नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे?
नेहमीप्रमाणेच आज ही.... एक खास किस्सा, जास्त वेळ वाया न घालवता आज सरळ सुरुवात करतो.
एक-दीड वर्षांपूर्वीची घटना, मी जेव्हा प्रायव्हेट कंपनी मध्ये "सिनिअर डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअर" कम "ऍडमिनिस्ट्रेटोर" म्हणून कार्यरत होतो, त्यावेळेची. जस्ट सहा महिन्यांपूर्वीच लागलो होतो, आणि तिसर्या महिन्यातच प्रमोशन. माझ्या नेहमी हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावामुळे मी बऱ्याच अचिव्हमेंट्स केल्या होत्या, त्यात प्रमोशन हे मेन होतं. त्यामुळे जबाबदाऱ्या ही भरपूर होत्या. मी आणि माझा आणखी एका सहकारी, आमच्यावर सरांचा भलताच विश्वास. सरांच्या(बॉसच्या) गैरहजेरीत इतर कामंही आम्हालाच बघावी लागत. त्यात माझा बॉस "नग" होता म्हटलं तरी चालेल. कधी काय करेल, काय बोलेल याचा नेम नाही.
एकदा असंच एका मीटिंग मध्ये जायचं होतं. सहसा सर आमच्या दोघांशिवाय कुठेच जात न्हवते. एक तर मी किंवा माझा सहकारी, किंवा आम्ही दोघे सोबत लागायचोच. एरव्ही आम्ही फोर व्हिलर ने फिरायचो, पण त्या दिवशी काय हुक्की आली सरांना काय माहित, म्हटले बाईक ने जाऊ. त्यादिवशी तो सहकारी गैरहजर होता त्यामुळे राहिलो मीच. मलाच सोबत जावं लागणार होतं, ते पण बाईकवर डबल सीट.? आता तर पुरती वाट. मनाची चलबिचल वाढली, कारण सर ड्रायव्हिंग फार विचित्र करायचे. कधी कोणाला जाऊन ठोकतील याचा नेम नाही, स्पीड ब्रेकर म्हणू नका, खड्डे म्हणू नका, एकदम सुसाट. मागे बसणारा बिचारा पांढराफिक्क पडायचा अक्षरक्ष:. त्यात आम्हाला जायचं होतं "बेलापूरला" म्हणजेच हायवे वरून. इच्छा नसतानादेखील मला सरांसोबत जावं लागलं. मी बाईकला घट्ट पकडून मागे बसलो. अगदी डोळे झाकून. निघायच्या आधी मी म्हणालो "सर, मोठ्या गाडीने जाऊया ना." सर म्हणाले "नही ना यार, बाईक से जल्दी आयेंगे." मी आपला मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. सुदैवाने आम्ही पोहोचलो व्यवस्थित. काम आटोपून निघालो. येताना थोडंसं पण एक्सपेन्सिव्ह सामान होतं. सर गाडी काढत होते. मी सामान पकडून मागे बसलो. गाडी चालू झाली, मी आपला सामान सावरण्यात गुंग होतो, इतक्यात ब्रेक दाबला, सर एकदम उभे राहिले, मी पकडलं नसल्याने घसरून डायरेक्ट त्यांच्या जागेवर, सुरवातीला मला काहीच समजलं नाही. मी समोर पाहिलं. बिल्डिंगचा सेक्युरीटी गार्ड आम्हाला आडवा आला होता, इतक्यात सर त्याच्यावर खेकसलेच एकदम जोरात, स्वतः कडे बोट करत म्हणू लागले, "इनिस्पेक्टर भिडे", "इनिस्पेक्टर भेंडे", "इनिस्पेक्टर भिडे". असं ३-४ वेळा बोलले. सेक्युरीटी आपला गप्प उभा राहून आमच्याकडे बघत होता. सर अजून उभेच होते, ते पुन्हा म्हणाले. "साहब, इनिस्पेक्टर भेंडे, साहब" "साब, इनिस्पेक्टर भेंडे, साहब" जाणे दो ना साब. प्लिज साहब "इनिस्पेक्टर साब" जाणे दो साब". (त्या दिवशी मी वोचमन ला गयावया करणारा पहिलाच इनिस्पेक्टर पहिला). इतक्यात तिथे हेड ऑफ सेक्युरीटी गार्ड आला, क्या हुआ साहेब.? त्याने विचारले. सर पुन्हा स्वतःकडे बोट करत म्हणाले "सर इनिस्पेक्टर भिंडे, सर". त्या हेड ने दुसऱ्या गार्ड कडे पहिले, तर तो म्हणाला "सर, ये गेट से सिर्फ इन है, आऊट दुसरे गेट से है. मैं कबसे बोलणे कि कोशिश कर रहा हूं, लेकिन ये सिर्फ यही कह रहे है " इनिस्पेक्टर भिडे/भेंडे."
.
.
.
परतीच्या वाटेवर मागे बसून मी आवाज होऊ नये म्हणून दातात हाथ पकडून लोटपोट हसत होतो......
किस्से आणि निरीक्षणं (भाग ४).....इनिस्पेक्टर भिडे/भेंडे
Submitted by बग्स बनी on 8 March, 2017 - 08:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यांचा अजून एक किस्सा,
त्यांचा अजून एक किस्सा, त्यांची कोणी तारीफ केली कि त्यांचा एकच डायलॉग फिक्स असायचा. "अपने पास सबकुछ है, गाडी है, बांगला है, ऑफिस है, बस नहीं है तो एक साइकिल"...... :०
कधी कधी प्रश्न पडायचा, हा माणूस मुद्दामहून असा करतो कि याला मध्ये मध्ये झटके येतात ???
नगच आहे खरा. किस्सा आवडला.
नगच आहे खरा. किस्सा आवडला. पहिल्या पॅरातले स्वकौतुक नको होते असे वाटले.
किस्सा भारि
किस्सा भारि
मी सामान पकडून मागे बसलो.
मी सामान पकडून मागे बसलो. गाडी चालू झाली, मी आपला सामान सावरण्यात गुंग होतो, इतक्यात ब्रेक दाबला, सर एकदम उभे राहिले, मी पकडलं नसल्याने घसरून डायरेक्ट त्यांच्या जागेवर, सुरवातीला मला काहीच समजलं नाही.>>>>

(No subject)
धन्यवाद...!! भुत्याभाऊ
धन्यवाद...!! भुत्याभाऊ
धन्यवाद...!! राया,
धन्यवाद...!! राया, पुढच्यावेळी प्रयत्न करीन.
साहब, इनिस्पेकटर भेंडे, साहब"
साहब, इनिस्पेकटर भेंडे, साहब" "साब, इनिस्पेकटर भेंडे, साहब" जाणे दो ना साब. प्लिज साहब "इनिस्पेकटर साब" जाणे दो साब". >>>> काही कळंलंच नाही मला. कोण कुणाला गयावया करत होतं नक्की?
वेडाच आहे बॉस :p :p
वेडाच आहे बॉस :p :p
काही कळंलंच नाही मला. कोण
काही कळंलंच नाही मला. कोण कुणाला गयावया करत होतं नक्की?>>>>>>> माझे एक्स्-बाॅस, गार्डला.
खरंतर त्यांचा टोनच तसा होता,
खरंतर त्यांचा टोनच तसा होता, गयावया करणारा. आणि जेव्हा खरंच गयावया करायची वेळ यायची त्या वेळी त्यांच तोंड बघण्यासारखं व्हायचं .

इन्स्पेक्टर भिंडे कोण?
इन्स्पेक्टर भिंडे कोण? तहकीकात वाला का?
इन्स्पेक्टर भिंडे कोण?
इन्स्पेक्टर भिंडे कोण? तहकीकात वाला का?>>>>>> तोच असावा.
मला पण नीट्स काही कळलं नाही.
मला पण नीट्स काही कळलं नाही.
काय नाही कळालं तुम्हाला?
काय नाही कळालं तुम्हाला?
तुमचा बॉस गार्डला गयावया करुन
तुमचा बॉस गार्डला गयावया करुन इन्स्पेक्टर भिंडे इन्स्पेक्टर भिंडे असं म्हणत होता का? पण गयावया का करत होता ?
कारण, त्याने आम्हांला अडवले
कारण, त्याने आम्हांला अडवले होते. आम्ही जिथुन बाहेर पडत होतो, तिथुन फक्त आत एंन्ट्री होती, आऊट ( बाहेर) होण्यासाठीचा गेट दुसरा होता. आणि फिरून जावे लागणार होते.
आणि ते आपण स्वतः इनिस्पेक्टर
आणि ते आपण स्वतः इनिस्पेक्टर आहोत, यासाठी सांगत होते कारण आम्हांला तिथुनच निघता यावे.
Lol Lol