आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनीचे कर्णधारपद ईथेही गेले. आयपीएलची अर्धी मजा ईथेच गेली.
गेल्यावेळी अर्धी स्ट्रेंथ गायबल्याने वाईट स्थिती झालेली. यावेळी कर्णधार धोनी उसळून बघण्यात मजा होती..

पण संघात आहे ना तो? मी चेक केलेले नाही. स्मिथ फार पूर्वी पुण्याकडूनच खेळायचा. त्या जुन्या संघाकडून.

मालकच वेगळा असेल तर त्या पुणे नावाला काय अर्थ आहे.. तसेही पुणेकर त्यांच्या पराभवाची जबाबदारी पराभव व्हायच्या आधीच झटकतात.

हो संघात आहे धोनी. पण धोनी संघात असून कर्णधार नसेल तर मग अवघड आहे त्याचे. भविष्य धोक्यात आहे.

भारतात टी२० लोकप्रिय होऊन आता १० वर्षे झाली. २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत व पाकिस्तान पहिल्याच फेरीत गारद झाले व आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला मोठे नुकसान सोसावे लागले (किमान वेस्टिंडिज बोर्डाला तरी). ते भरून काढायला घाईघाईत आयोजित केलेल्या पहिल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने अनपेक्षित विजय मिळवला. या स्पर्धेत द्रविड, तेंडुलकर इत्यादी तेव्हाचे स्टार खेळाडू खेळले नव्हते. बीसीसीआयचा तर खरे तर २०-२० स्पर्धांना विरोधच होता. ही पार्श्वभुमी १० वर्षांपुर्वीची. तर आयपील व इतर अनेक लीग्ज हे मुख्य आर्थिक स्त्रोत बनलेल्या २०-२०च्या आजच्या जमान्यात सगळीच गणिते वेगळी झाली आहेत.

"तसेही पुणेकर त्यांच्या पराभवाची जबाबदारी पराभव व्हायच्या आधीच झटकतात." - नाव पुण्याचं आहे, बाकी काय आहे पुण्याचं त्या संघात? एकही महाराष्ट्राचा खेळाडू नाही.

आरसीबी ने सुद्धा मिचेल स्टार्क ला रिलीज केलय.

ईंग्लंड आणी द. अफ्रिके चे खेळाडू शेवटच्या टप्प्यत नसणार आहेत. मला वाटतं ह्याचा सगळ्यात मोठा फटका दिल्ली डेअरडेव्हिल्स ना बसेल. कारण डि कॉक, ड्यूमिनी, रबाडा, मॉरीस आणी सॅम बिलिंग्ज गेल्यावर त्यांच्या संघाला मोठा फटका बसेल.

अरे तू ते स्मिथला जुन्या पुण्याचा म्हणालास म्हणून बोल्लो. त्या पुणे नावाला काय अर्थ नाही. त्याचा मालक वेगळा आणि याचा मालक वेगळा.

टण्याने मध्येच "पाच ओळीत माहिती लिहा" छाप पोस्ट का लिहिली आहे? Proud

सालाबादप्रमाणे यंदाही पाठिंबा मुंबईलाच !

आरसीबी ने सुद्धा मिचेल स्टार्क ला रिलीज केलय. >> स्टार्क पूर्ण आयपील स्किप करणार असे त्याने जाहीर केले होते. ह्या वर्षानंतर सगळे खेळाडू परत ड्राफ्ट्साठी जातील (सध्या तरी) त्यामूळे पैसे कशाला अडवा असा विचार केला असेल. बंगलोरची टीम परत जबरदस्त वाटते. पुण्याची फास्ट बॉलिंग बघा - फक्त देसी खेळाडूंवर भर दिला आहे. धोनी काय कप्पाळ करणार तिथे ? मुंबई चे ड्राफ्टींग विचित्र होते.

काही काही खेळाडूंच्या कहाण्या जबरी आहेत. चेन्नई जवळच्या खेड्यातून आलेला तो नटराजन - ज्याला पंजाब ने $४५०,००० ला घेतला. वडील रोजंदारीवर व आई कोणत्यातरी खाण्याच्या स्टॉल वर. विसाव्या वर्षापर्यंत लेदर बॉल ने खेळलेला नव्हता. स्थानिक लीग मधल्या परफॉर्मन्स वर त्याची निवड झाली.

तसेच ते अफगाणिस्तान मधले दोन जण.

इरफान पठाण बद्दल सर्वात वाइट वाटते. त्याचा सध्याचा फॉर्म माहीत नाही, पण एकेकाळी काय स्विंग होता त्याचा. युसूफ पठाण असतो का आजकाल?

इशांत शर्माला बीसीसीआय नेच स्पॉन्सर करून एखाद्या टीम मधे नुसते ठेवायला पाहिजे. त्याची खरी गरज टेस्ट मधे आहे.

मी आय.पी.एल. अजिबात फॉलो करत नाही. पण आज अफगाणिस्तानच्या २ खेळाडूंबद्दलची बातमी वाचली. रिअली हॅपी फॉर देम !!

"बंगलोरची टीम परत जबरदस्त वाटते. " - नेहेमीच वाटते. यंदा कदाचित कोहली च्या आंतरराष्ट्रीय कॅप्टन्सी च्या अनुभवाचा फायदा मिळेल असं वाटतय.
"मुंबई नेहमीच विचित्रच काहीतरी ड्राफ्टिंग करते राव." - अगदी खरय. भारंभार पैसा खर्च करतात आणी काही तरी विचित्र ड्राफ्टिंग करतात.
"इरफान पठाण बद्दल सर्वात वाइट वाटते." - मला ह्या माणसाचा कधी कधी सुक्ष्म हेवा वाटतो. गेली अनेक वर्ष त्यानी काही चमकदार कामगिरी केलेली नाहीये, पण त्याच्या ईतका सॉफ्टकॉर्नर ईतर कुठल्याही खेळाडूविषयी दिसत नाही.
"युसूफ पठाण असतो का आजकाल?" - केकेआर च्या कोअर मधे आहे तो.

जगातला क्र. १ चा गोलन्दाज इम्रान ताहिरला एकाही टीमने न घेणे म्हणजे या सग्ळ्या प्रक्रियेत किती मूर्ख भरलेले आहेत याचीच साक्श देणारे आहे

ईम्रान ताहीर ला न घेण्याचं आश्चर्य वाटलं. बहुदा टीम बॅलन्स, त्याची नंतर च्या सत्रातली अनुपस्थिती अशी काही कारणं असावीत.

"इरफान पठाण यंदाच्या देशांतर्गत टी २० स्पर्धेत बरा खेळला आहे." - सहमत.

ह्या बाबतीत अजुन एक निरिक्षणः मी त्या सय्यद मुश्ताक अली ईंटर झोनल टी-२० मॅचेस (थोड्या लाईव्ह, बर्याचश्या हायलाईट्स) पाहील्या आणी आंतरराष्ट्रीय आणी डोमेस्टीक खेळाडूंच्या खेळात केव्हढी प्रचंड तफावत आहे हे जाणवलं. अशा डोमेस्टिक क्रिकेट मधून आलेली लोकं आंतरराष्ट्रीय पातळीवर ईतकं चांगलं खेळतात हे पाहून, मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागलाय. Wink

"युसूफ पठाण असतो का आजकाल?" - केकेआर च्या कोअर मधे आहे तो. >> खर तर मागच्या आयपील मधे तो चांगला खेळ ला होता. त्याच्यातली आफ्रिदी स्ट्रीक कमी होउन सेहवाग स्ट्रिक वाढल्यासारखे वाटलेले होते. टू लेट आय गेस ....

ताहिर भारतीत खेळपट्ट्यांवर चालणार नाही असे वाटलेले असू शकते. त्याच्या अ‍ॅक्र्युरसी बद्दल प्रश्नचिन्ह आहेत. परत रबाडा, फिलँडर, स्टेन ह्यांच्या उपस्थ्तितीचा फायदा त्याला जो आफ्रिकेमधे मिळतो तो आयपीलमधे मिळेच ह्याची खात्री नाही. अशी बरीच कारणे असू शकतात. परत थोडीफार बॅटींग किंवा फिल्डींग करू शकतील , विशेषतः विदेशी खेळाडूंमधे अशा खेळाडूंना घेण्याचा कल सगळ्या संघांचा वाटतो. मुंबई ने कर्ण शर्मासाठी बिड केले ताहिर च्या ऐवजी ह्यातून समजून घ्या.

मला प्रत्यक्ष आयपीएल इतकेच त्याचे auction ही interesting वाटतात..... त्यामुळे मस्त सुट्टी घेउन टीव्हीसमोर ठाण मांडून तब्येतीत live auction बघितले Happy

स्टोक्स सगळ्यात मोठी बिड मिळवणार हा अंदाज होताच पण संघांकडे असणारी मर्यादित पर्स लक्षात घेता १० क्रॉस करे असे मात्र वाटले नव्हते
डीडी चा सपोर्टर या नात्याने ११-१२ च्या आसपास जेंव्हा डीडीने स्टोक्ससाठीच्या बिडींगमधून माघार घेतली तेंव्हा वाइट वाटण्याऐवजी जीव भांड्यात पडल्यासारखा वाटला!
पुण्याची मात्र पत्त्याच्या खेळात लवकर बाद होवुन बाकीच्यांचा खेळ बघत बसणाऱ्या गड्यासारखी अवस्था झाली होती..... घर बांधण्यात एवढा पैसा गेला की आता घरात सामन भरायला पण पैसा नाही असे काहीसे!
ताहिर आणि इरफान पठाण बद्दल मात्र आश्चर्य वाटले
अगदी आफ्रिकेच्या इतर खेळाडूंप्रमाणे लवकर जावे लागणार असले तरी ५० लाखात काही वाइट नव्हता... त्याला बहुतेक क्रिकेटेतर कारणे नडली असावीत
मुनाफ पटेलला घेतात, दिंडा खेळतोय, वरुण ॲरोन साठी चढाओढ लागते आणि इर्फान पठाणला कोणी हिंग लावून विचारत नाही याचे आश्चर्य वाटतेच वाटते
टायमल मिल्सला RCB सोडून इतर कोणत्या संघाने १२ करोड मोजले असते तर मी त्याला उधळपट्टी म्हंटले असते पण एक स्पेशालिस्ट डेथ ओव्हर बॉलर ही RCBची आत्यंतिक गरज होती!
प्रवीण तांबेला अजुन एक सीझन मिळाला हे बघून बरे वाटले!
नटराजन, नथूसिंग, थंपी वगैरे मंडळींना बघायची उत्सुकता आहे
इशांत शर्माला कोणत्याही संघाने घेतले नाही याबद्दल सर्व बिडर्सचे कौतुक वाटते... He is good for nothing, atleast in IPL

दिल्ली डेअरडेव्हिल्सबद्दल थोडेसे:
साउथ आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या मध्यातून माघार घेणार असल्याचा सगळ्यात मोठा फटका डीडीला बसणार आहे
त्यांच्या लिलावाच्या आधीच्या संघातले ५ पैकी ४ परदेशी खेळाडू या दोन संघाचे मिळून आहेत
त्यातले दोन बॅट्समन, एक विकेटकीपर बॅटसमन आणि एक ऑल राउंडर आहेत आणि त्यानुरूप बॅकअप घेणे अपेक्षित होते
विकेट्कीपर बॅट्समन दिल्लीकडे भरपूर आहेत त्यामुळे डीकॉकच्या रिप्लेसमेंटऐवजी कुल्टीअर नाइल ला रिप्लेस करण्यासाठी आणि झहीर/शमीला सपोर्ट म्हणून एक फास्ट बॉलर, मॉरीसला रिप्लेस करण्यासाठी एक ऑल राउंडर आणि दोन बॅट्समन असे अपेक्षित होते
त्या हिशोबाने पेट कमिन्स आणि कोरी ॲंडरसन एकदम स्पॉट-ऑन!
इतके लोक परत जाणार आहेत त्यात अजुन एक परत जाणारा रबाडा घेण्यामागचे लॉजिक कळले नाही! त्याऐवजी बोल्ट किंवा मॅट हेन्रीवर बोली लावायला हवी होती आणि मॅथ्यूजच्या ऐवजी गप्टील ला घ्यायला हवे होते
डीडीसाठी ते शक्य होते
आता साउथ आफ्रिकन आणि बिलिंग्स परतल्यावर ॲंडरसन, मॅथ्यूज आणि ब्रेथवेट असे तीन-तीन ऑल राउंडर खेळवावे लागणार आहेत.... त्याऐवजी एखादा प्रॉपर बॅटसमन असता तर डीडीची टीम अधिक बॅलन्स्ड दिसली असती!
डीडीची अननुभवी डॉमेस्टीक फलंदाजीची फळी बघता एखादा बळकट परदेशी खुंटा तिथे हवा होता.... श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि करुण नायरचा फॉर्म बघता हा निर्णय डीडीच्या फारसा अंगलट येवू नये ही अपेक्षा!
डीडी ची सगळ्यात मोठी चिंता असेल ती म्हणजे कॅप्टन कोण?
मागच्या सीझनमध्ये झहीरने चांगली चमक दाखवलेली पण त्याचा मॅच फीटनेस अजुन गुलदस्त्त्यात आहे... कॅप्टन्सीसाठी एक परदेशी स्पॉट ड्युमिनीच्या नावाने ठेवायला जीवावर येतेय.... आणि तोही मध्यातून परत जाणार आहे!
मिश्रा कॅप्टन्सी मटेरीअल वाटत नाही.... एकंदरीत अवघड प्रश्न आहे!
करुण नायर? झाला तर आवडेल पण परत अनुभवाचा प्रश्न येतोच!
असो!..... तरी देखील डीडीला खुप शुभेच्छा.... प्लॅऑफ नक्की

केकेआर ने निवडक पण चांगली खरेदी केली.... मोर्केलला रिप्लेस करायला बोल्ट आणि कुल्टीअर नाइल ला घेतले , रसेलला रिप्लेस करायला वोक्स आणि पॉवेल घेतला.... रिषी धवन is also smart buy for them
शकीब, नरीन, चावला मुळे त्यांची स्पिन बॉलींग मजबूत आहे.... बेंचवर कुलदीप यादव आहे त्यामुळे हॉगला रिलीज करायचा निर्णय योग्यच!
सयान घोष या देसी मलिंगाला बघायची उत्सुकता आहे
गंभीर, उथाप्पा, मनीष पांडे, सुर्यकुमार यादव, युसुफ पठाण ही त्यांची बॅटींग जरा एजी दिसतीय पण तसे म्हंटले तर हे सगळे आयपीएल स्टार आहेत.... स्पर्धा सुरु झाल्यावर यांना जोर चढतो... आणि जर गेलेच कोणी out of form तर शेल्डन जॅक्सन, इशांक जग्गी वगैरे तरुण मंडळी पण आहेतच!

एकूण कागदावर नेहमीप्रमाणेच संतुलिय संघ आहे केकेआर!

स्वरूप, मस्त अ‍ॅनालिसिस आहे दोन्ही टीम्स चं. कीप ईट कमिंग!
दिल्ली ने रबाडा ला घेतल्यावर आश्चर्य वाटलं होतं कारण त्यांच्या परदेशी खेळाडूंचा कोअर मधे द. अफ्रिकेच्या खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे आणी ते शेवटच्या सत्रात नसणार आहेत.
केकेआर मधे संधी मिळाली तर जग्ग्गी आणी जॅक्सन चा खेळ बघायला आवडेल. दोघही डोमेस्टिक सीझन मधे छान खेळले आहेत. मुश्ताक अली च्या फायनल मधे घोष ची बॉलिंग बघितली होती. चांगला आहे, बघू काय करतो ते.

आरसीबीला फक्त एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आणि एका इकोनोमिक सीमर/मिडीयम पेसरची गरज होती..... बाकी त्यांची टीम सेट आहे!
स्टार्कने माघार घेतल्यानंतर तर मिल्स सारख्याची खूपच गरज होती (आता फक्त तो पूर्ण सीझनभर फीट राहिला म्हणजे मिळवली कारण तसा तो Injury prone आहे.... त्यातून भारतात भर उन्हाळ्यात सलग इतक्या मॅचेस, त्यातल्याही निम्म्या चिन्नास्वामीसारख्या पाटावर खेळण्याची त्याची ही पहीलीच वेळ आहे).... राहता राहीला इकॉनॉमिक सीमर तर तसेही त्यासाठीचे प्रूव्हन ऑप्शन कमीच होते.... त्यातल्या त्यात स्टार्कसारख्याचा सराव व्हावा म्हणून भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या अनिकेत चौधरीला संधी दिलीय!

बाकी गेल, एबीडी, वॉटसन आणि मिल्स असताना अजुन कुणाला फारशी संधी नाही.... अर्थात एबीडी परत गेल्यावर किंवा गेल चमकला नाही तर ट्रेव्हीस हेडला चान्स मिळू शकतो किंवा त्याजागी एखादा भारतीय फलंदाज खेळवून बद्री किंवा शस्मीची वर्णी लागू शकते

एकंदरीत आरसीबीची बॅटींग ऑल सेट आहे.... कोहली फॉर्मात आहेच, राहुल आता सिनीयर संघातही नियमित झालाय, मागच्या सीझनचा केदार जाधव आणि यंदाचा केदार जाधव खुपच improvement आहे
लागलेच तर सर्फराज आणि सचिन बेबी पण आहेतच
नेगीच्या समावेशामुळे बिन्नीवर परफॉर्मन्सचे प्रेशर असेल
बॉलिंगमध्ये चहल पण यंदा चांगल्या फॉर्मात आहे, गरज पडल्यास अब्दुल्ला दुसऱ्या स्पिनरची जागा घेवू शकतो आणि आता नेगीचा ऑप्शनही आहेच!
मिल्सला आता अनिकेत चौधरी, अरविंद, हर्शल पटेल (संधी मिळाली तर) आवेश खान वगैरे मंडळी कशी साथ देतायत यावर आरसीबीचा संघ कुठेपर्यंत मजल मारतो हे ठरेल.... प्लेऑफ तर नक्की डिझर्व करती ही टीम!

हैद्राबादला वॉर्नरचा लोड कमी करण्यासाठी एखाद-दोन इन फॉर्म बॅट्समन आणि करण शर्माला रिप्लेस करायला एखाद्या स्पीनरची गरज होती
नेमका त्यांनी मॉर्गनला रिलीज केल्यावर पठ्ठ्या फॉर्मात आला!
स्पीनर्समध्ये ते ताहिर आणि नेगीसाठी जोर लावतील असे वाटले होते पण त्याऐवजी त्यांनी रशीद खानला घेतले... not bad!
जास्त आनंद याचा झाला की त्यांनी प्रवीण तांबेला पण घेतले
गप्टील किंवा जेसन रॉयला घेतले असते तर वॉर्नरवरचा लोड कमी करता आला असता
कारण धवन साहेबांचा बॅडपॅच भलताच लांबलाय, युवी युवीसारखा खेळला पाहिजेल, केन विल्यमसन is not a 20-20 material, हूडाकडून असलेल्या अपेक्षा त्याने मागच्या सीझनमध्ये तरी अजिब्बात पुऱ्या केल्या नाहीत, राजस्थानकडून खेळताना भलताच प्रॉमिसिंग वाटलेला तो!
ओझा पण फेल गेला मागच्या सीझनमध्ये.... त्यामुळे उरता उरतो हेन्रीके!
मागच्या सीझनमध्ये वॉर्नर चालला म्हणून पण यावेळी बॅकअप बॅट्समनवर जरा फोकस करायला हवा होता हैद्राबादने
बाकी त्यांचा पेस ॲटॅक हेवा वाटावा असा आहे
बरींदर स्रॅन, सिराज, जॉर्डन ला संधी मिळवण्यासाठी झगडावे लागेल!

मुंबई नेहमीच विचित्रच काहीतरी ड्राफ्टिंग करते राव. >>> Proud अगदी अगदी ... आणि डावपेच सुद्धा कमालीचे अनाकलनीय असतात.. बॅटींग ऑर्डर तर सट्टेबाजच ठरवतात वाटते.. एक कट्टर मुंबई सपोर्टर म्हणून नेहमी घोर लावतात जीवाला. तरीही पांड्या ब्रदर्स आणि बुमराह, रायडू वगैरे एकेका सीजनला चमकणारे प्लेअर निघतात मुंबईच्या गोटातून.

चार परदेशी खेळाडूंमध्ये जेव्हा एक पोलार्ड खेळतो तेव्हा कसेसेच होते. त्याला घ्यायचेच असेल तर पुढे तरी पाठवावे. शेवटी येतो तेव्हा मारायची गरज असते, पण याला चांगला बॉलर भेटला तर ओवर खेळून काढतो बिनधास्त आणि गिर्हाईक बॉलरची वाट बघतो. तो भेटला तर ठिक अन्यथा बाद झाला तर ईतरही मॅच काढू शकणार नाही अश्या स्थितीत नेऊन ठेवतो...

मलिंगा मात्र म्हातारा झाला तरी डेथ ओवरला विश्वास वाटतो त्याबद्दल. तेवढाच मिडल ओवरला हरभजनबद्दल वाटतो.
पण सर्वात महत्वाचा प्लेअर, की प्लेअर ज्याच्या आजूबाजूला संघ उभा राहतो तो रोहीत शर्मा आहे. बरेचसे त्याच्या फॉर्मवरच ठरते. त्याने ओपनरच यावे तेच चांगले. जो वनडेमध्ये मोठी शतके मारू शकतो, २०-२० मध्येही शतक मारायची पात्रता राखतो, अश्याने मागे राहण्यात काहीच अर्थ नाही.

Pages