बाबाची चप्पल
बाबाची चप्पल
फार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच. परीक्षेला जाताना त्याची चप्पल घालून गेलो की खुप छान वाटायच. अगदी पेपर सोप्पा जायचा.
पाय मोठा झाल्यावर मग ती चप्पल पायाला येइनाशी झाली. तरीही कोम्बून पाय त्यात भरायचो. मग पुढे शिक्षण झाल्यावर नोकरी निमीत्त बाहेर गावी गेल्यावर चपलेचा सन्बध तुटला. अगदीच तुटल्या तुटल्या सारख झाल. बाबा आजारी पडल्यावर मग घरी बाबाच्या चपले जवळ आलो पण मात्र पुन्हा चपलेच्या खेळाची गम्मत येइनाशी झाली. ईस्पीतळाच्या वार्या सुरू झाल्या. अनेकदा अतिदक्षता कक्षाच्या बाहेर बाबाची चप्पल असायची. ती परत बाबाच्या पायात यावी म्हणून देवा जवळ प्रार्थना करायचा. काही वेळा देवाने माझी प्रार्थना ऐकलीही. पण पुढे कदाचित देवाला हा चपलेचा खेळ पुढे चालवायचा नसावा. तो पटकन बाबाला घेऊन गेला. खल्लस. पटदिशी खेळ सम्पला. बाबाच्या अन्त्यविधीला देवाला चिडवायला मुद्दाम बाबाची चप्पल घालून गेलो. कदाचित मुद्दाम कदाचित चुकून असेल. बाबा जळताना चप्पल माझ्या पायाशी होती. ती हृदया जवळ यावी म्हणून कवटाळून छातीशी घेतली. तीही लगेच मला बिलगली माझे स्वान्त्वन करायला. काही अश्रु चपलेवर ओघळले काही मनातच राहीले. ते असे कधी कधी बाहेर पडतात. आत्ता सारखे. बाबा गेला पण जाताना आपली चप्पल देउन गेला. वारसा हक्काने ती माझ्या कडे आली.
पुढे चपलेने मला धीर दिला. बाबाची वाचनाची आवड मी लिखाणातून भागवली. चालण्याची आवड मैलोनमैल प्रवास करून भागवली. बडबडण्याची आवड बडबडून भागवली. खाण्याची आवड खाद्य पदार्थान्चे दुकान सुरू करून भागवली. परोपकाराची आवड अनेकाना मदत करून भागवली. आता खर्या अर्थाने चप्पल माझ्या पायाला यायला लागली होती.
अनेकदा मी बाबाची चप्पल पायात घालून बाहेर जातो. घरचे ओरडतात पण मी ऐकत नाही. त्याना माझे आणि चपलेचे नाते त्याना माहीत नाही त्याला ते तरी काय करणार? कधी कधी मी कुण्या स्नेह्याकडे जातो. चप्पल त्याच्या घराबाहेर काढतो. स्नेही मग विनोद करतात. म्हणतात. तुझ काय बर आहे. तुझी चप्पल कधीच चोरीली जाणार नाही (मनात: इतकी जुनी पुराणी चप्पल कोण नेणार?) सर्व जण हसतात मी सर्वात मोठ्याने हसतो आणि हळुच म्हणतो ही चप्पल माझ्या बाबाची आहे आणि " In real sense, I stepped into my father's shoes"
केदार साखरदान्डे
केदार, खूप छान लिहीलसं.
केदार, खूप छान लिहीलसं. हृदयस्पर्शी. रडवलस.
भिडलं. ...
भिडलं.
...
फार सुंदर ! एकदम हृदयस्पर्शी.
फार सुंदर ! एकदम हृदयस्पर्शी..
हे असले उद्योग मी ही करायचो... (भूतकाळ)
फार सुंदर ! एकदम हृदयस्पर्शी.
फार सुंदर ! एकदम हृदयस्पर्शी.. >> +१
छान ..
छान ..
फार सुंदर !
फार सुंदर !
हृदयस्पर्शी. रडवलत
हृदयस्पर्शी. रडवलत
चांगलं लिहिलेय
चांगलं लिहिलेय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहीलत. ह्रदयस्पर्शी
छान लिहीलत. ह्रदयस्पर्शी
छान लिहिलंय
छान लिहिलंय
अगदी हृदयस्पर्शी :'(
अगदी हृदयस्पर्शी :'(
वाह !
वाह !
छान लिहिलंय >>+१
छान लिहिलंय >>+१
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
रडवलंत....!!!! अतिदक्षता
रडवलंत....!!!! अतिदक्षता विभागाच्या वाऱ्या , चप्पल बाबाच्या पायात जावी हि प्रार्थना ....! रिलेट झालं !!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खुप सुंदर लिहिलय
खुप सुंदर लिहिलय
सुंदर लिहिलंय . मनाला भिडलं
सुंदर लिहिलंय . मनाला भिडलं अगदी
सुंदर लिहिलंय . मनाला भिडलं
सुंदर लिहिलंय . मनाला भिडलं अगदी <<++११
मनस्पर्शी....+१००
मनस्पर्शी....+१००
धन्यवाद
धन्यवाद
मनातले अश्रु शब्दावाटे उमटले इतकेच
केदार, छान! अगदी भिडले!
केदार, छान! अगदी भिडले!
Kharach hridayala bhidale
Kharach hridayala bhidale
प्रत्येकाच्या मनात असे हळवे
प्रत्येकाच्या मनात असे हळवे कोपरे असतात आपल्या आई वडिलांविषयी.
छान लिहिलंयस.
छान लिहिलंय ....खूप रिलेट
छान लिहिलंय ....खूप रिलेट झालं.
मस्तं. >>प्रत्येकाच्या मनात
मस्तं. >>प्रत्येकाच्या मनात असे हळवे कोपरे असतात आपल्या आई वडिलांविषयी.--- +१
मी कधी काही माझ्या बाबांचा
मी कधी काही माझ्या बाबांचा शर्ट घालतो ... मस्त वाटते
खूप छान...! माझा भाऊ लहान
खूप छान...! माझा भाऊ लहान असताना वडीलान्च बनीयन घालायचा ते आठवले (वय ८-१० वर्षे असेल त्याचे)...एकदा आम्हाला एका लग्नाला जायचे होते, आणि भावाने चूप्-चाप बनीयन घातले त्यान्चे...त्यावेळेस "एक दाण्डीवर आणि एक ***" " अशीच पद्धत असल्याने त्याना काही केल्या बनीयन सापडेना...
खूप शोधा-शोध, चीड-चीड झाली...मलाच शन्का आली आणि मग मी भावाच्या शर्टाच्या आत डोकावून पाहीले, तेव्हा बनीयनचा गळा खूप खाली गेलेला दिसला आणि वडीलन्च्या हरवलेल्या बनीयन चा शोध लागला !!
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
Pages