आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमेश यादव टेस्ट मधल्या यशावर 'हाय' आहे बहुतेक!! जबरदस्त!!

"कसला कंजूस .. फिल्डींगमध्ये रन लुटवले आज मजबूत" - ह्याला म्हणतात 'आयजीच्या जीवावर बायजी उदार'. स्वतःच्या बॉलिंगमधे कंजुषी, दुसर्याच्या बॉलिंगवर दिलदारी. Wink

पण ह्या लिस्ट सारखाच गंभीर हळू हळू आयपीएल पुरता मर्यादित रहातो की काय असं वाटून गेलं >> ओह तू उलट अर्थाने बोलत होतास होय.

धमाल सुरू आहे मॅच मधे, सिक्स काय, ड्रॉप काय, कॅचेस काय नि ओव्हर थ्रो काय. काहिच्या काही .......

"धमाल सुरू आहे मॅच मधे, सिक्स काय, ड्रॉप काय, कॅचेस काय नि ओव्हर थ्रो काय. काहिच्या काही " - हो ना. गल्ली क्रिकेट ची आठवण झाली.

१७० स्कोअर ठीक आहे. पण १०-१५ रन्स कमी आहेत असं वाटतय. अर्थात पंजाब कडे सुद्धा चांगली बॉलिंग आहे, पण ईशांत पण आहे. Wink तो गेम चेंजर आहे (कोलकत्याच्या फेवर मधे!! Happy )

नरेन ला नक्की काय सांगून ओपन करायला सांगितले असेल ? तो एकाच प्रकारे मारतोय पहिल्या ओव्हरमधे तरी बि बॅटींग आर्क स्लगिश वाटतेय. उत्थप्पा असताना का पण ?

हो मारतोय पण सगळा फ्लूक आहे रे. परत चालेल ह्याची खात्री नसताना कशाला असे प्रयोग करायचे ? स्टेबल ओपनिंग पेयर जरुरी आहे ना लाँग टर्म साठी. आता उथ्थप्पा येईल तो धडपडेल fielding restrictions नसल्यामूळे. त्याला सेट व्हायला वेळ लागेल. पंजाब - विशेषतः मॅक्सी नि अ‍ॅरन ह्यांची लआईन लेंग्थ कसली गंडलेली होती. तेही स्लिप लावलेली असताना ? संदीप शर्माच्या पहिल्या ओव्हरच्या वेळी काय सुरू होते त्याकडे लक्ष नव्हते का ?

From here onward, game is KKR's to lose really

नारायण माझ्यामते आजच्यासाठी तरी मास्टर स्ट्रोक होता.. अश्या चांगल्या खेळपट्टीवर, १७० असे अल्याडपल्याड टारगेट चेस करताना तरी.. आणि हे मी आता नाही व्होटसपवर आधीच बोल्लेलो, पहिल्याच ओवरला. त्याला मागेही काही उचलून सिक्स मारताना पाहिले आहे मी, पण कन्सिस्टन्सी नव्हती त्याचे कारण पसरलेली फिल्डींगही असू शकते. तेच आत फिल्डींग असताना ऊचलून मारले आणि यशस्वी ठरले. गम्भीरचे कडक क्लासिकल ऑफचे फटकेही तितकेच जबरदस्त. नारायणचे हवाईदल आणि गंभीरचे भूदल. पंजाब सळो की पळो झाले. आणि गंभीर आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार आहे हे त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध केले.

परत चालेल ह्याची खात्री नसताना कशाला असे प्रयोग करायचे ? >>>> याबाबत काही अंशी असहमत. आयपीएल एवढा मोठा सीजन असतो की जो विनिंग फॉर्म्युला तुम्हाला सुरुवातीला गवसेल तोच शेवटपर्यंत काम करत नाही. पुढच्यावेळी प्रतिस्पर्धी नारायणवर उपाय शोधून येतील तेव्हा कदाचित केकेआरचा अ‍ॅटेक वेगळीकडूनच झाला असेल. टीम कॉम्बीनेशनचे प्रयोग चालणे हीच आयपीएलची गंमत आहे Happy

उचलुन शॉट्स मारणे हे आयपील पुरते तरी काहीच नवीन नाही. सध्याच्या वजनदार बॅट्सच्या जमान्यात उचलून सिक्स मारणे ह्यात मोठा पराक्रम नाही रे. गंभीर ने ओपन स्टान घेतल्यापासून त्याला शॉर्ट बॉल तेही धेडगुजर्या स्पीड मधे म्हणजे त्याच्या सारख्या स्मार्ट प्लेयर ला सेट होण्याची संधी देणे हे उघड आहे. (पहा : मुंबईने काय केले होते ते) त्याच्या बरोबर उलट नरेनचे आहे. त्याला कुठे बॉल टाकू नये हे उघड असतानाही मॅक्स्वेल नि अ‍ॅरन ह्यांनी अंदाधुंद बॉलिंग केली. तो एक प्रॉपर बॅट्समन नाही (rather limited ability चा आहे). KKR ची बॅटींग डीप आहे. त्यामूळे उत्थप्पा, पठाण नि यादव अजून पुरेसे खेळेलेले नाहीत. पुढच्या मॅचेससाठी सूर्यकुमार यादव नि पठाण ह्यांना फ्लो मधे आणणे जरुरी होते. एव्हढे सगळे असतानाही नरेन ओपन करतोय हे विचित्र वाटले.

क्रिकइन्फोवाले म्हणतायत, की नरिनने बिग बॅशमध्ये तीनदा ओपन केलेले म्हणून. >> मला आठवते त्याप्रमाणे कुठल्या तरी champions trophy types स्पर्धेमधे पण तो वेस्ट इंडीज कडून खेळताना असाच वर आलेला (तिसरा बहुतेक)

अरे एवढं सिरीयस नाही रे असामी, लिन इन्ज्युअर्ड आहे म्हणून. ओपनिंग काँबिनेशन शोधण्याचा प्रश्नच नाही. लिन आणि गंभीर हेच त्यांचं ओपनिंग कॉम्बो असेल.

टीम कॉम्बीनेशनचे प्रयोग चालणे हीच आयपीएलची गंमत आहे >> हे बरोबर आहे.

चार्य लिन बहुतेक गेल्यात जमा आहे आजच्या बातमीनुसार.

हे नव्हतं माहिती. अशी बातमी मी अजून वाचली नाही. मी तर काल वाचलं, की कॅलिस म्हणाला ते अपबीट आहेत, आणि तो नंतर भाग घेऊ शकेल टूर्नामेंटमध्ये.

एकदम एकतर्फी झाली शेवटी मॅच. कोलकता ने पॉवरप्ले मधेच पंजाब ची हवा काढून घेतली आणी नंतरही कुठलीही संधी दिली नाही. Sheer dominance!

उद्या आरसीबी वि. मुंबई ईंडियन्स - कोहली खेळणार आहे. मॅच चुरशीची होईल असा अंदाज आहे.

उद्याची दुसरी मॅच गुजराथ लायन्स वि. पुणे सुपरजायंट्स - दोन्ही तळाच्या टीम्स असल्या आणी जडेजा खेळण्याची शक्यता असली तरी जर गुजराथे ने फॉकनर ला खेळवलं नाही तर पुणे सहज जिंकू शकतील. जर जडेजा आणी फॉकनर खेळले, तर ही मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. पुण्याने दिडा च्या जागी शार्दुल ठाकुर ला खेळवलं तर त्यांची बॉलिंग स्ट्राँग होईल की नाही ते माहीत नाही, पण कच्ची तरी नाही रहाणार.

उचलुन शॉट्स मारणे हे आयपील पुरते तरी काहीच नवीन नाही. >> असामी, हो नक्कीच, पण ऊचलून मारायची प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. किंबहुना स्ट्रेंथ आणि वीकनेसेस वेगळे असतात. प्रतिस्पर्ध्यांना समजेपर्यंत तो मारून गेला ईतकेच. किंवा अश्या हिटरना एक साजेसा गोलंदाज भेटतो आणि ते त्यावरच हात साफ करून घेतात. ही फक्त एक सरप्राईज चाल होती. पुढे लिन परत येवो न येवो, हे पर्मनंट सोल्युशन नाही हे गंभीरलाही माहीत असणारच.

जेव्हा उचलून मारणे नवीन असायचे तेव्हाही सरप्राईज पिंच हिटर पाठवायची एक पद्धत असायची. पण ते एखाद्या सामन्यात हिट झाले म्हणून कोणीही त्यांना प्रत्येक सामन्यात आणायचे नाही. जसे आपण पाकिस्तानसोबत कानिटकर फोरने सव्वातीनशे चेस केलेले तेव्हा रॉबिन सिंग तिसरा पाठवणे ही चाल यशस्वी ठरली तरी रॉबिनने तो नंबर काही कायमचा घेतला नव्हता. ना धोनीने तिसरा येत धडाकेबाज शतक मारले म्हणून त्याला तो नंबर कायमचा दिला नाही. याकडे तसेच बघायला हवे. आजचा सामना जिंकून घेतला हे महत्वाचे Happy

बाकी आजच्या खेळीने नारायनला बराच आत्मविश्वास मिळेल. त्याची गोलंदाजीची धार अ‍ॅक्शन बदलल्यापासून कमी झाल्याने त्याला आपण आता कप्तानाचे मुख्य अस्त्र राहिलो नाही याचे जरा वाईट वाटत असेल, तसेच आज फिल्डींगमध्येही गचाळपणा केलेला. मात्र आज कप्तानाने विश्वास टाकला आणि आपण त्याला जागलो, सामना काढून दिला यातून मिळालेला आत्मविश्वास त्याला ऊर्वरीत स्पर्धेत गोलंदाजीसाठी पुरेल..

"ना धोनीने तिसरा येत धडाकेबाज शतक मारले म्हणून त्याला तो नंबर कायमचा दिला नाही." -धोनी पिंच हीटर दर्जाचा बॅट्समन होता हे जाहीर केलय ऋन्मेष ने Wink (am I opening a can of worms? Uhoh )

ऋन्मेऽऽष ( मिळालेला आत्मविश्वास त्याला ऊर्वरीत स्पर्धेत गोलंदाजीसाठी पुरेल..हा मुद्दाच वेगळा आहे. त्या अनुषंगाने तो फेल गेला असता तर काय झाले असते असा विचार करून बघ.) पिंच हिटर असण्याबद्दल माझे काही म्हणणे नाहीये, पण पिंच हिटर हा मूळात चांगला बॅट्समन असतो. रॉबिन सिंग, धोनी हे मूळात बॅट्समन म्हणून संघात होते हे विसरू नकोस. (रॉबिन सिंग ढाक्यातच नाही तर त्या नंतर सुद्धा आफ्रिके विरुद्ध३ वर regularly येत होता.) नरेन तसा बॅट्समन नाही हे उघड आहे . तू संदीप शर्माची पहिली ओव्हर बघितलीस तर त्याला कंट्रोल मधे ठेवणे किती सोपे होते हे दिसत होते. पुढच्यांनी बरोबर तेव्हढेच करणे का टाळले हे त्यांनाच माहित. "तो नंबर कायमचा दिला नाही" ह्यापलीकडे मह्त्वाचे म्हणजे लिन बद्दल एव्हढी अनिश्चिती असतानाही KKR ने proper opening pair शोढण्याकडे लक्ष दिले नाही हे आश्चर्याचे वाटले. Maybe they know something more about Lynn than we do.

am I opening a can of worms? >> Happy

आरसीबी वि. मुंबई ईंडियन्स मॅच आधी आहे हे आश्चर्य आहे. कोहली परत येत असतानाही ? उद्य सुट्टी आहे का देशात ?

"हो, उद्या सुट्टी आहे." - गूड फ्रायडे? सेक्यूलर देशात रहाण्याची मजाच काही और असते Wink नाहीतर माणसाने कॉन्स्युलेट मधे नोकरी करावी म्हणजे दोन्ही देशांच्या सुट्ट्या मिळतात. Happy

असो, बॅक टू क्रिकेट. असामी, मलाही हा प्रश्न पडला होता की उद्या २ मॅचेस कशा काय. पण आता उत्तर मिळालं.

त्यापेक्षा सेवानिवृत्त व्हावे. सगळ्या देशांच्या सुट्ट्या!
आणि विलो टीव्ही बघत बसावे, म्हणजे लिहीता येईल की १९९२ मधे अमक्यातमक्याने त्या दुसर्‍या अमक्यातमक्याला टाकलेला बॉल काय जबरदस्त होता, किंवा १९९७ मधे त्या ह्याने मारलेला शॉट कसला पॉवरफुल होता.

Pages