क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस फा! कधीच त्याची गोडी कमी होणार नाही. 'आम्ही हे प्रत्यक्ष पाहिलंय' अशा गोष्टी येणार्‍या पिढ्यांना लोक सांगतात, त्यातलीच एक.

आमच्या ऑफिस मधला एक अमेरिकन मित्र बरेच दिवस आमच्याकडून या कप बद्दल ऐकत होता. तो मला म्हंटला मलाही एकदा एक मॅच पाहायची आहे. त्याला मी आधीची झिम्बाब्वे विरूद्धची दाखवायला घरी नेणार होतो. पण ऑफिस मधली चर्चा ऐकून त्यानेच हट्ट केला की ही भारत-पाकच मला पाहायची आहे - कारण एकतर ऑफिसमधे एक दोन जणही येणार होते आणि चर्चेवरून ही टोटल खुन्नसवाली मॅच असणार असे त्याच्या लक्षात आले होते. त्याप्रमाणे तो आला, पूर्ण रात्रभर मॅच बघत, इतरांप्रमाणेच चहा व इतर खाणेपिणे करत टोटली सामील झाला. आमच्याकडे तेव्हा वीसेक जण तरी होते. याला हळुह्ळू थोडे नियमही समजले. ड्रिन्क्स ब्रेक झाला की तो हसायचा. इनिंग्ज ब्रेक मधे ऑफिसमधल्याच एका कलीगबरोबर रात्री आमच्या कॉम्प्लेक्स मधे चक्कर मारून आला तीन-साडेतीन वाजता, आणि परत पूर्ण भारताची इनिंग बसला. शेवटी वकार ने ३-४ रन्स राहिलेले असताना वाइड बॉल टाकल्यावर त्यावर हसून टीका ("at least don't make it easy") करण्याएवढे त्याला कळू लागले होते. पुढे अनेकदा तो मॅचेस बद्दल विचारत असे. त्याला मी इतकेच सांगितले होते की तुला जर कोणी भारतीय भेटला तर सचिन ची 'ती' इनिंग मी रात्री बसून लाइव्ह पाहिली आहे असे त्याला सांग आणि त्याचा चेहरा कसा होतो ते बघ Happy

वाह फारएण्डा, काय आठवणी जाग्या केल्यास!!

http://www.maayboli.com/node/57879

ही लिंक माझ्या लेखाची जाहिरात म्हणून देत नाहीये. केवळ 'अगदी तस्साच अनुभव' मलाही आणी तुझ्या - माझ्या सारख्या असंख्या क्रिकेट वेड्यांना आला होता, ह्याची आठवण म्हणून देतोय. एखादा क्षण पहायला आपण जिवंत होतो अशी धन्यता वाटायला लावणार्या काही क्षणांमधे तो दिवस कोरून ठेवलाय.

क्रिकेट हा रिकामटेकड्या लोकांनी बघायचा आणि अक्कलशून्य लोकांनी खेळायचा खेळ आहे हे सेहवाग ने सिद्ध केले. त्याला धन्यवाद द्यावेत तितके कमीच. >>

राईट ! त्याला व्यक्ती म्हणून काहीच विचार नसावेत. फक्त तो क्रिकेटर असावा आणि त्याने त्याला वाटलेले काहीही कुणाला बोलून दाखवू नये कारण, ते बोललेले, काही लोकांना आवडणार नाही, तर त्याने त्या लोकांचा विचार करून आपले मत कधीही प्रदर्शित करू नये.

फेरफटका - पुन्हा तो लेख वाचला. सही आहे. आता असेही लक्षात आले की तेथे प्रतिक्रियांमधे हीच माझी वरची पोस्ट ऑल्मोस्ट अशी च्या अशी लिहीलेली होती Happy

असाम्या Happy

केदार, इग्नोर माडी. ह्या धाग्यावर कुठे त्या सगळ्या गोष्टींना आणायला प्रोत्साहन देतोस. Happy ते काहीही चुकीचं बरोबर जे असेल, ते बोलण्याची ही जागा नाही. सोडून द्या, उत्तर देऊ नका.

हम्म. तेच विचार करून दुसर्‍या धाग्यावर लिहिले नव्हते. पण इथेही तेच. असो. आता नाही लिहिणार.

फा आत्मचरित्र लिहिणार आहे का? वा, वा. Proud

भास्क्राचार्य, सहमत!

फारएण्ड, १४ वर्षानंतरही ती मॅच ईतकी डिटेल्स सकट आठवते ही खरच कमाल आहे.

बंगळूरू मधे ऑस्ट्रेलिया ने पुण्याचीच टीम खेळवणार असल्याचं जाहीर केलय. भारताच्या टीम मधे काही बदल होतील असं वाटतय का? मला वाटतं तीच टीम खेळेल. काय अंदाज?

भाऊ गांगूली काय बोललाय हे पाह Happy

About the Pune pitch, Ganguly said, "When you prepare such pitches as the one in Pune and I know the curator was not happy, then you give average bowlers a chance and I am not belittling Steven O'Keefe.

"But he becomes a wicket-taker which he won't be normally on a batting pitch. India need to prepare good pitches, take the Test match to day four an then take the game forward."

भारताच्या टीम मधे काही बदल होतील असं वाटतय का? मला वाटतं तीच टीम खेळेल. काय अंदाज? >> फे फे इशांत नि यादव वगळता अजून काहि बदल करायची गरज वाटत नाही. एक मॅजिकल मोमेंट हवी ज्याने मोमेंटम परत येईल. Aussies आता खूपच बडबड करत आहेत.

शामी फिट होईपर्यंत ईशांत नावाचा गोटा आपण खेळवत राहू. 'काही काही लोकं कसलं नशीब घेऊन जन्माला येतात राव' छापाच्या कॉमेंट्स रवी शास्त्री, ईशांत सारख्यांसाठीच खास राखून ठेवायला हव्या.

यादव च्या जागी लगेच बदल होणं अवघड आहे. कुलदीप नवीन आहे आणी मिश्रा ४-१० ओव्हर्स मधे जे करू शकतो ते ३०-३५ ओव्हर्स टिकवून ठेवत नाही.

"एक मॅजिकल मोमेंट हवी ज्याने मोमेंटम परत येईल. Aussies आता खूपच बडबड करत आहेत." - मॅजिकल मोमेंट साठी लिहा अथवा भेटा विराट कोहली विथ सम सपोर्ट फ्रॉम चि. विजय आणी कु. चेतेश्वर. मा. रहाणे फॉर्मात आले तर बरं होईल. बरेच दिवस चाललाय लीन पॅच. ऑसीज ना बडबड करायचं लायसन्स आपणच गिफ्ट पॅक करून घरपोच डिलिव्हरी करून पोहोचवलय. ते हिसकावून घेतल्याशिवाय ते थांबणार नाहीत.

फेफ, माझंही इशांतविषयी असंच मत होतं अगदी अलीकडच्या काळापर्यंत, पण त्याने श्रीलंका सिरीज जिंकवून दिल्यापासून माझं मतपरिवर्तन झालं आहे. अगदी आत्ता बांग्लादेशच डाव गुंडाळण्यात तो सहभागी होता. बराच काळ तो अत्यंत 'कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस' होता हे अगदी खरं आहे, पण गेल्या २-३ वर्षांमध्ये पाहिलं, तर तो इतका वाईट नाही. तसंही पर्थ २००८, मोहाली २०१०, लॉर्ड्स २०१४ अशा भारी विजयांमध्ये सहभागी फास्ट बॉलरला बोल लावणं माझ्या दृष्टीने जरा अवघडच आहे.

दादा सोबत सहमत. Happy

इंशातच्या काही स्पेल ( ऑस्ट्रेलिया मध्ये अन श्रीलंकेविरुद्ध ) ह्या मेस्मराईसिंग आहेत. त्यात खूप पोटँशियल आहे पण त्याचा उपयोग तो करू शकत नाही असे मला वाटतं. भूवी असायला हवा हे ही वाटतं. Happy

इशांतबद्दल सहमत. त्यात त्याला आता दुसरीकडून झहीर ही नाही. जरा स्विंग सपोर्ट मिळाला तर तो मॅच फिरवेल ऑसीजविरूद्ध सुद्धा.

दादाचे बाकी काहीही असो (म्हणजे तसे बाकीसुद्धा चांगलेच आहे), पण मुलाखतीत बोलणे कायम चांगले असते. बरीच वाक्ये आणि अर्थ काहीच नाही असे तरी नसते Happy

इशांतकडून भारीच राव अपेक्षा आहेत तुम्हांला!.... असोत बापड्या Wink

Ganguli speaks his heart out ..... उगाच पॉलिटीकली करेक्ट वगैरे बोलायच्या भानगडीत पडत नाही तो!

>>बरीच वाक्ये आणि अर्थ काहीच नाही असे तरी नसते 
बाकी हे कुणाबद्दल म्हणे? Wink

ऑसीज ना बडबड करायचं लायसन्स आपणच गिफ्ट पॅक करून घरपोच डिलिव्हरी करून पोहोचवलय. >> भारताच्या आजी खेळाडूंनी कुठे बडबड केलेली रे. बडबडणारे सगळे आपले नि त्यांचे माजी खेळाडू होते.

त्यात खूप पोटँशियल आहे पण त्याचा उपयोग तो करू शकत नाही असे मला वाटतं. >> +१ . आपल्याकडे खोर्‍याने विकेट्स घेणारे फास्ट बॉलर्स नसल्यामूळे त्याला विकेट्स मिळत्नाही हा भाग नेहमीच त्याच्या विरोधात जात राहणार. नुसता एक बाजू लावून धरणारा बॉलर म्हणून चालायला त्याच्या बरोबरचा बॉलर स्टेन, स्टार्क, रबाडा ह्यांच्या तोडीचा हवा.

एक जाम भारी स्टॅट आहे, ते इशांत किती युजलेस होता, ते दाखवायला पुरेसे आहे. हे फारसे कुठे म्हटले गेल्याचे आठवत नाही, पण मला हे तेव्हा माहीत होते - जेव्हा इशांत शर्माने ५० कसोट्या पूर्ण केल्या, तेव्हा (विकेटकीपर्स सोडून) १८७७ पासून त्या वेळपर्यंत ५० कसोट्या खेळलेल्या जगातल्या सर्व (आजी, माजी, सर्व) खेळाडूंमध्ये तो एकमेव खेळाडू होता, ज्याने ५०० धावाही पूर्ण केलेल्या नव्हत्या, आणि १५० किंवा जास्त बळीही घेतलेले नव्हते. इन शॉर्ट, द मोस्ट युजलेस क्रिकेटर ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज एव्हर अ‍ॅट दॅट टाईम. Lol

सिरीयसली? बोलर्स च्या बाबतीत हे फारच अन्यायकारक आहे. इशांत तेव्हा "आपुन ने दो इच मारा, लेकिन सॉलिड मारा ना?" कॅटेगरीत होता. इम्पॅक्ट बोलर. पर्थ २००८ ला त्याने त्या पूर्ण मॅच मधे तीनच विकेट्स काढल्या. पण त्यातल्या दोन रिकी पॉण्टिंग च्या होत्या. मॅचविनिंग.

लॉर्ड्स सारख्या एकाच इनिंग मधे ५+ विकेट्स तो नंतर काढू लागला. पण झहीर बरोबर बोलिंग करताना दोघांची जोडी अत्यंत भेदक होती. कारण प्रेशर दोन्हीकडून असे. याच काळात भारताने फास्ट पिचेस वर परदेशात सुद्धा चांगला खेळ केलेला आहे. २०११ च्या सुरूवातीला नं. १ ला ही पोहोचले. इशांतचा नक्कीच हातभार होता त्यात.

सिरीयसली? बोलर्स च्या बाबतीत हे फारच अन्यायकारक आहे. >> बट ही वॉज द ओन्ली वन एव्हर ज्याने दोन्ही केलेले नाही. ५० कसोट्यांमध्ये १५० बळी म्हणजे कसोटीमागे ३ बळी सरासरी. खूप नाहीये मागणी. तू म्हणतोयस ते अगदी सुरवातीला. पर्थ वगैरे खूप आधी होते. पण ५० कसोट्यांमध्ये ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज इम्पॅक्ट खूपच कमी आहे.

"भारताच्या आजी खेळाडूंनी कुठे बडबड केलेली रे. बडबडणारे सगळे आपले नि त्यांचे माजी खेळाडू होते." - कोण बोलतय त्याच्याविषयी मी काही लिहीत नव्हतो. आपल्या परफॉर्मन्स ने त्यांना ती मोकळीक दिली असं मला म्हणायचं होतं.

ईशांत गेली १० वर्ष खेळतोय. ७५ टेस्ट्स खेळलाय. ईतक्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही त्याच्या ग्लोरी चे क्षण असे वेचून वेचून सांगावे सांगावे लागतात ह्यातच त्याच्या करियरची ईतिकर्तव्यता आहे. जसं मोक्याच्या क्षणी किंव अडचणीच्या वेळी कोहली शामी च्या हातात बॉल ठेवताना दिसून आलाय, किंवा शामी-यादव बॉलिंग करताना कधीही विकेट पडेल असं वाटत होतं (जे झहीर च्या बाबतीत होतं, कुंबळे च्या बाबतीत होतं, हरभजन च्या बाबतीत होतं, आता अश्विन च्या बाबतीत आहे) ते ईशांत च्या वर उदाहरण दिलेल्या sporadic spells चा अपवाद वगळता कधी आढळून आलेलं नाहीये. आज ईतक्या सिनीऑरिटीनंतर सुद्धा तो केवळ शामी च्या ईंज्युरी मुळे खेळतोय.

"भारताच्या आजी खेळाडूंनी कुठे बडबड केलेली रे. बडबडणारे सगळे आपले नि त्यांचे माजी खेळाडू होते." - कोण बोलतय त्याच्याविषयी मी काही लिहीत नव्हतो. आपल्या परफॉर्मन्स ने त्यांना ती मोकळीक दिली असं मला म्हणायचं होतं >> माझा मूळ कॉमेंट सध्याच्या ऑसीजच्या कॉमेंट्ला अनुसरून होता रे. बहुतेक जणांनी 'We had to shut few mouths' असा सूर आळवलाय म्हणून वैताग आला. पहिल्या सामन्याआधी वेगळा सूर होता म्हणूण बदललेल्या टोनचे आश्चर्य वाटले.

शमी injured असल्यामूळे इशांतला खेळवायला लागतेय ह्यात आपले रिसोर्सेस किती तळाला पोहोचले आहेत हे लक्षात येतेय.

ईतक्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही त्याच्या ग्लोरी चे क्षण असे वेचून वेचून सांगावे सांगावे लागतात ह्यातच त्याच्या करियरची ईतिकर्तव्यता आहे. >> इंडियन फास्ट बोलर्सना सन्माननीय अपवाद वगळता असे ग्लोरीचे क्षण वेचूनच सांगावे लागतात. Happy

एक सुंदरसा बॅटींग पिच. भारताची टॉस जिंकत पहिली ब्याटींग. ऑस्ट्रेलियन स्पिनर्सना त्यांची जागा दाखवत पावणे दोन दिवस खेळत 500+ धावा.. पुढे जे काही होईल ते .. अनिर्णित तर अनिर्णित.. पण मागच्या सामन्यातून उभारी घ्यायचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. बाकी उद्याचा पेपर कसा निघतोय ते उद्याच समजेल.

अनिर्णित सोडले तर बाकीच्याला 'आमेन' ऋन्मेष Happy

२०११ च्या सुरूवातीला नं. १ ला ही पोहोचले. इशांतचा नक्कीच हातभार होता त्यात. >> ते कसे? >> भा - कसोटीत बोलर चा परफॉर्मन्स नेहमी त्याच्या विकेट्स मधेच क्वाण्टिफाय (हा शब्द तुम्हाला आवडेल Happy ) करता येइल असे नाही. पहिल्या स्पेल मधे दोन्ही बोलर्स टाइट लाइन ठेवतात. बॅट्समन फ्रस्ट्रेट होतो. मग पहिल्या चेंज ला आलेल्या बोलर ला रन काढायच्या प्रयत्नात आउट होतो. ही विकेट त्या तिघांची असते खर्‍या अर्थाने. हंटिंग इन पॅक्स.

Pages