क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाम्या Lol

"हल्ला चालेल, पण उर्दू आवरा" आठवले.

"आता भा दे मार आकडेवारी तोडून फा ला देणार " Happy Happy
"इंडियन फास्ट बोलर्सना सन्माननीय अपवाद वगळता असे ग्लोरीचे क्षण वेचूनच सांगावे लागतात" - एकदा ह्या विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे Wink

त्यांचे पेसर्स खूपच चांगले आहेत. इंग्लंडकडे ब्रॉड इन्ज्युरीमुळे जेन्युईन पेसरच नव्हता. हेझलवुड आणि स्टार्क खूपच टिच्चून खेळतायत.

कॅप्टन कोहली पुन्हा चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात बाद!
३ बाद ९१
मागच्या कसोटीत ३ बाद ९३ वरून १०५ पर्यन्त मजल मारलेली! त्यामुळे अजून काही बोलणार नाही!

धैर्य गमावले सारखे खेळत आहेत का असा प्रश्न पडतोय!

ऑस्ट्रेलियन लायन की दहाड! आठ विकेट.. भारत सर्वबाद 188..

पण ऑस्ट्रेलियाला आपणही 200 च्या आतच गुंडाळू ईथे असे वाटतेय. फक्त वॉर्नर आणि स्मिथ या दोघांनी आक्रमक खेळाने सामना पलटवायला नको. आपल्या मात्र कैक विकेट फालतूच होत्या..

जबरदस्त खेळले.
काय एक एक शॉट होते. लायनची तर पार बकरी बनवून टाकली. कोहली तर भन्नाट खेळत होता. तो सोडलेला बॉल खरतर सिक्सर मारण्यासारखा होता पण चुकीचे आउट दिले. बाकी सगळेच एकदम सुस्साट खेळले होते.

आवडले बुवा

बहुतेक त्या वोटींग मशिन सारखा काहीतर घोटाळा करत असावेत ऑसी बॉलर चेंडू मध्ये! Wink
सलग ३ डाव ढेपाळलो!
मागे एकदा इन्ग्रजांचा बॉलर जॉन लिव्हर ने अशीच आपली भंबेरी उडवलेली! तेंव्हा त्याने ग्रीस लावले बॉलला असे बोलले जायचे... Wink

चांगल्या गोलंदाजीसमोर ठिसूळ टॉप ऑर्डर ढेपाळली आणि बॉटम ऑर्डर बेलआऊट करायला येऊ शकली नाही. (हे मी आधीच सांगितले होते. Proud - अण्णा पावशे)

चुकलोच आपण !
काल मी म्ह्टल्याप्रमाणे पहिल्या सामन्यानंतर आपल्या आत्मविश्वासाच्या ज्या धज्जिया उडाल्या ते पाहता छानसा पाटा बनवायला हवा होता. त्यावर ५००+ मारून आत्मविश्वास परत मिळवायला हवा होता.. भले सामना अनिर्णित राहिला असता पण तिसर्‍या कसोटीत ऊतरताना आपली बॉडी लँगवेज बदलली असती.. पण आपण ऑस्ट्रेलियाला मोमेंटम तसेच ठेवण्यास मदत केली. हा सामना गेला तर २-० खेळ खल्लास!

अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.. उद्या बिनबाद ४० चे त्यांचे सर्वबाद २००-२२५ सुद्धा होऊ शकतात.. तरी प्रश्न हा राहील की आपले फलंदाज पुढच्या इनिंगमध्ये तरी स्तर उंचावू शकतील का..

टीम इंडीया पुढे गहन प्रश्न: मंगळवारी कुठे ट्रेकिंग ला जायचं? >>>> बंगरुळू मधे ट्रेकिंग करिता किल्ला, डोंगर वगैरे आहे का ????

मी फक्त सुरूवातीच्या काही ओव्हर्स पाहिल्या. राहुल ज्या स्टाइलने खेळत होता त्यावरून तो ९० पर्यंत कसा पोहोचला हे आश्चर्य आहे. त्याला टेस्ट क्रिकेटचा पेशन्स कमी दिसतो. कदाचित नंतर स्थिरावला असेल.

अभिनव मुकुंद ला आउट दिलेला पाहून प्रचंड आश्चर्य वाटले. लाइव्ह बघताना तो लेग च्या बाहेर चालला होता असेच वाटले. रिप्ले मधे स्टम्प च्या लाइन मधे दिसला. पण डावखुर्‍या बोलरने डावखुर्‍या बॅट्समनला ओव्हर द विकेट टाकताना पायावर बॉल लागला आहे, आणि त्या एलबीडब्ल्यू दिला गेला आहे असे मला या आधी पाहिल्याचे आठवत नाही. खूप रेअर असेल. कारण त्या दिशेने जाणारा बॉल स्टंप्स वर जाइल याची १००% खात्री अंपायर्स ना क्वचितच असेल. आणि एलबीडब्ल्यू १००% खात्री असल्याशिवाय द्यायचा नाही असा संकेत आहे.

एलबीडब्ल्यू १००% खात्री असल्याशिवाय द्यायचा नाही असा संकेत आहे. >> ऑस्ट्रेलियात बसलेला सचिन आठवला Happy

राहुलचा पेशन्स कमीच आहे. पण आज मी त्याला पन्नाशीनंतर खेळताना पाहिले, ईतरांच्या तुलनेत फारच कम्फर्टेबली खेळत होता. समोरून सारे बाद होतील पण हा होणार नाही असेच वाटत होते. शतक तर डिजर्व्ह करत होता. आठवणीतले झाले असते. पण आठ विकेट पडल्यामुळे गेला उतावीळ फटका खेळून ..

एखादा हुषार व अव्वल क्रमाकावर सहज येवूं शकणारा मुलगा कॉपी करण्याच्या वाईट संवयीमुळे गोत्यात यावा, तसं खराब विकेटस बनवण्याच्या आपल्या संवयीमुळे आपलं तर होत नसावं ना ? Wink

अहो सतत इंटर्नल एक्झामचे सोप्पे सोप्पे पेपर सोडवून एकदम पुणे युनिव्हर्सिटीच्या एक्झामला बसल्यासारखे झालेय भारतीय संघाचे!
त्यातुन ऑस्ट्रेलिया म्हणजे M3 चा पेपर Wink

सलग दुसर्‍या कसोटीमधे सुद्धा खराब खेळपट्टी कशी दिली ? Uhoh
स्मिथ ने तब्बल ५६ चेंडू खेळून अवघे ७ धावा काढू शकला.

खेळपट्टी बनवणारे नशेत खेळपट्टी तर नाही बनवत ?

ज्या टीम च्या नावावर ३ कसोटींमधे सलग ६०० च्या वर स्कोर करण्याचा जागतीक विक्रम नोंदवला गेला त्याच टीमच्या नावावर अवघ्या काही दिवसातच सलग ३ इनिंग मधे २०० च्या आत ऑल आउट होण्याचा सुध्दा विक्रम नोंदवला गेला.

हॅट्स ऑफ

पण जडेजा आणि अश्विन पेक्षा लायन आणि ओकेफी श्रेष्ठ स्पीनर म्हणावेत का सलग तीन डावातील बॉलिंग बघता.

विराटचे नेतृत्वगुण अशा प्रेशर मॅच मधे कमी पडत आहे. रिव्ह्यु वाया घालवणे, विकेट घेणार्‍या बॉलरला अचानक बाजूला करणे, बॉलरचा स्टँड न बदलने, जिथून बॉल जात आहे तिथे लगेच फिल्डर उभा करने. बर्‍याच प्राथमिक चुका होऊ लागल्या आहे. बहुदा स्वतःची फलंदाजी होत नसल्याने स्वतः वरचा विश्वास कमी झाला आहे.

रिव्ह्यु वाया घालवणे, >>>
हम इंडियन्स की टायमिंग गलत होती है.. चाहे वो VRS हो या DRS !!!
-- विरु उवाच Happy

सलग दुसर्‍या कसोटीमधे सुद्धा खराब खेळपट्टी कशी दिली ?
खेळपट्टी खराब आहे की नाही हे सामना संपल्यावर कळेल,
फक्त भारतीय संघ फलंदाजी करू शकत नसेल, गोलंदाजी करू शकत नसेल पण ऑस्ट्रेलिया मात्र भारताला ३३३ धावांनी हरवू शकतो, तर खेळपट्टी पेक्षा आपल्या खेळात काही कमी तर पडत नाही ना हे आधी तपासायला पाहिजे.
त्याच खेळपट्टीवर त्याच नियमांनी एक संघ भरपूर धावा काढतो, विकेट्स घेतो नि दुसरा नाही, यात खेळपट्टीखेरीज जास्त महत्वाचे काय हे बघायला पाहिजे.

Pages