खरंतर ते दोघंही आता त्या जहाजाच्या विशाल कार्बो कम्पार्टमेंट मध्ये येऊन पोहोचले होते.
अखेर खूप मेहनतीने त्यांना त्या लहानशा गोलाकार पाईपामधून बाहेर पडण्यात यश आलं होतं. आता त्यांना राञ होण्याअगोदरच जहाजात रॉनचा व रॉकीचा शोध घ्यायचा होता. त्यामूळ त्या काळ्याकूट्ट बंकरमध्ये फार वेळ वाया घालवून भागणार नव्हतं.
कारण वेब व ती माणसं कधीही त्यांच्या रूममध्ये येऊ शकली असती. अर्थातच जँकने त्याच्या रूमचा दरवाजा आतूनच लॉक करून घेतला होता. त्यामूळे त्यांना रॉनला व रॉकीला शोधण्यासाठी थोडा वेळ नक्कीच मिळणार होता. पण तो वेळही कदाचीत पूरेसा नव्हता.
त्या बकंर मध्ये सगळीकडेच कोळशाचे मोठमोठे ढीग पसरले होते. आणी त्यातच भर म्हणून की काय तो कोळसा ईजींन कम्पार्टमेंटमध्ये वाहून नेण्यासाठी आजूबाजूला छोट्या-छोट्या ट्रॉल्यांची रांग लावण्यात आली होती.
ते दोघंही आता अगदी सावधपणे रॉन व रॉकीच्या शोधात त्या बंकरमधून बाहेर पडण्यासाठी हळूहळू पूढे जात होते.
जँकने पाहीलं, एक छोटी ट्रॉली घेऊन त्या बंकरमधील एक कामगार कोळसा घेऊन जाण्यासाठी त्यांच्या दिशेने येत होता. त्याला पाहताक्षणी जँक लगेचच त्याच लक्ष नसताना बंकरच्या दरवाज्यामागे लपला. त्याबरोबर ज्युलीही ताबडतोब जँकसोबत दरवाज्यामागे धावली.
ते दोघंही त्याक्षणी पकडले जाण्यापासून थोडक्यात बचावले होते. पण त्यांना प्रत्येकवेळी अशी चूक करून चालणार नव्हतं. जर त्या शीपमनने त्या दोघांनाही पाहीलं असतं तर त्याने नक्कीच आरडाओरडा करून सर्वाना एकञ गोळा केलं असतं. आणी मग ते दोघंही पून्हा पकडले गेले असते.
मग थोड्या वेळाने आपल्या ट्रॉलीत कोळसा भरून तो कामगार ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने पून्हा मागे जाऊ लागला.
" ज्युली हा कोळसा घेऊन नक्कीच या जहाजाच्या ईजींन कम्पार्टमेटमध्ये जात असणार कारण जहाजात कोळशाचा जास्तीत जास्त वापर फक्त ईजींन कम्पार्टमेंटमध्ये आणी किचनमध्येच केला जातो " जँक
" पण आपण त्या ईजींन कम्पार्टमेटमध्ये जाऊन काय करणार आहोत
आपल्याला तर अगोदर रॉनला व रॉकीला भेटायचं आहे ना " ज्युली
" अगं चल पटकन, आपण नंतर बोलू नाहीतर हा ईथून निघून जाईल. कदाचीत त्याच्या मागून गेल्यावरच आपल्याला ईथून बाहेर पडण्यासाठी एखादा मार्ग सापडेल " जँक हळू आवाजातच पूटपूटला.
मग फार वेळ न घालवता ते दोघंही त्याच्या नकळतच मागून सावकाशपणे जाऊ लागले.
जँकचा अंदाज बरोबरच ठरला. तो बंकरमधील कामगार त्या जहाजाच्या ईजींन कम्पार्टमेंट मध्येच गेला होता.
तीथे जहाजातील अनेक कर्मचारी मोठमोठ्या मशीन्स हाताळण्यासाठी व त्यांच्यावर नियञंण ठेवण्यासाठी त्या ठीकाणी कार्यरत होते.
अगदी जहाजाच्या चीफ ईजींनीअरपासून ते कोळशाची वाहतूक करणाऱ्या साध्या कामगारापर्यतं अनेक जण तीथे ऊपस्थीत होते.
त्या संर्वाच्याच नकळत नजर चूकवून पूढे जाणं म्हणजे खूपच जीकरीचं काम होतं.शेवटी कसंही करून त्यांना आता लवकरात लवकर रॉनला व रॉकीला भेटायचं होतं. कारण त्यावेळीतरी तीच एक संध्याकाळ त्यांच्यासाठी महव्ताची ठरणार होती.
ते दोघंही ईजींन कम्पार्टमेटंच्या मोठ्या दरवाज्यामागे लपून त्या कम्पार्टमेटंच व्यवस्थीत निरीक्षण करत होते. आता त्यांना संर्वाचीच नजर चूकवून अगदी सावधपणे तिथून बाहेर पडावं लागणार होतं.
मोठमोठ्या मशनरीच्यां प्रचंड आवाजामूळे काहीच समजण्यास मार्ग नव्हता. त्याचाच फायदा घेऊन ते दोघंही तिथून निसटणार होते.
परंतू खरी अडचण तर वेगळीच होती. तेथील प्रत्येकजण आपआपली नेमून दिलेली कामं करण्यात जरी व्यस्त असला तरीही त्यांच्या नजरेतून सूखरूप निसटणंही तेवढंच अवघड होतं.
मग थोड्या वेळाने आजूबाजूचं लक्षपूर्वक निरीक्षण करून एखाद्या चक्राकार चाकाप्रमाणे गोल फिरणाऱ्या एका मोठ्या मशीनीच्या आडोशाने ते दोघंही पूढे निघाले. तेथील सर्वच यंञे गूतांगूंतीने प्रत्येकांशी जोडलेली आणी विशेष म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर अवलंबून होती.
जणू काही त्या संपूर्ण ईजींन कम्पार्टमेटंनेच धूराच्या जाड थरामूळे आणी कोळशाच्या लहान-सहान खड्यामूंळे काळा रंग धारण केला होता.
त्या सर्व कर्मचाऱ्यांचे एकमेकांशी असलेले जलद गतीने काम करण्याचे अप्रतीम कैशल्य पाहून जर एखाद्याला नवल वाटलं नसतं तरच नवल.
तेथील प्रत्येक कानाकोपऱ्यात जरी कँमेरे लावण्यात आले असले तरीही त्या सर्वच कँमेऱ्यांची नजर मोठमोठ्या मशीनीपलीकडे माञ नक्कीच पोहोचत नसावी. म्हणूनच तर ते दोघंही मशीनींच्या आडोशाने लपूनच सावकाशपणे पूढे जात होते.
पण यावेळी माञ एका कँमीकलने भरलेल्या मोठ्या ड्रम जवळ येऊन ते पोहोचले. त्या कँमीकलचा खूपच ऊग्र वास आख्या ईजींन कम्पार्टमेटंमध्ये हळूहळू दरवळत होता. त्या ड्रममागून त्यांना समोर दहा-बारा फूटांच्या अंतरावर ईजींन कम्पार्टमेटंच मोठं प्रवेशद्वार दिसत होतं. परंतू तीथपर्यतं पोहोचण्यासाठी कोणतीच वस्तू त्यांच्या अडोशाला नव्हती.
त्या ईजींन कम्पार्टमेटंच्या प्रवेशद्वारापर्यतं पोहोचण्याचा एकमेव ऊपाय म्हणजे त्या कँमीकलने भरलेल्या ड्रमपासून ते त्या प्रवेशद्वारापर्यतं त्या दोघांनाही वेगाने पूढे धावत जाणं.
आणी धावतेवेळी साहजीकच कोणाचीही नजर त्या दोघांवर पडण्याची दाट शक्यता होती. अगदी प्रत्येक कोपऱ्यात बसवलेल्या कँमेऱ्याचींही.
अखेर नाईलाजास्तव विचार करण्यात फार वेळ न घालवता आजूबाजूला पाहून कोणाचंच लक्ष नसताना त्या दोघांनीही कशीबशी ईजींन कम्पार्टमेटंच्या प्रवेशद्वारापर्यतं धूम ठोकली.
सूदैवाने प्रत्येकजण आपआपल्या कामात मग्न असल्यामूळे यावेळीही त्यांना कोणीच पाहू शकलं नाही.
मग ते दोघंहीजण त्या प्रवेशद्वारा बाहेरील कॉरीडॉरमधून लगेचच पूढे जाऊ लागले. कारण तीथे ऊभं राहणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कूऱ्हाड मारून घेण्यासारखा मूर्खपणा होता. कारण नकळत कोणाचीही नजर त्यांच्यावर सहजच पडू शकली असती.
त्या भव्य जहाजात पळता भूई थोडी होत होती. आणी आता त्यातच भर म्हणून की काय त्या कँरीडॉरमध्ये त्यांच्या समोरूनच एक वेटर हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता. अगदी त्या दोघांच्या समोरूनच. परंतू त्याची नजर खाली खिळली होती. कारण त्याच्या हातात एक मोठा ट्रे होता व त्या ट्रे मध्ये पद्धतशीरपणे वेगवेगळे पदार्थ सजवून ठेवण्यात आले होते. कदाचीत तो कोणाचीतरी स्पेशल ऑर्डर घेऊन जात होता. त्या क्षणी त्या दोघांनाही ताबडतोब त्या वेटरपासून लपण्यासाठी आजूबाजूला एखादी छोटीशी जागाही दिसत नव्हती. आणी आता पळण्यातही काहीच अर्थ नव्हता.
तो वेटर जेव्हां त्या दोघांच्या अगदी जवळ आला. तेव्हां जँकची सॉलेड ततंरली. नखशीकांत हादरणं म्हणजे काय याचा त्याला क्षणार्धात चांगलाच प्रत्यय येऊन गेला. तो वेटर त्या दोघांनाही पाहून ओरडाओरडा करून सर्वानां एकञ जमा करेल अशी भीती असताना त्याने ज्युलीला एक गोड स्माईल दिली. व तो काहीच न बोलता अचानक पूढे निघूनही गेला.
कदाचीत वेबने जँकला व ज्युलीला कीडनँप करून या जहाजात आणलंय याची त्या वेटरला पूसटशीही कल्पना नसावी. आणी म्हणूनच तो काहीही प्रतीक्रीया न देताच पूढे निघून गेला असावा.
त्या कॉरीडॉरमधून थोडं पूढे गेल्यावर त्या दोघांनीही नकळतच त्या जहाजाच्या भव्य किचनमध्ये प्रवेश केला होता.
किचनमधील वेगवेगळ्या दरर्जेदार पक्वानांची मेजवानी पाहून कोणाच्याही तोडांला पाणी सूटलं नसतं तरच नवल. त्यातच तो पदार्थाचा रसरशीत सूंगधही त्यांच्या मनाला सारखा खूणावत होता.
पण त्यावेळी तरी कीचनमधून लवकरात लवकर बाहेर पडणंच जास्त महव्ताचं होतं.
मोठमोठी भांडी, वेगवेगळे खाद्य पदार्थ भांड्याचा मोठ्याने होणारा कलकलाट आणी तेथील प्रत्येकाचंच काम करण्याचं विशीष्ट कैशल्य या सर्वच गोष्टी त्या दोघांसाठीही अगदी नवीन होत्या.
त्या जहाजातील कार्बो कम्पार्टमेटंप्रमाणे कीचनमध्येही सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त होते. तीथेही जर त्या दोघांवर कोणाची नजर पडली असती तर साहजीकच वेबने व त्याच्या माणसांनी त्या दोघानांही पून्हा पकडलं असतं.
कीचनमधून बाहेर पडल्यावर त्या भव्य जहाजात त्यांना प्रथम रॉनचा व रॉकीचा शोध घ्यायचा होता. आणी त्यानंतरच ज्युलीच्या घरी फोन करून वेबबद्दल व घडलेल्या सर्वच घटनांबद्दल तीच्या आईला थोडक्यात कल्पनाही द्यायची होती. त्यामूळेच कदाचीत त्यांना ईनेस्पँक्टर रसेलकडूनही मदत मिळवण्याची संधी प्राप्त होणार होती. पण हे सर्व तेव्हांच शक्य होऊ शकणार होतं. जेव्हां ते दोघंही त्या किचनमधून सूखरूप बाहेर पडू शकणार होते.
यावेळी ते दोघंही त्या जहाजाच्या ग्राऊडं फ्लोअरमध्ये होते. जिथे फक्त ईजींन कम्पार्टमेट, बंकर, मेडीकल डिव्हीजन आणी एका भव्य किचनची रचना करण्यात आली होती. हे समजून घेण्यास जँकला फार वेळ लागला नाही.
आता काहीतरी युक्तीशीर मार्ग काढून त्यांना त्या कीचनमधून लवकरात लवकर बाहेर पडावं लागणार होतं. कारण तीथून निघण्यासाठी खूपच ऊशीर होत होता.
ते दोघंही मोठमोठ्या स्टीलच्या भांड्यामागे लपून त्या कीचनमधील प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेऊन होते. मिळालेली एकही संधी त्यानां आता वाया घालवून चालणार नव्हती.
त्या भव्य जहाजात जँकची नजर सारखी रॉनचा व रॉकीचा शोध घेण्याच्या लक्ष्यावर होती. ज्युलीही काही क्षणासाठी शांत बसून कसल्यातरी विचारात बूडून गेली होती.
तेवढ्यात त्या दोघांनाही कँरीडॉरमध्ये दिसलेल्या वेटरने अचानकच किचनमध्ये प्रवेश केला. तो यावेळी माञ खूपच घाईत होता.
" वन बाय टू चीकन फ्राय राईस "
त्या वेटरने गेस्टची ऑर्डर शेफला दिली आणी तीथेच बाजूला ठेवलेला एक ट्रे ऊचलून तो बाहेर जाण्यास निघाला.
जँकलाही तो वेटर नेमका घाईत असलेलाच हवा होता. लगेचच त्या संधीचा फायदा घेऊन तो समोरून येत असतानाच जँकने त्याच्या बाजूची एक तेलाची पिशवी फाडून त्यामधलं थोडं तेल खाली फरशीवर ओतलं आणी मग ताबडतोब ते दोघंही किचनच्या मूख्य लोखंडी दरवाजामागे जाऊन लपले.
अखेर जे व्हायंच होतं तेच झालं. हातात मोठा ट्रे असल्यामूळे त्या वेटरचही लक्ष जँकने खाली फरशीवर ओतलेल्या तेळाकडे गेलं नाही. आणी तो नकळतच पाय घसरून तोडांवर पडला. सर्वाचचं लक्ष त्याने क्षणार्धात वेधून घेतलं होतं. तो खाली पडल्यामूळे त्याच्या हातात असलेल्या ट्रे मधील सर्वच पदार्थ खाली पडले होते. आणी त्या ट्रेचा मोठा आवाज झाला होता.
एव्हाना तेथील कूजबूज एेकून त्या किचनचा डेप्युटी हॉटेल डायरेक्टरही अचानकच तीथे ऊपस्थीत झाला होता.
" वॉट आर यू डूईगं मँन व्हेअर ईज यूवर अटेनशन " असे मोठ्याने म्हणत तो त्या वेटरवर ओरडत होता.
" स्वारी सर आय एँम एकट्रीमली स्वारी " वेटर
या घडलेल्या प्रकारामूळे सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यासाठी तो कारणीभूत ठरला होता.
त्याच गडबडीचा फायदा घेऊन कोणाचंच लक्ष नसताना जँक व ज्युली त्या किचनच्या दरवाजामागून सूखरूप निसटले होते.
आता ते दोघंही त्या भव्य किचनबाहेर ऊभे होते. त्यांना जास्त वेळ तीथे ऊभं राहून चालणार नव्हत.
येवढं फिरूनही त्या भव्य जहाजात त्यांना कूठेच रॉन व रॉकीची चाहूलही अजूपर्यतं लागली नव्हती. त्यामूळे जँकला आता भलतीच शंका सतावू लागली.
" जर वेबने रॉनला व रॉकीला या जहाजातच आणलं नसेल तर ?
" त्या दृष्टाने त्यांच काही बरंवाईट तर केलं नसेल ना...........जाऊदे आपण या विषयावर आपण नंतरच चर्चा केलेली बरी आपल्याला अगोदर ईथून निघायला हवं " जँक
ते दोघंही एकमेकांशी बोलत असतानाच ज्युलीने त्या किचनच्या डेट्यूपी हॉटेल डायरेक्टरला पून्हा कीचनमधून बाहेर येताना पाहीलं.
मग ते दोघंही लगेचच बाजूच्या लिफ्टमध्ये जाऊन लपले. व त्यांनी ताबडतोब लिफ्ट दूसऱ्या मजल्यावर सेट सूद्धा केली. लिफ्टचा दरवाजा बंद होणार तेवढ्यात तो हॉटेल डायरेक्टरही लिफ्टजवळ येऊन पोहोचला. कदाचीत त्यालाही लिफ्टने वरच्या मजल्यावरच जायचं होतं. पण सूदैवाने तोपर्यतं लिफ्टचा दरवाजा बंद झाला होता.
" हूश्श जँक आपण थोडक्यात वाचलो नाहीतर आता आपलं काही खरं नव्हतं "
सूटकेचा श्वास सोडत ज्युलीने स्वतःला लगेचच भानावर आणलं. आता त्यांची लिफ्ट काही सेकंदातच पहिल्या मजल्यावर येऊन पोहोचली होती.
अचानक लिफ्टचा दरवाजा जँकने ऊघडायच्या अगोदरच बाहेरच्या बाजूने ऊघडला गेला.
कदाचीत कोणीतरी आत येण्यासाठीच तो दरवाजा बाहेरून ऊघडला असावा.
क्रमशः
पुढील भाग लवकरच.............
भाग ९ साठी
http//www.maayboli.com/node/61786
भाग १० साठी
http//www.maayboli.com/node/61839
भाग ११ साठी
http//www.maayboli.com/node/61962
खुपच मस्त...!!! चालु राहुदे..
खुपच मस्त...!!! चालु राहुदे....!!!
धन्यवाद
धन्यवाद
उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली
उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.
खूप भारी चालू आहे कथा.
पुढचा भाग लवकरात लवकर टाकावा ही विनंती!
(मागील २-३ भागांसाठी प्रतिसाद देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व)
धन्यावाद
धन्यावाद