Submitted by मीनल कुलकर्णी on 9 April, 2017 - 12:49
तुझे माझे
तुझे माझे बंध
जसा मोग-याचा गंध
किती दडपू पाहिला
दरवळे मुक्तछंद....
तुझी माझी भाषा
निशब्दाची रेषा
अबोल भासे तरी
पुर्णत्वाची परिभाषा...
तुझे माझे गाणे
ना सूर ना तराणे
गवसले मज त्यात
जगण्याचे किती बहाणे...
तुझी माझी भेट
नभ धरेचा समेट
होता नजरानजर
कळ काळजात थेट...
तुझा माझा प्रवास
मनी क्षितीजाची आस
गुंफता हात हाती
पायी नक्षत्रांचा भास...
तुझा माझा पारिजात
सडा केशरी दारात
भरली ओंजळ प्रेमाने
सुख मावेना डोळ्यात...
- मीनल
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
कडक अप्रतिम आवडली कविता. असेच
कडक अप्रतिम आवडली कविता. असेच लिहित रहा. पु.ले.शु.
धन्यवाद अक्षयजी
धन्यवाद अक्षयजी
सुंदर
सुंदर
छान.. आवडली.....
छान.. आवडली.....
Thanx
Thanx
सुन्दर कविता
सुन्दर कविता
छान
छान
धन्यवाद...द्वैत आणि सारंग
धन्यवाद...द्वैत आणि सारंग
छान! पु.ले.शु.
छान!
पु.ले.शु.
Thanx satyajit
Thanx satyajit
शब्दांच्या पलीकडचे!
शब्दांच्या पलीकडचे!
धन्यवाद! !
धन्यवाद! !