तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.
अशा तमिळ शिकणार्यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.
पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी! कोणी बालवाडीत,कोणी पहिलीत तर कोणाची त्याहून अधिक!
पण तमिळ शिकण्याची इच्छा हाच समान धागा!
आमच्या सारखेच आणि कोणी धडपडे तमिळ भाषाप्रेमी जर इथे असतील तसंच ही भाषा कोणाला बोलता,लिहिता येत असेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं ही अपेक्षा आहे.
खरंतर इथेच याबाबतचा धागा सुरु करायला आवडलं असतं,पण काही अमराठी,मराठी जेमतेम मराठी जाणणारे तमिळप्रेमी मित्रही आहेत,येतील.काही इतरही कारणं,मर्यादा आहेत.
ज्यांना या समुहात सामील व्हायचं असेल त्यांनी विपुद्वारे आपला WhatsApp नं कळवावा.
इतर मार्गदर्शक सूचनांचं स्वागत आहेच!
Tamizh स्पेलिंग असले तरी
Tamizh स्पेलिंग असले तरी उच्चार तमीळ असाच आहे. त्यांचा ळ जरा वेगळया प्रकारे म्हटल्या जातो, म्हणऊन zh वापरतात इंग्रजीत.
Tamizh स्पेलिंग असले तरी
Tamizh स्पेलिंग असले तरी उच्चार तमीळ असाच आहे. त्यांचा ळ जरा वेगळया प्रकारे म्हटल्या जातो, म्हणऊन zh वापरतात इंग्रजीत. >>>>
त्यांच तमीळ मधला "ळ" हा मराठी मधल्या "ळ" सारखाचा उच्चार होतो..
१ - पलि = शाळा (School) .. "ल" हा आपल्या "ल" सारखा..
२ - पली = पाल (Lizard) .. हा "ल" आपल्या "ल" सारखा पण थोडासा घासुन आहे..
३ - मोळी ( Mozh) = भाषा .. हा "ळ" आपल्या "ळ" सारखा आहे...
ता.क. :
लेखकास विनंती की कोणतीही भाषा शुध्द वा अशुध्द अशी नसते, त्या वाक्याचा विचार करावा हि विनंती...
ज्यांना तमिळ येतं त्यांनी
ज्यांना तमिळ येतं त्यांनी थोडं थोडं इथे पण शिकवा चालत असेल तर
मोरपंखी आपण खरंतर आमचे
मोरपंखी आपण खरंतर आमचे मार्गदर्शक ठरु शकता.
दुसरं असं की तमिळ ही पंचद्रविड भाषांमध्ये संस्क्रुतचा सर्वात कमी प्रभाव हा तमिळवर आहे.एवढच!
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर तमिळ बंधु/भगिनींना हिंदी शिकायला सांगा किंवा तुम्हीच शिकवा तमिळ ज्ञानाचा उपयोग करून.
ज्यांना तमिळ येतं त्यांनी
ज्यांना तमिळ येतं त्यांनी थोडं थोडं इथे पण शिकवा चालत असेल तर
>> +१००
हो मला मुव्ही बघून काही शब्द
हो मला मुव्ही बघून काही शब्द कळतात पण उच्चार नीट येत नाहीत.
तामिळ तेरीयाद
तामिळ तेरीयाद
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर तमिळ बंधु/भगिनींना हिंदी शिकायला सांगा >> +१
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर तमिळ बंधु/भगिनींना हिंदी शिकायला सांगा
+100
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर
तुम्हा सर्वांना तमिळ आल्यावर तमिळ बंधु/भगिनींना हिंदी शिकायला सांगा >>>>>
काय हे ... हिंदी ... अहो "मराठी" शिका तरी म्हणा..!!!
ता. क. :
मला सर्वच भाषा आवडतात ... पण मला कोणाला, एखादी भाषा शिकवायची वा शिक म्हणायची झाल्यास माझ्या मराठीस मी प्राधान्या देइन..
मी माझ्या तमीळ मित्राला मराठी
मी माझ्या तमीळ मित्राला मराठी शिकवायला सुरुवात केलीये ऑलरेडी...
त्याला बर्यापैकी मराठी कळतं आणि मला बर्यापैकी तमीळ कळायला लागलंय