Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"बाहेर खेळताना काय करणार ?" -
"बाहेर खेळताना काय करणार ?" - पुण्याच्या बाहेर पडलं की 'पानिपत'?
(No subject)
हार्दिक पंड्या पांडुरंगा
हार्दिक पंड्या पांडुरंगा सारखा धाऊन आला मुंबई इंडियन्स साठी.
जोपर्यंत दिंडा खेळतो,
जोपर्यंत दिंडा खेळतो, तोपर्यंत मॅच कधीही फिरू शकते (प्रतिस्पर्धी टीम च्या फेवर मधे) हे परत एकदा सिद्ध झालय! भरघोस ३० रन्स ची मदत केलीये. समोर कुणीही चालतं त्याला. अगदी गेल च हवा असंच काही नाही. पंड्या पण चालेल.
Old Jungle Saying : दिंडा
Old Jungle Saying : दिंडा कधीच निराश करत नाही
पुण्याची हि बोंब नेहमीचीच
पुण्याची हि बोंब नेहमीचीच असणार आहे. पुण्याबाहेर ताहिर कमी effective होइल. म्हणजे नेहमी एक बॉलर शॉर्ट असणार.
पंड्याने जेवढे रन शेवटच्या
पंड्याने जेवढे रन शेवटच्या ओव्हर मध्ये केले त्यातले निम्मे पहिल्या षटकात दिले!!
रहाणे छान मारतोय!!
रहाणे आणी स्मिथ ने मस्त काढली
रहाणे आणी स्मिथ ने मस्त काढली मॅच. दोघही क्लासिक टेस्ट प्लेयर्स आहेत आणी मला तरी दोघही सगळ्या फॉर्मॅट्स मधे समर्थ वाटतात.
रहाणे आणी स्मिथ ने मस्त काढली
रहाणे आणी स्मिथ ने मस्त काढली मॅच. >> +१. आज दिंडा लकडी पुलावर दोघांचे जाहीर मुके घ्यायला तयार असेल
"आज दिंडा लकडी पुलावर दोघांचे
"आज दिंडा लकडी पुलावर दोघांचे जाहीर मुके घ्यायला तयार असेल " -
त्याला बहुदा दोघांनाही मसाज करायच्या ड्यूटीवर लावलाय.
काल स्टेडियमधे मॅच पाहिली ,
काल स्टेडियमधे मॅच पाहिली , झकास झाली अन मजा आली .
पण मला खटकलेले दोन मुद्दे , तुम्हाला काय वाटत ?
१. मॅच चुरशीची झाली खरी , पण २टीम खूप चांगल खेळल्यामुळे नाही तर २ टीम (बिलो) अॅव्हरेज खेळल्यामुळे. ते सुटलेले कॅच , मिसाफिल्डींग , लेंग्थ बॉल्स ना मारलेले सिक्स, (विशेषतः धोनीचे) साध्या बॉलवअरील फालतू शॉट , हे बघताना क्रिकेटची पातळी घसरलीय की काय अस वाटत
२. भारतात प्रेक्षकाना ग्रुहित धरण नॉर्मल आहे , पण काल मॅच नंतर केऑस होता . १:३० पर्यंत मी तिथेच अडकून होतो , अन एकही पोलीस तिथे नव्ह्ता. सगळे तिथून २ किमीवर पुणे सुरू होते तिथे ग्रुपने बसले होते .
आम्हीही सालाबादप्रमाणे किमान
आम्हीही सालाबादप्रमाणे किमान एक मॅच live बघून आलो!
इस्ट/वेस्ट आणि नॉर्थ इस्ट/वेस्ट स्टॅंडमधून बऱ्याच मॅचेस बघितल्यात पण यावेळी पहील्यांदाच साउथ अप्पर स्टॅंडची तिकीटे काढलेली.... amezing view आहे तिथून.... Just loved it!
काल बऱ्यापैकी आतल्या साईडला गाडी लावलेली असूनसुद्धा तुलनेने लवकर बाहेर पडलो.... केदार म्हणतो तसा आमचे काही मित्र तिथे तास-दीड तास अडकून पडले होते पण आम्ही मात्र मॅच संपल्यावर रमतगमत बाहेर पडूनही अर्ध्या पाउण तासात हायवेला लागलो होतो
आम्हालाही एक्सप्रेस वे सुरु होतो तिथल्या अंडरपासजवळ घोळक्याने उभे राहीलेले पोलीस दिसले
एकंदरीत मजा आली
आता थोडेसे मॅचबद्दल:
मॅच एकदम पैसावसूल झाली.... all thanks to Dinda and Pollard
ताहीर बॉलर म्हणून चांगलाच आहे पण DD च्या Team Combo मध्ये थोडा misfit होता..... मिश्रा आणि जयंत यादव असताना ताहीरला खेळवणे पण अवघड आणि त्याला बाहेर बसवणेही अवघड!
झाले ते बरेच झाले.... जिथे त्याला खेळायला मिळेल अश्या टीममध्ये आहे आता तो!
त्याने आणि रजत भाटीयाने मस्त बॉलींग टाकली पण दिंडाने शेवटच्या ओव्हरमध्ये सगळ्यावर पाणी ओतले... खरी कमाल वाटते ती त्याची खासियत माहित असूनही त्यालाच शेवटची ओव्हर देणाऱ्या कॅप्टन आणि थिंकटॅंकची!
पुण्याची बॅटींग काल मस्त चालली... रहाणे आणि स्मिथ दोघेही चांगले खेळले..... They took time to settle.... सुरुवातीचे त्यांचे बरेच चांगले शॉट्स सरळसरळ फिल्डर्सकडे जात होते पण दोघेही चिकाटीने टिकून राहीले आणि रन्स आल्या
मुंबईची ग्राउंडफिल्डींग मस्त झाली... काही कॅचेस सुटले तरी फिल्डींग प्लेसमेंट अगदी टाइट लावली होती
धोनी काल फारसा खेळला नसला तरी त्याचे फॅन फॉलोइंग इतके जबरदस्त आहे की स्मिथ केवळ नावालाच कॅप्टन वाटत होता
स्मिथ, रहाणे आणि स्टोक्सची बॅटींग चालू असताना सगळीकडे धोनीच्या नावाचाच जयघोष सुरु होता!
त्याचे ते रिव्ह्यूचे अपील पण एकदम एंटरटेनींग होते
पुढच्या मॅचमध्ये बहुतेक झंपा ऐवजी फाफ आत येईल... पुण्याला अजुन थोड्या डीप बॅटींगची गरज आहे
मुंबई सुरुवातीला अशीच खेळते अजुन काही मॅचेसनंतर ते फॉर्ममध्ये यायला सुरुवात होइल
आता आज कलकत्ता वि. गुजरात!
खाली असणार्या स्टँड ला काय
खाली असणार्या स्टँड ला काय म्हणतात ? त्याची तिकीट दर जास्त असतो का ? मी वानखेडेवरची ८०००ची काढली आहे. पण पहिल्यांदाच जात असल्याने नेमकी खालची आहे की वरची कळत नाही.
कुणाला काही आयडीया ?
दीपस्त, सर्वात खालच्या
दीपस्त, सर्वात खालच्या सेक्शनमधल्या सर्वात उंच सीट्सवरून मॅच चांगली दिसते. तुमचा कुठला स्टँड आहे? नॉर्थ किंवा गरवारे असेल, तर मस्त दिसेल तिथून मॅच.
SACHIN STAND BLK N L2
SACHIN STAND BLK N L2
हा स्टँड आहे. खाली की वर कळत नाही.
८००० चे तिकिट बॉक्स मध्ये
८००० चे तिकिट बॉक्स मध्ये असेल ना?
यंदा तिकिटे खूप महाग झाली आहेत का? मागच्यावेळी पुण्यात १५०० ची तिकिटं पण अगदी जबरी जागी होती.
१५०० पासुन आहे पण सलग मिळत
१५०० पासुन आहे पण सलग मिळत नव्हती. म्हणून ही काढली.
तेंडुलकर स्टँड मध्ये N म्हणजे
तेंडुलकर स्टँड मध्ये N म्हणजे कॉमेंटरी बॉक्सच्या बाजूला एक सेक्शन सोडून असेल. मधली लेव्हल. L2 म्हणजे सेकंड लेव्हल. मस्त दिसेल मॅच. एका साईडने व्ही आर्कमध्ये येतो तो पॅच.
चला म्हणजे व्यवस्थित दिसेल
चला म्हणजे व्यवस्थित दिसेल मॅच
जमिनीवरची लेवल १ ? मधली २ आणि एकदम वरची ही ३ ? बरोबर ?
हो.
हो.
"हे बघताना क्रिकेटची पातळी
"हे बघताना क्रिकेटची पातळी घसरलीय की काय अस वाटत" - आयपीएल ची तुलना फार सिरियस क्रिकेट शी करण्यात अर्थ नाहीये. ते थोडसं मनोरंजनात्मक क्रिकेट आहे. पूर्वी एग्झिबिशन मॅचेस व्हायच्या तशा. अगदी तितकं कॅज्युअल नसलं तरी, आऊटलूक थोडा तसा वाटतो. मागे एका राजस्थान रॉयल वि. हैद्राबाद सामन्यात डेल स्टेन ने बाऊंड्री वर डाईव्ह करून बॉल अडवायचा प्रयत्न केला होता, तेव्हा एक ऑसी कॉमेंटेटर पटकन म्हणाला होता, की आयपीएल च्या मॅच मधे ईतकी रिस्क घ्यायची काय गरज आहे. बीसीसीआय हा धडा लवकर शिकले. सुदीप त्यागी, मनप्रीत गोनी, सौरभ तिवारी असे काही आयपीएल स्टार्स ईंडियन टीम मधे येऊन गेले. आयपीएल जवळ आली की परदेशी आजी-माजी खेळाडू भारतीय क्रिकेटपटूंचं कौतूक करण्यात रंगून जातात.
अर्थात हे सगळं असलं तरी एक क्रिकेट फॅन म्हणून माझी / आपली इन्व्हॉल्वमेंट तेव्हढीच असते, हे सुद्धा खरय. हे थोडसं लेफ्ट ब्रेन - राईट ब्रेन सारखं आहे. तेव्हा आता लेफ्ट ब्रेन बाजूला ठेवून, आजच्या कोलकता - गुजराथ मॅच विषयी चर्चा होऊन जाऊ द्या. कोलकता ने टॉस जिंकून बॉलिंग घेतलीये. कोलकता ने प्रामुख्याने (चारपैकी तीन) परदेशी खेळाडू बॉलर्स खेळवले आहेत, तर गुजराथ ने चारही बॅट्समेन.
नुसत्या नावावरून KKR ची
नुसत्या नावावरून KKR ची बॉलिंग सॉलिड वाटतेय. नरिन बदललेल्या अॅक्शन नंतर कमी मिस्टीरियस वाटतो. रैना फ्लोव मधे वाटायला लागलाय.
गंभीर बॉलिंग चेंजेस मस्त करतो राव.
फे फे तू म्हणतोस पण एकंडर IPL
फे फे तू म्हणतोस पण एकंडर IPL मधली fielding level जास्त चांगली असते असे वाटते बघताना, विशेषतः परदेशी खेळाडूंची आजच्या बोल्ट चा सेव्ह बघितला का ?
फे फे तू म्हणतोस पण एकंडर IPL
फे फे तू म्हणतोस पण एकंडर IPL मधली fielding level जास्त चांगली असते असे वाटते बघताना, विशेषतः परदेशी खेळाडूंची आजच्या बोल्ट चा सेव्ह बघितला का ? >> अगदी सहमत. बॅटींग पिचेस असल्याने खूप टाईट होतात मॅचेस, त्यामुळे खूप महत्व आहे फिल्डींगला. काल पोलार्डचा कॅचपण सुंदर पकडला.
मला उलट बायलॅटरल वन-डे आणि टी-२० सिरीजचा कंटेक्स्ट फार नसेल, तर मजा येत नाही. उदाहरणार्थ, न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका ह्यांच्यातल्या टेस्ट्स मी फॉलो करतो अॅट सम लेव्हल, पण वन-डेमध्ये आणि टी-२० मध्ये काही फार रस वाटत नाही. फार रीमूव्हड फ्रॉम होम.
कितीही म्हटले तरी IPL मधली
कितीही म्हटले तरी IPL मधली कामगिरी हा भारतीय टीममधे येण्याचा शॉर्ट कट झालेला आहे त्यामूळे भारतीय खेळाडूंपुरते तरी त्याला मह्त्व आहे. त्यातले जे मूळातच चांगले फिल्डर्स आहेत ते चांअगलीच फिल्डींग करतात. जे नाहित ते सुधारण्यचा प्रयत्न करतात असे वाटते. पण त्यातले वाईटातले वाईट सुद्धा दहाएक वर्षांपूर्वीच्या अपवादात्मक भारतीय फिल्डर्स पेक्षा + कॅटेगरी मधे आहेत असे म्हणू शकतो.
कालच्या मॅचबद्दल केदार म्हणतो त्यात माझ्यापुरती सुधारणा अशी कि दोन्ही संघांची बॉलिंग up to the mark नव्ह्ती.
असामी, बोल्ट चा सेव्ह बघितला.
असामी, बोल्ट चा सेव्ह बघितला. अप्रतिम होता. किंबहूना, मी दिलेल्या उदाहरणात डेल स्टेन ने चांगलीच फिल्डींग केली होती. ती कॉमेंट कॉमेंटेटर ची होती. त्यांचा दृष्टीकोन, 'हे मनोरंजनात्मक क्रिकेट आहे' असा होता, खेळाडूंचा नाही.
"कितीही म्हटले तरी IPL मधली कामगिरी हा भारतीय टीममधे येण्याचा शॉर्ट कट झालेला आहे " - माझं मत गेल्या काही वर्षात थोडं वेगळं झालय ह्या बाबतीत. मला वाटतं की सुरूवातीला तसं झालं पण नंतर, नवीन खेळाडूंच्या बाबतीत तरी डॉमेस्टीक क्रिकेट, ए टीम्स बरोबर खेळलं गेलेलं क्रिकेट हा निवडीचा निकष बनतोय, जे चांगलं आहे. कमबॅक करणार्या खेळाडूंच्या बाबतीत, त्यांचा फॉर्म तपासण्यासाठी आयपीएल चा उपयोग होतोय हे खरय.
KKR ने दिवाळी साजरी केली
KKR ने दिवाळी साजरी केली
क्रीस काय खाऊन उतरला? देव जाणे
काय बघतो आहे मी हे?! :डोळे
काय बघतो आहे मी हे?! :डोळे चोळणारा बाहुला:
बिग बॅशमध्ये सुद्धा त्याचे २
बिग बॅशमध्ये सुद्धा त्याचे २-३ अगदी शतकाच्या जवळ जाणारे स्कोअर होते.... माझा कलीग (जो बिग बॅश खुप क्लोजली फॉलो करत होता) सांगत होता त्याला घे फॅंटसी टीममध्ये म्हणून.... आमचा अतिशहाणपणा नडला.... त्याला तर घेतले नाहीच पण उथाप्पाला power player करुन बसलो..... सगळे चेंजेस वाया.
कुलदीप यादवनेच काही पॉइंट्स दिले असतील तर असतील!
सेम
सेम
उत्तप्याला उतरायला मिळाले नाही
रैना व कार्तिक ने दिले पॉंन्टस
Pages