निसर्गसेवक मित्र

Submitted by सेन्साय on 26 March, 2017 - 13:46

पर्यावरण हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे..... त्यावर निसर्गातील सहजीवन जीवन अवलंबून आहे..... आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे सर्वच बाबीत समतोल बिघडत चालला आहे व त्याचे परिणाम सर्वत्र जाणवू लागले आहेत.... त्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण संवर्धनाचे पर्याय निवडले पाहिजेत, हे तर सर्वच सुजाण नागरिकांना पटत असते मात्र नकी काय करायचे ह्याची माहिती व शास्त्र शुद्ध ज्ञान बरेचदा नसते. इच्छा शक्ती उत्तम असली तरी योग्य माहितीच्या अभावाने उचित कार्य घडत नाही व हताश उद्गार काढून हे विषय काळाच्या ओघात विस्मरणात जातात. ह्यासाठी आधी निसर्गाच्याच आपल्या छोट्या मित्रांची थोडी ओळख करून घेवूया.

compost-worms.jpg

'गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे' हे वाक्य वाचून आणि विसरून बरीच वर्षे झाली Happy . गांडुळांमुळे शेतजमिनीची मशागत होते, इतकेच शालेय अभ्यासक्रमात होते. त्यानंतर गांडुळांचा संबंध आला तो अकरावी-बारावीच्या वेळी डिसेक्शनसाठी . त्यावेळीही हा ओला, लिबलिबीत प्राणी हाताळताना आलेली किळसच अधिक लक्षात आहे. गांडुळे ही दिसायला किळसवाणी दिसत असली तरी त्यांचे अदृष्य कार्य बरेच मोठे आहे. येथे मुख्य काम गांडूळ करत असले तरी विघटनासाठी अनेक सुक्ष्म जीव आपली बहुमोल कामगिरी बजावत असतात.

पर्यावरणाचा ऱ्हास मुख्यत: कचऱ्याच्या अव्यवस्थापनातून निर्माण होतो. ह्यातील ओला कचरा आपण सुनियोजित रित्या वापरला तर त्याच्या विघटना पासून अतिशय चांगल्या प्रकारची खते निर्माण करून आपण अंशत: वसुंधरेच्या ऋणातून नक्कीच मुक्त होऊ शकतो. ही खते पूर्णत: सेंद्रिय पद्धतीची असल्याने मानवी आरोग्य व पर्यावरण दोन्हीसाठीही अजिबात हानिकारक नसतात.

उपलब्ध जागा व इतर साधन सामुग्री प्रमाणे आपण ह्याचा विनियोग खालील पद्धतींद्वारे करु शकतो.

(अ) कुजणारे पदार्थ:
पालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ.

(ब) न कुजणारे पदार्थ:
यात दोन उपगट केले जातात.

ब-1 : पुनर्वापरासाठी/प्रक्रियाशील -
यात प्लास्टिक, कागद, काच, कपडा, लोखंड, रबर इ. वस्तू येतात. म्हणजेच हा माल 'भंगार' म्हणून विकता येईल.

ब-2 : अप्रक्रियाशील :
थर्मोकोल, टेट्रापॅक, पाण्याच्या बाटल्या इ. हा भाग फार कोणी विकत घेत नाही.

ह्यातील "अ" भाग आपल्या उपयोगाचा आणि आपल्या ह्या छोट्या मित्रांच्याही कामाचा आहे. ह्याकामासाठी निसर्गदेवतेने आपल्या मदतीसाठी कितीतरी दोस्त मंडळींची फौजच दिमतीला ठेवल्याचे दिसून येते. निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर होतो.

diversity-05-00581-g001-1024.png

आपल्या बाल्कनीत रोपांना असे जैविक / सेंद्रिय खत घालण्याचा फायदा तर आपण जाणला , आता अजून कोण कोण आपल्या मदतीसाठी निसर्गदेवतेने पाठवले आहे तेसुद्धा पाहूया.

1200px-Coccinella_magnifica01_0.jpg

लेडीबर्ड बीटल हा आपला मित्र कीटक आहे जो अफीड्स, मिलीबग्स, माईट्स अख्या उपद्रवी कीटकांसह इतर अनेक छोट्या कीटकांना आणि त्यांच्या अंड्याना फस्त करून आपल्या झाडाचे रक्षण करतो. ह्यासारखे अजूनही काही बग्ज जसे पायरेट बग सारखे कीटक आपल्या उपयोगाचे असतात. अजून एक महत्वाचा मित्र म्हणजे कोळी. घरात दिसल्यावर आपण ह्याला उपद्रवी म्हणून मारत असतो पण हा आपल्या मित्र कीटकांच्याच यादीतील एक महत्वाचं दोस्त आहे जो आपल्या झाडांवरील अनेक उपद्रवी किडींचा सहजगत्या बंदोबस्त करत असतो.

d28d0a3b6d4fae558e4b780db2bfc514.jpg

प्रेयिंग मॅंटिस म्हणजे नाकतोडा सदृश हा मित्र छोट्या सर्वच कीटकांवर ताव मारत असतो. फरक एवढाच आहे की तो आपल्या इतर मित्र किडीनाही मारू शकतो. त्यामुळे एखाद दुसरा आपल्या बागेत दिसला तर ठीक पण जास्त संख्या असेल तर ह्याला दूर ठेवलेलेच बरे. Happy

4-Praying-Mantis-1-by-Jon-Brierly.jpg

आता आपण पाहतोय ती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आणि घरात शिरताच मनात सहजच धडकी भरवणारी अशी गांधीलमाशी. जसे हि आपली घाबरगुंडी उडवते त्याहून अधिक घाबरवते ते पान खाणाऱ्या अळ्यांना त्यांचा कर्दनकाळ बनून.

parasitoidla.jpg

अजूनही असे बरेच मित्र आहेत आपल्या निसर्गात जे नेहमीच आपल्या भल्यासाठी राबत असतात आणि अनवधानाने म्हणा किंवा भीतीने म्हणा आपण मात्र त्यांना पाहताच मारायला धावत असतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीला गांडूळ खतातील गांडूळ हाताळताना खूप विचित्र फील असतो.... मनातील सर्व भावनांचा कल्लोळ होत एक अनाहूत शिरशिरी स्पर्श करायच्या आधीच जाणवते....पण त्या इवल्याश्या प्राण्याचे आपल्या (मानवा) साठीचे कष्ट पाहिले की बाकी इतर भावनांची जागा फक्त ममत्व घेते आणि मग त्याच भावनेने त्याला हाताळायला लागलो कि सर्व काही सोप्पे होवून जाते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सोनाली Happy

मस्त माहिती .
सुरुवातीला गांडूळ खतातील गांडूळ हाताळताना खूप विचित्र फील असतो.... मनातील सर्व भावनांचा कल्लोळ होत एक अनाहूत शिरशिरी स्पर्श करायच्या आधीच जाणवते....पण त्या इवल्याश्या प्राण्याचे आपल्या (मानवा) साठीचे कष्ट पाहिले की बाकी इतर भावनांची जागा फक्त ममत्व घेते आणि मग त्याच भावनेने त्याला हाताळायला लागलो कि सर्व काही सोप्पे होवून जाते. >> +1

धन्यवाद ऋन्मेश Happy

फोटोचे उगमस्थान विविध स्त्रोत आहेत, त्यांचा वापर ईथे आपल्या मित्रांची तोंडओळख अधिक सुलभ व्हावी ह्या उद्देशाने करण्यात आलाय.