Submitted by चैतन्य दीक्षित on 24 February, 2017 - 06:08
सावळ त्याचा रंग घनासम ।
गोरी मी संगमरवरी ।
बाह्याकारी तो आकर्षक
मी साधीशी व्रजनारी ।।
त्याचे कुंतल काळे कुरळे
माझी लांब सरळ वेणी ।
कुंदकळ्या हास्यातुन माझ्या
त्याच्या मोत्यांच्या श्रेणी।
माझ्या डोळा भाव भाबडा
गहन डोह त्याच्या डोळा ।
मी चवथीची कोर, चंद्र तो
उधळी सोळा सर्व कळा ।
कदंब तो तर सदाहरितसा
मी जल यमुनेचे काळे ।
तो माझी ओढणी कुसुंबी
मी त्याचे अंबर पिवळे ।।
त्याचे माझे नाजुक नाते
निळे जांभळे मोरपिशी ।
रंगगर्भ श्रीरंग तसा तो
आणिक मी रंगार्त अशी ।।
मिटून डोळे मुक्त वाजवी
कृष्णसखा जेव्हा वंशी ।
विरघळते त्याच्यात पूर्ण मी
अलगद, नकळत अत्तरशी ।।
-चैतन्य
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलिये कविता...
छान लिहिलिये कविता...
राधा-क्रुश्नावरती...मस्त!!
सावळ>>>सावळा अस आहे का???
सुन्दर रचना
सुन्दर रचना
खूप छान !
खूप छान !
देखणी शब्दकळा !
देखणी शब्दकळा !
सुंदर...शब्द रचना खूप छान
सुंदर...शब्द रचना खूप छान
सुंदर!!!!!!!!!!!!!!!
सुंदर!!!!!!!!!!!!!!!
<<<विरघळते त्याच्यात पूर्ण मी
<<<विरघळते त्याच्यात पूर्ण मी
अलगद, नकळत अत्तरशी ।।>>>
अप्रतिम!!
अप्रतिम ......
अप्रतिम ......
देखणी रचना
देखणी रचना
मस्त आहे शब्दकळा !
मस्त आहे शब्दकळा !
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
@ कावेरि
>>सावळ>>>सावळा अस आहे का???
हो, अर्थ तोच. सावळकांती असाही शब्द वापरात आहे. त्यातला फक्त 'सावळ' घेतला
अप्रतिम!! खूप छान कविता. पु
अप्रतिम!! खूप छान कविता. पु.ले.शु.
अहाहा... खुप गोड रे!
अहाहा... खुप गोड रे!
छान
छान
छान
छान