बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीस्कूल मध्ये "International week" चालू आहे सध्या...मी त्या साठी भारता विषयी ची माहीती आणि काही snacks द्यायचा विचार करतेय...
३ रन्गाचे jaam sandwitch (flag) सारखे, Pretzels sticks लावून.... ग्रीन रन्गासाठी काय लावावे ते कळत नाहि..जेणे करून सगळे (अमेरिकन) मुले खातील....
केशरी रन्गा साठी apricot jam , white = bread असा विचार करतेय....हिरव्या रन्गाचे काही सुचेना....आपली मिन्ट चटणी अमेरिकन मुले खाणार नाहीत असे वाटतेय (वय वर्ष्रे)

अवा काडो mash करून लावु का ? शक्यातो रात्रीच बनवून ठेवायचे आहेत , सकाळी वेळ नाही मिळणार...१६ मुले आहेत...
८ sandwitch तरी करावे लागतील, हाफ कापून देता येतील..
बेसील पेस्तो लावला तर ग्रीन साठी ? जाम सोबत चान्गला लागेल का ?

बेसील पेस्तो जॅम सोबत बेकार लागेल. जॅमसोबत अवाकाडोही फार चांगला लागणार नाही. जॅमएवजी केचप वापरता येईल का? केचप, अवाकाडो (ग्वाकामोले) आणि काकडीच्या चकत्या छान लागेल. भरपुर बटर लावा, मुलांना आवडते (किंवा चीज).

केचप , चीज आणि थोडी कोथिंबीरीची चटणी असेही चालेल. अवाकाडो आदल्या दिवशी करून ठेवले तर काळे पडू शकते.

केचप + चीझ + ग्वाकामोले असे sandwitch रात्रीच करून फ्रीज मध्ये
ठेवले, तर सकाळी १० वाजता मऊ / काळे नाही ना पडणार ?? Uhoh

बेसिल पेस्तोने रंग छान हिरवा येईल. पण मग केचप किंवा टोमॅटॉ स्लाइसेस आणी चीज स्लाइसेस वापरले तर चांगली चव येईल. ग्वाकमोले काळा पडु नये म्हणुन लिंबु पिळावे किंवा अवाकाडोचे पीट (बी) मिश्रणात ठेवावे. जॅमच वापरायचा असेल तर ग्रीन जेलीशिवाय पर्याय सुचत नाहीए.

इतक काँप्लिकेटेड करु नका. Happy प्री स्कुलच्या मुलांना नाही कळणार एवढं.
भारताची माहिती . शक्यतो भारतीय पोषाखातल्या/राजस्थानी बाहुला/बाहुली ,भातुकलीचा सेट, मेहंदीचा एखादा टाटु, साडी, लहान मुलांचा/मुलींचा ट्रॅडीशनल ड्रेस , भारताचा झेंडा, टिकली, बांगड्या, लाकडी किंवा पितळेच्या छोट्या वस्तु ,आजी आजोबांचा भारतीय पोषाखातला फोटो,दिवाळीची पणती यापैकी काहीही घेवून जाता येईल. मुलांना फार आवडत बघायला हे सगळं.
रंगिबेरंगी (पाईप किंवा स्टार शेप असलेले) सांडगे मिळतात. ते तळून नेले तर मुलांना आवडतात. घरचे सांडगे पण रंगिबेरंगी असतील तर नेता येईल. (अगदी घरचच करून न्यायच असेल तर ईडली किंवा लाडू. खुप कठीण आहे ते ही खाणं. Happy किंवा बटाट्याची शेव विकतची. )
अ‍ॅलर्जी आणि शाळेच्या होम मेड पदार्थाविषयीच्या पॉलिसी पण लक्षात घ्या. खाण्यामध्ये मुलांना फारसा इंटरेस्ट नसतो तसाही. त्यापेक्षा वस्तू वगैरे पहायला आवडतं.

सीमा, खूप छान आयडीया दिल्यात....माझ्याकडे खेळण्यातला पोळ्पाट-लाटणे आहे, पणती आहे, ते पाठवतेय...
मी एक प्रेझेन्टेशन केले आहे, त्याच्या कलर प्रिन्ट्स देते...
ग्रीन जेली मिळालि तर sandwitch चे ही बघते जमले तर...
धन्यवाद सगळ्याना !

रान्गोळी असेल तर एका ट्रे मधे रन्गोळी काढुन दाखवता येइल, construction पेपर चे आकाशकन्दिल एक्दम सोपे आहे करायला, त्यावर ग्लिटर ग्लु लावुन डेकोरेट करायच, (आम्ही २ मै त्रीणी ने सगळा फराळ पॅक करुन नुसता दाखवायला नेला होता, )अ‍ॅलर्जि मुळे कुठलही फुड आणता येणार नव्हत, मग सान्गितलेले चिझ क्रॅकर नेले होते, पणत्या नेवुन त्यात इलेक्टिक टिलाइट लावले होते, एक दिवाळिच्या स्टोरीच पुस्तक नेवुन त्यातल्या झेपेल अशी स्टॉरी सान्गितली होती.

You can try tricolour chirote. Original recipe on ma.dhuras recipes . I agree with seema though. Tricolour pasta is also possible.

वरती शाळेसाठी,गोड सँडवच मध्ये, ऑरेंज जॅम, आणि किवी जॅम मस्त लागतो.

लहान मुले अवाकडो खात नाही सहसा हा माझा अनुभव आहे.
आणि स्पिनच पासून लांब पळतात.

रात्रीपासून बनवून सॉगी होणार नक्कीच. त्यापेक्षा इडली बरे तीन रंगाचे.

मिनी इडली बनवायची तीन रंगाची, आणि टूथेपिकला लावून द्यायची, बाजूला सॉसची चपटी डबी जी बाजारात मिळते.

 थोडी मदत करा प्लीज..गणपतीच्या प्रसादासाठी ४० मोठी माणसे आणि १७ मुले बोलवायची आहेत. सोपी म्हणून साबुदाण्याची खिचडी, मलई बर्फीचे मोदक आणि दही असा बेत करायचा आहे. तर खिचडीसाठी लागणार्‍या सामनाचा अंदाज द्या प्लीज. आणि ह्या मेनूबरोबर ते अ‍ॅपल सॉसचे पन्हे चांगले लागेल का? त्याचा पण अंदाज द्या.
धन्यवाद!

तीन किलो साबुदाण्याची खिचडी लागेल माझ्यामते . त्यात 15/17 नॉर्मल आकाराचे बटाटे घालावे लागतील . दोन किलो दाण्याचं कूट लागेल . एवढी खिचडी एकदम न करता दोन तीन लॉट मध्ये केली तर गरम मिळेल सगळ्यांना . कारण खिचडी गार नाही चांगली लागत .
चार लिटर दुध लागेल दह्या साठी . सेपरेट वाट्यात लावून ते 7/8 तास फ्रीज मध्ये ठेवलं तर मस्त घट्ट सेट होईल . दह्यावर एक चिमूट तिखट आणि एखादं कोथिंबीरीच पान
ठेवलं तर मस्त सजावट ही होईल .
हा अंदाज मी खिचडी एकदाच वाढायची आहे असं समजून दिला आहे .

दोन दोन जिलेबी, मसाले भात एक मूद, रायते दोन तीन पुरी, व्हेज कुर्मा/ सुंडल टाइप उसळ/ फ्लावर ब टाटा भाजी व मसाल्याचे ताक ग्लासात. पण डिस्पोझेबल थर्मोकोल प्लेट मध्ये जेवण देणार असल्यास नीट डिस्पोज ऑफ करा.

संध्याकाळी आहे त्यामुळे जिलेबी,बटाटेवडा त्याबरोबर काय द्यायचे कारण डिश द्यायची आहे.

जिल्बी च हवी आहे का?

पावसाळ्या मध्ये , गरम दोन मूगडाळ कचोरी- तिखट गोड चटणी, उपमा मूद.
मग दुसर्‍या रॉउंड्ला गोड प्लेटीत एक गरम शीरा/गजर हलवा नाहीतर फक्त गुजा ,चहा कॉफी हवीच.
नवरत्री आहे तर, साबुदाणा वडेचटणी सुद्धा. साखरपुडा ४ - ७ पर्यंत आट्पत असेल तर.

जेवण ठेवायचे असेल आणि उशीरापर्यंत प्रोगृअ‍ॅम असेल तर,
हॉलवर आल्यावर , फक्त इडली- चटणी, कॉफी-चहा, मोतीचूर लाडु
मग जेवायला: मभा, कुर्मा भाजी, वरण-भात( लहान मुले कोणाची असत तर) चटणी, पापड , रायता, लोण्चे, मूगाचा हलवा

जिलेबी बटा टे वडा दोन्ही फ्राइड व हेवी आहे. >>> खरेतर हे दोन्ही खरचं हेवी आहे, पण लोकांना असेच आवडते मोस्टली .

हवेतर समोसा, जिलेबी अन एखादे कोल्ड ड्रींक ठेवु शकता

जिलेबीचा आग्रह का पण? नाहीतर गुलाबजाम, दहीवडे व आलूपराठे असं ही काँबिनेशन मस्त होईल....अथवा पाव- भाजी, दही बुत्ती व जिलेबी (!) किंवा रगडा पॅटीस, समोसा व जिलेबी!

जिलेबी म्हटल की मला मठ्ठाच आठवतो. माझ्या मोठ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही जिलेबी मठ्ठा ठेवला होता.

Pages