तो आणि ती
( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती )
ती :- हेल्लो कुठे आहेस तू ?? आणि किती वेळ
तो :- अग येतोय गं ५ मिनिटांत जाम ट्राफिक आहे
ती:- नेहमीची कारण मला नाही लागला ते ट्राफिक मी पण त्याच रोडवरुन आले ना ?? आर्धा तास झाला तुझी ५ मिनिटं काही संपत नाहीये येतो येतो सांगतोयस माझा पुतळा झालाय इकडे.
तो :- तुझं नेहमीच आहे हे वेळेच्या आधी येतेसच कशाला ?? आपलं ठरलेल ना ६ वाजता भेटायचं मग तू ५:४५ ला का आलीस ?? हे बरा आहे स्वतः लवाकर यायच आणि मग मी वेळेत आलो तरी दंगा करायचा मी नेहमीच कसा उशीरा येतो आणि आॕल.
ती :- राजे घड्याळ बघा जरा ६:२५ झालेत आता म्हणशील खरच ६:२५ झालेत ?? आयला माझं घड्याळ बंद पडलय नाहीतर माझं घड्याळच हरवलय आणि घरातील घड्याळ मागे आहे कारण बरी मिळतात तुला. ताई बरोबरच बोलते आॕल बाॕईस आर सेम..
तो :- आई शपथ १ दिवस लवकर नाही आलीस तर तुझी किरकिर चालू आणि मी थांबायचो ते ?? स्टेशन वर कॉलेजवर चांगले २ तास तेव्हा मी बोलायचो का काही ??
ती :- थांबायचास म्हणजे उपकार न्हवतास करत लगेच ऐकवायची काय गरज आहे का ??
तो :- ये आता बस कर भेटल्यावर भांडू राहिलेलं. पार्किंगला जागा शोधतोय तू दिसलीस मला अलोच मी ठेव आता फोन.
ती :- हे हाय डबल काँग्रेट्स मला तुला कधीपासून भेटायचं होतं माहितीय काय मिळालं तुला प्राईस ट्राॕफी ? सांग ना ?
तो :- कसली आहेस ग तू ?? आत्ता थोड्या वेळापूर्वी आग ओकत होतीस आणि २ मिनिटांत तुझा मुड आसा ?? मला अस वाटलं की मी दुसऱ्या च कोणाशी बोलत होतो की काय फोनवर.
ती :- आहे का कोणी दुसरी ?? सांगून टाक असेल तर हा हा हा.
तो :- या फिरुन माझ्याकडे भलाईचा जमानाच नाही राहिलाय.
ती :- हे हे बिचारा बर बर नाहीये हा दुसरं कोणी आता खुश ??
तो :- हम्म.. ते जाऊदे मला एक bat भेटलीय आॕटोग्राफड बाय दादा म्हणजे सौरव गांगुली. कसली खतरानाक मॕच झाली माहितीय पूर्ण काॕलेज ओळखू लागलय आता मला. ट्राॕफी पण भेटलीय पण ती इतकी मॕटर करत नाही फेम मॕटरस.
ती :- सही ना.. सगळे ओळखणारच मोस्ट हार्डवर्किंग प्लेयर आहेस अॕलोंग विथ बेस्ट प्लेयर इन टुरणामेंट. मजा आहे बाबा एका मुलाची.
तो :- हम्म मी असला खतरनाक खूष होतो माहीतेय.
ती :- माझी आठवण पण आली नाही ना ?? कशाला येईल ?? मी कोण ??
तो :- ये च्या आयला रड तू कायम आठवण आली म्हणूनच मॕच संपल्या संपल्या फोन केला तुला घरी करायच्या आधी
ती :- हो ना माहितीय मला पेटतोस काय लगेच
तो :- अरे पेटतो म्हणजे काय तू बोलतेसच असं मला अस तुझ्या सारखं ५० वेळा बोलून दाखवता येत नाही मिस यू लव यू पण माझ्या वागण्यातून दाखवतो ना मी?? आता ते तुला ते कळत नाही त्याला मी काय करू ??
ती :- वाहा म्हणजे मी खोटं खोटं बोलते आणि वागण्यातून माझ्या काही दिसतच नाही अस म्हणायचंय ना तुला ??
तो :- तस नाही गं आता जरा निट बोलूया का माझी आई ?? एकतर विंकेंड ला भेटायला मिळत फक्त आणि तू नाही साॕरी आपण भांडत बसलोय जाऊ दे ना. चल लाँंग ड्राइव ला जाऊ का??
ती :- आधी मला पार्टी दे.
तो :- आलीस पार्टी वर ?? वाटलच मला पार्टी मागणार तू . भुक्कड नुसती .
तो :- हो! आहे मी भुक्कड आणि फुकटी पण आहे असू दे. मला पार्टी दे म्हणजे झालं बाकी काहीही म्हण हे हे हे...
तो :- हम्म ती तर देणारच आहे आणि मला माहितीय तू कसली खाणार ?? चिमणी पण जास्त दाणे खात असेल तुझ्या पेक्षा .
ती :- गप्प बस. मला आता साॕलिड भूक लागलीय आणि मी जाम खाणार आहे
तो :- फक्त जाम ?? ब्रेड जाम तरी खा.
ती :- तुझे फालतू जोक तुझ्याकडेच ठेव. नेहमीच्या ठिकाणीच जाऊया चल. मला चाट आणि सँडविच दोन्ही हवय.
तो :- चक्क ice-cream नकोय ??
ती :- अरे हा नॕचरल्स चं
तो :- कोकोनट माहितीय मला तेच खाते नेहमी चिमणी.
ती :- तूच असशील
तो :- मी कस काय ...
ती :- आता आजून एक फालतू जोक मारलास तर मी घरी निघून जाईन मग बस वरडत.
तो :- हे हे हे भडकली लगेच. हे घे विसरलो द्यायला आल्या आल्या.
ती :- ये यम्मी chocolate!! थँक्स तू की नाही जाम गोड गोड आहेस.
तो :- हम्म आता लगेच गोड झालो मी. आणि शी गोड बिड काय म्हणतेस. किती वेळा सांगितलय तुला मी, कॉल मी मि. कूल एम एस धोनी सारखं .
ती : हे हे हे बरं बरं अँड हँडसम टू चल आता खूप पकवलस. मला भूक लागलीय रे
तो:- ठीक आहे चल पटकन खायला जाऊया.
तीनदा झाली हो आता...
तीनदा झाली हो आता...
(No subject)
व्वा !!खूपच मस्त..खूप आवडलं
व्वा !!खूपच मस्त..खूप आवडलं संभाषण...
त्यांचं भांडण आणि प्रेम दोन्हीही मस्त जमलंय...
खूपच बोर झालं होत हे वाचून मूड चेन्ज झाला...थँक यू...
पु.ले.शु...
मी जिथे प्रतिसाद दिला ते काढून टाकलं ...आता इथे परत द्यावं लागलं...
कावेरीजी प्रतिक्रिया बद्दल
कावेरीजी प्रतिक्रिया बद्दल खूप खूप आभार .
चिमणराव धन्यवाद
चिमणराव धन्यवाद
अजुन एक्दा येओ द्या...
अजुन एक्दा येओ द्या...
च्रप्सजी अजून काय येऊ द्या ??
च्रप्सजी अजून काय येऊ द्या ?? प्रतिक्रिया बद्दल खूप खूप आभार .
एक हलकी - फुलकी मस्त कथा..!!!
एक हलकी - फुलकी मस्त कथा..!!! आवड्ली...!!! तुमच्या पुढील लेखनास माझ्याकडुन भरभरुन शुभेछा...!!
Abdul Hamid सर धन्यवाद..!
Abdul Hamid सर धन्यवाद..!
जमलीये. मजा आली वाचून.
जमलीये. मजा आली वाचून.
धन्यवाद काकेपांदा
धन्यवाद काकेपांदा
एक हलकी - फुलकी मस्त कथा..!!!
एक हलकी - फुलकी मस्त कथा..!!! आवड्ली...!!! जमलीय आजून काही येऊ देत . पु.ले.शु.
धन्यवाद Ssshhekhar...
धन्यवाद Ssshhekhar...
आवडली कथा.
आवडली कथा.
धन्यवाद अशिषजी..
धन्यवाद अशिषजी..
जमलीय अकडली कथा
जमलीय!! आवडली कथा
आवडलं लिहीलेलं...
आवडलं लिहीलेलं...
थँक्स ब्रो राहुल धन्यवाद..
थँक्स ब्रो
राहुल धन्यवाद..
छानेय
छानेय
तुमचे ते रेंजवाले ललित खुप आवडले होते, ते परत वाचण्यासाठी शोधत होते तर हे सापडले.
भारी जमलय मस्त
भारी जमलय मस्त
हे पण मस्तंय..
हे पण मस्तंय..
छान आहे...
छान आहे...
Vb, पंडितजी, सयुरी, पवनपरी
Vb, पंडितजी, सयुरी, पवनपरी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
Rofl
सॉलिड आहे तो पण आणि ती पण