आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रेयस अय्यर सुद्धा पहिले १-२ आठवडे कांजिण्या झाल्यामुळे बाहेर. दिल्ली आणी बंगळूरू च्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही संपायची चिन्ह नाहीत.

खर तर चांगलेच आहे. bench strength काय आहे तेही कळेल नि मेन प्लेयर्स नंतरच्या भागात येतील जेंव्हा खरी गरज असते.

मी MI कडे कुतूहलाने बघतो आहे. बहुतेक जण मोठ्या break नंतर खेळणार आहेत. जर ते क्लिक झाले तर पेपरवर तरी जबरदस्त संघ ठरतो. त्यांनी जॉह्न्सनला आणून २०१५ चा विजयी फॉर्मुला परत वापरायचे ठरवलेले दिसतेय. Champions Trophy साठी रोहित नि रैना परत फॉर्ममधे येवोत अशी आशा धरूया.

अय्यरच्या ऐवजी आदित्य तरे किंवा अंकित बावणेला चान्स मिळेल

MI कागदावर तरी खरच चांगला आहे
पांड्या ब्रदर्सने MI ला बरेच बॅलन्स केलय आणि दोघेही T20 साठी आयडीयल आहेत
डेथ ओव्हर्समध्ये एका बाजूने मलिंगा आणि दुसऱ्या बाजूने बुमराह टाकत असताना स्लॉग करणे फार अवघड जाणार आहे समोरच्या संघाला!

अय्यर च्या जागी फर्स्ट चॉईस तरे असेल असं वाटतं.

मुंबई चा संघ चांगला आहे. बुमराह-मलिंगा जोडी ला मारणं आघड आहे. पंड्या ब्रदर्स खूप व्हॅल्यूएबल आहेत.

फायनली, ईशांत शर्मा चं मीटर डाऊन झालं. सेहवाग ने पर्सनल रिलेशनशिप चा हवाला देत त्याला पंजाब च्या टीम मधे घेतलं. अर्थात पंजाब कडे फास्ट बॉलर ची काही फार मोठी खाण नाहीये, त्यामुळे वासरात लंगडी गाय होण्याचा संभव आहे.

>>पंजाब कडे फास्ट बॉलर ची काही फार मोठी खाण नाहीये, त्यामुळे वासरात लंगडी गाय होण्याचा संभव आहे

मोहीत शर्मा, संदीप शर्मा, अनुरीत सिंग, टी नटराजन, वरुण अरॉन, मॅट हेन्री आणि सॅमी असताना इशांत शर्माला कशाला कोणी खेळवेल?
आता सहवागने पर्सनल वजन टाकून त्याला घेतलाय त्यामुळे जबरदस्ती प्लेयींग इलेव्हनमध्ये असू शकतो
पण मुरली विजयची रिप्लेसमेंट म्हणून इशांत शर्मा म्हणजे काहीच्या काही आहे!

येस्स! सरसावून बसलोय

अनिकेत चौधरी आणि रशिद खान ला खेळताना बघायची उत्सुकता आहे!

अनिकेत चौधरी आणि रशिद खान - दोघांमधेही एक्स फॅक्टर आहे. एक लेफ्ट आर्म फास्ट आणी दुसरा रिस्ट स्पिनर. दोघांनाही खेळणं अवघड जातं. प्रेशर कसं हँडल करतात त्यावर सगळं अवलंबून आहे.

या आयपीएल चा
पहिला बॉल खेळला :- वॉर्नर
पहिला फॉर मारला :- वॉर्नर
पहिला नो बॉल मिळाला :- वॉर्नर
पहिला सिक्स मारला :- वॉर्नर
पहिला विकेट गेला :- वॉर्नर

दिवसभरातला ताण, तणाव, थकवा, स्ट्रेस सगळ्याला टाटा बाय बाय. जिंको कोणीही डोळ्याचा पारणं फेडल राव युवी ने वेलकम टू IPL १०

मनदी[ चे मिड विकेट मधून मारलेले शॉट्स एकदम वेगळेच आहेत. असे बघितले नाहि कोणाला मारताना.

हूडा ने क्रीजच्या मागे जाऊन मारलेला शॉट केव्हढा विचित्र प्रकार होता.

अपेक्षित निकाल!

वॉटसन एकदम ढीला कॅप्टन आहे राव! २००+ स्कोअर होत असताना दिसत असूनही काही व्युव्हरचनाच नाही या माणसाकडे... शिवाय स्वतः बॉलिंग घेवून पोत्याने रन्स दिल्या
आता कोहली, एबीडी मंडळी येतील तेंव्हाच खरे!....
बिन्नी, बेबी वगैरे लोक प्रेशरखाली टिकतील असे वाटत नाही.
अनिकेत चौधरीला मार पडला तरी त्याची बॉलींग मला भारी वाटली याउलट रशीद खानला विकेट्स मिळाल्या असल्या तरी त्याच्यामध्ये फार काही विशेष वाटले नाही.
एकंदरीत RCB ची बॉलींग मागच्या पानावरुन पुढे टाइप्सनेच चालू आहे.
हैद्राबादने मात्र सगळ्या आघाड्यांवर सरस कामगिरी केली

RCB ला fielding practice ची भारी गरज आहे. सगळे कॅचेस पकडते तर १५० वगैरे चेस करायला लागले असते. चहल ला मानला पाहिजे राव. गेलच्या सिक्स भारीच प्रचंड होत्या, अगदी गेल च्या मानानेही. युवी आज जसा खेळला तसा Champions Trophy मधे खेळो राव. आपण हरणे अशक्य आहे मग. युवी ने मिल्सला केलेला पुल कम हुक एकदम उच्च होता. धवन ला सुद्धा सूर गवसतोय असे वाटट होते. नीट पुल करायला लागलाय परत. तो मिल्स back of hand ने short ball किती सहज टाकतो, काहीच्या काही.

ईंटरेस्टींग टीम सिलेक्शन. हरभजन सिंग (मुंबई) आणी फाफ ड्यू प्लेसिस (पुणे) बाहेर. विकेट फास्ट / स्विंग बॉलिंग ला साथ देणार असं वाटतय.

बटलर वेडा आहे पार हे मझे मत आज परत ठाम झाले. तो रॅम्प हिट दिवसेंदिवस अजून amazing होत चाललाय.

भाऊ बघताय का ?

तो S Ravi हुकलाय राव. बटलर ची inside edge मला buffer होणार्‍या streaming video मधे तेही फोनच्या दिसली नी त्याला दिसली नाही ?

"तो S Ravi हुकलाय राव. " - sad part हा आहे की तो ईंडियाचा एकमेव एलिट पॅनेल मधला अंपायर आहे. Sad

रवी अजून उगावला नाहिये बहुतेक. पुण्याची स्ट्रेटेजी साधी आहे. बाउन्सी विकेट नि दोन चांगले लेग स्पिनर्स. बाहेर खेळताना काय करणार ?

बाउन्स असल्यामूळे मॅक्लेशान पेटलेला असेल आज. पुण्याच्या पिचवर खेळू शकणार्‍या प्रत्येक भारतीय खेळाडूला ऑसी दौर्‍यावर घेऊन जायचे Happy

Pages