Submitted by संतोष वाटपाडे on 28 February, 2017 - 00:10
जीवनाला.. वेदनांची एक यादी कर म्हणालो
मात्र त्या यादीत हळवे प्रेमसुद्धा धर म्हणालो ..
लोभ इर्ष्या वासना यांनीच आहे व्यापले मन
काय चुकले मी मनाला दुर्गुणांचे घर म्हणालो ....
फक्त भाकर घेउनी खेड्यातल्या शाळेत शिकलो
त्यामुळे त्या भाकरीला शेवटी दप्तर म्हणालो ....
चोळले जखमेस होते मीठ जगताना जगाने
मी तरी स्पर्शास त्याच्या नेहमी फुंकर म्हणालो...
याच घटनेने भडकले युद्ध रात्री आमचे...बस,
ती मला चादर म्हणाली...मी तिला पांघर म्हणालो...
पापणीने रोज गार्हाणेच केले आसवांचे
एकदा वैतागलो मी ...तू तुझे निस्तर म्हणालो...
शेत पोखरत्या उन्हाला कालही दरडावले मी
शक्य झाले तर भुकेली आतडी पोखर म्हणालो...
एक छोटी पायरी चढलो नि थकलो...काय कारण?
मित्रहो त्या पायरीला मीच तर डोंगर म्हणालो...
-- संतोष वाटपाडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दर!!!
सुन्दर!!!
खूप छान!
खूप छान!
छान
छान
खुपच छान
खुपच छान
एकेक शेर कातील..
एकेक शेर कातील..