Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१००/७. पुजारा गॉन.
१००/७. पुजारा गॉन.
ऑसिज ३ ऱ्या डावात ७० ओव्हर
ऑसिज ३ ऱ्या डावात ७० ओव्हर खेळतात त्या खेळपट्टी वर आपण दोन्ही डावात मिळून तेवढ्या ओव्हर खेळलो नाही हे विशेष!!
जिथे स्मिथ १०० मारतो तिथे आपण
जिथे स्मिथ १०० मारतो तिथे आपण सगळॅ मिळून १०० मारू शकत नाही
जिथे स्मिथ १०० मारतो तिथे आपण
जिथे स्मिथ १०० मारतो तिथे आपण सगळॅ मिळून १०० मारू शकत नाही
१०२/९. झाले बुवा १००.
१०२/९. झाले बुवा १००.
१०७ ऑल आउट. आधीच्या डावात २
१०७ ऑल आउट. आधीच्या डावात २ धावांची भर घातली. ऑसीज विन बाय ३३३ रन्स.
(No subject)
घरच्या मैदानावर हा आपला
घरच्या मैदानावर हा आपला सर्वात वाईट (धावांची संख्या बघता) परफॉर्मन्स असेल का?
कोह-लीला
कोह-लीला
त्याला बॉल समजू नये ? समोर शेन वॉर्न सारखा गोलंदाज असता तर एकवेळ मान्य करु. पण हा अगदी नवखा स्पिनर ६-६ विकेट घेऊन जातो. याचा अर्थ काय ? भारतीय फलंदाजांना वळलेले चेंडू कळत नाही? यापेक्षा तर भारत-अ टीम चांगली खेळली.
केवळ ७४ ओव्हर दोन्ही डावात
केवळ ७४ ओव्हर दोन्ही डावात ह्यापेक्षा वाईट काय असू शकते!!
दीपस्त, नवखा असला, तरी तो
दीपस्त, नवखा असला, तरी तो बराच चांगला स्पिनर आहे. मी ए टीमला बघायला ब्रेबॉर्नवर गेलो होतो, तिथे त्याला बघितले. तो, आणि रेन्शॉ, ह्या दोघांना ऑसीजनी समुद्रात फेकले आणि ते उत्तम पोहणारे मासे निघाले. आता त्यांच्यासाठी विशेष जाळी बनवायला लागतील. ऑसीज श्रीलंका टूरपासून चांगलेच शिकलेले आहेत. आपलीच अंडरकुक्ड बॅटींग ह्या निमित्ताने उघड झाली. त्यांची बॅटींग खूपच मन लावून होते आहे. दे वॉक्ड द टॉक. त्यांनी म्हटले होते, की आम्ही स्पिनर्सना एकच लाईन खेळणार, आणि त्यांनी ते व्यवस्थित एक्झीक्युट करून दाखवले. स्मिथचे शतक हे मी पाहिलेल्या शतकांपैकी वन ऑफ द बेस्ट होते. त्याला ४ चान्सेस मिळाले, हेच एक काय ते म्हणता येईल, पण तो खेळतही खूप चांगला होता. लक फेवर्स द डिलीजंट समटाईम्स.
चांगला स्पिनर आणि सर्वोत्तम
चांगला स्पिनर आणि सर्वोत्तम स्पिनर याच्यात फरक आहे.
नशिब कोहली आणि कंपनी समोर शेन वॉर्न सारखा एक ही दर्जेदार स्पिनर नाही आहे. तरी ही हालत झाली. द्रविड सारखा खेळपट्टीवर ठाण मांडून बसणारा कोणीच नाही. कोहली ज्या चेंडू वर आऊट झाला तो तर अगदीच टॉपस्पिन टाईपचा होता जो पडून बाहेर न वळता आत वळला. आणि तो टप्पा सुध्दा कोहलीपासून लांब होता तरी कोहलीला तो स्पीन कळू नये? इतका ही नवशिका नाही आहे. मग वॉर्न मुरली सारखे जे ६ वेगवेगळे चेंडू टाकण्यात माहीर होते अशांसमोर तर पुर्ण १०० काय ५० सुध्दा करता आले नसते.
कदाचीत हा एक बॅडलक म्हणून बघितले जाईल पुढच्या कसोटीपासून जिंकायला सुध्दा लागू पण कोहली फस्ट्रेशन मधे फार फार चुका करतो. रिव्हु सुध्दा त्याला निट घेता येत नाही. प्रचंड रिव्ह्यु वाया घालवले. अशा वेळी धोनी अतिशय शांत असतो आणि विचार करत राहतो. पण कोहली थोडा जास्तच आक्रमक होऊन पुर्ण लक्ष उडवून लावतो. उमेश यादव ला गोलंदाजीसाठी फार उशिराने आणले. जेव्हा त्याने आधीच्या इनिंगमधे सुंदर रिवर्स स्विंगिंग गोलंदजी केली होती. पण त्याच्यावर विश्वास टाकण्याऐवजी कोहलीने स्पीन वर जास्तच दबाव टाकला. १०-१५ ओव्हर स्पीन चालली नाही तर बॉलरचा एंड बदल अथवा बॉलर थोडा बदलून बघितला नाही.
दुसर्या कसोटीमधे बहुदा धडा घेतील.
भा खुश तो बहोत होंगे तुम आज ?
भा खुश तो बहोत होंगे तुम आज ?
आपले स्पिनर्स त्यांच्या नॅचरल स्पिनमुळे चेंडू गरजेपेक्षा जास्त वळवायला लागतात, ज्यामुळे बॅट बीट होते, पण विकेट्स मिळत नाहीत. >> कोहलीची मुलाखत ऐकलीस का ? तो हेच म्हणालाय एकदम. हा सामना हरल्याचा दोष बॅटसमन वर जातो ह्याबद्दल त्याने १००% मान्यता दिली आहे. पार्टनरशिप झाल्या नाहित ह्याबद्दल सहमती दर्शवली आहे.
http://www.rediff.com/cricket/report/we-needed-something-like-this-for-a...
स्मिथला पाच जीवदाने दिली आहेत, चार नाहीत. पहिल्या इनिंगच्या धक्क्यातून बाहेर आलेच नाहीत.
तिन्ही दिवस सामना मैदानावर
तिन्ही दिवस सामना मैदानावर पाहिला (खर तर ५ दिवसाच तिकिट होत , पण ...)
हार जीत तर चालू असतेच . पण २ वेळा ३५ ३५ ओव्हर मधे ऑल ऑट ? तेही दुसर्या इनिंगमधे ऑसी ८० ओव्हर खेळले असताना ?
मी ऑसी टीमच्या ट्रॅव्हलींग सपोर्ट्र्ससोबात बसलो होतो, त्यानाही हाच प्रश्न पडला होता की , आपली बॅटींग फॉर्मात असताना रँक टर्नर बनवायचे का ?
आणि अशा २.५ दिवसाच्या मॅचने सगळ्यांचे जे नुकसान होते त्याला जबबदार कोण ?
सेहवाग, सचिन, द्रविड,
सेहवाग, सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि दादा .... हे आपल्याकडे यंदा नसताना ईतके स्पिनरफ्रेंडली विकेट बनवून समोरच्या संघातील स्पिनर्र्सना उत्तेजित करणे अंगाशी येऊ शकते याची प्रचिती आली.
पहिल्या डावात फारच बंडल खेळले, फालतू विकेट टाकलेल्या.
आज मात्र खेळपट्टी जास्त हरकत करत होती. तरीही पहिल्या इनिंगपेक्षा दोन धावा जास्तच मारल्या हे कौतुकास्पद.
पुढच्या सामन्यात बहुतेक नायर आत येईल.
जयंत बहुतेक जाईल.
नायर त्याच्या जागी येत ६ फलंदाज खेळवतात की मिश्राला त्याच्या जागी आणत ५ गोलंदाजांसोबतच जातात
की जयंतच्या जागी मिश्रा आणि रहाणेच्या जागी नायर असे काही करतात...
बदल तर करावाच लागणार, नाहीतर ईथून ऊठणे कठीण होईल.
टॉस हमखास जिंकणारा कर्णधार
टॉस हमखास जिंकणारा कर्णधार असेल तेंव्हाच फिरकीला पोषक खेळपट्टी बनवावी, असं तर नसेल ?
एका सामन्यातल्या दारूण पराभवावरून संघाला अगदींच कमकुवत समजणं चूकीचंच [ व या आपल्या संघाला तसं समजणं तर साफच चूकीचं] पण आपण फिरकी खेळण्यात इतरांपेक्षां वाकबगार आहोत, ह्या भ्रमात रहाणं मात्र आपण केंव्हांच सोडायला हवा होता हें कालच्या कसोटीने अधोरेखित केलंय .
'टर्नींग विकेट असल्या तरीही गोलंदाजाना कसब दाखवूनच बळी मिळवावे लागतात' हें कोहलीचं आधीच्या दौर्यांवेळच विधान व ' पहिल्या डावात विरुद्ध सघाला मोठी आघाडी मिळाल्यावर फलंदाजांवरच्या दडपणामुळे एखादा 'पार्ट टाईम' गोलंदाजही त्यांच्या विकेटस घेवू शकतो ', हें कोहलीचं कालचं विधान ! कोहली, बी अ स्पोर्ट, प्लीज !!!
मॅच हारल्याचे वाईट नाही
मॅच हारल्याचे वाईट नाही किंबहुना हारजीत खेळात असतेच!
पण ज्या पद्धतीने आमची बॅटिंग बॉलिंग आणि मह्त्वाचे म्हणजे फिल्डिंग झाली आणि आम्ही मॅच हारलो. दोन्ही डावात नवोदित स्पीनर्स समोर फलंदाजीचा पत्यांचा बंगला झाला. अगदी किंगस्टन मध्ये होल्डिंग, रॉबर्ट, मार्शल किंवा पर्थला थॉम्सन - लिली समोर सुद्धा आमचे फलंदाज एवढे गर्भगळीत झाले नव्हते!
खेळपट्टी फिरकीला अत्यंत अनुकुल असली तरी तुमच्या जागतिक नं. १ बॉलर समोर ते खेळले आणि २८०+ धावा तिसर्या डावात काढल्या गेल्या!
ह्यालाच म्हणतात अभ्यासात आम्ही कमी पडलो!
छे! ह्या मॅच च्या निकालानंतर
छे! ह्या मॅच च्या निकालानंतर ईतकं फ्रस्ट्रेशन आलं होतं की गेले दोन दिवस ह्या धाग्यावर नुसता 'वाचनमात्रे' येत होतो. आज जरा भर ओसरलाय. हारण्याचं दु:ख वेगळं असतं. हे अजिबात लढाऊवृत्ती न दाखवल्याचं, मानहानीकारक पराभव पत्करल्याचं दु:ख होतं. चौथ्या ईनिंगला टिच्चुन, जबरदस्त फाईट देऊन हारलो असतो, तर लढण्याचं सुख तरी लाभलं असतं. बाकी टेक्निकॅलिटीज जाऊ द्या! ही टीम चांगली आहे, अननुभवी आहे, पण लढाऊवृत्तीत कमी पडायला नको. लढाऊवृत्ती म्हणजे, दाढी वाढवणं, शिव्या देणं, स्लेजिंग करणं नव्हे, तर प्रतिकुल परिस्थितीत टिच्चुन प्रतिकार करणं.
सहज आठवायला गेलो, तर गंभीर ने न्यूझिलंड मधे चौथ्या ईनिंग मधे एकदा सेंच्यूरी मारून मॅच वाचवली होती आणी शिखर धवन ने एकदा (न्यूझिलंड मधेच) सेंच्यूरी मारून मॅच वाचवायचा प्रयत्न केला होता, हे दोन प्रसंग सोडले तर गेल्या काही वर्षात भारताने टेस्ट वाचवल्याचं उदाहरण मला तरी आठवत नाही. कुणाला आठवत असेल, तर सांगा, म्हणजे मझा आठवणींचा डेटाबेस अपडेट करता येईल.
कोहलीने इंग्लंड विरुद्ध पहिली
कोहलीने इंग्लंड विरुद्ध पहिली टेस्ट वाचवली होती असे म्हणू शकतो का ? तसेच Down Under जी पहिली टेस्ट हरलो ती जवळ्जवळ जिंकत आलो होतो. "गेल्या काही वर्षात भारताने टेस्ट वाचवल्याचं उदाहरण मला तरी आठवत नाही. " हे गेल्या काही वर्षात पेक्षा ही बरेच rare आहे असे म्हणू शकतो.
एका सामन्यातल्या दारूण पराभवावरून संघाला अगदींच कमकुवत समजणं चूकीचंच [ व या आपल्या संघाला तसं समजणं तर साफच चूकीचं] >> ह्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणेन, ह्या सामन्या आधी जर कोणालाही विचारले असते तर ९९% लोकांनी हाच संघ (इशांत, जयंत यादव असे एखाद दोन फेरफार वगळता) निवडला असता. एव्हढेच काय पुढच्या सामन्यासाठीही हेच एव्हढेच अचूक विधान होईल
ह्या सामन्या आधी जर कोणालाही
ह्या सामन्या आधी जर कोणालाही विचारले असते तर ९९% लोकांनी हाच संघ (इशांत, जयंत यादव असे एखाद दोन फेरफार वगळता) निवडला असता. एव्हढेच काय पुढच्या सामन्यासाठीही हेच एव्हढेच अचूक विधान होईल>>>
सहमत. पण अधिक परिपक्वता अपेक्षित आहे.. चेंडू वळत होते तरी भयानक खेळपट्टी नव्हती.. टिच्चून खेळायचा एकाने देखील प्रयत्न केला नाही ह्याची दुःख..
"कोहलीने इंग्लंड विरुद्ध
"कोहलीने इंग्लंड विरुद्ध पहिली टेस्ट वाचवली होती असे म्हणू शकतो का ? तसेच Down Under जी पहिली टेस्ट हरलो ती जवळ्जवळ जिंकत आलो होतो.' - डेटाबेस अपडेटेड!
कृष्णा - सहमत! अधिक
कृष्णा - सहमत! अधिक लढाऊवृत्ती अपेक्षित आहे.
फे फे थोडिशी गडबड होते आहे.
फे फे थोडिशी गडबड होते आहे. वर लिहिलेल्या मॅचेस सोडून देऊ. इंग्लंड सिरीज घेउ. सेशन बाय सेशन हीच टीम जिंकत आलीये असे नाही वाटत ? तोही एका चांगल्या संघाविरुद्ध संघर्षच होता. आफ्रिकेबद्दलही पहिला सामना वगळता तेच म्हणता येईल. किवीज बद्दलही तेच. शेवटच्या मॅचमधे दोन्ही इनिंगमधे टोटल गडबड झाली हे मान्य आहे पण आधीच्या सगळ्या कामगिरीवर बॉला फिरवल्यासारखे का लावून घेताय. अजून ३ मॅचेस आहेत त्या होउ दे नि मग अपेक्षा काय आहेत नि काय झाल्या हे पडताळून पाहूया.
आणखी एक मुद्दा -
आणखी एक मुद्दा -
मस्त भाऊ
मस्त भाऊ
मस्त भाऊ. कल्पना पण मस्त आहे
मस्त भाऊ. कल्पना पण मस्त आहे आणी व्यंगचित्र सुद्धा. तसच बर्याच दिवसांनी अॅक्टीव्ह झालात, त्यामुळे बरं वाटलं.
असामी, मला ग्लोबल खुदाई खिन्नता आली नाहीये, किंवा ह्या टीम ला मी टिपिकल ('पैसे मिळतात, जाहिराती करतात, आयपीएल खेळतात, फिक्सिंग च असलं पाहिजे वगैरे कॅटेगरीज) पद्धतीनं क्रिटीसाईज करत नाहीये. केवळ ह्या मॅच पुरतं बोलतोय की फायटिंग स्पिरिट दिसलं नाही.
पण आपण फिरकी खेळण्यात
पण आपण फिरकी खेळण्यात इतरांपेक्षां वाकबगार आहोत, ह्या भ्रमात रहाणं मात्र आपण केंव्हांच सोडायला हवा होता हें कालच्या कसोटीने अधोरेखित केलंय >>
ते मागच्या इंग्लड दौर्यात दिसलेच होते भाऊ. आपण फिरकी खेळू शकत नाही, असे म्हणणे जास्त उचित आहे आता. अन्यथा मोईन अली किंवा अफ्रिकेचा ताहिर पण आपल्याला भारी पडले नसते.
ग्लोबल खुदाई खिन्नता >> हा
ग्लोबल खुदाई खिन्नता >> हा शब्द प्रयोग आवडला रे.
पाकिस्तानी गोलंदाजीच्या
पाकिस्तानी गोलंदाजीच्या पुण्यतिथीच्या सर्व क्रिकेटरसिकांना शुभेच्छा! १४ वर्षे झाली. 'असेच आम्ही बसलो होतो १५-२० जण रूम मधे. पाकड्यांनी २७३ मारल्यावर जरा टेन्शनच होते....' बहुतांश लोकांच्या आठवणींची सुरूवात इथूनच होत असेल
https://www.youtube.com/watch?v=NnHaP1MdCgA
क्रिकेट हा रिकामटेकड्या
क्रिकेट हा रिकामटेकड्या लोकांनी बघायचा आणि अक्कलशून्य लोकांनी खेळायचा खेळ आहे हे सेहवाग ने सिद्ध केले. त्याला धन्यवाद द्यावेत तितके कमीच.
Pages