Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
विकी पेज इथे पाहाता येईल
ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी मस्त चाललीय, नानी तर
भारी मस्त चाललीय, नानी तर राँकींग एकदम.
मी मधेच बघायला सुरुवात केली
मी मधेच बघायला सुरुवात केली पण तरीही आवडतेय...
धम्माल आहे
ओझीवर बघ जमल्यास आधीचे रीया.
ओझीवर बघ जमल्यास आधीचे रीया.
मधेच बघितली कधीतरी तर कळलं
मधेच बघितली कधीतरी तर कळलं की बकुळामावशी , कुन्देची सासू आहे .
ती ही काही भांडायला कमी नाही
ती ही काही भांडायला कमी नाही दाखवलीय! कडाकडा भांडण दाखवल नानीच आणि कुंदीच्या सासूचं परवाच्या (बुधवार) भागात...!
तरुण पणीची मालू चेहेर्यावर
तरुण पणीची मालू चेहेर्यावर तेच ते भाव घेऊन वावरते...सतत नाक उडवून , डोळे बारीक करुन....बोलायचं......! सेम एक्सप्रेशन्स!
सिनिअर राजाभाऊ -मालूंना तर काही कामच नाही विशेष. फक्त आठवणीत रमायचं!
डायलॉग्ज मात्र मस्त चुरचिरीत.
ते भांडण एवढे मस्त होते कि
ते भांडण एवढे मस्त होते कि लिटरली एन्जॉय केले मी. मज्जा आली.
पांड्या इलंय..http://www
http://www.loksatta.com/manoranjan-news/writer-actor-prahlad-kudatkar-ne...
2 ऑगस्ट पासून नवी शिरेल.. चुभुद्याघ्या संपतेय
हो ना, संपतेय ही मालिका.
हो ना, संपतेय ही मालिका. अर्थात तिचा जीव छोटाच होता म्हणा पण छान रंगली, आवडली. यंग बोक्या मालू आणि नयना आपटे आत्ताच्या काळातली जास्त आवडले.
नकटी लग्न नाही का संपणार, ती आवडली नाही आणि बघितलीही नाही कधी.
अय, अजून नव्या शिरेलीची अॅड
अय, अजून नव्या शिरेलीची अॅड आलेली नाही. उगा कायी बाता नका करू. यील तब धागा काळीनच नै का मी!
छान होती मालिका. काही
छान होती मालिका. काही एपिसोड्स तर अगदी हहपूवा होते अलीकडे. नानी माझ्या फेवरिट- त्या या मालिकेच्या सचिन तेंडुलकर - काय तुफान फटकेबाजी.
खुकखू, कादिप, नकटीच्या, मानबा अशा एकसोएक भयाण वाईट मालिका चालू आणि चुकभूल बंद??
सध्या टीआरपीमध्ये मानबा, तुझ्यात जीव, कादिप, हवा येऊ द्या आणि चुकभूल आघाडीवर आहेत. चान्गले टीआरपी असून का बंद होतेय???
अय, अजून नव्या शिरेलीची अॅड
अय, अजून नव्या शिरेलीची अॅड आलेली नाही. >>> आला प्रोमो नवीन. मी सोताच्या डोळ्याने बघितला. वरती लिंक दिलीय बघा कच्चा लिंबू यांनी.
व्हय जी. ही चांगली चालू
व्हय जी. ही चांगली चालू असलेली शिरेल बंद होतेय. :रागः
मालिका सुरू होतानाच
मालिका सुरू होतानाच मालिकाकर्त्यांनी तु मर्यादित भागांची आसेल हे.सांगितलेलं. मग राग खशाला?
ही सिरीयल बंद करण्यापेक्षा
ही सिरीयल बंद करण्यापेक्षा त्या नकटीचे लग्न तरी लावून द्यायचे.
भरत मर्यादित भागांची असेल हे
भरत मर्यादित भागांची असेल हे मान्य. पण शेवटी अगदी गाशा गुंडाळल्यासारखं करतात ते खटकतं... बाकी काही नाही.
तशी मस्त चालू होतीच की
नकटीपण मर्यादीत भागांचीच आहे
नकटीपण मर्यादीत भागांचीच आहे असं सांगितलेलं. नकटीचं लग्न शेवटी त्या आतेभावाशीच होणार पण अनेक अॅक्टर्स आणून पिदवणार तोपर्यंत. असो, बघत नाही मग काहीही करोत.
खरय! नानिचा कर्कशपणा सोडला तर
खरय! नानिचा कर्कशपणा सोडला तर मालिका आवडत होती, सुरवातिला खटकलेले काही पॉइन्ट (मोने बाइच चालण,ओठ हलवण, नानीच वय ई) नतर सवयिचे झाल्यावर ब्लर वाटत होते... अजुन आवडली असती बघायला.
प्रियदर्शनने केलेली स्त्री
प्रियदर्शनने केलेली स्त्री भूमिका नाही आवडली. दिलीपची बायको त्याच्या मुलीच्या वयाची दिसत होती. शेवटचा भाग चांगला होता. बाकी ह्या मालिकेबरोबर फारच दुजाभाव केला, कधी प्रोमो नाहीत, रविवार दुपारचे रिपीटसुद्धा बंद केले होते.
शेवटचा भाग चांगला होता. बाकी
शेवटचा भाग चांगला होता. बाकी ह्या मालिकेबरोबर फारच दुजाभाव केला, कधी प्रोमो नाहीत >>> अगदी, अगदी.
काय झालं शेवटच्या भागात?
काय झालं शेवटच्या भागात?
सुमो काहीतरी धक्का देणार असं काहीसं असणार होतं ना?
काही धक्का नाही. सुमो
काही धक्का नाही. सुमो व्हिसासाठी जायला तयार नव्हती, दिप्रच्या मनात नाही म्हणून पण दिप्र तयार झाले मग व्हिसासाठी गेले. तोपर्यंत मुलगा सून घरी आले आणि एक इमोशनल सीन झाला बाप लेकात आणि दोघांनी आपल्या चुका, एकमेकांचं महत्व मान्य केलं. नानी आणि कुसुम पण जाणार इंग्लंडला हे ठरलं. मग मुलगा फॅमिलीसकट येणार भारतात हे ठरलं . त्याने मुलांवर मराठी संस्कार केलेत, मुलं मराठी बोलतात आणि तो सर्व सणवार, भारतीय संस्कृती टीकवून आहे, हे ऐकून दिप्रला आनंद झाला. कहाणी सुफळ संपुर्ण .
त्या चुकभुलच्या पेजवर लिहीलंय
त्या चुकभुलच्या पेजवर लिहीलंय की आम्ही परत येऊ .
त्या यंग बोक्या मालूला लगेच कलर्स मराठीची जीएसटी ही सिरीयल पण मिळाली, जी आजपासून आहे.
बरं झालं. दोघांचा अभिनय छानच
बरं झालं. दोघांचा अभिनय छानच होता. सुमोंनी जरा आराम करावा आता आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे (फु.स.)
आधी प्रियदर्शन आवडायचा नाही
आधी प्रियदर्शन आवडायचा नाही पण शेवटी आवडायला लागला होता तर मालिकाच बंद झाली. त्याने स्रीपात्र काय ग्रेसफुली केलं hats off to him for that!
सुमोंचा अभिनय शेवटच्या भागात
सुमोंचा अभिनय शेवटच्या भागात झकास. सतत बायकोचा हिरमोड करणा-या दिप्रंचा शेवटी शेवटी राग यायला लागला होता. सतत आपलं मी नाही येणारचं तुणतूणं. त्याऊलट नानींचा ऊत्साह. सर्वात व्रुद्ध स्री म्हणून गिनीज बुकात जाणार तेही नविन साडी नेसून. सर्वांना मिस करणार. लवकर या म्हणावं परत.
Pages