चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याहीपेक्षा क्युट नंतरच्या एपिसोड मधे आताच्या मालू आणि नानी त्या विड्याची चर्चा करताना दाखवल्यात. त्यात नानी अगदी कौतुकाने मालूला म्हणतात आता तुला हवा असेल ना तर मी देईन करून. मोलकरीण गेली सोडून तरी म्हणतात बोक्याला लाव कामाला. काम काय असतं त्याला. त्या टेण्याकडे जाऊन चकाट्या पिटतो नुस्ता Lol

स्नेहा फाटक>> नाही सायली फाटक.. फेबूवर Sayalee Phatak याच नावाने official अकाउंट आहे तिचं.
स्नेहा फाटक सर्च केलं तर हिची माहिती वगैरे येत नाही.

काल परवाच्या भागात टेण्या शिळ घालतो त्या मुली पंजाबी सुट घातलेल्या दाखवल्या आहेत. ती 'मंदा' सुध्दा पंजाबीमधे ते जरा खटकलं. ५० वर्षापुर्वी लग्नाळु मुली साड्या नेसत असत असं आईपण म्हणाली.

५० वर्षापुर्वी लग्नाळु मुली साड्या नेसत असत असं आईपण म्हणाली. >> बरोबर. तेव्हा कुठे पंजाबी ड्रेस घालत होत्या मुली ?

मला सुद्धा हे खटकलं.... आणि तशीही ती मंदाचं काम करणारी किती साधारण दिसायला आहे मुलगी! ...या सिरीयल मधे मुख्य पात्र वगळता...बाकी सगळेच अगदी मोस्ट ऑर्डीनरी कलाकार आहेत.. (बोक्याची मुलगी-जावई, मुलगा, शेजारची कुंदा -मंदा, ट्ण्या.....छ्या छ्या.......अगदीच बेकार!)

काही बाबतीत जुना काळ गंडलाच आहे. टेलिफोन तसच आत्ता १०१ वर्षाची बाई मोस्टली त्याकाळी नववारी नेसत होती, सुना बहुतेक पाचवारी नेसायला लागल्या होत्या पण सासूबाई नाही.

एनीवे बाकी मालिका सुरेख असल्याने ह्याकडे दुर्लक्ष करतेय मी. एरवी सर्वच गंडलेले असते.

अहो आंबट गोड ते ऑर्डिनरी लोकच आहेत. मला तरी स्टार व कलर्स वरच्या इंपॉसिबल नटलेल्या गोर्‍या बायकांपेक्षा हे बरे वाटते. जरा कऴक्ट साधे व आपल्यातले. तसला डिट्टो पानाचा डब्बा माझ्याआईकडे होता. बोक्या अन बायको आईच्या नजरेआड हळूच प्रेम करतात ते खूप छान वाट्ते. काय कैदाशीण सासू आहे.

काय कैदाशीण सासू आहे. >>> Happy . नाही हो अमा .
नानी कटकटी आहे , पण प्रेमळ आहे .
मालूशी कधी कधी प्रेमाने बोलते ती .

अहो आंबट गोड ते ऑर्डिनरी लोकच आहेत. मला तरी स्टार व कलर्स वरच्या इंपॉसिबल नटलेल्या गोर्‍या बायकांपेक्षा हे बरे वाटते. जरा कऴक्ट साधे व आपल्यातले. >>> आण्मोदन Happy

५० वर्षापुर्वी लग्नाळु मुली साड्या नेसत असत >> ह पन्नास वर्षापुर्वीचा काल्पनिक काळ असे म्हणून सोडून द्या.
अहो आंबट गोड ते ऑर्डिनरी लोकच आहेत. मला तरी स्टार व कलर्स वरच्या इंपॉसिबल नटलेल्या गोर्‍या बायकांपेक्षा हे बरे वाटते. जरा कऴक्ट साधे व आपल्यातले. >>+१

अजुन एक, घरी फोन आहे तरी मालुची माहेरची माणसे सारखी पत्रेच पाठवतात. मालु माहेरी जायला निघाली तेव्हा नानी म्हणाल्या पोचल्यावर पत्र पाठव. पण सिरिअल मस्त आहे. हीच नेमकी बंद करतील बघा लवकर झीवाले.

आजच्या भागात बोक्याची बहीण म्हणते तू असा गबाळ्यासारखा राहतोस म्हणून. अशनी माझ्या सासरची माणसं माझ्या तोंडात शेण घालतील तेव्हा बोक्या म्हणतो " हो तुझी सासरची माणसं बसलीच आहेत हातात गोबर घेऊन दिसली कि घाल शेण तोंडात . दिसली कि घाल शेण तोंडात " Lol

भारी होता कालचा एपिसोड . धमाल आणत आहेत सगळेच. काळ व कपडेपट बदलावा त्यांनी. सरळ आमची चुक झाली. नानी ७५-८० व बोक्या सुन ६०-६५ करुन टाका. पूर्वी लग्न लवकर मुल लवकर त्यामुळे नानी ८० बोक्या ६० चालुन जाईल.

ते आज्जीचे जाम आवडले. आता ह्या वयात स्वभाव बदलून काय सोयरीक करायची आहे कि काय मला?! अगदी अगदी झाले. तिला मिठी मारून तो स्वेटर व्हिक्स, व वयाचा एकत्रित वास घ्यावा असे फार वाटले. नळी एकदम यडचाप आहे. आणि बोक्या कसा सुर्र कन पळून जातो.
टेण्या मंदाला चिकणी म्हणतो. आय वॉज लाफिंग थ्रू अँड थ्रू. मी सर्व एपिसोड एकदम कडबोळे पुढे मागे असे बघते. त्यामुळे परीक्षण पण एकदमच.

तरूणपणीच्या बोक्या आणि मालू च्या कास्टिंग साठी १०० मार्क्स! नानी तर अफाट आहे !! कचाकचा भांडायचा एक चान्स सोडत नाही !!

Pages