'कासव'ला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ

Submitted by चिनूक्स on 7 April, 2017 - 03:40

६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Hs5kdjwmizU

डॉ. मोहन आगाशे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.

'व्हेंटिलेटर', 'दशक्रिया', 'सायकल' या मराठी चित्रपटांनाही यंदा पुरस्कार मिळाले आहेत.

सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.

मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.

Kaasav-new poster.jpg
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, जम्बो,

चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. तारीख मायबोलीवर जाहीर होईलच. शिवाय जगभरात हा चित्रपट दाखवण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न सुरू आहेत. त्याची माहितीही इथे मिळेलच.

दिनेश.,
मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या खेळांची माहिती, परीक्षणं इत्यादी इथे वाचायला मिळेल.

*

तुम्हां सर्वांच्या शुभेच्छा चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते व कलाकार-तंत्रज्ञ यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वांचे मनःपूर्वक आभार. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरही तुम्ही असाच पाठिंबा द्याल, ही अपेक्षा आहे. Happy

'कासव'च्या चमूचं हार्दिक अभिनंदन. Happy

>>> जगभरात हा चित्रपट दाखवण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न सुरू आहेत. त्याची माहितीही इथे मिळेलच.
धन्यवाद.

पहिला 'स्वीडन मराठी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' २० ते २४ एप्रिल, २०१७ या काळात स्टॉकहोममध्ये आयोजित केला आहे.

या महोत्सवात एकूण वीस मराठी चित्रपट दाखवले जातील. या चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शकही यावेळी उपस्थित असतील.

अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला, यंदाचं सुवर्णकमळ-विजेता असलेला 'कासव' हा चित्रपटही महोत्सवात दाखवला जाईल.

चित्रपटाचे निर्माते डॉ. मोहन आगाशे व दिग्दर्शिका श्रीमती सुमित्रा भावे यांच्याशी चित्रपटानंतर संवाद साधला जाणार आहे.

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

स्थळ - Biograf Sture AB

तारीख - २३ एप्रिल, २०१७

वेळ - संध्याकाळी ५.३० वाजता

ऑनलाईन तिकीटविक्री - www.sf.se

*

भावे - सुकथनकरांचे 'संहिता' आणि 'अस्तु' हे दोन चित्रपटही महोत्सवात दाखवले जातील.

'कासव' ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असल्याने प्रदर्शनाचं वेळापत्रक मायबोलीवर वाचायला मिळेल.

धन्यवाद !
लक्ष ठेवुन आहे, अस्तू बघितला, आता कासव पाहणारच !

Pages