहतं बाकीचे गपगुमान ऐकत राहतात...
बाय द वे ते टण्या आणि ती मंदा
बाय द वे ते टण्या आणि ती मंदा यांचं का नाही मार्गी लागलं.>> मंदीचं लग्न ठरला ना ग . म्हणून टण्या आपला ब्रह्मचारी
हो का, थँक्यु सुजा. ते
हो का, थँक्यु सुजा. ते बोक्याला नावं ठेवणं चाललं होतं. ते बघितलं होतं. पुढे काही कळलंच नाही.
कालचा अजून एक प्रसंग आवडला.
कालचा अजून एक प्रसंग आवडला.
मालू, बोक्या आणि नळी साठी जेवायची थांबते आणि ते दोघं बाहेरूनच भारपूर खाऊन आल्यामुळे (नळी - ७ बटाटेवडे आणि बोक्या - १/४ बटाटावडा ....... ), मालूला एकटच जेवायला लागणार होतं, त्यावर नानीचा उपाय आणि डायलॉग लाजवाब होता.
काल का परवा त्या नानी आणि
काल का परवा त्या नानी आणि नळी लहान मुलीसारख्या "माझी साडी तुझी साडी "करून कशा भांडत होत्या
कालचा अजून एक प्रसंग आवडला.>>
कालचा अजून एक प्रसंग आवडला.>>+१
बोक्याचे वडिल ही दिलीप
बोक्याचे वडिल ही दिलीप प्रभावळकर! वा वा... रंग भरतेय ही मालिका
खरंतर नानीचा मालूवर खूप जीव
खरंतर नानीचा मालूवर खूप जीव आहे, पण सासूचा धाक रहावा म्हणून कटकट करतात असं वाटतं.
बिच्चारा बोक्या सारखा मारंच
बिच्चारा बोक्या सारखा मारंच खात असतो, आधी त्याचे बाबा मारायचे त्याला मग आई. बायको मात्र छान मिळाली त्याला.
मस्त चाललेय मालिका . मला जाम
मस्त चाललेय मालिका . मला जाम आवडतेय. टाइम पास. त्या नानांच्या कारकिर्दीत रोजच सगळेजण त्या आजीला प्रदक्षिणा घालतात कि काय ? . त्या नानांची आई भिजलेल्या सशासारखी बसलेली होती आणि नाना तिचे पाय काय धुतात. तुम्ही आम्हाला जन्माला घातलंत म्हणून आम्ही या भूतलावर आलो काय म्हणतात आणि मग प्रदक्षिणा
आजचा नानीचा डायलॉग, '
आजचा नानीचा डायलॉग, ''मरायबिरायची नाही हा मी तुमच्यासाठी, एकतर तुम्हाला जीव द्या, वर तुमच्यासाठी जीव द्या, याला काय अर्थ आहे?"
बाय द वे, त्या जुन्या
बाय द वे, त्या जुन्या अभिनेत्री शांता आपटे ह्या नयना आपटे यांच्या मातोश्री.>>> नयना आपटे, माणिक वर्मांची मुलगी आहे, शांता आपट्यांची नाही.
नाही, माणिक वर्माच्या मुली
नाही, माणिक वर्माच्या मुली भारती आचरेकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि एक डॉक्टर आहे त्या ह्या क्षेत्रात नाहीत. मागे ह्या सर्व एकत्र होत्या टीव्हीवर.
नयना आपटे हि माणिक वर्मा
नयना आपटे हि माणिक वर्मा यांची मुलगी नाही. माणिक वर्मांच्या चार मुली. भरती आचरेकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि अरुणा जयप्रकाश . त्या माणिक वर्माच्या मुलगी नाहीत. नयना आपटे ह्या शांता आपटे यांना त्यांच्या लग्नाच्या आधी झालेली मुलगी आहेत असं वाचतेय
हा अरुणा जयप्रकाश, बरोबर सुजा
हा अरुणा जयप्रकाश, बरोबर सुजा. मला अरुणा जयरामन आठ्वे आणि काहीतरी चुकतंय असं वाटत होतं म्हणून लिहीलंच नाही.
आज हवा येऊ द्या मध्ये चूक
आज हवा येऊ द्या मध्ये चूक भूल ची मंडळी होती " मजा आली . मनवा नाईक खूप छान दिसत होती
ती यंग मालू, सायली फाटक आहे.
ती यंग मालू, सायली फाटक आहे. मला स्नेहा फाटक वाटली होती.
मनवा नाईकने उखाणा नीट नाही घेतला. कसं बोलत होती. अजून एक भाग हवा होता या टीम बरोबर. नयना आपटे छान दिसत होत्या पण त्यांच्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं बहुतेक. कारण ते सारखं तिथे बोट लावत होत्या.
हा दिसत मात्र छान होती मनवा,
हा दिसत मात्र छान होती मनवा, आणि ही चांगली सिरीयल दिली त्यासाठी मात्र धन्यवाद तिला आणि पुर्ण टीमला.
नयना आपटे छान दिसत होत्या पण
नयना आपटे छान दिसत होत्या पण त्यांच्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं बहुतेक >> हो का ? लक्षात नाही आलं
खरंच धन्यवाद सगळ्या टीमला . अशी एकादी निखळ मनोरंजक मालिका पाहिजेच अधून मधून
मनवा नाईक खूप छान दिसत होती.>
मनवा नाईक खूप छान दिसत होती.>> ही चांगली सिरीयल दिली त्यासाठी मात्र धन्यवाद तिला आणि पुर्ण टीमला.>> +१०१
नयना आपटे या माणिक वर्माची
नयना आपटे या माणिक वर्माची मुलगी असेच समजत होते. माहिती बद्दल आभार ___/\____
ही चांगली सिरीयल दिली
ही चांगली सिरीयल दिली त्यासाठी मात्र धन्यवाद तिला आणि पुर्ण टीमला>>>>>+१००१
मधुगन्धा च लेखनही उत्तम आहे,
मधुगन्धा च लेखनही उत्तम आहे,
अपुन पंखा या शिरेलचा... नानी,
अपुन पंखा या शिरेलचा... नानी, राजाभाऊ, माली भन्नाट आहेत. दारू पिऊन गोंधळाचे सीन्स मस्त केलेत!
अपुन पंखा या शिरेलचा... नानी,
अपुन पंखा या शिरेलचा... नानी, राजाभाऊ, माली भन्नाट आहेत. दारू पिऊन गोंधळाचे सीन्स मस्त केलेत! >>>. +१
नयना आपटे नि सिरीयल खाऊन
नयना आपटे नि सिरीयल खाऊन टाकली आहे ... त्या या सिरीयलचा USP आहेत
Pages