काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.
खेळ बघत असताना काही रँडम विचार मनात येत होते, तेच ईथे मांडतोय.
ईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाणवतं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय. गेम सुरू व्हायच्या आधी अमेरिकन एअरफोर्स ची विमानं स्टेडियम वरून उडत जातात. सुरूवातीच्या राष्ट्रगीताच्या वेळी स्पेस-स्टेशन मधले अंतराळवीर वगैरे सुद्धा दाखवतात. राष्ट्रगीत म्हणायला कुणातरी सेलिब्रीटीज ची निवड होते. काल तर टॉस करायला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सपत्निक आले होते. मध्यांतरातला 'हाफ टाईम शो' हा एक महत्वाचा मानबिंदू असतो. काल लेडी गागा चा शो सुद्धा परंपरेला साजेसा नेत्रदिपक झाला. हा शो चालू असताना, आत्ता ईथे एक फूटबॉल ची मॅच चालू होती, किंवा ह्या मध्यंतरानंतर पुन्हा सामना चालू होणार आहे ह्याच क्षणभर विसर पडावा ईतका भव्य देखावा उभारला जतो. सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत. ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. सामान्य प्रेक्षकांमधे, सूपरबोल पार्टीज त्यातला पिझ्झा-विंग्ज-बीअर असा 'पारंपारिक मेन्यू' असं एक वेगळच वातावरण तयार होतं सगळीकडे. मस्त वाटतं.
मग एक प्रश्न पडला की भारताला असं एकत्र बांधून ठेवणारा धागा कुठला? भाषा नाही, क्रिकेट सुद्धा आपण समजतो तितकं नाही. कितपत क्रिकेट चे चाहते रणजी, ईराणी वगैरे करंडक फॉलो करतात माहीत नाही, पण फारसे नसावेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पण मग तो काही फक्त भारताचा सोहळा रहात नाही.
गेल्या अनेक वर्षात असं दूरदर्शन ला मोठ्या प्रमाणात, भारतभर पसरलेल्या जनतेला बांधून ठेवणार्या दोनच गोष्टी मला आठवल्या - रामायण आणी महाभारत. (नंतर चा अपवाद सचिन च्या बॅटींग चा). ह्या दोन मालिकांमधे नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर भावनिक गुंतवणूक होती. फर्स्ट ऑफ अ काईंड असण्याचा फायदा तर मिळालाच. पण तरिही त्यापलिकडे जाऊन मोठ्या प्रमाणात लोकं त्या कथांशी भावनिक पातळीवर गुंतली होती. त्या कथानकांशी, त्यातल्या पात्रांशी आपलेपणा वाटला होता. रविवारी सकाळी टीव्ही वर रामायण आणी नंतर महाभारत लागायचं तेव्हा कर्फ्यू लागला आहे असं वाटावं ईतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते ओस पडत. ही परिस्थिती बर्याच ठिकाणी होती. ह्या दोन सिरियल्स च्या टीव्ही वरच्या ब्रॉडकास्टिंग च्या वेळेनुसार लग्ना-मुंजीचे मुहूर्त पुढे-मागे ढकलले गेल्याच्या कथा आणी अनुभव आहेत.
भारताचा सर्वसमावेशक धागा, रामायण आणी महाभारत च आहे का? माबोकरांचे प्रतिसाद वाचायला आवडेल.
"अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव
"अणुयुद्ध टाळण्याचा एकमेव इलाज रे" राजकारण्यांवर टी़का करणे हा कॉमन धागा आहे प्रत्येक भारतीयाला बांधणारा रे !
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारत पाक मॅच
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारत पाक मॅच >+१
तसेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधिल अंतिम सामना ज्यात भारत एक प्रतीस्पर्धी असेल तर सूपरबोल सारखेच वातावरण असते आणि त्यात जर सामना भारतात असेल तर मात्र विचारायलाच नको.
ड्राय डे ?
ड्राय डे ?
"विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची
"विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची भारत पाक मॅच" - मी शक्यतो आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स टाळत होतो. अन्यथा, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच हा तर भारतातला सगळ्यात मोठा 'देशप्रेम शोकेस डे' असतो.
पण अमेरिकेत जेव्हढा फूटबॉल
पण अमेरिकेत जेव्हढा फूटबॉल आहे त्याच प्रमाणात भारतात क्रिकेट हा भारतीयांनां बांधून ठेवणारा धागा आहे असं मला तरी वाटतं.
>> मग एक प्रश्न पडला की भारताला असं एकत्र बांधून ठेवणारा धागा कुठला? भाषा नाही, क्रिकेट सुद्धा आपण समजतो तितकं नाही. कितपत क्रिकेट चे चाहते रणजी, ईराणी वगैरे करंडक फॉलो करतात माहीत नाही, पण फारसे नसावेत
हे वाचून मला कळलं नाही की तुम्हाला सुपरबोल बद्दल लिहायचं आहे की फूटबॉल ह्या खेळाबद्दल. कारण मग अमेरिकेतही सुपरबोल जितके लोक त्यातल्या विविध आस्पेक्ट्स करता बघतात तितका कॉलेज फूटबॉल किंवा अन्य फूटबॉल बघतात का असा प्रश्न मला पडला.
"अमेरिकेतही सुपरबोल जितके लोक
"अमेरिकेतही सुपरबोल जितके लोक त्यातल्या विविध आस्पेक्ट्स करता बघतात तितका कॉलेज फूटबॉल किंवा अन्य फूटबॉल बघतात का " - चांगला मुद्दा आहे. कॉलेज फूटबॉल देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. बरेच वेळा असं पाहिलय की कॉलेज फूटबॉल मधे कुणाचा तरी कुणीतरी खेळत असतो, ज्याच्यामुळे त्याला जर पर्सनल टच येतो.
क्रिकेट चा मी मोठा फॅन आहे हे सत्य आहे. एज ग्रूप क्रिकेट पासून, रणजी, दुलीप, ईराणी (भारतातलं डोमेस्टीक क्रिकेट) ते आंतरराष्ट्रीय असं सगळं मोठ्या प्रमाणात फॉलो करतो आणी जमेल तितकं बघतो. पण बरीच लोकं भेटतात की ज्यांच्या बोलण्यात 'हल्ली ईतकं क्रिकेट फॉलो करणं जमत नाही' 'तू अजून क्रिकेट बघतोस?' 'पहेले देखते थे यार, वह फिक्सिंग का हुआ, तब से मन नही करता' वगैरे ऐकायला मिळाल्यापासून क्रिकेट तो धागा आहे का असा प्रश्न पडायला लागला.
तुमचं एक्स्प्लनेशन
तुमचं एक्स्प्लनेशन पटण्यासारखं आहे. पण तरिही मी अमेरिकेत गेले सोळा वर्षं आहे आणि माझ्या संपर्कातले खूप कमी लोक सुपरबोल सोडला तर फूटबॉल फॉलो करतात. अर्थात हे एखाद्या बबल मध्ये असल्याचं लक्षण नाकारता येत नाही. पण असंही वाटतं की अशा प्रकारचे खूप बबल्स असावेत इकडे इकडच्या विविधतेमुळे जसे भारतातही आहेतच.
माझंही आता क्रिकेट बघणं होत नाही कारण इझी अॅक्सेस नाही आणि जेव्हा बघायचे तेही लिमीटेड कारण कदाचित तुमच्यासारखी डाय हार्ड फॅन नसावे मी क्रिकेट ची. आणि तेव्हाही आई बाबा इत्यादी ह्यांची क्रिकेटची आवड, माझ्या भावाची क्रिकेटची आवड आणि माझी आवड ह्यात बराच फरक होता. तोच फरक इथेही दिसतो फूटबॉल च्या बाबतीत असं वाटतं. परत बबल आर्ग्युमेन्ट आहेच पण तरिही माझ्या म्हणण्यात थोडंफार तथ्य आहे असं मात्र वाटतं.
(सुपरबोल चा एक्स्ट्राव्हॅगन्स मला मनापासून अपील होत नाही पण तरी कधीतरी बघते, आणि माझ्यासारखे एकंदर फूटबॉल, सुपरबोल फारसे न फॉलो करणारे खूप आहेत आजूबाजूला हे दिसतंय).
बबल असू शकतो. मी काही भाग असे
बबल असू शकतो. मी काही भाग असे पाहिले आहेत जिथे कॉलेज फूटबॉल चं प्रस्थ प्रचंड आहे. घरचं कार्य असल्यासारखे लोक वागतात. आणी काही ठिकाणी एनएफएल, फँटसी टीम्स वगैरे चा गदारोळ असतो.
अरे तुम्ही दोघे कुठल्या
अरे तुम्ही दोघे कुठल्या स्टेट्स मधे आहात ते बघा म्हणजे कॉलेज फूटबॉलच्या फॉलोइंगची संगती लागेल.
असामी,
असामी,
मी आता तेच लिहीणार होते. इथे बे एरियात काही ठराविक लोक सोडले तर नेमाने कॉलेज फूटबॉल फॉलो करणारे कमीच. जिकडे अशी बे एरियातल्यासारखी डायव्हर्सिटी आहे तिकडे फूटबॉल बरोबरच इतर अनेक वेगवेगळे धागे सापडतील लोकांनां बांधून ठेवणारे
पण रामायण आणि महाभारत ह्याबद्दल मात्र अनुमोदन. त्या दोन टि व्ही सिरीयल्स नी खरंच भारतीयांनां एकत्र आणलं असं म्हणायला वाव आहे.
"अरे तुम्ही दोघे कुठल्या
"अरे तुम्ही दोघे कुठल्या स्टेट्स मधे आहात ते बघा म्हणजे कॉलेज फूटबॉलच्या फॉलोइंगची संगती लागेल.' -
बे एरिया मधे खरच खूप डायव्हर्सिटी आहे. मागे एकदा मॅनहटन सोडून जास्तीत जास्त लांब म्हणजे जर्सी सिटीला (रहायला) आणी अटलांटीक सिटी ला विकेंड ला जाणारा एक मित्र भेटायला आला असताना त्याला कल्चर शॉक बसला होता. आणखी एक डोस द्यावा म्हणून त्याला वॉलमार्ट ला घेऊन गेलो होतो. ते ४ दिवस कसेबसे काढले त्याने.
खरं आहे.
खरं आहे.
टायटल वाचून रामायण महाभारताशी संबंध जोडणारा विनोदी लेख असेल वाटलेलं.
"टायटल वाचून रामायण
"टायटल वाचून रामायण महाभारताशी संबंध जोडणारा विनोदी लेख असेल वाटलेलं. " - जे जमतं तेच काम माणसानं करावं. फारएण्डासारखा प्रतिभा असलेल्यांनी विनोदी लेखनाचा मार्ग धरावा. ऋन्मेष सारखी कला असेल तर शतकी-महाशतकी धागे काढवेत. आम्ही पामर फक्त मनात आलेले विचार - आळसानं बोटांवर मात केली नाही - तर ईथे टंकणार.
>>पहेले देखते थे यार, वह
>>पहेले देखते थे यार, वह फिक्सिंग का हुआ, तब से मन नही करता'
असंच एकजण काल डिफ्लेट गेट बद्दल म्हणाला. अमेरिकन फुटबॉल बद्दल काहीच माहिती नसल्यामुळे गुगल करून बघावं लागलं हा काय प्रकार आहे.
इंटरेस्टिंग. भारतात असा
इंटरेस्टिंग. भारतात असा वार्षिक "देशी" इव्हेण्ट नसेल एकच. भारत-पाक ची मॅच किंवा वर्ल्ड कप च्या महत्त्वाच्या गेम्स हेच त्यातल्या त्यात जवळचे उदाहरण.
क्रिकेटमधला इंटरेस्ट कमी झाल्याचे मला जाणवले नाही. भारतात तर नाहीच पण अमेरिकेतील भारतीयही. याउलट गेल्या काही वर्षांत क्रिकेट इथेही लोकांना सहज बघायला उपलब्ध झाल्याने "स्कोअर बघणारे" लोक पूर्वीपेक्षा खूप वाढलेत. ९० च्या दशकात व त्या आधी इथे आलेल्या लोकांचे क्रिकेट कनेक्शन बर्यापैकी तुटले होते. ते नंतरच्या लोकांचे झाले नाही.
स्वातंत्र्ययुद्ध?
स्वातंत्र्ययुद्ध?
"स्वातंत्र्ययुद्ध?" - त्या
"स्वातंत्र्ययुद्ध?" - त्या विषयी च्या मतमतांतराचं जाळं प्रचंड मोठं आहे. त्यातून थोडेसे राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी लाभलेले नेते / क्रांतीकारक सोडले, तर सगळा आनंद आहे. 'महानायक' च्या प्रस्तावनेत विश्वास पाटलांनी लिहीलय की सुभाषचंद्र बोस ह्या विषयावर रिसर्च करायला सुरूवात केल्यावर त्यांना जाणवलं होतं की खुद्द बंगाली माणसांत सुद्धा सुभाषबाबूंविषयी गैरसमज आणी कन्फ्युजन आहे.