एक थोर गायक म्हणून गेलेला आहे, 'गाना न आया, बजाना न आया, दिलबर को अपना बनाना न आया'. आमची हे असले संशोधन करणारी टीम यातील तिन्ही गोष्टींशी अगदी परिचित आहेच. या संशोधनात वेळ जात असल्यानेच आम्हाला या गोष्टी जमलेल्या नाहीत. मात्र आमचे टीकाकार याच्या बरोब्बर उलटे आहे असा आरोप करतात.
तर पूर्वीच्या ऋषीमुनींनी जशी जीवनाची कोडी सोडवली, तशी आमची टीम चित्रपटातील कोडी सोडवणे हे आपले ध्येय समजते. या टीम ला दिल समजले, इश्क समजले, बरेच काही नियम समजले, पण ही गाणी मात्र काय खाउन लिहीली गेली आहेत ते अजिबात कळत नाही. तर आमच्या टीम ने काही गाणी "सोडवायचा" प्रयत्न केला पण कोणालाही ते जमले नाही. सुरूवातीला बरे होते. लोक काय सांगायचे ते सरळसोट सांगून टाकत. कोणाला झोपवायचे असेल तर 'सो जा राजकुमारी सो जा', 'आजा री आ निंदिया...' वगैरे. या गाण्यांचे पुढे 'दो नैना एक कहानी, थोडासा बादल, थोडासा पानी' वगैरे अॅब्स्ट्रॅक्टीकरण झाले व लोक गाणी ऐकताना गुंगून जाण्यापेक्षा ती न झेपल्याने झोपू लागले. तरी उपमा कंट्रोल मधे होत्या तोपर्यंत ठीक होते. म्हणजे 'जैसे बरसे कोई बदरिया ऐसे अखियाँ बरसे' मधे ही केवळ उपमा आहे, शब्दश: घ्यायची नाही - म्हणजे डोळ्यातून अश्रू स्प्रे मारल्यासारखे खाली पडत नाहीत याची कल्पना आली. तरी पाणी वरून खाली पडते यापेक्षा या दोन्हीत काय साम्य आहे हा प्रश्न राहिलाच. पण तरी ठीक होते.
मात्र नंतर या उपमासृष्टीत अचाट गोष्टी येउ लागल्या. त्या उपमा, अलंकार कोणालाच कळेनात. शेवटी कंटाळून यावर रिसर्च करणारे लोक सोडून जाउ लागले. त्यामुळे 'अच्छा दोस्त' नावाच्या चिरविरही व्यक्तीच्या कहाणीप्रमाणेच हा ग्रंथ अपूर्ण राहणार अशी भीती वाटू लागली. मात्र तेवढ्यात आम्हाला लक्षात आले की या रिसर्च करणार्यांनी ही गाणी सोडवायचा प्रयत्न करताना काही नोट्स काढल्या होत्या. त्या वाचून हे किती मोठे आव्हान होते ते वाचकांच्या लक्षात यावे म्हणून त्याच येथे एकत्रित करून सादर करत आहोत. पुढील रिसर्च कोणाला करायचा असेल तर जरूर याचा फायदा होईल. नाहीतरी विज्ञानातील अनेक शोध आधीच्या शोधांवर आधारितच असतात.
१. "फूल बने है घूंगरू, घुंगरू बन गये फूल..."
म्हणजे नक्की काय? समजा यात सुरूवातीला m घंगरू असतील व n फुले असतील. तर त्यावर हे गाणे गायल्याने काय होईल याच्या बर्याच शक्यता निर्माण होतात. जीआरई वगैरे परिक्षांना हे गाणे लावता येइल अशी शिफारस आमची टीम येथे करत आहे.
तर (m घुंगरे + n फुले) + (हे गाणे) =
अ. n घुंगरू व m फुले: कारण अदलाबदल एकदमच झाली
ब. (m + n) फुले. कारण पहिल्यांदा फुले घुंगरांमधे बदलली व नंतर ती सगळी घुंगरे पुन्हा फुले झाली.
क. (m + n) घुंगरे. कारण फूल बने है घुंगरू, घुंगरू बन गये फूल हे कवितेचे नियम लावले तर एकच वाक्य दोन रूपांत म्हंटले आहे त्यामुळे गणितदृष्ट्या ते वेगळे धरता येणार नाही.
त्यामुळे या गाण्यात ऋषी कपूरने डफलीवर टिचकी वाजवल्यानंतर सृष्टीची अवस्था नक्की काय होती याबद्दल बरेच संदेह आहेत.
२. ".. उन को ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते"
हा खुलासा सुमारे साडेचार मिनीटं आणि तीन कडवी चालतो. आता 'हम कुछ नहीं कहते' म्हणून जर एवढी मोठी गजल म्हंटली जात असेल तर ही व्यक्ती बडबडी असेल तर काय होईल!
३. "दुख मेरा दुल्हा है, बिरहा है डोली,
आँसू की साडी है, आहोंकी चोली..."
या वाक्यातील उपमा ज्या दिशेने चालल्या आहेत ते पाहता पुढच्या काही वाक्यांना नक्कीच सेन्सॉर ने उडवले असेल.
४. " देख के तेरा रूप सलौना, चाँद भी सर को झुकाता है..."
Hey Moon! How is it going?
Not much. Just reflecting!
Why the sad face then?
Oh this guy on earth is saying that there is some girl who looks better than how I look to him from there. I am sad at their brilliance.
५. "ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी..."
अरे माझ्या खगोलजीनियस मित्रा, जेव्हा तुला रात सुहानी दिसते व समोर चंद्र दिसतो तेव्हा तेथे लख्ख उन पडलेले असते. हे म्हणजे अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला ख्रिसमस ला 'लेट इट स्नो लेट इट स्नो..." गाणे ऐकवण्यासारखे आहे..
६. "..जब भी झरनों से मैने सुनी रागिनी, मै ये समझा तुम्हारी ही पायल बजी"
https://www.youtube.com/watch?v=YDkBL3lYgKc&t=1m13s
उपमेला उपमा. मुळात झरनों से रागिनी हीच उपमा आहे. ती जेव्हा ऐकली तेव्हा काहीतरी दुसरे वाजल्यासारखे वाटले. म्ह्णजे मी झर्याचा आवाज ऐकला (मूळ आवाजः पाणी), तेव्हा मला नेहमी जे ऐकल्यासारखे वाटते (पाणी->रागिणी), तेव्हा मला तुझी पायल वाजल्यासारखे वाटले (पाणी->रागिणी->पायल)
७. "जिन्हे इस जहाँ ने भुला दिया, मेरा नाम उन मे ही जोड दो,
मुझे तुमसे कुछ भी ना चाहिये, मुझे मेरे हाल पे छोड दो"
महापालिका विस्मृतीत गेलेले कवी विभाग-२. रजिस्टरः ११/मविगेक/२०१५
लेखनिकः "अं.... काय नाव लिहायचं?"
८. "कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा...
...
उनसे कहना जब से गये तुम मै तो अधूरी लगती हूँ..
...
यहाँ का मौसम बडा हसीं है फिरभी..."
कबूतर म्हणेल हे सगळं चिठ्ठीतच का नाही लिहीलं? उगाच आणखी मला काम. बातम्या झाल्या, मौसम का हाल झाला, आता त्यात " ब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है..." घाला म्हणजे स्कोरबिर ही सांगून पूर्ण बातमीपत्रच तयार होईल.
९. चाँद को क्या मालूम, चाहता है उसे कोई चकोर
वो बेचारा दूर से देखें, करे न कोई शोर
कायच्या काय. चकोर गप्प बसला म्हणे. तो ओरडला असता तर चंद्राला ते कळणारच होते!
१०. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, नवतरूणी काश्मिरी
https://www.youtube.com/watch?v=sGD6IXRZnk0&t=43s
हे गाणे गाजल्याच्या नोंदी सापडतात. पण आश्चर्य म्हणजे या गाण्यात तो तिची तारीफ करत आहे असे समीक्षक लोकांना वाटलेले दिसते. म्हणजे कोणाला हे गाणे कळालेच नसावे.
चिनार: चिंचेचे झाड
काश्मिरी नवतरूणी: तू
यातून वरच्या दोन्हींत जेवढा फरक आहे तेवढा खालच्या दोन्हीत आहे असेच सुचवायचे असावे. तसेच भारतात व्हर्च्युअल रिअॅलिटी खूप आधीपासून होती हे हे गाणे सिद्ध करते, ती ही टेलिपॅथिक. तिने गॉगल घातल्यावर याला काश्मीर दिसते.
११.
"हम तुम, एक कमरे मे बंद हो, और चाबी खो जाय"
यातील कमरेमे बंद होण्याच्या फॅण्टसीमुळे यातील लॉजिकल गोची पुढे येत नाही. जर दोघे खोलीच्या आत असतील तर आतून कुलूप कशाला लावायची गरज आहे? केवळ कडी लावून काम होणार नाही का? याउलट जर कुलूप दुसर्याच कोणीतरी बाहेरून लावले असेल तर किल्ली हरवली काय किंवा सापडली काय काहीच फरक पडणार नाही. पण एकूणच फार ब्राइट नसावेत हे. घनघोर अंधेरा फक्त "आगे" असतो, किंवा दोघांपैकी कोणाला खावे हे वाघ यांचे ऐकणार असे समज हेच दाखवतात.
१२. "हमने सनम को खत लिखा, खत मे लिखा,
ऐ दिलरूबा, दिल की गली, शहर-ए-वफा..."
हे पत्र नक्कीच मिळाले नसणार. पत्ता नीट लिहीत नाहीत आणि उगाच पोष्टाला दोष. वरचा दिल की गली वगैरे पत्ता जरी खरा मानला तरी तो पत्राच्या वर लिहायचा असतो, पत्राच्या आत नाही.
१३. तुझको नजरे ढूँढ रही है, मुखडा तो दिखलाजा हो मुखडा तो दिखलाजा
रस्ते पर है आस लगाये आनेवाले आजा...
वाट पाहात आहे ते ठीक आहे, पण रस्त्यावर कशाला बसायला पाहिजे. त्यात मुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर ताबडतोब दोन बकर्या तिच्याजवळ येत असल्याने हे गाणे नक्की कोणाला उद्देशून आहे याबद्दलही शंका आहेत.
१४. हाय ये फूलसा चेहरा, ये घनेरी जुल्फे
मेरे शेरों से भी तुम मुझको हसीं लगती हो
https://www.youtube.com/watch?v=yQOIDLOYg1Y&t=1m15s
सर्कशीतील रिंगमास्टर च्या सत्कारसभेत पत्नीला उद्देशून केलेली तारीफ.
15. दूरातल्या दिव्यांचे, मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे, आभाळ सांडलेले
या लेले ला काय काय अचाट गोष्टी करायला सांगत आहेत या गाण्यात! मणिहार काय मांड, आभाळ काय सांड, काहीही.
पण एकूणच या लेले लोकांबद्दल फार आकस दिसतो. स्वतःच्या बाहुपाशांत कोणी 'लेले' असून सुद्धा एकटेच फिरत असल्याच्या तक्रारीही सापडल्या आहेत
“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”
सही लिहीलय
सही लिहीलय
अचाट __/\__
अचाट __/\__
भन्नाटच! ते चित्रपण काय
भन्नाटच! ते चित्रपण काय झकासच जमलेय!
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
>>> अं.... काय नाव लिहायचं?
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
धमाल लिहिलंय
धमाल लिहिलंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त. मजा आली वाचताना.
मस्त. मजा आली वाचताना.
खतरनाक लिहीलंय, सगळ्यात जास्त
खतरनाक लिहीलंय, सगळ्यात जास्त
कलम ८ मुळे झाले. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
http://cdn1.maayboli.com
फा, भारीच!!
फा, भारीच!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चिंचेचे झाड मस्तच!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फा इज बॅक.. भारीच
फा इज बॅक.. भारीच![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आप को देखा तो फूलों को पसीना आ गया..... बद्दल आपली संशोधक टीम काय म्हणेल
भारी लिहिलेय
भारी लिहिलेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि ते खालचे चित्र कुठून शोधून काढलेस की तूच काढलेस..
ईतरांनी प्रतिसादात पुढचे द्या आता...
भन्नाट !!
भन्नाट !!
(No subject)
हिंदी/मराठी गाण्यातल्या उपमा
हिंदी/मराठी गाण्यातल्या उपमा (आणि रूपकही?) अलंकाराबद्दलची नावड ओतप्रोत जाणवत आहे लेखातून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीये
भारीये![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुफान लिहिले आहे.
तुफान लिहिले आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे पत्र नक्कीच मिळाले नसणार. पत्ता नीट लिहीत नाहीत आणि उगाच पोष्टाला दोष. वरचा दिल की गली वगैरे पत्ता जरी खरा मानला तरी तो पत्राच्या वर लिहायचा असतो, पत्राच्या आत नाही.<<<<<
नाहीच मिळत. गाण्याच्या शेवटच्या कडव्यात पोस्टखाते 'पत्ता सापडत नाही' म्हणून पत्र परत धाडते हे सांगितलेलं आहे. खरंतर, हिंदी सिनेमावाल्यांसाठी पोस्टखात्याने नीट पिनकोड वगैरे घालून पत्ता कसा लिहावा / सांगावा, याचा कोर्स घेणे गरजेचे आहे. नाहीतर भेटीस इच्छुक मुलींना 'रुपनगर, प्रेमगली, खोली नंबर ४२०' असला अर्धवट पत्ता सांगायचा आणि नंतर 'मैं दुनिया में अकेला हूं' म्हणून तक्रारी करायच्या याला काही अर्थ नाही.
लेले मंडळींवरचे संशोधनही विचार करण्याजोगे आहे. एवढी अन्यायकारक वागणूक मिळूनही लेले मंडळींनी फक्त झीनत अमानमुळे त्याचा निषेध केलेला नाही, असे माझे मत आहे.
लेल्यांचे ऑटाफे गाणे-
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
https://youtu.be/1dULpY3iWHo
फा.. आपने तो मेरा शनीवार बनां
फा.. आपने तो मेरा शनीवार बनां दिया.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खुप हसले वाचताना
बरीच गाणी सुटली आहेत. अजून
बरीच गाणी सुटली आहेत. अजून येऊ द्या.
एक तो फारेंड का लेख उपरसे
एक तो फारेंड का लेख उपरसे श्रदधा का प्रतिसाद हहपुवा
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर
मुखडा तो दिखलाजा म्हंटल्यावर ताबडतोब दोन बकर्या तिच्याजवळ येत असल्याने>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ब्रिस्बन कसौटी मे सचिन तेंदुलकर ब्यानवे पे खेल रहे है..." घाला>>
बाहोंमे कोई लेले>>> तु फा न!!
श्र माते _/\_
:हहवडापाव: भारी लिहीलयसं .
:हहवडापाव:
भारी लिहीलयसं .
तुफान हसलेय आज.
तुफान हसलेय आज.
:हहवडापाव: >> हे काय आहे श्री???![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
“फिरते है हम अकेले, बाहोंमे
“फिरते है हम अकेले, बाहोंमे कोई लेले”
कोसळलो हे वाचून ....अफाट लिहिलंय, याचे अजून पुढचे भाग यायला हवेत
@ फा, खुपच छान!
@ फा, खुपच छान!
तुमच्या या उपमा/ रुपकाच्या संतापात माझी अजुन भर.
ते गुलजार नावाचे सदग्रुहस्थ तर वात आणतात हो.
१. ११६ चांद की राते एक तुम्हारे कांधेका तील?
तो चंद्र ही स्वतःला २९ व्या दिवशी शोधत फिरत असेल अवकाशात. ह्याला सलग ११६ रात्री कुठुन गावल्या देव जाणे.
२. हमने देखी है, इन आखोंकी महकती "खुशबु"?
डोळ्याच्या ह्या सुवासिक तर्हा ही फक्त एका गुलजार ला कळतात. बाकी, मेडिकल कॉलेजमधे काय घंटा शिकवतात का?
३. सपने सुरिले सपने, कुछ हसके कुछ गमके, तेरी आंखोके साये चुराये रसिली यादोंने..
घोळ घोळ .. प्रचंड घोळ ...
(No subject)
हमने देखी है, इन आखोंकी महकती
हमने देखी है, इन आखोंकी महकती "खुशबु"?
बरोबर आहे ते.
प्यार मे दिवाने हो गये - सगळ्या संवेदनाच बदलल्या सारखे वाटतेय - नाकात सारखा त्याचा आवाज गुंजतोय, कानांसमोर सतत त्याचीच प्रतिमा आहे आणि डोळ्यांत त्याच्या डोळ्यांचा सुवास दरवळतोय असे ती खुबीने सांगतेय.
मस्त रे , फा!
फा आणी श्रद्धा, तूम्ही आय
फा आणी श्रद्धा, तूम्ही आय क्यु काढलाय का, नक्कीच २०० असेल.
अप्रतीम लिहिलय.
आजच फिल्मफेअर मधे कपिल शर्मा
आजच फिल्मफेअर मधे कपिल शर्मा म्हणालेला
तुने मेरा दुध पिया है तु बिल्कुल मेरे जैसा है
हे कस बरोबर नाही, किसीने भैस का दुध पिया होगा वो क्या भैस के जैसा दिखेगा
(No subject)
Pages