ए ssss झब्बू! - मराठी खाद्यपदार्थ

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:47

बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती Happy

हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझं माझं जमेना... तुझ्यावाचून करमेना ...अस्स झालाय या धाग्याचं.... खाऊ की गिळू....

नलिनी, माझ्या पातेल्यातला घेतलास का? >> हो. तुम्ही बनवलात आणि मी तो वाढायचे काम केले. Happy

सई, देवकी, सर्वांना धन्यवाद!
सई, ते लाडू एवढे छान होण्याचे श्रेय केवळ दिनेशदादाच्या पाकृला.

IMG_20170303_125507.jpg

फोटो टाकताना पुरेवाट झाली.हा कालचा मेनू,दाण्याची चटणी,लिंबाचे लोणचे,गाजराच्या चकत्या,कोबीची भाजी आणि पुलाव्/वाटाणेभात.

alt="1488549100273229516618.jpg" />1488549100273229516618.jpg

मराठी नाही म्हणता येणार्,पण लाडका ग्रीन टी.

Nalini
Aho tumhi kay dhamalach udvat ahat.

मराठी लोकं सगळे हावरट आहेत. मराठी सणांवर एक पोस्ट पडतेय तेवढ्या वेळात ईथे सात. असे वाटते नैवेद्य खायला मिळावा म्हणूनच सण साजरे करतात Happy

हा घ्या ख र व स !
खाता खाताच आठवले, अरे मायबोलीवर फोटो टाकायला हवा Happy

kharwas.jpg

नलिनी, शोभा०१, राखी, सशल, मुग्धाकेदार, देवकी वगैरे काय फोटो टाकताहेत...

नलिनी , तुमचे पदार्थ तर खासच... लाडु काय, चिवडा काय...

आजकाल मराठी सामारंभात पण असे पदार्थ मिळत नाहीत. ते छोले वगैरे मला बिलकूलच आवडत नाही.. मराठी समारंभ असेल तर

वा ऋन्मेष ख र व स धन्यवाद
कसला भारी आहे तो तोंडातून धार लागलीय बघूनच
तुम्हाला लवकरच सई बरोबर walk करायला मिळो. : )

मसाला कारलं, रस्सा कारलं, कैरी लोणचं, अनारसे, थालीपीठ,श्रीखंड, मिसळ वरून गारेगार आइसक्रीम काय जबरी व्हरायटी आहे

Pages