मखाणे - ३-४ ग्लास
तुप - १ चमचा
कॅरमल करण्यासाठी :
बटर एक- दिड चमचा
साखर ५ चमचे
पाव चमचा दालचीनी पुड (ऑप्शनल)
१. जड बुडाच्या भांड्यात / कढईमध्ये तुप गरम करा.
२. तुप गरम झाल्यावर त्यात मखाणे घाला. मी अंदाजे ३-४ ग्लास मखाणे घेतले होते.
३. मंद आचेवर तुपावर मखाणे भाजा.
४. ३-४ मिनीटात मखाणे छान क्रिस्पी होतिल. त्यांचा रंगही थोडा बदलेल.
५. मखाणे भाजल्यावर एका परातीत/ ताटात काढून घ्या.
६. कढईमध्ये कॅरमल करण्यासाठी बटर घाला.
७. बटर विरघळल्यावर त्यात साखर घालून मंद आचेवर हलवत रहा.
८. ५-६ मिनीटात सगळी साखर विरघळून कॅरमलचा कॉफी सारखा रंग येतो. या स्टेजला हवे असल्यास यात दालचीनीची पुड घाला.
९. कॅरमल झाल्याबरोबर गॅस बंद करून त्यात मखाणे मिक्स करा.
१०. सगळ्या मखाण्यांना कॅरमल व्यवस्थित लागल्यावर आणि कॅरमल थोडे थंड झाल्यावर मखाणे बटर पेपर लावलेल्या ताटात काढून घ्या. कढईतच राहिले तर कॅरमलसकट बुडाला चिकटतिल आणि काढायला थोडा त्रास होईल.
दालचिनी पुड घालायच्या ऐवजी आवडीचा इसेन्स पण घालता येईल.
फोटो हवा..
फोटो हवा..
त्याशिवाय फिल येत नाही...
मस्त दिसतोय प्रकार बाकी...
रेसेपी लिहिताना काहीतरी फोटो
रेसेपी लिहिताना काहीतरी फोटो अपलोडचा ऑप्शन आला होता. मला वाटले तिथे अपलोड केल्यावर दिसेल फोटो.
मोबाईलवरून लिहितेय. जरा फोटो लहान करून टाकते.
(No subject)
हा काल करतानाच काढलेला फोटो
हा काल करतानाच काढलेला फोटो आहे.
गुळ वापरून कॅरमल केल्यास बहूदा अजून खमंग लागेल.
मखाणे बरेच पौष्टिकआणि हेल्दी असतात म्हणे. येता जाता खायला, मुलांना खाऊ म्हणून द्यायला, रात्री बेरात्री जागरण करताना, संध्याकाळी भुक लागल्यावर खायला, टिव्ही बघताना तोंडात टाकायला वेगवेगळ्या चवींचे मखाणे हा एक सोप्पा आणि चांगला पर्याय आहे.
आम्ही याशिवाय चाट मसाला, काळे मीरे या चवींचे मखाणे केले आहेत. चॉकलेट, चीझ, चिली गार्लिक, इटालियन सिझनिंग इ चवींचे मखाणे बनवायचे प्रयोग करायचे आहेत.
मस्त.
मस्त.
कॅरेमलाइज्ड पॉपकॉर्न सारखे
कॅरेमलाइज्ड पॉपकॉर्न सारखे दिसतायत
मखाणे बरेच पौष्टिकआणि हेल्दी
मखाणे बरेच पौष्टिकआणि हेल्दी असतात म्हणे. येता जाता खायला, मुलांना खाऊ म्हणून द्यायला, रात्री बेरात्री जागरण करताना, संध्याकाळी भुक लागल्यावर खायला, टिव्ही बघताना तोंडात टाकायला वेगवेगळ्या चवींचे मखाणे हा एक सोप्पा आणि चांगला पर्याय आहे.
+१
मखाने healthy आहेत पण कॅरॅमल unhealthy आहे...लोटस ऑफ शुगर
मस्त! मी तुप जिरं व दाणे
मस्त! मी तुप जिरं व दाणे घालून चिवडा करते
!
मला वाटलं कॅरम शी रिलेटेड
मला वाटलं कॅरम शी रिलेटेड काहीतरी आहे, कॅरम खेळताना खायला म्हणून
मस्तच फोटो अल्पना..
मस्तच फोटो अल्पना..
मस्त दिसताहेत मखाने. करून
मस्त दिसताहेत मखाने. करून बघते.
मखाणे मुम्बैत कुठे मिळतात ?
मखाणे मुम्बैत कुठे मिळतात ?
पहिलं मखाणे म्हणजे नेमकं काय
पहिलं मखाणे म्हणजे नेमकं काय ते सांगा. फोटो बघून ते काबूली चणे वाटतायत मला तरी. तेच आहेत का ते??
निधी, मखाणे म्हणजे कमळाचे बी
निधी, मखाणे म्हणजे कमळाचे बी बहुतेक.
मोठ्या मॉलात फूड सेक्शनला मिळतात.
पण रत्नागिरीत कधी पाहिले नाहीत.
पंजाबी लोक आजुबाजूला असल्याने आम्हाला इकडे मात्र मिळतात.
अल्पना छान रेसिपी.
मी नुसते मीठ लावून एक- दोन मिनीट मावे करून खाते.
मस्त रेसिपी. मखाण्याच्या
मस्त रेसिपी. मखाण्याच्या पौष्टिक बद्दल मम . चविष्ट असतात . मी नुसतं तुपावर भाजून खाते.
कॅरॅमलपेक्षा चिली गार्लिकला प्राधान्य देईन
अल्पना, मखाणे अतिशयच
अल्पना, मखाणे अतिशयच टेम्प्टिंग दिसतायत.
मस्त आहे रेसिपी. कॅरॅमल पॉपकॉर्न माझे अतिशय आवडीचे.
गुळाचे क्ञारेमल कसे करतात?
गुळाचे क्ञारेमल कसे करतात?
छान. आता वेगवेगळे मसाले
छान. आता वेगवेगळे मसाले लावलेले मखाणे टिनमधे मिळतात. पण अजूनही मखाणे मराठी लोकांत फारसे माहित नाहीत.
निधी, मखाणे म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या. पण हि फुले महाराष्ट्राच्या उत्तरेला, खास करून बिहार मधे होतात.
या बिया भाजून मग लाकडी हातोड्याने ठोकून मखाणे बनवतात ( यू ट्यूबवर आहे हे ) नुसते खायला तसे बेचवच लागतात. थोडे तूपात परतून कुरकुरीत करुन घ्यावे लागतात ( नाहीतर चामट लागतात. )
याची खीर छान लागते.
मस्त आयडिया आहे!
मस्त आयडिया आहे!
धन्यवाद सातीताई, दिनेशदा.
धन्यवाद सातीताई, दिनेशदा.
हो मी तर ऐकलेलं पण नाही मखाणे. रत्नागिरीत सुपरमार्केटात मिळू शकतील कदाचित.