क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>चार बॉल व्यवस्थित टाकल्यावर त्याला ओव्हर क्लोज करता येत नाही, पाचवा नाही तर सहावा तो भरपूर विडथ देऊन टाकतो / किंवा त्याच्याकडून पडतो.

हे वाचताना अगदी म्हणजे अगदीच आगरकर डोळ्यासमोर आला!
तेव्हढ्यात असामीची खालची पोस्ट दिसली "राजू कुलकर्णी, अजित आगरकर, कुर्व्हिल्ला syndrome" वाली! Wink

यादव मला नेहमीच खूप प्रॉमिसिंग बॉलर वाटत आलाय. त्याचा विदर्भाचा कॅप्टन - वाघ- जसं मागे म्हणाला होता की अचूकता हे त्याचं शस्त्र कधीच नव्हतं. पण न थकता, कन्सिस्टंटली १४०+ च्या स्पीड ने तो मोठी स्पेल्स टाकू शकतो. ह्या वर्षी ईंग्लंड सिरीज पासून मात्र त्याच्यात खूप फरक जाणवतोय. शामी आणी यादव हे दोघं टेस्ट मधे चांगले फास्ट बॉलिंग पार्टनर म्हणून खेळू शकतील. शामी ने मागे त्या दोघंविषयी सांगितलं होतं की ते दोघं एकत्र चांगले खेळतात, त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. स्पीड सारखा आहे ज्यामुळे ते एकत्र प्रेशर क्रिएट करू शकतात. वन-डे मधे सुद्धा पहिला-दुसरा बॉलर म्हणून तो जास्त इफेक्टीव्ह ठरतो (अनलाईक द डेज जेव्हा मोहित शर्मा वगैरे स्लोवर वन्स टाकणार्यांची स्टीम संपली की यादव तिसरा बॉलर असायचा).

Happy

हा काय बोलिंग स्टॅमिनाचा प्रॉब्लेम असतो की काय कोणास ठाउक. की जनरल वेवर्डनेस.

मागे एकदा मॅग्राथ आणि गिलेस्पी ही ऑसीज ची ओपनिंग बोलर पेअर होती तेव्हा त्यांच्या पहिल्या ३-४ ओव्हर्स नंतर टीव्हीवर ते बॉलचे टप्पे दाखवतात ते दाखवले होते. ऑल्मोस्ट ९९% बॉल्स ऑफ च्या लाइन मधे, आणि गुडलेन्थ च्या आसपास! मॅग्राथ तर बरेचसे गुडलेन्थ आणि मधेच टाकलेले जरा बॅक ऑफ द लेन्थ यावरच पहिले २-३ काढत असे Happy

"हे वाचताना अगदी म्हणजे अगदीच आगरकर डोळ्यासमोर आला!" - अ‍ॅबसोल्यूटली. पहिले ४ बॉल्स आगरकर ची बाजू घेऊन रूममेट्स शी भांडावं तर पाचव्या बॉल ला कडक बाऊंड्री बसलेली असायची.

"जनरल वेवर्डनेस." - ह्या बाबतीत लिहा अथवा भेटा: आर. पी. सिंग. फिल्डींग कुठे लावलीये आणी आपण बॉल कुठे टाकतोय ह्याचा ताळमेळ च नसायचा. त्याच्या प्रत्येक टाकलेल्या बॉल चा परपज त्याला डिफाईन करायला लावला असता, तर आख्या स्पेल मधले जेमतेम २०% बॉल्स तो एक्स्प्लेन करू शकला असता कदाचित.

फे Happy

कोच लोक अशा वेळेस मधे बोलिंग मार्क कडे परत जाताना पॉज घ्यायला व जरा पुढचा बॉल कसा टाकायचा आहे याचा विचार करून मग टाकायला सांगतात. अनेक बोलर्स घाईत परत जाउन पुन्हा लगेच बोलिंग करतात.

हा काय बोलिंग स्टॅमिनाचा प्रॉब्लेम असतो की काय कोणास ठाउक. की जनरल वेवर्डनेस. > > स्टॅमिनाच्या काहिही संबंध नाही, delivery stride मधे बॉल वर कंट्रोल नसल्याचे हे लक्षण आहे फक्त. डोके हलते असू शकते, मनगट ठी़ जागेवर नसु शकते, रनप स्मूथ नसू शकतो. बरीच कारणे आहेत.

हिले ४ बॉल्स आगरकर ची बाजू घेऊन रूममेट्स शी भांडावं तर पाचव्या बॉल ला कडक बाऊंड्री बसलेली असायची. >> +१

यादव मला २०१४ ऑस्ट्रेलियन सिरीजमध्ये अजिबात आवडला नव्हता. ~५च्या रेटने रन्स देण्यात त्याच्या वेवर्डनेसचा मोठा हात होता. अजूनही त्याच्यात फार सुधारणा कन्सिस्टंटली झालेली नाही. मधूनच एका मॅचमध्ये चांगले स्पेल टाकून जातो आहे. त्याने जर मिचेल जॉन्सनसारखे शॉर्ट स्पेल्समध्ये बर्स्ट देण्यावर लक्ष केंद्रित केले, तर आपल्यासाठी ते जास्त चांगले होईल.

मिचेल जॉन्सन वर्कहॉर्स नव्हता रे. अन त्याला साथ देणारे वर्क हॉर्स १४०+ ने टाकत असत.

गेल्या ४-५ वर्षात आपल्याकडे पूर्ण ओव्हर १४० + टाकणारे केवळ तीन चार बॉलर्स तयार झाले आहेत. उमेश, शामी, वरूण वगैरे. त्यातील वरूण हा असून नसल्यासारखा आहे. आणि शामी / यादव हे बरेचदा इज्युंर्ड असतात. पण ह्या लोकांमुळे १४० / १४५+ वाली नवीन पिढी नक्कीच तयार होते आहे.

त्यामुळे आपल्या बॉलर्स बद्द्ल बोलताना अन फास्ट बॉलर्सची तुलना करताना हा फॅक्टर लक्षात घ्यावा लागेल असे मला वाटते. बाकी भूवी / प्रविण कुमार हे स्वींग वर १३५+/- चेच आहेत / होते. इरफान मध्ये मध्ये टाकायचा, पण तो आता भूतकाळात जमा आहे. इशांतराव त्यांच्या तरूणपणी जबरी टाकायचे, पण येत्या दोन वर्षात ते ही भूतकाळात जमा होतील. उनाडकट मध्येच बरा वाटला होता, पण त्याला विकेट मिळत नसे. मे बी ह्या सर्व फॅक्टर्स मुळे यादव टीम मध्ये आहे. आणि वर्कहॉर्स म्हणून आहे. आपले मेन बॉलर दोनच. जड्डू अन अश्विन. Proud

फायनली ऑस्ट्रेलियाचा ऑल आउट झाला ४५१ वर.

अजुन दोन मॅचेस चालू आहेत.. आणि दोन्ही एकदम इंटरेस्टींग चालू आहेत..
न्यूझीलंड विरुद्ध सा. आफ्रिका - पहिल्या डावात न्यूझीलंड बुडता बुडता वाचले आणि बरा स्कोर केलाय, पण नंतर सा.आफ्रिकेला गुंडाळता आले नाही आणि मोठा लीड दिला, डी कॉक आणि बावुमा जबरी खेळले आणि आता ९व्या विकेत साठी फिलँडर आणि मॉर्केल जीव काढत आहेत न्यूझीलंडचा.
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश - बांग्लादेशची १०० वी कसोटी - पहिल्या दिवशी श्रीलंकेची वाट लागलीच होती पण थोडक्यात बचावले, चंदिमलने शतक केले आणि त्यामुळे ३०० धावांचा टप्पा पार झाला, पण विकेट मधे फार काही नसल्यामुले बांगलादेशच्या प्लेअर्सनी सुद्धा टिकून बॅटींग केली आणि त्यांची धावसंख्या आता ३७७ / ६ बाद अशी आहे. एकच खेळाडू शून्यावर बाद झाला आणि बाकीच्या ७ जणांनी ३० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, त्यातल्या तिघांच्या ५० पेक्षा जास्त धावा झाल्या आणि अजून एक ५० धावा करण्याच्या मार्गावर आहे. मोसादेक होसेन - एकदम प्रॉमिसिंग प्लेयर वाटतो आहे त्याचे डोमेस्टीक रेकॉर्ड भन्नाट आहे.

दिवसातली शेवटची ओव्हर (ओकीफे ची) विजय हेल्मेट काढून खेळला. बर्याच दिवसानी हेल्मेट / टोपी न घालता खेळणारा बॅट्समन बघायला मिळाला. पूर्वी हे जरा जास्त बघायला मिळायचं. आता ईतकं दिसत नाही. साबा करीम ला कुंबळे चा बॉल लागून डोळ्याच्या ईंज्यूरीमुळे त्याचं करियर संपुष्टात आल्यावर त्या प्रकरणातून धडा घेतल्यासारखा सचिन नेहेमीच हेल्मेट घालून खेळला. पण अगदी लहानपणी (हे फक्त सचिन च्याच बाबतीत म्हणता येतं) सचिन किंवा त्या काळात कपिल वगैरे लोकं असं बोडक्या डोक्याने बॅटींग करायचे.

मुंबई रणजी संघात मधे उत्तम जलदगती गोलंदाज आहे. त्यातला एकाला तरी भारतीय संघात प्रवेश मिळायला हवा.

खेळपट्टी गेल्या दोन कसोटी पेक्षा तरी फारच उत्तम आहे. ऑसींनी पहिल्या दोन दिवसाचा भरपूर फायदा उचला आहे. जाडेजाचे चेंडू पडल्यानंतर स्किड होत होते. त्यावरून तरी अजुन एखाद दिवस तरी बॅट्समन फ्रेंडली राहिल. जर पहिल्या सत्रात विकेट पडली तर कोहलीच्या दुखापतीमुळे ४थ्या क्रमांकावर येण्याचे रद्द होईल. रहाणे त्याच्या जागी येईल. पण विजय आणि पुजारा यांनी पहिल्या सत्रात ५०--७० जरी धावा बिना विकेटच्या काढल्या तर मग ५००-६०० चे टारगेट आपल्याला गाठता येईल उद्याच्या दिवसात किमान ३०० धावा बनतील असा खेळपट्टीवरून तरी अंदाज आहे. रहाणे नंतर साहा आणि नायर यांनी जलदगतीने धावा बनवल्या पाहिजे. पाठीमागे कोहली उतरायचा बाकी आहे हा एक मानसिक सपोर्ट आहे. त्यामुळे ३५० नंतर ठोकून खेळले तर फार फायदा होईल. कसोटी निर्णायक बनण्याची शक्यता आहे.
फक्त अचानक पाकिस्तानी संघ अंगात संचारला सारखा भारत खेळू नये. ५०-५५ च्या भागिदारी प्रत्येक बॅट्समन ने जरी केल्या तरी पुरेसे आहे.

लंच पुर्वीची शेवटची १० ओव्हर आपण खुपच जलद खेळलो. किमान १० ओव्हर मधे ४० पेक्षा अधिक धावा काढल्या परंतू त्या नादात मुरली ऐन वेळेस आउट झाला.

तिसर्‍या दिवसा अखेर भारताचा स्कोर ३६०-६.
मी ३००+ स्कोर धरुन चाललेलो पहिले दोन सत्र उत्तम खेळले पण नंतरच्या शेवटच्या सत्रात एकदम "कोशात" जाउन बसले. असे वाटत होते की पहिल्या दोन कसोटीमधे अचानक धडाधड विकेट गेल्या त्याचे भुत अजून मनगुटीवरुन उतरले नाही. स्टार्क नाही याचा फायदा सुरुवातीच्या सत्रात विजय आणि पुजाराने छान उचलला. बरेच चांगले शॉट विजयच्या बॅटीतून लागले. पण ऐन वेळेस विजय ने माती खाल्ली. काहीच गरज नसताना उचलून मारण्याचा मोह काही विजय कडून सुटला नाही. आणि आउट झाला. इथे मॅच ऑसीकडे झुकली. ते दोघे अजुन १ तासभर उभे राहिले असते तर दिवसाखेर स्कोर ४०० पार सहज झाला असता.
लंच नंतर कोहली खेळायला उतरणे हा आजच्या दिवसातला सर्वात मोठा चुकिचा निर्णय होता. स्वतःचा खांदा दुखावला आहे, डॉक्टरने १ आठवडा विश्रांती घ्यायला सांगितली आहे. सामन्याचा ३राच दिवस आहे अशा वेळी रहाणेला पाठवण्याऐवजी स्वतः उतरणे चुकिचे होते. रहाणे त्या जागी उतरला असता तर त्याच्या डोक्यावर सांभाळून खेळण्याचे टेंशन नसते. मागे विराट साहा नायर होते त्यामुळे किमान रहाणे जो आउट ऑफ फॉर्म चालू आहे त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे. ४०-५० धावा रहाणेच्या झाल्या असत्या तर त्यासमोर पुजारी पण जरा खुलून खेळला असता. धावा ३-४ च्या धावगतीने निघाल्या तर ऑसी प्रेशर मधे येत होते. पण अचानक कोहली आऊट झाला की रहाणे गोंधळतोय. त्याचा थिंकिंग बॉक्स काम करत नाही. विकेट वाचवून खेळू की नैसर्गिक खेळू हे यात तो गडबडतोय. त्याला टीम मॅनेजमेंट ने सांगायला हवे. जसा गांगुली, धोनी सेहवागच्या मागे खंबीरपणे उभे होते की संघाचे किती ही विकेट पडल्या तरी तु तुझा नैसर्गिक खेळ खेळत राहा बाकीचे आहे जवाबदारी सांभाळायला. एक बाजू लावून धरायला द्रविड नेहमी तयार होता. तसे इथे "मी एक बाजू लावून धरतो तुम्ही खेळा" म्हणणारा नाही अथवा कुणावर ही जवाबदारी टाकली नाही. कोहली चालला की "बाजू लावून धरणे आणि आक्रमण करणे" या दोन्ही भुमिका तो एकत्रित निभावतो. अशाने बाकीच्यांचे फावत होते.
आता नेमका कोहलीच फ्लॉप चालु आहे. त्यामुळे कोणी आक्रमण करायचे कोणी बाजू लावायची याचा गुंता संघात वाढत आहे. साहा नायर रहाणे हे ५० च्या आतच आउट होत आहे. जर ह्या तिघांनीही ५० -८० धावा भागिदारीमधे काढून दिल्या तर खालची फळीतील अश्विन, उमेश यांच्यावर जवाबदारी कमी येईल अशावेळी ते जास्तीत जास्त धावा काढू शकतील.
पण हे मॅनेज करण्यात भारतीय संघ कुठेतरी कमी पडतोय. हे दिसून येते.
विजय, पुजारा, रहाणे यांना बाजू लावून धरणे ही जवाबदारी द्यायला हवी तर राहूल, कोहली, नायर, साहा, अश्विन यांनी आक्रमण करून धावा जलदगतीने काढायची जवाबदारी द्यायची. ४५०+ स्कोर झाल्यावर सग़ळ्यानीच जलद स्कोर कसा होईल याची काळजी घ्यायला हवी.
तरच आपण पुन्हा ६००+ स्कोर सतत करत राहू.
उद्या पहिले दोन सत्र तरी आपल्याला खेळायचेच आहे त्यात १००-१५० धावा तरी करायला हव्यात. कारण ५ व्यादिवशी आपल्याला किमान १००-१५० धावांचा पाठलाग करावा लागेल. आपल्या विकेट जर पहिल्याच सत्रात गेल्या आणि ऑस्ट्रेलियाला ५०+ ची बढत मिळाली तर ते उद्या उर्वरित २ सत्रात २००+ धावा काढायचे बघतील. खेळपट्टी उद्याच्या शेवटच्या सत्रात जर तुटायला सुरुवात झाली तर ५व्या दिवशी पहिल्या सत्रात ऑसी खेळून ३००+ चे टारगेट आपल्याला देतील.

अशा वेळी रहाणेला पाठवण्याऐवजी स्वतः उतरणे चुकिचे होते. रहाणे त्या जागी उतरला असता तर त्याच्या डोक्यावर सांभाळून खेळण्याचे टेंशन नसते>>

सहमत! मलाही रहाणे उतरेल ४ नं असे वाटलेले.. पण तसे झाले नाही!
आज २ विकेट नाहक गमावल्या असे वाटले अश्विन ला आधी पाठविण्या मागचा उद्देश काय असावा?

न्यूझीलंड वि. सा आफ्रिका - न्यूझीलंडचा दुसरा डाव अचानकच गडगडल्याने सा. आफ्रिका सहज जिंकली.

बांगलादेश वि. श्रीलंका - एक जबरी टेस्ट मॅच - तिन्ही निकाल लागाण्याची शक्यता - उद्या पहिल्या सत्रात काय घडते त्यावर सगळे अवलंबून असेल

स्मिथ च्या चेहर्‍यावरून असे वाटू लागले आहे की तो कोणत्याही क्षणी मैदानात उपोषणाला बसेल आणि मागणी करेल की जितका स्कोर झाला आहे त्यात २००+३०० धावा वाढवून घ्या पण पुजाराला तेवढा बाहेर घेऊन जा.

पुजारा सहानी बॉलरच्या सहन शक्तीचा अक्षरश: अंत पहिला...
आणि विशेष म्हणजे पायाचित विरुद्ध अचूक रिव्ह्यू वापरले!!

साहा चं शतक... पुजारा २००... टेस्ट क्रिकेट अ‍ॅट इट्स ब्रिलियंट बेस्ट...
पुढेमागे आणखी बरा कीपर मिळाला तरी साहा ला प्युअर बॅटिंग साठी टीममधे ठेवता येईल.
मस्त कॉन्फिडन्स नी खेळतो. (हाच कॉन्फिडन्स आजकाल राहणेच्या खेळातून गायब झालाय. सतत कसल्याशा दडपणाखाली असतो.)

उद्या लंच च्या १० ओव्हर्स आधी (अजून @ ४७-४८ ओवर्स खेळून), साधारण २२०-२३० टार्गेट दिलं पाहिजे.

च्यायला,
गेला पुजारा... १९९ पार्टनरशिप

शेवटी २ विकेट गेल्या हे महत्वाचे.
उद्या पहिल्या दोन सत्रात लव्कर विकेत घ्यायला हव्या

सतत कसल्याशा दडपणाखाली असतो +१ >>> त्याच्या कडून एक मोठी खेळी ड्यू आहे, त्याने ती खेळी त्याला दुसरा भक्कम पर्याय निर्माण होण्यापूर्वी केली पाहिजे.
सहा-पुजारा दोघांनीही अक्षरशः रडवलं स्मिथ आणि कंपनीला !
हे दोघं इतके टिच्चून खेळतायत, म्हणजे ते लोक पण फाइट करणार अशी भिती वाटत होती, तितक्यात जडेजाने पटापट दोन विकेट्स घेऊन हवा काढली.. आता उद्या मजा येईल.

जाडेजाच्या त्या दोन्ही विकेट्समुळे आज स्मिथ आणि कंपनीची झोप उडणार.
पुजारा आणि साहाची भागीदारी मँचचा टर्निंग पाँईंट. सोळा वर्षापुर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.

Pages