जुने मराठी चित्रपट

Submitted by गुलमोहोर on 3 January, 2014 - 06:12

खूप दिवसापासून 'शापित' हा जुना मराठी चित्रपट शोधत आहे वेब वर पण मिळत नाही आहे.

'अरे संसार संसार' आणि अजून काही जुने चित्रपट शोधले पण काही Youtube ची गाणी मिळाली फक्त. दादर ला कदाचित चित्रपटांची DVD मिळेल पण आत्ता काही Online असेल तर नक्की सांगावे. मी TORRENT वर अजून शोधले नाही आहे , कोणाला माहित असेल तर सांगावे.

लहानपणी रविवारी संध्याकाळी हे मराठी चित्रपट एकत्र आई-बाबां बरोबर पाहण्याचे दिवस आठवत आहेत.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेम हीच स्टोरी असलेला हिंदी चित्रपटही आहे . नाव आहे बहू की आवाज
सासू सुलभा देशपांडे आहे.>>>> स्नेहनिल, आशालता वागबावकरच्या रोलमध्ये सुलभा देशपांडे Uhoh कल्पनाच करवत नाही. त्यांना अस खाष्ट, हुंड्यासाठी सुनेला छळणार्‍या, मारणार्‍या सासुच्या या रोलमध्ये अ‍ॅक्सेप्ट करण मला तरी कठीण आहे.

फार दिवसांपासुन एक सिनेमा शोधते आहे. नाव आठवत नाही. राजा गोसावी यांचा सिनेमा आहे.कथा थोडी अशी आहे.. राजा गोसावी याना गाणी लिहिण्याचा छन्द असतो.त्यांना फक्त एक लावणीची ओळ सापडते.त्यावरुन पुर्ण गाणे-लावणी लिहावयचे असते. कोणाल आठवतो आहे का हा सिनेमा?

<<मला एखादं पुस्तक का घाण वाटलं त्याची कारणे कृपया मलाच सांगूद्या. इतरांनी ठरवू नका हं>> ठीक आहे. आपल्याला जेव्हा वेळ होईल तेव्हा आपणच सांगा Happy

नाव मोठ लक्षण खोट, सुगंधी कट्टा, पेडगावचे शहाणे असे बरेच चांगले चित्रपट VCD / DVD वर मिळत नाहीत. आता "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" VCD ची मिळाली

माझं घर माझा संसार या १९८५ साली आलेल्या चित्रपटाची कथा कुणी सांगू शकेल काय?
तसेच अर्धांगी ह्या चित्रपटाचीही.. दोन्हीत अजिंक्य देव नायक असल्याने कथा आठवण्यात गोंधळ होतोय..

माझं घर माझा संसार या १९८५ साली आलेल्या चित्रपटाची कथा कुणी सांगू शकेल काय?>>
अजिंक्य देव आणि मुग्धा चिटनीस यांचे लग्न ठरवून होते. रिमा लागू सासू असते, अजिंक्यची आई. ती वळण, सवयी यावरुन सारखी बोलत रहाते. त्यात अजिंक्यची बहिण तेल ओतत रहाते. मुग्धा खूप सहन करते पण काही वेळा अजिंक्यच्या समोरच वाद होतात. आई आणि बायको यात तो भरडला जातो आणि ट्रेनमधून दोघे उडी टाकतात. त्यात तो मरतो पण मुग्धा वाचते. तेव्हा सासूला उपरती होते. पण काय उपयोग? आधीच थोडा समजुतदारपणा दाखवला असता तर मुलगा पण वाचला असता.

तसेच अर्धांगी ह्या चित्रपटाचीही.. दोन्हीत अजिंक्य देव नायक असल्याने कथा आठवण्यात गोंधळ होतोय..>> अर्धांगी मधे आशा काळे त्याची आई आहे. तिला सासरचे खूप छळतात, मुलापासून पण दूर करतात. त्यामुळे ती जाळून घेते. पण मरतांना शाप देते. मोठा झालेला अजिंक्य त्याच वाड्यात रहायला येतो. त्याची बायको अर्चना जोगळेकर दाखवली आहे. अर्थात शेवट गोड होतो.

मुग्धा चिटनीस ... हिचा पहिला व शेवटचा चित्रपट. ३१ वर्षीच ती ब्रेस्ट कॅन्सरने गेली.
थॅक्स चिनूक्स Happy

विनिता, चिनूक्स, अनेक धन्यवाद! मा.घ.मा.सं ची कथा उडी टाकण्यापर्यंतच आठवत होती, अर्धांगीचीही अशीच अर्धवट... बर्‍याच दिवसांचा गोंधळ मिटला, नै तो दोन्ही चित्रपट पूर्ण बघावे लागले असते. Happy

रत्नाकर मतकरी यांच्या 'माझे रंगप्रयोग' या पुस्तकात या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल लिहिलं आहे.

मा घ मा सं मतकरिंच्या जौळ कादंबरीवर आहे त्यावर त्याच नावाचे(बहुतेक तेच नाव) नाटक आणि नंतर हा चित्रपट आला. मला मूळ कादंबरी जास्त आवडलेली.

यू ट्युबवर जुने मराठी चित्रपट सापडतात पण कित्येकदा खूप कापाकापी केलेले किंवा भाग अपलोड केले असतील तर अर्धवट अपलोड केलेले असे सापडतात. कापाकापी असेल तर लिंक लागत नाही आणि अर्धाच चित्रपट पाहायला मिळाला तर चुटपुट लागते.

'कधी करीशी लग्न माझे' हा जयश्री गडकरचा चित्रपट दूरदर्शनवर बघितलेला, त्यातल्या गाण्यांमुळे लक्षात राहिलेला. यू ट्युब वर 10 भाग आहेत पण चित्रपटाचा शेवट नाहीये Sad

मा घ मा सं मतकरिंच्या जौळ कादंबरीवर आहे त्यावर त्याच नावाचे(बहुतेक तेच नाव) नाटक आणि नंतर हा चित्रपट आला. मला मूळ कादंबरी जास्त आवडलेली. >>> सिनेमा खूप टची आहे. पण परत बघवला नाही. राहून राहून वाटायचे अजिंक्य देव वाचायला हवा होता. त्यामुळे परत लागला तरी बघत नाही Sad

हो, खूप वाईट वाटते, तिघांचेही. सासूही परिस्थितीवश वागते. कादंबरीचा फॉरमॅट असा आहे की त्यात प्रत्येक पात्र स्वतःच्या नजरेतून कथा पुढे नेतं त्यामुळे प्रत्येकाचा नजरिया कळतो, तो/ती असे का वागतात ते कळते. एकच घटना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत त्यातून स्वतःसाठी दुःख तेवढे शोधतात. हे सगळे वाचताना माणसे बदलत्या स्थितीनुसार स्वतःला ऍडजस्ट करत नाहीत, का करत नाहीत याचे वाईट वाटत राहते. मनुष्यस्वभाव, अजून काय

कथानक सत्यघटनेवर आधारित आहे. मतकरींच्या एका लेखात त्यांनी एक हृदयस्पर्शी उल्लेख केलेला. नाटकाच्या एका प्रयोगाला खऱ्या आयुष्यातली नयन आलेली. शेवटच्या अंकाच्या आधी तिने विंगेत येऊन नायक झालेल्या नटाची खूप मनधरणी केलेली की तू नको असे करुस म्हणून. हे वाचून सुध्दा खूप वाईट वाटलेले.

या चित्रपटाची एक छानशी आठवण पण आहे. माझा एक कार्यालयीन सहकारी होता ज्याच्या घरात सेम मा घ मा सं सारखी स्थिती होती. ब्राम्हण कुटुंब, आई शाळेत हे.मा. वडील लहानपणी गेलेले, आईने कडक शिस्तीत एकहाती ह्याला वाढवलेले. त्याचं लग्न झाल्यावर तो आम्हाला एकदा हसत हसत म्हणाला की घरी थोड्याश्या कुरबुरी सुरू झाल्यावर मी दोघींनाही एकत्र बसवले आणि आईला सांगितले की तुझ्यासारखे नीटनेटके काम कोणी करू शकणार नाही, तू सुनेकडूनसुद्धा अपेक्षा ठेऊ नकोस; बायकोला सांगितले की आई काम करतेय म्हणून तू बसून राहायचे नाही, जितके जमतेय तितके करत राहायचे. आणि दोघीना सांगितले की आपल्या घराचा मला मा घ मा सं पिक्चर झालेला मला बघायचा नाहीये. Happy

मला दिलीप प्रभावळकरांचा रात्र आरंभ हा सिनेमा पाहायचाय. एखादी चांगल्या प्रिंटची लिंक आहे का ? तसेच मतकरींची गहिरे पाणी मालिका कुठे आहे का उपलब्ध ? सीडी/डीव्हीडी च्या पेड लिंक्स पण चालतील