Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याने ओपनरच यावे तेच चांगले.
त्याने ओपनरच यावे तेच चांगले. >> मागच्या दोन्ही वेळेला मुंबई जिकलेय जेंव्हा पार्थीव नि लेंडल सिमन्स ओपन करत होते
मस्त अॅनेलेसिस स्वरूप. फारशी
मस्त अॅनेलेसिस स्वरूप. फारशी माहिती नव्हती या टीम्स बद्दल, विशेषतः गेल्या २-३ वर्षातील.
मलिंगा, मॅक्लेनाघन आणि साउदी
मलिंगा, मॅक्लेनाघन आणि साउदी असे तिघे तिघे असताना जॉन्सनला मुंबईने का घेतले असावे हा प्रश्नच आहे..... त्याच्या बीबीएलच्या कामगिरीवर जाण्यात फारसा काही अर्थ नाही.... आयपीएलमध्ये तरी तो गेले काही सीझन फ्लॉपच गेलाय!
पोलार्ड हा मला कधीच आवडला नाही.... एक अतिशय उर्मट खेळाडू वाटतो मला तो!
त्याने त्या वॉटसनला पार डगआउट पर्यंत जाउन चिडवल्यापासून तर तो पारच उतरला नजरेतून!
लेंडल सिमन्स हा मुंबईला लाभलेला एक अतिशय कंसिस्टंट आणि अंडररेटेड प्लेअर आहे.... भक्कम सलामीसाठी तो संघात हवाच
बटलर आहे तोपर्यंत त्यालाही खेळवावे आणि उरलेले दोन मलिंगा आणि मॅक्लेनाघन असतील
बटलर गेल्यावर कदाचित गुणरत्नेला चान्स मिळेल
बाकी सौरभ तिवारी, करण शर्मा, निकोलस पूरन, गौतम वगैरे मंडळीना एखाद दुसरी मॅच मिळेल
कृणाल पांड्या आणि भज्जी असताना करण शर्माला नियमित चान्स मिळणे अवघड आहे.... हां आता भज्जीला बऱ्यापैकी मार पडला तर करण शर्मा येवू शकतो प्लेयिंग एलेव्हनमध्ये!
सिमन्स, रोहीत शर्मा, पार्थिव पटेल, रायडू, बटलर, पांड्या ब्रदर्स, भज्जी अशी सखोल बॅटींग लाइनअप आहे मुंबईची
मलिंगा, मॅक्लेनाघन, बुमराह, भज्जी, पांड्या ब्रदर्स अशी बॉलींगपण Tried & Tested आहे
गुजरातने घेतलेल्या १०-११
गुजरातने घेतलेल्या १०-११ प्लेयर्समध्ये जेसन रॉय हे एकमेव एस्टायब्लीश नाव आहे
संघात ऑलरेडी बाझ, फिंच, ड्वेन स्मिथ असताना जेसन रॉयला घेउन काय साधल त्यांचे त्यांनाच माहित!
बाकी नथूसिंगला त्यांनी घेतल आणि त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये चान्स मिळण्याचीही बरीच शक्यता आहे
प्रवीणकुमार, धवल कुलकर्णी, नथूसिंग, फॉल्कनर, ब्राव्हो असा भक्कम पेस ॲटेक आहे आणि जोडीला जड्डू आहे, झालच तर तो पॉल ॲडम्स ॲक्शनवाला शिविल कौशिक आहे, रैनाची कामचलाऊ फिरकी आहे
इतकी चांगली बॉलींग असताना मनप्रीत गुनी, थंपी, मुनाफ पटेल (?) वगैरेंना घेण्यापेक्षा जरा चांगले भारतीय फलंदाज घेतले असते तर जरा बरी बेंच स्ट्रेंथ मिळाली असती
सध्या गुजरात कडे फक्त रैना, कार्तिक आणि इशान किशन हे तिघेच वेल नोन भारतीय फलंदाज आहेत
तो UAE चा चिराग सुरी एक का घेतलाय कुणास ठाऊक?
स्वरूप, मुंबई बद्दल चं अ
स्वरूप, मुंबई बद्दल चं अॅनालिसीस बुद्धीला पटणारं आहे आणी कदाचित, पहिल्या हाफ मधे सर्व प्रकारचे चमत्कारिक प्रयोग करून झाल्यावर आणी 'आता मुंबई बाहेर पडणार' अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर अचानक ते हे सगळं करतील असं वाटतं.
गुजराथ ची टीम हेवी-वेट आहे, बँगलोर सारखीच.
>> आणी 'आता मुंबई बाहेर पडणार
>> आणी 'आता मुंबई बाहेर पडणार' अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर अचानक ते हे सगळं करतील असं वाटतं.
अरे एकदोनदा जमून आले म्हणून तीच भारी स्ट्रॅटेजी असल्याचा समज नाही करुन घेतला म्हणजे मिळवली!
पंजाबने उपलब्ध परदेशी बॅट्समन
पंजाबने उपलब्ध परदेशी बॅट्समन पैकी गप्टील आणि मॉर्गन हे त्यातल्या त्यात चांगले पर्याय निवडले पण गम्मत अशी की त्यांना परदेशी फलंदाजांची नाही तर भारतीय फलंदाजांची गरज होती
मार्श, मिलर, मॅक्सवेल, आमला आधीच आहेत त्यात आता हे गप्टील आणि मॉर्गन..... त्यांना खरेतर मुरली विजय आणि मनन व्होरा यांना साथ द्यायला एखादा बरा भारतीय फलंदाज हवा होता.... अगदी चेतेश्वर पुजारा पण चालला असता.... सौरभ तिवारी, आदित्य तरे, इशांक जग्गी वगैरे बरेच पर्याय होते पण पंजाबने त्यांच्यासाठी बिडच केले नाही
अगदी नेगीसाठीही नाही (जो की अक्षर पटेलच्या जोडीला एक बरा स्पिन ऑप्शनही झाला असता)
बॉलर्समध्ये मात्र पंजाबने नटराजन आणि हेन्री हे त्यामानाने बरे पिक केले !
मोहीत, संदीप, अनुरीत, नटराजन, शार्दुल ठाकूर अशी लोकल पेसर्सची फौजच्या फौजच आहे पंजाबकडे आणि असे असताना त्या वरुण ॲरोन वर इतकी मोठ्ठी बोली का लावली कुणास ठाऊक? त्याऐवजी एखादा चांगला स्पिनर घेता आला असता!
वर्षा दोन वर्षापूर्वी कर्नाटका प्रिमीअर लीगमधून आलेल्या करीअप्पाने बरीच हवा केलेली पण त्यामानाने त्याच्यात फारशी चमक दिसली नाही.... तो एक राहूल तिवेटिया घेतलाय पण मुख्यत्वे भार अक्षर आणि मॅक्सवेलवरच असेल!
या आत्ताच्या Auction चे जाउद्या पण ती एक एक्स्ट्रा स्पीनरची गोष्ट सोडली तर पंजाबचा संघही कागदावर तरी बऱ्यापैकी समतोल आहे!
अरे एकदोनदा जमून आले म्हणून
अरे एकदोनदा जमून आले म्हणून तीच भारी स्ट्रॅटेजी असल्याचा समज नाही करुन घेतला म्हणजे मिळवली! > हे असे नाहिये खर तर. जी टीम शेवटी फॉर्म मधे येते नि सुरुवातीला थोडेफार पॉईटंस खात्यात गोळा करून राहते ती बहुतेक वेळा जिंकतेय. सुरूवातीला प्रयोग करून शेवटी सेट्ल्ड टीम असणे मह्त्वाचे आहे.
मुंबईबद्दल बटलर हवाच असे मला वाटत नाही. गुनारत्नेचा फॉर्म बघता त्याला आधी संधी दिली जावी. तो ऑल राऊंडर आहे हा बोनस. पोलार्ड ऐवजी पूरनला चाचपडून बघायला हवे त्याचा फॉर्म बघता. मलिंगा नुकताच लंकेमधून खेळायला लागलाय त्यामूळे त्याच्या फिटनेस वर परत शंका असणार. त्याऐवजी साऊदी चांगला फिट ठरू शकेल. जॉह्नसन नि मॅक्ल्शान हे विकेट टेकिंग बॉलर्स म्हणून एकमेकांचे बॅकप आहेत. ओपन सिमन्स नि पटेल ह्यांनीच करावे असे मला वाटते. शर्मा दहा ओवर्स च्या आत आला नाही तर त्याला रायूडू, पांड्या बंधू, पोलार्ड ह्यांच्या खाली ढकलावे. आलया आल्या उचलून बॉल मारणे हा त्याचा प्रांत नाही.
>>सुरूवातीला प्रयोग करून
>>सुरूवातीला प्रयोग करून शेवटी सेट्ल्ड टीम असणे मह्त्वाचे आहे.
I agree
पण त्यासाठी अगदी Do or Die लाईनपर्यंत नको ना जायला!
आणि हे सेटल्ड टीमबद्दल कुणीतरी त्या डीडीच्या टीम मॅनेजमेन्टला पण सांगा रे!...... हॉर्सेस फॉर कोर्सेस ठीक आहे पण त्याच्या प्रेमात पडून आधीच्या मॅचच्या MoM ला पूढच्या मॅचला बाहेर नका बसवू रे! At some point of time, you have to have a settled team!
पुण्याकडे स्टीव्ह स्मिथ, फाफ,
पुण्याकडे स्टीव्ह स्मिथ, फाफ, मिशेल मार्श आणि झंपा असे चार बऱ्यापैकी सेटल्ड फॉरेनर असताना आणि उस्मान ख्वाजाच्या रुपाने फाफ गेल्यानंतर लागणारा बॅकअपही असताना बेन स्टोक्ससाठी एव्हढी मोठी बोली लावण्याची खरच काही आवश्यकता नव्हती.... पुण्याला गरज होती रहाणे, स्मिथ, फाफ या स्लो स्टार्टर्सना नलीफाय करण्यासाठी एका खऱ्याखुऱ्या हीटरची आणि एखाद-दोन दर्जेदार पेसर्सची!
दिंडा, पांडे, रजत भाटिया हा पेस ॲटेक घेउन तुम्ही फार पुढे जाउ शकत नाही आणि बेन स्टोक्स याला पर्याय होवू शकत नाही
स्टोक्सला इतक्या मोठ्या रकमेला घेतल्यामुळे नंतर आलेल्या रबाडा, बोल्ट, मिल्स साठी पुणे बिडच करु धजले नाहीत..... एव्हडेच नव्हे तर नटराजन, थंपी, नथूसिंग, रिषी धवन वगैरेंच्या बिडींगमध्येही त्यांचा टिकाव लागला नाही
मनोज तिवारी, उनाडकट. चहार, डॅन ख्रिस्तियन वगैरेंवर मग त्यांना समाधान मानावे लागले!
त्यात भरीस भर म्हणजे धोनीऐवजी स्मिथकडे कॅप्टन्सी देण्याचा घेतलेला निर्णय..... भारतीय कंडीशनमध्ये आणि आयपीएलसारख्या हातखंडा स्पर्धेमध्ये धोनीच्या स्ट्रीट स्मार्ट कॅप्टन्सीला डावलून स्मिथला कॅप्टन करण्याच्या निर्णयामागे काय कारण असावे बरे?
असो! थोडक्यात काय तर यंदाही पुण्याकडून फारश्या अपेक्षा नाहीत
>>पुण्याकडे स्टीव्ह स्मिथ,
>>पुण्याकडे स्टीव्ह स्मिथ, फाफ, मिशेल मार्श आणि झंपा असे चार बऱ्यापैकी सेटल्ड फॉरेनर असताना आणि उस्मान ख्वाजाच्या रुपाने फाफ गेल्यानंतर लागणारा बॅकअपही असताना बेन स्टोक्ससाठी एव्हढी मोठी बोली लावण्याची खरच काही आवश्यकता नव्हती....
आता मिशेल मार्श खेळणार नसल्याने स्टोक्सवर लावलेले पैसे अगदीच वाया गेले नाहीत असेच वाटले असणार पुणे टीमला!
इरफान पठाण ला अजूनही कोणी
इरफान पठाण ला अजूनही कोणी वाली नाही? बीसीसीआय नेच स्पॉन्सर करायला हवेत असे लोक
हर्षा भोगलेच्या फॅन्ससाठी
हर्षा भोगलेच्या फॅन्ससाठी गुडन्यूज
He may be back to commentry box for IPL
हर्षा हवाच रे. काय बोलतो तो
हर्षा हवाच रे. काय बोलतो तो माणूस! त्या वळू सिनेमातलं वाक्य आठवतं 'इथे शेंबडी पोरं भाष्नं ठोकायला लागले, मंग तू कशाला गुळनी धरून बसतो'.
मिचेल मार्श पेक्षा स्टोक्स नक्कीच उजवा आहे. मला तर मिचेल मार्श तसाही कधी फारसा इफेक्टीव्ह वाटला नाही. ऑस्ट्रेलियन स्टुअर्ट बिन्नी आहे.
मला तर मिचेल मार्श तसाही कधी
मला तर मिचेल मार्श तसाही कधी फारसा इफेक्टीव्ह वाटला नाही. >> मार्श डाऊन अंडर जास्त effective ठरतो. गेले वर्षभर तो तसाही पूर्ण फीट नव्हता त्यामूले त्या पेस पण भलताच Drop झाला होता. नाहितर तो पांड्याच्या level चा बॉलर आहे. गरिबांचा कॅलिस
"गरिबांचा कॅलिस" -
"गरिबांचा कॅलिस" -
http://www.espncricinfo.com
http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2017/content/story/108...
ड्युमिनी (दिल्ली डेअरडेव्हिल्स) ची आयपीएल मधून माघार. अँजेलो मॅथ्यूज चा सहभाग अनिश्चित.
ब्लेसिंग ईन डिसगाईज फॉर दिल्ली डेअरडेव्हिल्स?
>>ब्लेसिंग ईन डिसगाईज फॉर
>>ब्लेसिंग ईन डिसगाईज फॉर दिल्ली डेअरडेव्हिल्स?
अगदी तसेच नाही पण फार मोठा ब्लो वगैरे नाही.... आता झहीर अनफीट असेल तर बॅकअप कॅप्टन कोण हा पण प्रश्न आहे!
त्याखेरीज डीकॉक, रिषभ पंत, नायर, सॅमसन, अय्यर, बिलिंग्स या त्यांच्या प्रोबॅबल टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये एक पण पार्टटाइम बॉलर नाही आता (तसे नायर करतो थोडीफार बॉलिंग म्हणा)
Starting 11:
डीकॉक, अय्यर, सॅमसन, नायर, बिलिंग्स, रिषभ पंत, मॉरीस, जयंत यादव, मिश्रा, झहीर, रबाडा
बॉलिंग ऑप्शन चा विचार करता
बॉलिंग ऑप्शन चा विचार करता कॉरी अँडरसन प्लेयिंग ११ मधे येवू शकतो. ह्या दोन खेळाडूंसाठी रिप्लेसमेंट घेतील का ते बघायला हवं.
"Quinton de Kock is in doubt
"Quinton de Kock is in doubt for the Hamilton Test due to tendon damage to his right index finger
Even if de Kock does play, his availability for Delhi Daredevils in the looming IPL is in extreme doubt, as the injury commonly takes around six weeks' recovery time"
Now thats the real blow for DD.... He was very certain in starting11 and looking at his form he would hv been played all their matches till SA players departure!
आता डीडीला तातडीने रिप्लेसमेंट शोधण्याची गरज आहे.... एक तडाखेबंद ओपनर/मिडल ऑर्डर बॅट्समन जो पूर्ण सीझन उपलब्ध असेल
हेच लिहायला ईथे आलो होतो.
हेच लिहायला ईथे आलो होतो. डीडी ला ड्युमिनी, डी-कॉक, मॅथ्यूज असे तीन परदेशी खेळाडू अनुपस्थित असणं परवडणार नाही. विशेषतः ड्युमिनी / मॅथ्यूज नसताना कुणीतरी कॅप्टन मटेरियल घ्यावा लागेल. कारण झहीर संपूर्ण सीझन खेळायची शक्यता कमी आहे आणी उरलेल्या खेळाडूंमधे देशी-परदेशी खेळाडूंचं नेतृत्व करू शकेल असा खेळाडू नाहीये. उगाच अमित मिश्रा ला वगैरे कॅप्टन करण्यात अर्थ नाही. डी-कॉक च्या अनुपस्थितीत सॅम बिलिंग्ज खेळेल, पण तो सुद्ध संपूर्ण सीझन नसणार आहे बहुदा.
डीकॉक एकदम भरवश्याचा होता राव
डीकॉक एकदम भरवश्याचा होता राव!
आता कुठुन शोधून आणायच्या इतक्या रिप्लेसमेंट?
"मिशेल मार्शच्या बदली
"मिशेल मार्शच्या बदली पुण्याकडून इम्रान ताहीरला करारबद्ध"
अश्विन, झंपा आणि ताहीर एका टीममधून!
स्मिथ, फाफ आणि स्टोक्स ऑलमॉस्ट सर्टन आहेत त्यामुळे झंपा किंवा ताहीर एकावेळी कुणीतरी एकच खेळेल
पुण्याने खर तर पेसर घ्यायला पाहिजेल होता!
बहुधा त्यांना एक विकेट टेकर
बहुधा त्यांना एक विकेट टेकर हवा होता.
पुण्याच्या टीमचा थिंक टँक
पुण्याच्या टीमचा थिंक टँक अशक्य अनाकलनीय आहे
पुणे वि. मुंबई मॅचची तिकिट्स
पुणे वि. मुंबई मॅचची तिकिट्स बूक केलीत मित्रहो!
अश्विन, कोहली, विजय, राहूल,
अश्विन, कोहली, विजय, राहूल, ड्युमिनी, डि-कॉक हे आत्तापर्यंतचे आयपीएल मधून बाहेर पडलेले खेळाडू. ह्यापैकी दिल्ली आणी बंगळूरू संघांना मोठा फटका बसलाय असं वाटतय. विजय आणी अश्विन चं मागच्या वर्षी तरी त्यांच्या संघांच्या कामगिरीत काँट्रीब्युशन फारसं उल्लेखनीय नव्हतं. (हे शेवटचं वाक्य कुठलेली स्टॅट्स चेक न करता आलय, केवळ आठवणीतून).
अश्विन, कोहली, विजय, राहूल
अश्विन, कोहली, विजय, राहूल यांना विश्रांती आवश्यकच आहे.... यादव, जडेजाने पण खरतर विश्रांती घ्यायला हवीय!
त्यानिमित्ताने नव्या चेहऱ्याना संधी मिळेल
आता जडेजा आणि उमेश यादव पण
आता जडेजा आणि उमेश यादव पण पहिले दोन आठवडे खेळणार नाहीत
झालच तर ABD ला पण पाठदुखीचा त्रास सुरु झालाय म्हणे!
"आता जडेजा आणि उमेश यादव पण
"आता जडेजा आणि उमेश यादव पण पहिले दोन आठवडे खेळणार नाहीत" - तुझी इच्छा पूर्ण झाली. दोघांना विश्रांती ची गरज होतीच.
Pages