नक्कीच त्याच्या मनात त्या जहाजातील रूममधून बाहेर पडण्याची आगाऊ कल्पना जल्म घेत असावी.
जँकने त्या रूममधील सर्व कानाकोपऱ्याचं निट निरीक्षण केलं.
कदाचीत तो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता.
" तू नक्की काय करतोयेस जँक ते तरी मला कळू दे "
शेवटी न राहवूनहवून ज्युलीने तोडं ऊघडलंच.
" ज्युली तू आता एक काम कर, तूला या रूममध्ये एखादी मोठी रस्सी सापडतेय का ते बघ " थोडावेळ शांत राहून जँक ऊत्तरला.
" पण रस्सी कशासाठी ? " ज्युली
" आता तूला सगळंच सागांयला हवं का ?" जँक
" हो मग " ज्युली
" मग मी काय सांगतोय ते तूला आता निट ऐकावं लागेल. ठीक आहे " जँक
" बरं बोल काय ते "
असं म्हणत ज्युली एका कोपऱ्यात सरसावून बसली. आणी जँकच्या बोलण्याची वाट पाहू लागली.ज्युलीचं लक्ष अापल्याकडे असलेलं पाहून मग जँकही पूढे बोलू लागला.
" जर समज रॉन आणी रॉकी दोघंही खरंच या जहाजात असतील तर त्यांना आपण आता लवकरात लवकर भेटणं गरजेचं आहे.........आणी त्यांना शोधण्यासाठीच आपल्याला अगोदर या रूममधून बाहेर पडावं लागेल. बरोबर "
" हो बरोबर मग "
जँकच्या बोलण्याला दाद द्यावी म्हणून ज्युली ऊगाचच काहीतरी पूटपूटली.
" जर एकदा का आपण या आपल्या रूममधून त्यांच्या नकळत बाहेर पडलो की मग जहाजात जीथे संधी मिळेल तीथून तूझ्या आईला व ईनेस्पँक्टर रसेलनाही या माणंसाबद्धल आपल्याला फोन करून कळवता येईल. आणी त्यांच्या त्या स्मग्लींगच्या धंद्याबद्धलही आपण ईनेस्पँक्टर रसेलांशी बोलू.......तूला काय वाटतं ?"
जँकने एका श्वासातसात सर्व बोलून टाकलं. आणी तो ज्युलीच्या प्रतीसादाची वाट पाहू लागला.
" हो रे, तूझं म्हणनं अगदी बरोबर आहे पण मला अजूनपर्यतं हे कळलं नाही की तूला आता रस्सी कशासाठी हवी आहे रे. आणी तू म्हणतोस त्याप्रमाणे आपण दोघं या रूममधून तरी कसे काय बाहेर पडणार आहोत ?" ज्युली
" त्याची काळजी तू करू नकोस गं या रूममधून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे एक सॉलेड प्लान आहे. "
जँकने एक कटाक्ष खिडकीबाहेर टाकला. मग ज्युलीला विश्वासात घेऊन तो पूढे बोलू लागला.
" आपल्या रूमखाली ईजींन कम्पार्टमेंट आहे बरोबर " जँक
" हो मग " ज्युली
" पहील्यांदा आपण दोघंही संधी साधून खालच्या ईजींन कम्पार्टमेटंच्या ऊघड्या खिडकीमधून आत प्रवेश करायचा आणी मग तीथूनच पूढच्या प्रत्येक गोष्टीची चाहूल घेत हळूहळू पूढे जाऊन रॉनला व रॉकीलाही शोधून काढायचं.
जर चूकून समजा त्या दोघांना शोधताना वेबनी व त्यांच्या माणसांनी आपल्याला पकडलंच तरी देखील ते आपल्याला फार काही करू शकणार नाहीत.
कारण त्यांना तो कूठलातरी गूप्त खजाणा शोधण्यासाठी आपल्याच मदतीची गरज भासणार आहे.
म्हणजे खरंतर त्यासाठीच तर त्यांनी आपल्याला ईथे या जहाजात आणलंय........हो ना " जँक
" हो हो रे, हे अगदीच सोप्प आहे नाही का ?
म्हणे रॉकीला व रॉनला शोधू................मला सांग जँक आपण एवढ्या मोठ्या जहाजात त्या दोघांना कसे काय शोधणार आहोत ?
आणी तू म्हणतोस त्याप्रमाणे त्या ईजींन कम्पार्टमेटंमध्ये घूसण्यासाठी बाहेरच्या कोणत्या ऊघड्या खिडकीमधून आपण आत जायचं रे " ज्युली ऊगाचच जँकच्या योजनेतील ऊणीवावंर बोट ठेवून संधीचा फायदा घेत त्याच्यावर खेकसत होती.
" तू माझा प्लान तर अगोदर ऐकून घे ज्युली.......................हे बघ, मी पहील्यांदा स्वतःला एक मोठी रस्सी बांधून या आपल्या रूमच्या खिडकीमधून बाहेर पडेन.
आणी मग खाली ईजींन कम्पार्टमेटं मध्ये जाण्यासाठी एखादा मार्ग आहे का ते बघून तूला खाली बोलावून घेईन " जँक
" ते सर्व ठीक आहे रे पण तूला या खिडकीमधून खाली जाण्यासाठी आपल्याकडे रस्सी कूठे आहे. ?" ज्युली
" तीच तर वेडे मी तूला शोधायला सांगतोय ना कधीपासून, बघ ईकडेतीकडे कदाचीत सापडेलही कूठेतरी " जँक
नाही म्हटलं तरी जँकची योजना सरसच होती. मग आणखीन चर्चा करण्यात फार वेळ न घालवता त्या दोघांनीही रस्सी शोधायच्या नादात अख्खी रूमच पालथी घातली. पण तरीही त्यांना काहीच गवसलं नाही.
खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर शेवटी सूदैवाने कपाटाच्या वरतून एका कोपऱ्यात व्यवस्थीत गूडांळून ठेवलेला जाड दोरखंड ज्युलीने शोधून काढला. कदाचीत गरजेच्या वेळी ऊपयोगासाठीच ती जाड रस्सी तीथे ठेवण्यात आली असावी.
मग जँकने फार वेळ न घालवता त्या रस्सीचं एक टोक वरती विन्डोजवळच्या एका मोठ्या पिलरला घट्ट बांधून ठेवलं आणी त्या रस्सीचं दूसरं टोक स्वतःला बांधून घेतलं.
" हे बघ ज्युली मी पहिल्यादां या रस्सीमार्फत खाली जाऊन पहातो खालच्या ईजींनरूममध्ये जाण्यासाठी एखादा मार्ग सापडतोय का ते
जर समजा तीथे जाण्यासाठी एखादी जागा सापडलीच तर मी तूला ईशारा करून खाली बोलावून घेईन तू या विन्डोजवळच ऊभी राहा........आणी हां जर मी खाली असताना दरवाज्याजवळ कोणी आलंच तर मला लगेच कळवं मी पून्हा वरती येईन " जँक
" हो ते सर्व ठीक आहे रे, पण तू खालीतर जा अगोदर,
सावकाश, घाई करू नकोस " ज्युली
मग थोड्या वेळाने ज्युलीकडून मिळालेली व्यर्थ हिम्मत ऊराशी बालगून जँकने खिडकीबाहेर पाय टाकले.
पण खंरतर त्याला खाली जाण्याअगोदरच धाकधूकी भरली होती. त्यातच बाहेरून येणारा बोचरा थडंगार वारा अंगावर शहारे आणत त्याला अणखीनच घाबरवत होता.
मग कसलातरी विचार करण्याच्या नादात तो काही क्षण खिडकीवरच बसून राहीला.
" जर मी खाली पाण्यात पडलो तर..... बापरे कीती थंड असेल ना ते पाणी. कल्पनाच न केलेली बरी..........पण मी यावेळी अशा निरर्थक गोष्टीचा विचार करून का स्वतःला घाबरवतोय ?
जर मला रॉनला व रॉकीला शोधायचं असेल तर आता खाली गेलंच पाहीजे कदाचीत नंतर ही वेळच येणार नाही "
अखेर स्वतःशीच ठाम निर्धार करून जँकने त्याच्या दोन्ही दणकट हातांनी त्या दोरखंडाला पकडलं. मग तो त्या जाड रस्सीमार्फत हळूहळू खाली जाऊ लागला. त्यावेळी हवेचा दमट गारठा म्हणजे काय याचा त्याला क्षणार्धात चांगलाच प्रत्यय येऊन गेला.
जँकने त्या रस्सीवर त्याच्या दोन्ही हातांची पकड खूपच मजबूत ठेवली होती. जेणेकरून त्या दोरखंडावर जोर देऊन त्याला एका ठीकाणी स्थीर ऊभं राहता येत होतं. पण त्यावेळी हवेचा वेग ईतका बहरदार होता की त्या जाड दोरखंडाच्या वाजवी हेलकाव्यामूळे तोही त्या दोरखंडासोबत अलगद हेलकावे घेऊन लटकत होता.
त्याने निट निरखून पाहीलं. त्याचा अंदाज पूर्णपणे चूकल्याची जाणीव त्याला क्षणार्धात होत होती. कारण त्यांच्या रूमखाली अनेक मोठमोठ्या मशीनीनं व्यापलेलं ईजींन कम्पार्टमेटं तर होतंच पण त्या ईजीनं कम्पार्टमेटमध्ये जहाजाच्या बाहेरून जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता.
कारण खरंतर प्रत्येक मोठ्या जहाजाच्या रचनेत त्या जहाजातील ईजीनं कम्पार्टमेटमधील धूर कीवां विषारी वायू बाहेर सोडण्यासाठी मोठमोठ्या फ्ल्यूची व्यवस्था करण्यात आलेली असते. याचातर जँकने त्याच्या प्लानमध्ये विचारच केला नव्हता.
जरी जँकने त्या दोरखंडाचं दूसरं टोक वरती त्याच्या रूममधील पिलरला घट्ट बांधलं असलं. तरी हवेच्या वादळी वेगापूढे ती रस्सी सारखी हेलकावे घेत होती. आणी त्याबरोबर जँकही थरथरत कसाबसा त्या जाड रस्सीवर जम बसवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.
त्यांचा प्लान फसत असल्याची पूसटशी चाहूल लागलेली असतानाच सूदैवाने जँकला त्याच्या रूममधील विन्डोखाली डाव्या बाजूला एक गोलाकार हँच ( गोल दरवाजा ) दिसला.
" आता हे काय नवीन ?
मला जवळ जाऊनच बघीतलं पाहीजे त्याशीवाय काहीच कळणार नाही "
स्वतःशीच पूटपूटत जँक त्या रस्सीसोबत हेलकावे घेत कसाबसा त्या हँच पर्यतं पोहोचला. त्याने निट पाहीलं. तो गोल हँच बाहेरून ऊघडण्यासाठी तीथे एक धातूचा चक्राकार व्हिल बसवण्यात आला होता. जँकने तो व्हिल डावीकडे फिरवून हँच अलगदच बाहेरच्या बाजूने ऊघडला. आणी त्याबरोबरच अचानक आतील खूप दिवसांपासून कोढूंन राहीलेली गरम हवा त्याच्या नकात शीरली. पण खोकतच त्याने स्वतःला कसंबसं खाली पडण्यापासून सावरलं.
त्याला आतमध्ये मोकळ्या जागेत एका गंजलेल्या लोखंडी पाईपाचा बाहेरील भाग दिसत होता.
खरंतर त्या मोठ्या लोखंडी पाईपच्या मेटंनससाठी व दूरूस्तीसाठीच त्याठीकाणी मोकळ्या जागेची व्यवस्था करण्यात आली होती. आणी कदाचीत त्या मोकळ्या जागेत प्रवेश करण्यासाठीच जहाजाच्या बाहेरून तो गोलाकार हँच लावण्यात आला असावा.
जँकने त्या जागेचं थोडं निट लक्षपूर्वक निरीक्षण केल्यावरच त्याला या सर्व गोष्टीचा हळूहळू ऊलगडा झाला होता.
" आता दूसरा कोणताच मार्ग नाही म्टल्यावर या छोट्याशा जागेमधूनच मला पूढे जावं लागणार. कदाचीत माझ्या पायाखालचा हा मोठा पाईप ईजींन कम्पार्टमेटं मधूनच ईथपर्यतं आला असावा.
जर खरंच असं असेल तर या पाईपवरून पूढे गेल्यास ईजींन कम्पार्टमेटंमध्येही जाता येईल.......
पण अगोदर ज्युलीला खाली बोलवून घ्यायला हंव. मगच काय ते निट ठरवता येईल "
स्वतःशीच पूटपूटत त्याने ज्युलीला हातानेच खाली येण्याचा ईशारा केला.
मग तीही नाईलाजास्तव घाबरत घाबरत रस्सीला पकडून कशीबशी जँकपर्यत पोहोचली.
" एवढ्या थंड हवेत ईथे कूणी तासभर जरी ऊभं राहीलं ना तरी त्याचा गारठून अगदी बर्फ होईल " ज्युलीही त्या थडंगार वाऱ्याच्या झोताबरोबर थरथरत ऊभी होती.
" तेही बरोबरच आहे म्हणा
जाऊदे आता आपण एक काम करू ही जाड रस्सी ईथेच जहाजाबाहेर टांगत राहूदे. कदाचीत पून्हा येताना आपल्याला गरज भासल्यास आपण ईथूनच आपल्या रूममध्ये जाऊ शकतो. " जँक
" पण तू मला या पाईपावरून पूढे का नेत आहेस. आपण तर ईजींन कम्पार्टमेटंच्या ऊघड्या खिडकीमधून आत जाणार होतो ना. " ज्युली
" हो गं, पण ईजींन कम्पार्टमेटंच्या सर्वच खिडक्या त्यांनी आतून बंद केल्या आहेत. त्यामूळे या जहाजाच्या बाहेरून आपल्याला जर ईजींन कम्पार्टमेटं मध्ये जायचं असेल. तर आता या पाईपावरून पूढे जाण्याशीवाय आपल्याकडे दूसरा कोणताच पर्याय नाही. " जँक
" बंर तू म्हणशील तसं "
ज्युलीला खरंतर जँकचं बोलणं काहीच समजलं नव्हतं. ती ऊगाचच काहीतरी बडबडत होती.
सूदैवाने त्त्या पाईपावरच्या मोकळ्या जागेत अंधार नव्हता. तीथे थोड्या-थोड्या अंतरावर छोट्या ट्यूबलाईट्स लावण्यात आल्या होत्या, आणी त्याभोवती लोखंडाच्या जाळीचं गोलाकार आवरण बसवलं होतं. त्यामूळे त्या मोठ्या पाईपावरून पूढे जाणं त्या दोघांसाठीही आता खूपच सोयीस्कर झालं होतं. ज्यूली ऊगाचच स्वतःला सावरण्यासाठी जँकचा खांदा पकडून हळूहळू पूढे जात होती.
" पण जँक मला हे समजंल नाही की तूला कसं काय कळलं. की हा पाईप त्या ईजींन कम्पार्टमेटं मधूनच ईथपर्यतं आला आहे ते " ज्युलीचा अजूनही जँकच्या योजणेवर विश्वास बसत नव्हता.
" निट बघ तूझ्या पायाखाली, काय आहे ते.
या पाईपावर कसलीतरी धूराची काळी जाड परख बसली आहे............याचाच अर्थ असा होतो की हा पाईप ईजींन कम्पार्टमेटंमधूनच ईथपर्यतं आला असावा, नाहीतर कदाचीत किचनमधून तरी. " जँकने त्या गंजलेल्या लोखंडी पाईपाकडे ईशारा करत पून्हा ज्युलीसमोर आपला तर्क माडंला.
" तूझा अंदाज जर खरंच योग्य ठरला. तर आपण या पाईपावरूनच थेट ईजींन कम्पार्टमेंटमध्ये कीवां कीचनमध्ये बाहेर पडू शकतो. आणी जर तसं काहीच नसेल तर आपल्याला पून्हां आपल्या रूममध्ये परतावं लागेल."
ज्युलीचं म्हणनंही बरोबरच होतं. कारण कोणतीही पूर्वकल्पना नसताना केवळ एका पूसटशा तर्काद्वारे त्या पाईपावरून पूढे जाणं म्हणजे केवळ मूर्खपणाचचं लक्षण होतं. पण खरंतर यावेळी त्यांच्याकडे दूसरा कोणताच पर्यायही ऊपलब्ध नव्हता.
म्हणून मग ते दोघंही प्रत्येक गोष्टीची चाहूल घेत अगदी सावधतेनेच पूढे जाऊ लागले. तो पाईप पूर्णपणे गजंला होता. यावरून त्या ठिकाणी गरजेशीवाय कोणीच कधी फिरकत नसावं याचा अंदाज लावता येत होता.
पूढे-पूढे तर त्या पाईपाचं तोडं खूपच अरूंद होऊन त्याची ऊंची कमीकमी होत होती. आणी त्यामूळेच त्या दोघांनाही आता कमरेत वाकूनच हळूहळू पूढे जावं लागणार होतं.
त्यातच भर म्हणून की काय तीथल्या ट्यूबलाईट्सही काही ठीकाणी फूटून त्यांच्या काचा सगळीकडेच विखूरल्या गेल्या होत्या. त्यामूळे आता प्रकाशाचं तेज कमी होऊन त्याची जागा अंधाराने व्यापली होती.
" जँक आपण ईथे ऊगाचच आलो असं मला आता वाटू लागलंय. पूढचं काहीच स्पष्ट दीसत नाही रे. शीवाय खूप वेळ वाकावं लागल्यामूळे माझी पाठही दूखतेय " ज्युली आता माञ अगदी वैतागूनच बोलत होती.
" तू थोडा धीर धर गं
आपण जैपर्यतं या पाईपाच्या शेवटापर्यतं पोहोचत नाही तोपर्यतं आपल्याला असंच खाली वाकून पूढे जावं लागणार " जँक
" शू............ ईथे कीती ऊकळतय रे
कधी एकदाचं ईथून बाहेर पडेन असं झालयं मला........या ठीकाणी माझा श्वास आता कोंढू लागलाय " ज्युली
जवळजवळ आठ-दहा मिनटं तरी त्या काळ्या अंधारात तेही वाकून त्या दोघांना धडपडत पूढे जावं लागलं.
पण अखेर प्रतीक्षा संपली. आणी शेवटी दूरूनच प्रकाशाची केवीलवाणी चाहूल त्यांचे डोळे दिपावून गेली. आता त्या पाईपाचा सूरूवातीचा सर्कल त्याच्यां नजरेत भरत होता. ईजींन कम्पार्टमेटमधून एका मोठ्या जाड लोखंडी जाळीने तो बंद करण्यात आला होता.
त्या जाळीच्या बाहेरून येणाऱ्या तेजस्वी प्रकाशामूळे जँकला आता सर्वच ईजींन कम्पार्टमेटं स्पष्ट दिसू लागला होता.पाईपाच्या तोडांशी लावलेल्या जाळीच्या सर्कलला बाहेरच्या बाजूने एक छोटीशी कडी लावण्यात आली होती. त्यामूळे जोर लावूनही जँक ती लोखंडी जाळी ऊघडू शकत नव्हता.
जर ती कडी जँकला सहजच ऊघडता आली असती तर ते दोघंही त्या पाईपमधून बाहेर पडून ईजींन कम्पार्टमेटंमध्ये प्रवेश करू शकले असते.
पण खरंतर त्या जाळीच्या सर्कलमध्ये प्रत्येक तारेमधील अंतर खूपच कमी होतं ईतकं की फक्त एकच बोट जाईल एवढी जागाच त्या जाळीतील दोन तारांमधल्या अतंरात होती. आणी त्यातच भर म्हणून की काय ती छोटीशी कडीही जाळीच्या खालच्या भागात बसवण्यात आली होती. त्यामूळे प्रयत्न करून सूद्धा जँकच्या हाताची करंगळीही त्या कडीपर्यतं पोहोचू शकत नव्हती.
एवढ्या मेहनतीने कसेबसे ते दोघंही तीथपर्यतं पोहोचले होते. खरंतर आता माघार घेण्यातही काहीही अर्थ ऊरला नव्हता. कारण मागे जाऊनही त्यांच्या नशीबी केवळ निराशाच झळकणार होती.
त्यामूळे फार वेळ न घालवता त्या लोखंडी जाळीला बाहेरून असलेली कडी कशी खोलता येईल यावरच जँकने त्याचं संपूर्ण लक्ष केद्रींत केलं.
मागे ज्युली गर्मीमूळे घामाने चीबं भीजली होती. तीचा श्वास आता त्या छोट्याशा जागेत कोंडू लागला होता.
अखेर खूप वेळाच्या विचाराअंती जँकला त्याच्या प्रश्नाचं योग्य ऊत्तर मिळालं होतं. जँकने त्याच्या पायातील डाव्या बूटाची लेस(lace) बाहेर काढली.
मग त्या लेसचं एक टोक त्याने कडी वरून टाकून पून्हा आतमध्ये घेतलं.
म्हणजे आता तो त्या लेसच्या साहाय्याने ती कडी मागे पूढे फिरवू शकत होता. परंतू त्या वाकलेल्या परीस्तीतीत ती कडी ऊघडण्यासाठी खूपच अडचण येत होती. अखेर खूप वेळाने ती छोटीशी कडी मागे पूढे करत राहल्यामूळे ऊघडली गेली.
त्या बिकट परीस्थीतीतून जँकच्या अचाट कल्पनाशक्तीनेच त्याला पूढे जाण्याचा यशस्वी मार्ग दाखवला होता.
मग त्याने हळूच आजूबाजूच्या जागेचं निट निरीक्षण केलं. खाली कोणीच नाही याची खाञी करून त्याने तो जाळीचा गोलाकार सर्कल ऊघडला. मग त्याच्या पाठोपाठ ज्युली देखील त्या सर्कलमधून बाहेर आली.
खूप वेळ श्वास कोडंल्यामूळे तीची खूपच बिकट अवस्था झाली होती. पंरतू थोड्यावेळाने ती पूरती सावरली.
त्याठिकाणी सगळीकडेच काळ्या कोळशाचे ढीग पसरले होते. व त्याभोवती मधूनच कसलेतरी मोठमोठे ड्रम ठेवण्यात आले होते. जणू काही तेथील सर्वच भींत काळ्या रंगाने रंगवण्यात आल्या होत्या.
खरंतर ते दोघंही आता त्या जहाजाच्या विशाल कार्बो कम्पार्टमेट मध्ये येऊन पोहोचले होते.
क्रमशः
पुढील भाग लवकरच.............
भाग १० साठी
http//www.maayboli.com/node/61839
भाग ९ साठी
http//www.maayboli.com/node/61786
भाग ८ साठी
http//www.maayboli.com/node/61747
जिथे संवाद आहेत तिथे परिच्छेद
जिथे संवाद आहेत तिथे परिच्छेद दे, वाचायला सोपं जाईल.
थँक्सं तूमच्या सल्ल्याबद्दल
थँक्सं तूमच्या सल्ल्याबद्दल
पकड मस्त ठेवलायस....!!! जरा
पकड मस्त ठेवलायस....!!! जरा मोठे भाग टाकण्याचा प्रयत्न कर....!!!
धन्यवाद
धन्यवाद