Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
विकी पेज इथे पाहाता येईल
ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तरुण सुकन्या आवडली आणि
मला तरुण सुकन्या आवडली आणि तरुण दिलीपही. दोघांनी सहज बेअरींग सांभाळलं आहे. फोन मात्र दुर्मिळ होता तेव्हा, ते मलापण खटकलं. पण सिच्युएशनला मदत म्हणून केलं असेल. त्या मित्राकडेपण फोन दाखवलाय. फोन इतके घरोघरी ९० च्या दशकात चालू झालेत.
'पिवळी कढी पितोय मेला' ह्या
'पिवळी कढी पितोय मेला' ह्या वाक्यावर जाम हसले मी. मोठ्याने रेडिओ लावून नुसते ओठ हलवून आईला झापल्याची अॅक्टींग करायची कल्पना पण अफलातून वाटली. पण मनकर्णिका येते तो एपिसोड चुकला माझा. काय दाखवलं त्यात? तिचं लग्न अजून व्हायचंय का?
मनकर्णिका, ग्लॅमरस आसावरी
मनकर्णिका, ग्लॅमरस आसावरी जोशी दाखवली आहे. तिचं तिसरं लग्न होणार आहे आता.
मालिकेचे टायटल साँग जितके
मालिकेचे टायटल साँग जितके मजेशीर आहेत तितकेच मालिका अचरट.
अगदीच अचरटपणाचा कळस असेल तर एकवेळ ते बघायला आवडते. पण ईथला अचरटपणा ईन्स्टॉलमेंटमध्ये येतो.
टाईमपास टू वाला हिरो लोकांनी कसा दोन अडीच तास सहन केला हे एक कोडे अजून सुटले नाही तोपर्यंत हा रोजच्या रोज दिसणार्या मालिकांतून घराघरात पोहोचून दुसरे कोडे घालून तयार.
घरी लागते म्हणून थोडीफार बघितली जाते. पण ते एक दुर्भाग्य म्हणू शकतो.
धागा दिसला तसे थेट प्रतिसाद टायपायला घेतला. आधीचे प्रतिसाद वाचले नाहीत. त्यामुळे ईथल्या लोकांचा मतप्रवाह कसा आहे या मालिकेबद्दल ते माहीत नाही. पण मालिका आवडणारेही नक्कीच असतीलच. एक आमच्या घरातच आहे. आमचा दादा. अचरटपणात तो देखील कमी नसल्याने त्याला हा हिरो आणि तो टाईमपास वन वाला प्रथमेश परब सुद्धा आवडतो
गंगाधर टिपरे देणार्या दिलीप प्रभावळकरांनी अश्या मालिकेत काम करावे, किंवा ते काम करत असलेल्या मालिकेचे दिग्दर्शन असे व्हावे हे काही फारसे रुचले नाही.
गंगाधर टिपरे देणार्या दिलीप
गंगाधर टिपरे देणार्या दिलीप प्रभावळकरांनी अश्या मालिकेत काम करावे >>> ते स्वतः लेखक आहेत. चु भु द्यावी घ्यावी त्यांनीच लिहीलेलं आणि कामही केलेलं नाटक आहे. त्याचीच मालिका केलीय आता.
म्हणून असेही लिहिले > किंवा
म्हणून असेही लिहिले > किंवा ते काम करत असलेल्या मालिकेचे दिग्दर्शन असे व्हावे > मला सादरीकरण नाही आवडले. हलकेफुलके निखळ विनोद अपेक्षित होते आणि त्यालाच साजेशी वातावरणनिर्मिती.
>>मनकर्णिका, ग्लॅमरस आसावरी
>>मनकर्णिका, ग्लॅमरस आसावरी जोशी दाखवली आहे. तिचं तिसरं लग्न होणार आहे आता.
बाप रे! काय तो आशावाद!
धन्यवाद ग!
काल मालूने नवर्याचा अनेक
काल मालूने नवर्याचा अनेक वर्षांपूर्वीचा खोटेपणा बरोबर उघडकीस आणला. कालचा एपिसोड आवडला मला.
टाईमपास टू वाला हिरो लोकांनी
टाईमपास टू वाला हिरो लोकांनी कसा दोन अडीच तास सहन केला हे एक कोडे अजून सुटले नाही तोपर्यंत हा रोजच्या रोज दिसणार्या मालिकांतून घराघरात पोहोचून दुसरे कोडे घालून तयार.
>> आता तो "चला हवा येऊ द्या" मध्ये पण आहे
मला आवडतेय ही मालिका.
मला आवडतेय ही मालिका. प्रियदर्शनने यंग प्रभावळकर चांगले सादर केलेत. उगाच टेक्निकल गोष्टींत न अडकता मालिका पाहिली तर छान वाटतेय. नयना आपटे _/\_
मला आवडतेय ही मालिका.
मला आवडतेय ही मालिका. प्रियदर्शनने यंग प्रभावळकर चांगले सादर केलेत. उगाच टेक्निकल गोष्टींत न अडकता मालिका पाहिली तर छान वाटतेय. नयना आपटे _/\_ >>>>> +१
मला पण तरुणपणीच्या बोक्याचं
मला पण तरुणपणीच्या बोक्याचं काम आवडलं! आवाज त्याचा आहे की दिलीप प्रभावळकरांचा ?!
त्याचाच आवाज आहे. पण त्याने
त्याचाच आवाज आहे. पण त्याने ती स्टाईल मस्त घेतलीये बोक्याची
त्याने ती स्टाईल मस्त घेतलीये
त्याने ती स्टाईल मस्त घेतलीये बोक्याची >>> करेक्ट.
अगदी. दि.प्र. ना ट्फ फाईट आहे
अगदी. दि.प्र. ना ट्फ फाईट आहे त्याची अॅक्टिंग. जबरदस्त निरिक्षण केलेय त्याने बोक्या ह्या पात्राचे.
मला तो प्रि.जाधव अजिबातच
मला तो प्रि.जाधव अजिबातच आवडला नाही टाइमपास २ मधे पण इथे दिलिप प्रभावळकरची स्टाइल भारी उचलली आहे.
आधी वाटलं प्रभावळकरनीच डबिंग केलय कि काय पण प्रि.जा. स्टँडप कॉमेडी वाला असल्यानी त्यानी आवाजाची कॉपी , कॅरॅक्टरच्या लकबी बरोबर अॅडॉप्ट केल्या आहेत !
येस, प्रियदर्शन मला च ह ये
येस, प्रियदर्शन मला च ह ये द्या मधे नाही आवडला आत्ता दोन दिवस अँकरींग केलं ते, पण चु भु मधे परफेक्ट कास्टींग वाटतंय. टाईमपास २ मात्र नाही बघावासा वाटला.
>>आधी वाटलं प्रभावळकरनीच
>>आधी वाटलं प्रभावळकरनीच डबिंग केलय कि काय पण प्रि.जा. स्टँडप कॉमेडी वाला असल्यानी त्यानी आवाजाची कॉपी , कॅरॅक्टरच्या लकबी बरोबर अॅडॉप्ट केल्या आहेत
खरं की काय. मला तर वाटलं प्रभावळकरांचाच आवाज आहे. कमाल आहे मग.
ह्यांचं चहा पिणं पाहून
ह्यांचं चहा पिणं पाहून 'रात्रीस खेळ चाले' ची आठवण होते. प्रत्येक एपिसोडमध्ये त्या नानीला एकदा तरी चहा देतात.
झी मराठी आणि चहा अतूट नाते
झी मराठी आणि चहा अतूट नाते आहे.
झी मराठी आणि चहा अतूट नाते
झी मराठी आणि चहा अतूट नाते आहे.>>> हो ना, मानबा मध्ये तर सलग दोन एपिसोड चहावर आधारित होते
अधून मधून बघतेय .
अधून मधून बघतेय .
प्रिजा आला की मज्जा येते .
सॉल्लिड बेअरिन्ग घेतलयं त्याने .
जुनी मालू पण छान
मस्तच. मेन कलाकार सगळेच कामं
मस्तच. मेन कलाकार सगळेच कामं छान करतायेत. सुकन्यापण न बोलता भाव छान दाखवते. आजचा एपिसोडपण धमाल होता.
>>>सुकन्यापण न बोलता भाव छान
>>>सुकन्यापण न बोलता भाव छान दाखवते.--
हो मुरलेली बायको, सुन, आई अशा सगळ्या भुमिका छान दाखवते ती. नानी त्या मोलकरणीवर खेकसतात तेव्हा मस्तं सांभाळते दोघींना.
कामं सगळेच छान करतात. पण
कामं सगळेच छान करतात. पण पार्श्वसंगीताची फार कटकट होते, म्हणून मी ही मालिका बघणं सोडून दिलं. (पण हा माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. अनेकांना त्यामुळेच मजा येत असेलही.)
तरुणपणाच्या मालतीचा रोल
तरुणपणाच्या मालतीचा रोल करण्याऱ्या अभिनेत्रीचे काय नाव आहे ? आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतेय ..
तरुणपणाच्या मालतीचा रोल
तरुणपणाच्या मालतीचा रोल करण्याऱ्या अभिनेत्रीचे काय नाव आहे ? आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतेय ..>>> हो गं जाई, मीपण आठवतेय कुठे पाहीलं आधी हिला. गोड आहे ती.
तरुणपणाच्या मालतीचा रोल
तरुणपणाच्या मालतीचा रोल करण्याऱ्या अभिनेत्रीचे काय नाव आहे ? आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतेय >>
3D मध्ये आली होती ती काही एपिसोड.. मिनलची मैत्रीण म्हणून.. नाव विसरले..
3D मध्ये आली होती ती काही
3D मध्ये आली होती ती काही एपिसोड.. मिनलची मैत्रीण म्हणून >>> हा बरोबर ती डॉक्युमेंटरी करायला आली होती. गुड मेमरी कच्चा लिंबु.
मुळ नाटक खुप आटोपशीर आणि छान
मुळ नाटक खुप आटोपशीर आणि छान होते. अजुनही त्यातील प्रसंग लक्षात आहेत. त्यामानाने ही मालिका खुपच फिकी पडली आहे
Pages