Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
विकी पेज इथे पाहाता येईल
ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टायटल सॉंग खरंच गोड आहे..
टायटल सॉंग खरंच गोड आहे.. शब्द आणि संगीत कोणाचं आहे??
संगित समीर सप्तिस्कर यांचं
संगित समीर सप्तिस्कर यांचं आहे आणि गीतकार कुणी खणीकर आहेत. (पहिलं नाव विसरले)
कादिप ला पण समीर साप्तिसकरांचंच म्युझिक आहे.
भ्रमनिरास झाला आहे.
भ्रमनिरास झाला आहे.
चांगली वाटली मालिका.
चांगली वाटली मालिका. हलकीफुलकी. डोक्याला ताप नाही.
काही त्रुटी असल्या, काही खटकत
काही त्रुटी असल्या, काही खटकत असलं तरी ही सिरियल अजुनही बघाविशी वाटतेय. प्रियदर्शन आवडला मला आत्तातरी. नकटीला मात्र कंटाळले, ती सोडली बघायची.
टायटल सॉंग खरंच गोड आहे.. >>>
टायटल सॉंग खरंच गोड आहे.. >>> हो मी ही पहिल्यांदा परवा पाहिली ही शिरेल, ईतकीशी आवडली नाही, पण टायटल साँग छान आहे
इथलं वाचून बरीच बोर असेल असं
इथलं वाचून बरीच बोर असेल असं समजून एपिसोड पाहिले. पण मला आवडली खूप. नानी तर भारीच आहे.
कलाकारांची वयं आणि त्यांचा मेकप आणि त्यांच्या पात्रांची वयं गंडली आहेत हे मान्य. पण संवाद (विशेषतः नानीचे) मस्त आहेत. एकदम चुरचुरीत.
मला आवड ले पहिले भाग. अॅप
मला आवड ले पहिले भाग. अॅप डाउनलोड करून पाहिले. त्या नानीचे एल सी डी टीव्ही आणून दे जरा डोक्यात जाते. पण अशी मंडळी पाहिली आहेत. त मुलगी आईला म्हणते मीच तुझ्या आधी विधवा होईन ते ऐकून कसेतरीच झाले. पण प्रभावळ्कर तारून नेतात. पोलादी अंग आणि सोन्याचे मन जामच आवडले. अॅप वर टायटल सॉन्ग ऐकू आले नाही. विनोद स्ट्रिकटली बरे क्याटेगरीतलेच आहेत. पन चलता है. सारखे प्रेमात पडलेली जोडी, सासू सुना लफडी बघून वैता ग्ग आला होता.
इथे अमेरिकेत Yupp TV वर टायटल
इथे अमेरिकेत Yupp TV वर टायटल साँग दाखवतच नाहीत या मालिकेचं. बाकी मालिका, विषय वेगळा असल्याने, आणि तगडे कलाकार (दि. प्र., सु. मो. आणि न. आ. ) असल्यामुळे अजूनतरी मजा येत्ये आहे.
मलाही आवडतीय बघायला सध्या तरी
मलाही आवडतीय बघायला सध्या तरी. सुकन्या चे काही काही डायलॉग्ज तर आमची आईच म्हणतेय असे वाटते कधी कधी . विशेष्तः ते मुलीला तिने काहीतरी शहाणपणा शिकवला की म्हणते ना, " ते असलं तुझ्या घरी जाऊन कर काय ते" :)) मोलकरणीची साबांशी झकाझक्की पण मजेशीर वाटते एकदम टिपिकल.
पियू +१
पियू +१
मी हि इथे वाचून बोर असेल सिरीयल असं समजून चालत होते. पण एपिसोड पाहिले तर हलके फुलके वाटले. टायटल सॉंग मस्त आहे. खुसखुशीत वाटली मालिका एकदम . सुकन्या आणि दिलीप प्रभावळकर धमाल आणत आहेत . त्यांचं ते एकमेकांना मध्येच चिमटे काढणं , सांभाळून घेणं आवडलं।. नानी पण धमाल करत आहेत
स्काइप्च्या सिन्समध्ये दि.प्र
स्काइप्च्या सिन्समध्ये दि.प्र. मस्तं अभिनय करतात. नानी पण सही!
यंग सुकन्या पण आवडली. सहज
यंग सुकन्या पण आवडली. सहज अभिनय करते.
मला म्हणायचं होतं ते आधीच
मला म्हणायचं होतं ते आधीच सांगितलंय इथे सगळ्यांनी. इंग्लंड आणि अमेरिका एकमेकांचे शत्रू हे लॉजिक ऐकून हसायला आलं. आजकाल आपण स्वतः गेल्याशिवाय पासपोर्ट दिसत नाही कारण बायोमेट्रिक डेटा घेतात आता. एजंटचा उपयोग होत नाही.
घरातल्या ज्यें. ना. साठी
घरातल्या ज्यें. ना. साठी आदर्श सिरिअल आहे. शिकण्यासारखे बरेच आहे
चक्क बर्याच दिवसांनी मराठी
चक्क बर्याच दिवसांनी मराठी सिरीयल पाहिली आणि आवडली. मस्त हलकीफुलकी आहे. साध्या घरात जे नॉर्मल वाद होत असतील आणि ज्या गमती जमती होत असतील त्या बरोबर दाखवलेल्या आहेत. नयना आपटे, दिलीप प्रभावळकर मस्तच ! त्याबरोबर प्रथमेश परब पण चांगले काम करतोय आणि ती त्यांची मुलगी पण भारी आहे.
प्रथमेश परब कोण दाखवलाय?
प्रथमेश परब कोण दाखवलाय? माझ्या लक्षात येत नाहीये. मी मधे एक भाग मिसलाय.
प्रथमेश परब नाही घोटाळा झाला.
प्रथमेश परब नाही घोटाळा झाला. प्रियदर्शन जाधव यंग दिलीप प्रभावळकर दाखवलाय ना. ते टाईमपास १ की २ मध्ये थोडा घोळ झाला
ओहह, इटस ओके. मला वाटलं मी
ओहह, इटस ओके. मला वाटलं मी बघितलं नाही तेव्हाच येऊन गेला की काय
प्रियदर्शन जाधव --- दि. प्र.
प्रियदर्शन जाधव --- दि. प्र. चे बेअरिंग चांगले घेतलेय त्याने.
प्रियदर्शन जाधव --- दि. प्र.
प्रियदर्शन जाधव --- दि. प्र. चे बेअरिंग चांगले घेतलेय त्याने. >>> हो, हो, हे बाकी खरं.
नयना आपटेचं बोलणं खूप कर्कश्श वाटतं.
ती पहिल्यापासुन कर्कश्शच आहे.
ती पहिल्यापासुन कर्कश्शच आहे.
कर्कश्श वाटतं >> तशा आजांना
कर्कश्श वाटतं >> तशा आजांना मोठ्याने बोललेलंच ऐकलं आहे. एकतर त्यांना ऐकू कमी येत असतं त्या वयात त्यामुळे त्या आवाज वाढवून बोलतात बहुदा त्यामुळे पात्रानुरूप वाटला तो आवाज. उलट ते कुर्र् केलेलं भारी वाटलं
मला आवडलं नयना आपटेचं काम,
मला आवडलं नयना आपटेचं काम, सगळेच काम मस्त करतायेत. मी एन्जॉय करतेय सिरीयल, धमाल येतेय बघायला. काही त्रुटी आहेत पण जमेच्या बाजू जास्त आहेत.
>>प्रियदर्शन जाधव --- दि. प्र
>>प्रियदर्शन जाधव --- दि. प्र. चे बेअरिंग चांगले घेतलेय त्याने
त्याला आवाज पण प्रभावळकरांचाच दिलाय का? नयना आपटे कर्कश्श असली तरी सुकन्या कुलकर्णीच्या मानाने मस्त काम करतेय. पण ती वन्स गेल्याची तार येते तेव्हा 'तीर्थयात्रेला गेल्या' वगैरे प्रकार ओढूनताणून आणल्यासारखा वाटला. तार आली आहे आणि त्यात 'गेली' असा उल्लेख म्हणजे 'वारली' असाच अर्थ नाही का होत. असो.
पण आई बोक्याला 'तू काय मदनाचा पुतळा लागून गेला आहेस का?' असं सुनावते तेव्हा सॉल्लीड मजा वाटली. मॅट्रीमोनियल साईटस वर स्वतःला खुशाल हँडसम म्हणून घेणार्या आणि आपण 'टॉल, डार्क, हँडसम' यातील फक्त 'डार्क' असूनही 'गोरी बायको' हवी असणार्या महाभागांना अशी आरसा दाखवणारी आई हवी.
दि. प्र., सु. मोंची सूनबाई
दि. प्र., सु. मोंची सूनबाई आणि नातवंड पण स्काईपवर दाखवायला पाहिजे.
छान आहे मालिका.. सुदर्शन तरुण
छान आहे मालिका.. प्रियदर्शन तरुण पणातले दिलीप प्रभावळकर बरोब्बर सादर करीत आहेत.. त्यांच बोलण व त्यांचे हावभाव अगदि बरोबर वठवतो आहे..
सुदर्शन तरुण पणातले दिलीप
सुदर्शन तरुण पणातले दिलीप प्रभावळकर बरोब्बर सादर करीत आहेत. >>>>>>>>>>>सुदर्शन नाही हो प्रियदर्शन नाव आहे त्या कलाकाराचं
ओह हो प्रियदर्शन...
ओह हो प्रियदर्शन...
एक फालतुगिरी आहे ती गंडलेली
एक फालतुगिरी आहे ती गंडलेली वयं.
मनकर्णिका इतकी तरुण ?
आणि त्या काळात फोन?
Pages