नमस्कार मंडळी,
एका फूड कंपनीसाठी लोगो डिझाइन करायचे काम माझ्याकडे आले आहे. गंमत अशी आहे की क्लायंटला नाव काय ठेवावे हेच गेले काही महिने सुचत नाहीये. ती व्यक्ती महिला उद्योजक आहे, सध्या घरगुती पातळीवर नाचणीचे पदार्थ व इतर तत्सम पदार्थ बनवून विकते. स्थानिक हॉटेल्स व कॅटरर्स तिचे नेहमीचे ग्राहक आहेत. तिने गेले चार-पाच वर्ष संशोधन करुन स्वतःचे असे काही पदार्थ शोधून काढले आहेत. ते तिला आता सामान्य रिटेल ग्राहकांपर्यंत घेऊन जायचे आहे. त्यासाठी एक चांगले, कॅची, लक्षात राहिल असे नाव हवे. मी गेले पंधरा-वीस दिवस शोधतोय पण झाले काय की अनेक जेनेरिक अशी नावे फूड-सेक्टर असल्याने आधीच घेतली गेली आहेत. भारतात ७० टक्क्यांच्या वर स्थानिक ब्रॅण्ड्सचाच धंदा असल्याने या क्षेत्रात ब्रॅण्डनेम आणि ट्रेडमार्क्सची भाऊगर्दी झाली आहे. अशात नवीन काहीतरी नाव शोधणे, ते आपल्या उत्पादनाशी जुळणे वगैरे दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे.
म्हणून मला वाटलं, चला आपण मायबोलीकरांची ब्रेनस्टॉर्मिंगसाठी मदत घेऊया काय...? तर मंडळी करणार काय मदत?
सदर कंपनी जे काही अन्नपदार्थ बनवते ते पूर्णपणे नैसर्गिक घटक वापरुन बनवते, कॄत्रिम रंग किंवा रसायने नाहीत. हे पदार्थ पचायला उत्तम व नेहमीच्या धान्यांपासून बनवलेली आहेत. मैदा वगैरे नाही. चविष्ट आणि आरोग्यास पोषक सर्व वयोगटातल्या व्यक्तींना खाता येण्यासारखे अशी ती उत्पादने आहेत.
नावे सुचत असल्यास नक्की कळवा... इंग्रजी, मराठी, संस्कृत कोणत्याही भाषेत चालतील.
खूप खूप धन्यवाद!
Indi food किंवा नुसतेच i-food
Indi food
किंवा नुसतेच
i-food
grainSmart or grainGenious
grainSmart or grainGenious
Nature's Best Taste It!
Nature's Best
Taste It!
Snack-IT Guilt-Free Foods
Snack-IT
Guilt-Free Foods
काहीकाही नावे मस्त आहेत.
काहीकाही नावे मस्त आहेत.
Namo Food Mela !!!
Namo Food Mela !!!
धन्यवाद मित्रांनो, आपण बरीच
धन्यवाद मित्रांनो, आपण बरीच मेहनत घेतलीत. मीही सुमारे शंभरेक नावे सुचवलीत. पण त्यांनी शेवटी स्वतःच एक नाव शोधून काढलंय ( जे मला अजिबात आवडलेलं नाही) पण कस्टमर इज राईट म्हणून त्यांचा लोगो डिझाइन करायला घेतोय.
आजवर नाव सुचवणार्या सर्वांना फूड हॅम्पर मिलेगा... भारतात राहणार्यांनी मला पत्ता पाठवा. (भारताबाहेर नाही पाठवू शकणार, सॉरी)
बावन्नकशी कस कसदार
बावन्नकशी
कस
कसदार
चवकस
चवकस
अरे वा ! सुटला का प्रश्न!
अरे वा ! सुटला का प्रश्न!
Pages